महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्रीकांत उत्तम बावीस्कर यांची नियुक्ती


         पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्रीकांत उत्तम बावीस्कर यांची निवड करण्यात आली.श्रीकांत बाविस्कर हे नातेपुते परिसरातील बापू म्हणून परिचित असून गेली वीस वर्ष ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेवर काम करीत आहेत.ते सध्या सोलापूर जिल्ह्याचे ग्राहक मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.तसेच त्यांनी सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद या शासकीय कमिटीवर सहा वर्षापासून व अशासकीय सदस्य म्हणून काम करत आहे.त्यांनी अनेक वर्ष दैनिक लोकमत, पुढारी या दैनिकात काम केलेआहे.सध्या ते दैनिक शिवनिर्णयचे पत्रकार म्हणून काम करीत आहेत. तसेच ते लक्षवेध न्यूज चॅनेलचे संपादक तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी  २८ जुलै रोजी नियुक्ती झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.श्रीकांतबावीस्कर नियुक्ती झाल्यानंतर म्हणाले की ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांची सोडवणूक करणे तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताला प्रति दिवशी ६०० रुपयांपासून १ लाख रुपये दंड करण्याचे अधिकार या पदावरील व्यक्तीला असतात या पदाचा लोकांच्या हितासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वापर करीन.या मंचचे सदस्यपद हे शासकीय पद आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीबद्दल एन.डी.एम जे चे राज्य महासचिव आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य  ऍड डॉ केवलजी उके, आमदार राम सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, धैर्यशील मोहिते-पाटील, एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते, संपादक प्रमोद शिंदे,सरपंच सौ कांचनताई  लांडगे,उपसरपंच अतुल पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण काळे.इत्यादींनी अभिनंदन करून सत्कार केला.

You may have missed