एन.डी.एम.जे. ठाणे जिल्ह्या चे प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव यांचा करत वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा
एन.डी.एम.जे. ठाणे जिल्ह्या चे प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव यांच

वाढदिवस अनेक सामाजी
उपक्रमांनी साजरा..
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोनवणे ठाणे दि.१\१\२०२२रोजी
ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व संकटकाळात पीडितांच्या मदतीला धाव घेणारे , गरजूंना मायेची साथ देणारे, अन्याला वाचा फोडणारे सर्वधर्मसमभाव जपणारे अशी भूमिका घेऊन, अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग व्यक्तिमत्व पत्रकारिता मध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे कार्यकुशल सोशल न्युज नेटवर्कच्या माध्यमाने सरकारला धारेवर धरणारे पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे प्रतिनिधि व नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मुरबाड तालुक्यातील आंबेगावचे मूळ रहिवाशी पत्रकार संदेश तुकाराम भालेराव यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजीक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा केला.

संदेश भालेराव यांना नॅशनल दलित मुव्हमेट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क ,बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था वंचित बहुजन आघाडी ,AISCST नॅशनल रेल्वे यूनियन यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.
सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार संदेश भालेराव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास ठाणे जिल्ह्यातील एन.डी.एम.जे. जिल्हा अध्यक्ष मा.विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे .ठाणे जिल्हा सचिव विनोद एस रोकडे, एन.डी.एम.जे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अँड. प्रविणजी बोदडे ह्यांच्या उपस्थितीने सर्व प्रथम बूद्ध वंदना घेउन संदेश भालेराव यांचा वाढदिवसाचा केक कापुन शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या मंगल कामना व्यक्त करून पुढील कार्यास मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच आदरणीय.डॉ.केवलजी उके राज्य महासचिव एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य, मा.वैभवजी गिते राज्य सचिव,
मा पी.एस.खंदारे राज्य सहसचिव, मा.प्रमोदजी शिंदे राज्य प्रसिद्धीप्रमुख व एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य सर्व सन्माननीय सभासद व पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सोशियल मिडीया द्वारे वाढदिवसा च्या शुभेछा दिल्या.
वाढदिवसाचे औचित्य साधून मा.ॲड.डॉ.केवलजी उके राज्य महासचिव एन.डी.एम.जे. यांच्या अदेशानुसार विनोद रोकडे यांच्या संयोजनांने व एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजय कांबळे व ॲड.प्रविणजी बोदडे,यांच्या उपस्थितीत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य (एन.डी.एम.जे) या सामाजिक संघटनेचे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथे राज्यस्तरीय दुसरे महा अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात
एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य संघटने कडून संदेश भालेराव यांना छत्रपती शिवाजी महाराज बहुजन नायक पुरस्कार व सन्मानचिन्ह घोषित केले .
व त्यांचा गौरव करण्यात आला. संदेश भालेराव यांनी आज आपल्या जन्मदिनी अनेक सामाजीक उपक्रम राबवून वाढदिवसाचा अनाठायी खर्च कमी करूण शालेय विद्यार्थीना पेन पेन्सिल वाटप केले वआपला वाढदिवस साजरा केला.
ह्या कार्यक्रमात उपस्थित मा. नथुरामजी मोहिते,श्रीधर शिंदे,विक्रम जाधव, कपिल पगारे,विजय निकाळजे,सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव, शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते