नातेपुते-दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण* खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- एन डी एम जे*
नातेपुते दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्र
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते- दहिगाव हा रस्ता जणूकाही मृत्यूला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे कारण नातेपुते दहिगाव रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. या अपघातात लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो .रस्त्यामध्ये एक-एक दोन-दोन फुटाचे मोठे खड्डे पडले असून हे खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत वर्षातून दोन-तीन वेळा लाखो रुपयांचे टेंडर काढून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात केला जाते सध्या नातेपुते दहिगाव रस्त्याचं मोठ काम चालू आहे यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून काम पूर्ण होण्यास बराच कालावधी जाणार आहे परंतु सध्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असल्याने सतत अपघात होत आहेत. या खाड्या संदर्भात संबंधित पीडब्ल्यूडी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता तात्पुरते त्यांनी खड्डे भरण्याचे मोहीम हाती घेतली आहे. परंतु हे खड्डे मातीने भरले जातात त्यामुळे माती पाऊस पडल्यानंतर निघून जाणार आहे. पुन्हा या ठिकाणी खड्डा पडून चिखल होऊन गाडीचा अपघात होऊ शकतो व त्या ठिकाणी एखादी व्यक्ती प्राण गमवू शकते म्हणून हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देत आहे जर या रस्त्यावरती अपघात होऊन एखाद्या व्यक्ती चा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल जनतेतून होत आहे. तसेच लवकरात लवकर खडी आणि डांबराने खड्डे भरले नाहीत तर पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, एन.डी.एम.चे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे व पदाधिकारी आंदोलन करून रस्त्यांमध्ये वृक्षारोपण करणार तसेच अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली