महायूती व महाआघाडीत माळशिरस तालूक्यात चुरस
–
खडूस (रजनी साळवे) देशात व राज्यात सत्ता परिवर्तन होताना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालूक्यातही विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाची लाट टिकेल की , राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाची लाट टिकेल , म्हणजेच दुसऱ्या शब्दात माळशिरस तालूक्याच्या मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील व नरेद्रमोदीच्या प्रतिमेलाच मते दिली . तशीच ती स्थानिक पातळीवर आता विधानसभा निवडणूकीतही देतील का ? ., या प्रश्नाच्या उत्तरावरच माळाशिरस तालूक्याच्या आमदारपदाची सूत्रे कोणाकडे जाणार ते ठरणार आहे .
या प्रश्नाचे उत्तर होकार अर्थी आलेतर भाजपाच्या अगदी नवख्या काल , परवा पक्षात
आलेल्या उमेदवाराकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाजलेल्या उमेदवाराचा सहज आश्चर्यकारकरीत्या पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष हा शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने माळशिरस तालुक्यात पुन्हा सत्तेवर बसेल आणि ते उत्तर नकारार्थी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता हस्तगत करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकलूज येथे ज्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली त्या उमेदवाराने विजय मिळविला. त्यातही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्वतःचे हक्काचे मतदान ही जमेची बाजू ठरली होती आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणूक विजयानंतर माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात पक्षसंघटना मजबुतीकरण करण्यास लक्ष घातले आणि मजबूत करण्याचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणूक पार झाली आणि पक्ष मजबूत करण्याचा मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थेट पाचारण करण्यात आले या विधानसभा निवडणुकीत उमेदवार भाजपलाच निवडून द्या व एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच निवडून द्या असे साकडे गल्लीतही व वाड्या-वस्त्यांवरही मतदार राजांना घालण्यात आले माळशिरस मतदार नेमका काय करेल तो पुन्हा नमो नमहा म्हणत भाजप पक्षाला एकतर्फी विजय मिळवून देईल का ? की स्थानिक पातळीवर वेगळा विचार करून ग्रामीण भागात सहकार क्षेत्रावर वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देईल .याची उत्सुकता आता लागली आहे या निवडणुकीतील प्रमुख पक्षांमधील फोडाफोडी सुरू झाली ती काही गोष्टी गृहीत धरूनच त्यानंतर उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात मात्र भाजप पक्षाने अकारण चुकीच्या खेळी केल्या बाहेरून आयात उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यातही पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून तालुका बाहेरील व्यक्तीस उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार हा मुद्दाही पक्ष प्रतिमेला मारक ठरला त्याचा विपरीत परिणाम पार्श्वभूमीचे उमेदवार दिलेल्या प्रभागात नव्हे तर सर्व तालुक्यात झाला दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने हबकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात खूपच कौशल्य वापरल्याचे दिसून आले स्थानिक आणि प्रभावी उमेदवार निश्चित केला गेला . ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व असल्याकारणाने वर्चस्व प्रस्थापित करीत खणखणीत प्रभावी उमेदवार दिला गेला त्यामुळे प्रचारात अन्य मुद्दे यापेक्षा भाजप उमेदवार हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला .भाजपने मात्र विकासाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजवटीतील कमकुवत मुद्देही मांडले अर्थात कार्यकर्ता हा मोहिते-पाटलांचा आत्मा असल्याने प्रदीर्घकाळ सत्तेची सूत्रे सांभाळलेल्या मोहिते-पाटील घराण्याची अस्तित्वाची लढाई आहे मतदार गृहीत धरून आखाडे बांधले तर तोंड पोळून घ्यायची वेळ येते .हे या पूर्वीच्या अनुभवावरून दिसून आले आहे त्यामुळे आयात उमेदवार व स्थानिक उमेदवार यामध्ये कोणाची सरशी होणार यावरच येणारा निकाल अवलंबून आहे.