राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करा मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे वैभव गीते यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई )-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 संशोधित अधिनीयम 2015 सुधारीत नियम 2016 नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात दोन बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे मुख्यमंत्री महोदयांनी या समितीची स्थापना करून तात्काळ उच्चअधिकाऱ्यांची बैठक बोलावून राज्यात बौद्ध दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्यावर वाढलेल्या अत्याचाराचा आढावा घ्यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी महाआघाडी करून सत्ता स्थापन करून मंत्रिमंडळाचे खातेवाटप सुद्धा झाले आहे त्यामुळे अधिक वेळ न घालवता दक्षता समितीची स्थापना करावी व न्याय करावा अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेबांनी केली आहे