एन डी एम जे आंदोलनाचा दणका, आंदोलनानंतर बांधकाम विभागाला आली जाग, खड्डे बुजवण्याचे काम सुरू
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)–पिरळे-फोंडशिरस व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त व्हावेत म्हणून एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमोद शिंदे यांच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर बांधकाम विभागाने याची दखल घेत तात्काळ पिरळे-फोंडशिरस, पिरळे-दहिगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.प्रसंगी या खड्ड्यांमुळे अपघातालाही सामोरे जावे लागत होते.तसेच या ठिकाणी अनेक लोकांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाले आहे.वेळोवेळी बांधकाम विभागाला सांगून देखील याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत होते.आंदोलनानंतर बांधकाम विभागाला जाग आली व तात्काळ खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले.सदर आंदोलनास माळशिरस तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच पिरळे,फोंडशिरस, एकशिव,तांबेवाडी येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता.

राहिलेले रस्त्यांचे खड्डे हे पाऊस थांबल्यानंतर दुरुस्त करण्याच्या आश्वासन संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.जर राहिलेले पश्चिम भागातील रस्ते वेळेत दुरुस्त झाले नाहीत तर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.

