सदाशिवनगर येथील रत्नत्रय संस्थेकडून पत्रकारांना एक लाखाचा विमा
नातेपुते (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नत्रय पतसंस्था व एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने पत्रकारांना एक लाखाचा अपघात विमा भेट म्हणून देण्यात आला.तसेच रत्नत्रय व दोशी परिवाराच्यावतीने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रप्रभू पतसंस्था नातेपुते चेअरमन राजेश शेठ शंकेश्वर हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दोशी बोलताना म्हणाले की ही संस्था सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी पत्रकारांचा सन्मान करते पत्रकार हा लोकशाहीचा कणा आहे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे तसेच पत्रकार गहिनीनाथ वाघबरे, श्रीनिवास कदम पाटील, लक्ष्मण वाघमोडे ,व अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रत्नत्रय संस्थेचे संस्थापक अनंतलाल दोशी ,चेअरमन विरकुमार दोशी, पत्रकार भगवान बनकर,आनंद शेंडगे,संजय हुलगे,प्रमोद शिंदे,विलास भोसले,प्रशांत खरात,बंडू पालवे,आप्पा कर्चे, वैभव शहा तसेच संस्थेचे पदाधिकारी शिक्षक,शिक्षिका,स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच पुरंदावडे येथील शितल एवळे या विद्यार्थिनी ची लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षिका यांना उपक्रमशील आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.