कल्याण येथे कवी मधुकरजी घुसळे यांच्या स्मृति निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव –कल्याण येथे महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
“सोनियाची उगवली सकाळ…” या भिमगीताचे गीतकार महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित वालधुनी- कल्यान येथे आयोजित ‘निखळला तारा..’ या कार्यक्रमा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना “महाकवी मधुकरजी घुसळे समाजभूषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य आयोजक आयु.संदीप घुसळे यांनी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आयु.सुरेश घोडेराव यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले होते.
याकार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना एन.डी.एम.जे. संघटनेचे राज्यमहासचिव डॉ. केवलजी उके साहेब् यांनी “दिवंगत मधुकरजी घुसळे यांनी लिहिलेली अनेक सांस्कृतिक व बुद्ध-भीमगीते ही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांनी गाईली आहेत. या गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे, त्यांचे नाव हे नक्कीच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल” असे म्हटले.
यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष आयु.बंदेश सोनावणे व प्रदेश सचिव आयु.शशिकांत खंडागळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु.विजय कांबळे, जिल्हा सचिव आयु.विनोद रोकडे, जिल्हा सहसचिव आयु.सुनील ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष आयु.संतोष बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आयु.संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष एड. प्रविण बोदडे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष आयु नितेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

