नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*
नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*
प्रमोद शिंदे ( नातेपुते )नातेपुते तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे जय्यत तयारी नातेपुते येथे सुरू करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राम सातपुते हे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सभेचे नातेपुते येथील पालखी मैदान येथे पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या तयारीसाठी स्वतः माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष घातले असून या तयारीसाठी शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील तसेच नातेपुते येथील सोलापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख सरपंच भानुदास राऊत ,मामासाहेब पांढरे माऊली पाटील दादासाहेब उराडे ,व परिसरातील नेतेमंडळी स्वतः पालखी मैदान वरती सभेची तयारी करत असताना दिसून येत आहेत सभेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कमतरता भासू नये याची काळजी मोहिते पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते घेत असल्याचे दिसत आहे. या सभेसाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे या सभेसाठी बारामती एडिशनल एस.पी तसेच 2 डी.वाय.एसपी 12 अधिकारी व 170 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली