Blog

समाजातला शेवटचा घटक हाच केंद्रबिंदू माना……हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –


शिवसेनेच्या भांबुर्डी ओबीसी शाखा उद्घाटन प्रसंगी राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी व्यासपीठावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख शंकर वाघमोडे माळशिरस तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख नातेपुते शहर प्रमुख रवी दादा वाघमारे प्रभाग 13 चे प्रमुख राजू शेख दहीगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे मनोजजी वेदपाठक त्याचबरोबर भांबुर्डी शाखेचे सर्व नेते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हिवरकर पाटील म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं काम महाराष्ट्राला विसरता येणार नाही लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटनवारी योजना असेल मारी सशक्ति करण्यासाठी बचत गटासाठी केलेले सर्व मोठे निर्णय असतील शेतीपूरक उद्योगांसाठी चे बाबतीतले निर्णय असतील कामगारांच्या बाबतीतली निर्णय असतील महाराष्ट्रात झालेली परकीय गुंतवणूक असेल या सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त एकनाथ शिंदे नावाचं हास्य दिसून येतं पक्ष आणि संघटना मजबूत करत असताना आपणाला समाजातला शेवटचा घटक आणि त्या घटकाला आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे दुर्लक्षित राहिलेला लहान लहान समाज आहेत ते आपल्या सोबत जोडून पक्ष बळकट करण्याची जबाबदारी सर्व नेते पदाधिकाऱ्यांची आहे त्यांची काम आहेत कुणाचे आरोग्याचे काम आहे ऑपरेशन असतील तहसील मधले काही दाखले असतील शेतकऱ्यांच्या सातबारा व इतर अडचणी असतील संजय गांधी निराधार योजना असेल यांच्या हक्काची शिवसेना झाली पाहिजे मग ती सर्व लोक शिवसेनेच्या हक्काचे होतील ह्यातं शंका नाही राज्यात पूरस्थिती चालू असल्याच्या कारणांना सोलापूर जिल्ह्यातील बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बोर्डच्या फॉर्म ची सर्व कागदपत्र
भिजली तिचा आवाज एबीपी माझा ने संवेदनशील उपमुख्यमंत्री मा ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला शिंदे साहेबांनी तात्काळ आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना देत पूर्ण महाराष्ट्रातील बारावीच्या बोर्डची फॉर्म भरण्याची मुदत वाढवून देणारा संवेदनशील नेता फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत बघतो करतो विचारून तपासून सांगतो हा पॅटर्न कधी शिंदे साहेबांनी ठेवला नाही आणि आपण आपला जो पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढतोय ते फक्त आणि फक्त शिंदे साहेबांनी केलेलं काम लोकांना झालेली मदत आणि त्या मदतीची परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या जाती-धर्माची वेगवेगळ्या गावातील मायबाप जनता पक्षासोबत शाखेच्या निमित्ताने माध्यमातून जोडली जात आहेत शिंदे साहेबांनी केलेल्या कामांमुळे लोकांना अडचण आल्यावर फक्त एकनाथ शिंदे साहेब शिवसेना हक्काची वाटते यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारीहरिभाऊ कचेॅ (शाखाप्रमुख)
भाऊ साहेब देवकाते (उपशाखाप्रमुख)
नितीन सरगर (शहरप्रमुख)
आजिनाथ वाघमोडे (उपशहरप्रमुख)
आशोक ढेंबरे (संघटक)
संतोष शिंदे (समन्वयक)
वसंत सुर्यवंशी (पंचायतसमिती गण प्रमुख)
आबासाहेब बगाडे (उप गन प्रमुख )
शिवाजी वाघमोडे
नीतन सुतार
जयसिंग वाघमोडे
साहील मगर
अंकुश वाघमोडे
केतन लवटे पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते दिनांक येथील अक्षय शिक्षण संस्था नातेपुते संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते येथे प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख सहशिक्षक सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ संस्था पदाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . गोरे सर 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा कवितके सचिव दिलीप घुगरदरे प्रशाला समिती सभापती हनुमंत धालपे संचालक महेश ठोंबरे अतुल बावकर अभिजीत घुगरदरे अँड. भारत उराडे हे मान्यवर उपस्थित होते. मनोगतात गोरे सर यांचा गुणगौरव करताना शांत संयमी स्वभावाचे गोरे सर यांनी समर्पित भावनेने काम केले. आपली शाळा सर्वार्थाने मोठी व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. क्रीडा क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला. विद्यार्थी केंद्र बिंदू मानून त्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले. सर्व समाज घटकाशी ऋणानुबंध जपले. आपला आम्हाला सार्थ अभिमान राहील. आपली सदैव आठवण येईल असे सांगितले. या प्रसंगी समारंभाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. विद्यार्थी मनोगत दिया वणवे श्रुती काळे यांनी व्यक्त केले. शिक्षक मनोगत पांडुरंग कुचेकर अलका दीक्षित हेमा ढवळे किरण सोरटे यांनी मांडले. सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले.समारंभाच्या यशस्वितेसाठी सर्व विभाग शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेमध्ये यश….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा २०२५-२६ या दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय मंगळवेढा येथील ‘जय मल्हार क्रीडा संकुल’ या ठिकाणी पार पडल्या. सदर कुस्ती स्पर्धेमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते या महाविद्यालयाने भरघोस असे यश संपादन केले आहे. फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये कु.पालवे स्नेहल शिवाजी वजन गट ५७ किलो, कु.सरक सोनिया हनुमंत वजन गट ६५ किलो या वजनगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला व कु.काळे भूमी देविदास वजन गट ६५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक तसेच मुलांमध्ये ग्रिको रोमन कुस्ती चि.सरक शंभूदेव हनुमंत वजन गट ६३ किलो यागटात प्रथम क्रमांक, फ्री स्टाईल कुस्ती मध्ये चि.सुरवसे विशाल राजाराम वजन गट ६१ किलो, चि.करे विकास दादा वजन गट ७९ किलो, चि.कदम अस्मित आणासो वजन गट ओपन या गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व चि.कोरे माउली वजन गट ७० किलो गटात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. सोलापूर मॅनेजमेंट कौन्सिल सदस्या, आमचे मार्गदर्शक संचालक डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील साहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.टी निकम, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सतेश पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


* टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य * आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्ती-ग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी बर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवशयक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीबरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे
येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची बाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री
फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि जनतेला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्दे श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे विभागाने गतीने कार्यवाही सुरु केली आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव चिनिता सिंधल यांनी सांगितले. पुढील तीन से चार दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्याबर विभागाचा भर आहे, असेही प्रधान सचिव सिंघल यांनी सांगितले. यावेळी राज्यातपूरग्रस्तांच्या पाठिशी शासन६० लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करु असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसंच दोन हजार २१५ कोटींच्या मदतीच्या वितरणास सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ..देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान, जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहोत. दहा किलो तांदूळ, गहू आणि तीन किलो डाळ उपलब्ध करून दिली आहे. निसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली आहे. केंद्रामार्फतही शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन सकारात्मक आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे हित साधणारे असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी दिली
.

नवी मुंबईत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचे निर्घृणपणे हत्या केल्याची घटन घडल्याने खळबळ उडाली आहे.

मनधरणी करायला गावावरून आला, वाद मिटवत नसल्याने संतापला अन्.. चाकूने वार करुन पत्नीची हत्या

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

कौटुंबिक वादातून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची मनधरणी करायला बुलढाण्यावरून आलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या करावे गावात घडली. मागील काही दिवसांपासून तो पत्नीला गावाकडे सोबत चलण्याचा हट्ट करीत होता. मात्र, काही केल्या त्यांच्यातील वाद मिटत नसल्याने त्याने चाकूने वार केले. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.ज्योती काकडे (वय ३५) ही महिला त्या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून दोन मुलांसह राहायला होती. तिचे पती राजू काकडे (४५) याच्यासोबत जमत नसल्याने त्या ठिकाणी ती पतीपासून वेगळी मुलांसह राहत होती. यापूर्वी पती-पत्नी व मुले पुण्याला राहायला होते. मात्र, त्या ठिकाणी दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून पत्नी करावे येथे राहायला आली होती, तर पती राजू हा बुलडाणा येथील देवळगाव या मूळगावी निघून गेला होता. दहा दिवसांपूर्वी तो पत्नीची मनभरणी करण्यासाठी करावे येथे पत्नीकडे आला होता. यादरम्यान, तो पत्नीची समजूत काढून सोबत गावाकडे चलण्याचा आग्रह करीत होता. परंतु, पत्नीने सोबत येण्यास नकार दिला होता. राजूला दारूचे व्यसन होते व त्यातून दोघांमध्ये वाद व्हायचे असे समजते.रविवारी पुन्हा दोघांमध्ये जोराचे भांडण झाले असता राजूने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी ज्योती यांच्या संपूर्ण शरीरावर वार केले. यावेळी जखमी ज्योतीच्या किंचाळ्या ऐकून शेजारीच राहणाऱ्या नातेवाइकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याच्यावर राजू काकडे एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले. 

नातेपुते येथील विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या 21 व्यावार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

नातेपुते येथील विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमाळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी एडवोकेट दिवाळी राऊत बोलताना म्हणाले की.प्रामाणिक कर्जदारांमुळे संस्था टिकून आहे. बऱ्याश्या कर्जदारांकडून संस्थेच्या सर्वांनी वसुलीच्या केलेल्या कसोशी च्या प्रयत्नाने समता संस्था प्रगतीच्या रुळावर आहे. ही वार्षिक सभा यशवंत सभागृह, समता शाळा नातेपुते येथेपार पडली.पुढे बोलताना राऊत म्हणाले, कोरोना काळात सरकारने कर्जाची वसुली थांबवली. तरी देखील संस्थेने मुदत ठेवीवरील व्याज अथवात्यांच्या मुदत पूर्ततेनंतर ठेवीच्या रकमा सर्वांना अदा केल्या. चालू वर्षात ज्यादा रकमांचे कर्जवाटप व त्यांची वसुली सुरळीत असल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात वाढ असल्याचे त्यांनी सांगितले. समता पतसंस्थेचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी तर विकासरत्न मोहिते पाटील सोसायटीचे सचिव विजय कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले.यावेळीसभेच्याअध्यक्षस्थानी सुधाकर राऊत होते. समता परिवार संस्थापक अॅड भानुदास राऊत, समता पतसंस्था चेअरमन अंबादास बरडकर, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ननवरे, विकासरत्न सोसायटी चेअरमन सावता बोराटे, माजी ग्रा.पं. सदस्य उत्तम बरडकर, भैय्या चांगण,बिटू काळे, भिमराव बरडकर, सतीश बरडकर, गंगाराम दुधाळ, सदाशिव ननवरे, दत्तात्रय जठार, नागनाथ टेंबरे, राहुल शेंडे, सुरेखा बोराटे, लीलावती राऊत, सदाशिव राऊत, अर्जुन पिसाळ, भागवत कर्चे, धनंजय रासनकर, प्रमोद कुलकर्णी आदिसह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

अतिवृष्टी बाधित व पूरग्रस्त नागरिक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावे- खा.धैर्यशील मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


  माढा लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अतिवृष्टी बाधित व पुरग्रस्त नागरिक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याची मागणी सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पत्राद्वारे केली.सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पाण्यात जलमय झाली, संपूर्ण प्रपंच वाहून गेला, तसेच महत्त्वाची कागदपत्रे देखील नष्ट झाली आहेत. महापूरग्रस्त नागरिकांना पुनर्वसनाच्या कामाकरिता तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे. परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे हे नागरिक सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत विशेष कॅम्पचे आयोजन करून, नागरिकांना हरवलेली अथवा नष्ट झालेली महत्त्वाची कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी) पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी म्हणून सांगितले आहे.तसेच, या महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांची शालेय व महाविद्यालयीन कागदपत्रे नष्ट झालेली आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र कॅम्पचे आयोजन करून त्यांना  आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत.यामुळे महापूरग्रस्त नागरिकांना शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून रोखता येईल. अशा प्रकारच्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी बारावी बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – प्रमोद शिंदे 
राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांत, त्यातही विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त केले. शेती, पिके, घरेदारे, गुरेढोरे सगळे काही वाहून गेले. अत्यंत निगुतीने उभा केलेला संसार एका पावसाने मोडून पडला. पावसाने काही तासांत होत्याचे नव्हते झाले.
शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दफ्तरं सगळं वाहून गेलंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी १२ वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील हजारो १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्याचा उद्याचा एकच दिवस बाकी असल्याने एवढ्या जणांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती.
पूरग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावीचे अर्ज भरण्याला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना त्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे) 
जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करून पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संस्था संघटना यांना केली आहे.करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही असेही सांगितले आहे.तसेच प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या किट प्रमाणे मदत करावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूर परिस्थितीमुळे पुरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून ज्या दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करावयाची आहे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील. या मदत कक्षाच्या माध्यमातून 88 बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त यांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी व संपर्क क्रमांक :-
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. सैपन नदाफ मोबाईल क्रमांक 83799 81799 तर दूरध्वनी क्रमांक 0217-2990140 यावर संपर्क साधावा.तालुकास्तरीय मदत मदतीसाठी संपर्क – नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9881741311, कार्यालयीन क्रमांक 0217-2731014; माढा तालुक्यात श्री प्रितम पवार, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9970827574, कार्यालयीन क्रमांक 02183-234031; करमाळा तालुक्यात श्री शतुघ्न चव्हाण, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 8805907686, कार्यालयीन क्रमांक 02182-220535; बार्शी तालुक्यात श्री संतोष गुलाब शिंदे, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9518562532, कार्यालयीन क्रमांक 02184-222213; अपर तहसिल मंद्रुप येथे श्री नवल सरवळे, सहा. महसूल अधिकारी, मोबाईल क्रमांक 9309597368; दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री विनायक कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9423331657, कार्यालयीन क्रमांक 0217-2731033; तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल क्रमांक 9022008681, कार्यालयीन क्रमांक 02189-232234. नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.सोलापूर जिल्हायातील पूरग्रस्त बाधीत कुटुंबाना शासना तर्फे किट वाटप करण्यात येत आहे. या किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा दाळ, स्वयंपाक तेल, मीठ, तिखट मसाला, हळद, दूध पावडर, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे, मच्छर आगरबत्ती, काडीपेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट, अंगाचे साबण, प्लास्टीक ताडपत्री, चादर, सतरंजी तसेच पातेला, तवा, ताट, तांबे, वाटी, चमचा, ग्लास, उलतन, पक्कड/सांडशी, पळी (आमटी वाढण्यासाठी), प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे.सामाजिक सस्था पूरग्रस्त बाधित नागारकाना जिल्हा प्रशासनान उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्ष यांच्याकडे मदत देऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)


श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर यांची 2024-25 आर्थिक वर्षाची 58 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात शंकराव मोहिते पाटील काकासाहेब, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील आक्कासाहेब आणि प्रतापसिंह मोहिते पाटील पप्पासाहेब यांच्या प्रतिमापूजनाने जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार व कारखान्याचे चेअरमन आ.रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर, तसेच सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.चेअरमन रणजितदादांनी भाषणात सांगितले:कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना FRP पेक्षा ₹458 प्रतिटन जास्त दर देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले आहे.सभासदांनी ऊस पुरवठा वाढवून कारखान्यास अधिकाधिक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.265 जातीपेक्षा 8602 जातीच्या उसाला प्राधान्य देऊन उतारा वाढवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.कृष्णाभीमा स्थिरीकरण योजनेची गरज तसेच उजनी धरणाच्या पाण्यावर हक्क प्रस्थापित करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, अहवाल वाचन कार्यकारी संचालक श्री. स्वरूप देशमुख यांनी केले तर आभार संचालक शिवाजी गोरे यांनी मानले. यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, श्री शंकर कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच-उपसरपंच, व्यापारी, ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.