कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-

कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट मेहनत जिद्द व चिकाटी असावी हे असेल तर यश सहज संपादन करता येते शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती केली आहे.आपण प्रतिकूल परिस्थिती वर मात करून यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा मागे राहिले नाहीत या मुलांना घडविण्यात महिलांचे मोठे योगदान आहे. कोरोनामुळे शासनाने घेतलेल्या शाळा बंद निर्णयाला आमचा सुद्धा विरोध आहे. राज्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांनी एकत्र येऊ शाळा सुरु करण्यास शासनास पत्र देणार असून सर्वांनी कोरोनाचं पालन करावं नातेपुते परिसरातील सर्व क्षेत्रातील जीवन संघर्षमय आहे.अशाप्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
तसेच मुख्याधिकारी माधव खांडेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे अवांतर वाचन आहे ज्ञानार्जन घेता येते वाचनाने शब्दसंपत्ती नेते विद्यार्थ्यांनी रोजनिशी लिहायला शिकलं पाहिजे तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर मार्गदर्शन करताना म्हणाले की शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात आहे चांगला प्रयत्न केला तर अधिकारी होऊ शकतो. तसेच शिक्षक संघाचे सचिव संभाजी फुले म्हणाले की कोरोना च्या नावाखाली फक्त शाळाच बंद आहे बाकीच्या सर्व गोष्टी सुरू आहेत शाळेला बंधने का शाळा तात्काळ सुरु करावी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास बाबाराजे देशमुख ,मुख्याधिकारी माधव खांडेकर ,एपीआय मनोज सोनवलकर ,संभाजी फुले सर, ज्ञानदीप संस्थेचे मारुती ढोबळे, सर, ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत,लतीफ नदाफ, अभिमन्यू आठवले,विलास भोसले,मनोज राऊत आनंद जाधव श्रीराम भगत महाराज पालक विद्यार्थी शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमा चे आयोजन ITSC2020 इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम संस्थेने केले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार आनंद लोंढे,पल्लवी लोंढे,मॅडम सारिका वाघ मॅडम,अंकुश कर्चे यांनी परिश्रम घेतले .

कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-
शिष्यवृत्ती यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना नगरपंचायत चे मुख्य अधिकारी माधव खांडेकर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी मनोज सोनवलकर
शाळा सुरू झाली पाहिजे असं मनोगतात मागणी करताना शिक्षक संघाचे सचिव संभाजी फुले सर

You may have missed