शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण करून त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

