मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्व.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर आहे-मंगेश चिवटे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्व.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर आहे-मंगेश चिवटे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)+मुख्यमंत्री कार्यालय आरोग्य विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे हे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना फोंडशिरस येथे शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या विचारसरणीवर आधारित आहे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हीच कार्यपद्धती ते पुढे घेऊन जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समाजकारणाला महत्त्व देतात त्यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे.मुख्यमंत्री तरुणांना लाजवेल असं काम करीत करतातज्या ज्या वेळी मानव जातीवर संकट आले त्या त्यावेळी नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः दीडशे कार्यकर्त्यांसह केरळ व कोल्हापूर येथील महापुरात लोकांना मदत केली आहे. स्वतः शिंदे साहेब कमरे एवढ्या पाण्यामध्ये जाऊन लोकांना कपडे अन्न लागणारे औषध देऊन मदतीचा हात दिला आहे.साडेतीन लाख रुग्णांवर उपचार करण्याचे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब हे वेगवेगळ्या हॉस्पिटल ला भेट देऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आजपर्यंत साडेतीन हजार लोकांवर उपचार केले आहेत. माळशिरस तालुक्यात सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी उभारण्यात आलाआहे.कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली पाहिजे शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर म्हणाले की तालुक्यातील आम्ही सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब शिवसेना प्रमुख शिवाजी सावंत साहेब जिल्हाप्रमुख शेवटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ताकतीने काम करेल व आपल्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे बोलत होते.या कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख नगरसेवक संतोष आबा वाघमोडे नगरसेवक गेजगे, सतीश सपकाळ, शिवसेना शहरप्रमुख समीर शेख,दादाभाई मुलांनी,जावेद शेख, सरपंच पोपटराव बोराटे शहरप्रमुख संतोष गोरे, सूत्रसंचालन गोरे यांनी केले.


