पुरोगामी महाराष्ट्र च्यावतीने जि.प.शाळा पिरळे येथे सावित्री बाई जयंती नमित्त वही-पेनचे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे. प्रमोद शिंदे च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वही-पेन चे वाटप करण्यात आले.जि.प.शाळा पिरळे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.जयंतीनमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणत आले विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा खेळाच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एन.डी.एम. जे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरळे गावच्या विद्यमान सरपंच अलका नरोळे ह्या होत्या सावित्रीबाई जयंती निमित्त शाळेच्या वतीने गावातील महिला यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ढवळे सर व मुल्ला मॅडम यांनी सावित्रीची ओवी तसेच प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली या वेळी भाऊसाहेब भिसे सर,प्रमोद शिंदे,विश्वास बनकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आनंदराव लवटे, संदीप पवार,नितीन खिलारे व सदस्य उपस्थित तसेच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढवळे सर,जब्बर मुलानीसर, खरात सर, निगडे सर,मुल्ला मॅडम,नामदेव मॅडम, शेंडगे मॅडम यांनी परिश्रम घेतले.





