Blog

भाजपाचे जेष्ठ नेते राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारविरोधात उपोषणाचा इशारा.


भाजपाचे जेष्ठ नेते राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारविरोधात उपोषणाचा इशारा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेसोमवार, दिनांक ३० नोव्हेम्बर, २०२० :- वसई-विरार मधील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांवर करवाई करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांच्या मनमानी, हेकेखोरी आणि मुजोर कारभाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्याकरिता भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर भटके विमुक्त आघाडीच्या वतीने राज्यसभेचे खासदार पदमश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण सुरु करण्याचा इशारा भाजपच्या अशोक शेळके यांनी दिला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या बोगस प्लांट चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बेकायदेशीपणे चालविण्यात येत असलेले गोरखधंदे सीलबंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुरु झाली काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन बोगस प्लांट सील करण्यात आले. मात्र प्रभाग समिती – बी चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांच्याकडून कारवाई करण्यास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याची बाब भाजपच्या अशोक शेळके यांनी यापूर्वी वेळोवेळी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
प्रभाग समिती – ब नालासोपारा मध्ये एकूण ६० बोगस प्लांट आढळून आले. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ३ प्लांट वर तर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी १५ बोगस प्लांट असे ६० पैकी केवळ १८ बेकायदा प्लांट सील करण्यात आले. उर्वरित ४२ प्लांट वरील कारवाई चे पुढे काय झाले असा सवाल अशोक शेळके यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. १३ तारखेनंतर आज नोव्हेंबर महिना संपत आला असताना पुढे एकही बेकायदा प्लांट वर कारवाही का झाली नाही, सदरची कारवाई न करण्यामागे सहाय्यक आयुक्तांचा नेमका हेतू काय आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. या प्रकरणी प्रशासनाचे प्रमुख म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सातत्याने तक्रारी करण्यात येऊनही अशा बेजबाबदार, जाणीवपूर्वक दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नसेल तर ही बाब नक्कीच खेदजनक व संतापजनक असल्याचे मत अशोक शेळके यांनी व्यक्त केले आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या या निष्क्रिय कारभाराविरोधात वसई-विरार शहर भटके विमुक्त आघाडी च्या वतीने राज्यसभेचे खासदार पदमश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मंगळवार दिनांक ८ डिसेंबर, २०२० रोजी पासून लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण सुरु करीत असल्याचा इशारा भाजपच्या अशोक शेळके यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनास दिला आहे.

खंडाळा परिसरात प्रथमच कुचेकर गायकवाड यांचा सत्यशोधक विवाह सम्पन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -पिंपरे बु.-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे ह.भ.प.गोरख कुचेकर महाराज यांची सत्यशोधिका ज्ञानेश्वरी उर्फ प्राजक्ता कुचेकर आणि सत्यशोधक सौरभ अशोक गायकवाड यांचा कुचेकर यांचे मुळ रहाते घरी दारासमोर पिंपरे बु.खंडाळा परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला.
सुगंधी फुलाच्या पायघड्यावरून चालत येत हातात वधु वर यांनी भारतीय संविधान धरून आगमन केले त्यावेळी विवाह मंडपात महापुरुषांचे नावाचा आणि संविधानाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी कालच संविधान दिन भारतभर साजरा झालेचे सांगून, स्त्री पुरुष समानता,मानवंताधर्म तसेच सर्वाना समान न्याय भूमिकेतून गरीब,श्रीमंत व भिकारी असलेतरी मतदान एकदाच करण्याचा हक्क समान देऊन जगात एक आदर्श 395 कलमांची राज्यघटना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांनी देऊन आपल्या भारतीयांनवर मोठे उपकार केलेत.या कोव्हिडं 19 मध्ये या संविधानाचे महत्व सर्वांनी जाणले आहे.तसेच आजचा हा सत्यशोधक विवाह संस्थेचे वतीने 21 वा सम्पन्न होत असताना, दि.7 डिसेंबर 2020 रोजी संस्थेच्या वतीने 22 वा सत्यशोधक विवाह तेलंगाणा राज्यातील पहिला होणार असल्याचे सांगितले .
यावेळी या भागातील आमदार मदन आबा पाटील बाहेर गावी असल्याने येऊ शकले नाही पण त्यांनी आवर्जून त्यांचे बंधू मिलिंददादा पाटील यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले त्यांचे हस्ते वधु वर यांना सत्यशोधक विवाहाचे प्रमाणपत्र आणि थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा भेट दिली .यावेळी सरपंच विनायक बिचुकले,उमेश जाधव,युवा नेते तुषार वाघ,माळी महासंघ महाराष्ट्राचे संघटक रोहित टिळेकर ,ग्रा.प.सदश्य विकास कुचेकर उपस्थित होते.
तसेच महात्मा फुले यांच्या 130 व्या स्मृतिदिना निमित्त वधु वर यांचे हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 130 ग्रंथ मान्यवर आणि मुली महिलांना भेट देण्यात आले. सुरवातीला ज्ञानेश्वरी आणि सौरभ यांचे हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पृथ्वी ची पूजा करून पर्यावरण समतोल साठी झाडे जगविली पाहिजे म्हणून एका आंब्याचे झाड देखील विवाहप्रित्यर्थ कुंडी मध्ये लावून त्याला दोघांनी पाणी घालून पूजन केले.
यावेळी महात्मा फुले यांचे वेशभूषेत रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाहाची माहिती देऊन सर्वांनाकडून सत्याचा अखंड गाऊन घेतला तर हनुमंत टिळेकर यांनी भारतीय उद्देशिका वाचन केले आणि राष्ट्रीय ओबीसी म्महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे यांनी टिळेकर,ढोक यांचे समवेत महात्मा फुले यांची मंगळाष्टक म्हणून सोहळ्यास रंगत आणली.
याप्रसंगी अक्षता रुपी तांदूळाची नासाडी होते म्हणून अधिकचे तांदूळ असे 15 दिवस पुरेल इतके अभिनव मतिमंद मुलांची शाळा ,पलूस, सांगली प्रतिनिधी सुभद्रा गाडवे विशेष शिक्षिका आणि कै. सुशिलाबाई घोडावत निवासी अंधशाळा, मिरज प्रतिनिधी श्रीमती रेखा गायकवाड, काळजी वाहक शिक्षिका यांचे कडे रोख रक्कम आणि त्यांना व ज्ञानेश्वरी चा योग्य प्रकारे सांभाळ माता म्हणून केला त्या श्रीमती सुरेखा धोत्रे यांना येवला पैठणी साडी देऊन योग्य सन्मान केला.
सत्यशोधक विवाहास संमती दिले बद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे दोन्ही आई वडील तसेच कोव्हिडं काळात आरोग्यसेविका म्हणून महत्व पूर्ण काम सुहासिनी कुचेकर यांनी केले त्यांचा देखील सन्मान पत्र देऊन सन्मानित केले.
विवाह मंडपात महापुरुषांचे मोठे होल्डिंग व त्याचे विचाराचे बॅनर्स , निसर्ग,पर्यावरण,मुलगी वाचवा,जल वाचवा संदेश बॅनर्स आणि रुखवतात महापुरुषांचे 100 चे वर ग्रंथ याने लक्ष वेधून घेतले.हा आदर्श सत्यशोधक विवाह म्हणून सर्वत्र कुटूंबाचे कौतूक होत होते तर अनेक पालकांनी व मुलामुलींनी सत्यशोधक विवाह हीच प्रथा योग्य असून आम्ही यापुढे असेच विवाह करू असे मते मांडली.
हा विवाह यशस्वी होणे कामी सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते ऐ. डी. पाटील यांनी मोलाची मदत केली.आभार मुकुंद कुचेकर यांनी मानले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कटगुण येथे महात्मा फुलेंना अभिवादन


  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- बहुजन उद्धारक, क्रांती ज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले यांनात्याच्या मुळगावी कटगुण येथील स्मारका मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र चे महासचिव मा बाळासाहेब दोडतोले , मा. माणिकराव दागडे सर, मा.काशिनाथ शेवते, मा.अण्णासाहेब रुपनवर, मा. नितीन धायगुडे, मा मामु शेठ वीरकर, मा.खंडेराव सरक, मा.श्रीकांत देवकर, मा.शेखर खरात, मा.श्रीमंत वाघ, मा. शाहिदभाई मुलाणी व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दमदार लोकप्रिय आमदार भारत भालके यांचे निधन

दमदार आमदार काय कै.भारत नाना भालके

आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा आमदार भारत भालके यांचे निधन

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, तीन विवाहित मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. त्यापूर्वी दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रूबी हॉस्पिटलमध्ये जावून तेथील डाॅक्टरांकडे आमदार भालकेंच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डाॅक्टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातदेखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे उपचारासाठी रूबी हाॅस्पीटलमध्ये दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची शुक्रवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास वाढल्याने आज दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

भारत भालके यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभेची निवडणूक लढवली होती. माजी आमदार सुधाकर परिचारक आणि राजूबापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी लढत देत तब्बल 40 हजारांहून अधिक मते घेतली होती. तिरंगी लढतीत परिचारक यांनी बाजी मारली होती. त्यानंतर 2009 मध्ये भालके यांनी रिडालोसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याचा पराभव करत ‘जायंट किलर’ म्हणून पहिल्यांदाच राज्याला ते परिचित झाले. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत बागल यांचा त्यांनी पराभव केला होता.

राज्यात 2019 मध्ये भाजप शिवसेनेची लाट असतानाही त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. या निवडणूकीमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचे तगडे आव्हान समोर असतानादेखील भालके यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर परिचारकांचा सुमारे 14 हजाराहून अधिक मताधिक्यांनी पराभव करत विजयाची हॅट्रट्रीक केली .

तालुक्याच्या राजकारणात 1992 पासून सक्रीय
पहिलवान असलेले आमदार भारत भालके हे थेट 1992 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आले. संचालकाच्या रुपाने त्यांनी थेट तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. अवघ्या काही दिवसातच त्यांनी औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासावर त्यांना कारखान्याचे उपाध्यक्षपदही मिळाले.

दरम्यानच्या काळात वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात राजकीय दुही निर्माण झाली होती. या मध्ये आमदार भारत भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरवात केली. काळे यांच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांनी 2002 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले. जो विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष तो तालुक्याचा आमदार अशी म्हणच त्यावेळी तालुक्यात रुढ झाली होती.

आमदार भालकेंनी 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारुन पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. कामाच्या जोरावर आणि दांडग्या लोकसंपर्कामुळे त्यांनी 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. त्यावेळी त्यांना मुंबईला नेण्यासाठी काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी खास हेलिकाॅप्टर पाठवले होते.

कोल्हापूरच्या लालमातीत मिळाले राजकीय धडे

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे 1960 मध्ये त्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सरकोली येथील प्राथमिक शाळेत झाले. द. ह. कवठेकर प्रशालेत त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाबरोबरच पहिलवानकी करण्यासाठी ते कोल्हापूर येथे गेले. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत पहिलवानकीचा सराव सुरु केला. तिथेच त्यांना राजकारण आणि समाजकारणाची आवड निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण व
शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता
.

कोल्हापूरच्या तालमीतून आल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणाला सुरवात केली. माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंढरपूर तालुक्यात जनसेवा संघटनेचे काम सुरु केले. पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळवून देण्यात प्रतापसिंहांचा मोठा वाटा होता.

सलग 18 वर्षे ‘विठ्ठल’च्या अध्यक्षपदाची धुरा

वसंतराव काळे यांच्या निधनानंतर 2002 मध्ये आमदार भारत भालकेंची गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. गेल्या अठरा वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून काम पहात होते. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याच्या विस्तारीकरणा बरोबरोरच को-जन,डिस्टिलरी आणि इथेनाॅल निर्मिती प्रकल्प सुरू झाले. फक्त जमिन तुमची खत,बेणे आणि ड्रीप कारखान्याचे अशी सभासदांसाठी राबवलेली अभिनव योजना त्याकाळी खूप चर्चेची ठरली होती.

आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत

अलीकडेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज होती. राज्य सरकारची थकहमी मिळत नसल्याने आर्थिक कोंडी झाली होती. बॅकांच्या आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार कारखान्याला थकहमी मिळणे अशक्य होते. तरीही आमदार भालके यांनी शरद पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सरकारकडून थकहमी मिळवून घेतली. राज्य सरकारलादेखील आपल्या नियमात बदल करणे भाग पडले. त्यानंतर राज्यातील सुमारे 21 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी मिळाली. त्यानंतर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला.

संविधान दिनानिमित्त अकलूज मध्ये समता रॅली

संविधान दिनानिमित्त अकलूज मध्ये समता रॅली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकलूज –बहुजन क्रांती मोर्चा व अकलूज अकलूज शहरातील सर्व समविचारी सामाजिक संघटना यांच्यातर्फे संविधान दिनानिमित्त अकलूज शहरातून संविधान,समता रॅली काढण्यात आली.

बहुजन क्रांती मोर्चा व अकलूज शहरातील सर्व समविचारी संघटना यांच्यातर्फे दिनांक-26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त अकलूज शहरातून संविधानाचा जागर करण्यासाठी,संविधानाची नीती,मुल्य, समाजातील तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत लोकांना समजण्यासाठी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन ते अकलूज शहरातील सर्व बहुजन महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून , संविधानाच्या सन्मानात घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समता रॅलीची सांगता करण्यात आली .यावेळी, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,भारत मुक्ती मोर्च्याचे महा. उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे जाधव,
पीआरपी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले,
आरपीआय युवक तालुका अध्यक्ष विजयभाऊ कोकणे
छत्रपती क्रांती सेना तालुका संयोजक रिकेश चव्हाण
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे
लॉर्ड बुद्धा चॅनेलं चे माळशिरस तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड,प्रहार तालुका अध्यक्ष किरण भांगे, सह सामाजिक संघटनेतील आदी मान्यवर उपस्थित होते.

या समता रॅलीचे आयोजक
सौरभ वाघमारे,शेखर खिलारे,अक्षय जाधव,अविनाश सोनवणे तेजस उबाळे,ऋतिक चव्हाण गीतेश चौगुले,अनिल पवार ,लखन बेन्द्रे सह आदीनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात संविधान दिन साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात संविधान दिन साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब व पोलीस नाईक शिवकुमार मदभावी यांना संपादक प्रमोद शिंदे यांच्या हस्ते कोरणा योद्धा पुरस्कार व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, विजय अडसूळ उपस्थित होते. तसेच ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकलेचे अनावरण ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ए.पी.आय मनोज सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे व हस्तकलेचे कौतुक केले. व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर कमिटी च्या वतीने संविधान दिन महोत्सव साजरा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव

26/11/2020 रोजी सकाळी वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर कमिटी च्या माध्यमातून 26 नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह मिलिंद नगर एफ कॅबिन रोड कल्याण पूर्व येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटक विनोद श्यामसुंदर रोकडे याच्या वतीने करण्यात आले तत्पूर्वी 26/11/2008ला झालेल्या भ्याड हल्यात शाहिद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली व बुद्ध वन्दना घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रम दरम्यान सहभागी संघटना रेल्वे असो. A.i.sc.st.N.D.M.J.संघटना द शिल्ड संघटना व साई श्रद्धा मित्र मंडळ यांनी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम दरम्यान कोविड 19 या महामारीत महानगरपालिका आरोग्य खात्यातील कर्मचारी अगंण वाडी सेविका शिक्षक वर्ग आनंदवाडी डॉक्टर सुप्रसिद्ध गायक, पत्रकार, सामाजिक संघटना यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संविधान दीना निमित्त हेल्थ कॅम्प व बॉडी चेक अप शिबीर ,पॅन कार्ड, हॅन्डीकॅप, निराधार,पेन्शन योजना ,नागसेन बुक डेपोच्या वतीने स्टॉल लावणे आसे आयोजन करण्यात आले आले.कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव विजयजी कांबळे साहेब, भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस मुंबई ठाणे प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे, प्रमोद पिगळे (माजी नगरसेवक),जेष्ठ कार्यकर्ते अशोकजी कांबळे,बौध्दचार्य अशोकजी त्रिभुवन,जेष्ठ कार्यकर्त्यां शोभाताई केदारे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव,वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक आप्पा गस्ते,देवानंद कांबळे साहेब विनोदजी गुप्ता,जेष्ठ कार्यकर्ते नथुराम मोहिते साहेब,विक्रम जाधव ,सुरेश शिंदे,दिपक वाघ डोंबिवली विभागातील पदाधिकारी गौतम गवई,चंद्रकांत पगारे,गणेश गायकवाड,अमर कुह्रे ,डॉ.धमेद्र उपाध्यय,डॉ.संजयकुमार पाडे,डॉ.कमलेश मोरे,मनोज नायर साहेब (समाजसेवक)सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी रविंद्र सांगारे ,A.I.SC.ST रेल्वे एम्लाय असोसिएशन शाखा OHEअध्यक्ष सुनिलजी ठेंगे,साई श्रध्दा मित्र मंडळाचे पदाधिकारी बाबुराज खिस्टोपर,रियाज शेख,राहुल शिंदे ,सुनिल बैलम,सर्व महानगरपालिका कर्मचारी,अंगणवाडी सेविका,सुप्रसिद्ध गायक,पत्रकार,सर्व मान्य वर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण पुर्वचे कार्यकर्ते जितेंद्र बुकाणे यानी केले केले

वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर कमिटी च्या माध्यमातून 26 नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव साजरा.

संभाजीराव फुले सरांना पितृशोक..

संभाजीराव फुले सरांना पितृशोक.

.. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी )सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा जिल्हा पतसंस्थेचे मा.व्हा.चेअरमन संभाजीराव फुले यांचे वडील कै.उत्तमराव फुले यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरात शोकाकुल पसरले आहे तिसऱ्याचा विधी  शुक्रवार दि.२७/११/२०२० रोजी सकाळी ९.३० वा.त्यांच्या राहत्या घरी दहिगांव येथे होणार आहे

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वाढीव वीजबिल च्या निषेधार्थ विजबिलांची होळी करुन आंदोलन करण्यात आले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे सोमवार दि.23 /11/ 2020 रोजी अकलूज महावितरण कार्यलयावर भारतीय जनता पक्षाचे वतीने माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते याचे नेतृत्वा खाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वाढीव वीजबिल च्या निषेधार्थ विजबिलांची होळी करुन या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुक्याचे आमदार मा.रामभाऊ सातपुते,कृषी उत्पन्न बाजारचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील भाजपाचे जिल्हा नेते धैर्यशील मोहिते पाटील, ओबीसीा मोर्चा प्रदेश उध्यक्ष आपासाहेब देशमुख भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वावरे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, के के पाटील माजी तालुकाध्यक्ष सोपान काका नारनवर,मुख्तार भाई कोरबू,जिल्हा परिषद सदस्य आरुण तोडकर मा संरपंच अकलूज शशीकला भरते जिल्हा परिषद सदस्य सुनदा फुले पंचायत समिती गट नेते प्रताप पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष महामुनी शिवमृत संचालक सचिन रणवरे हरीभाऊ मगर संदीप घाडगे विष्णूपंत केमकर सरचिटणीस ,संजय देशमुख.शरद मदने,महादेव कावळे,डॉ.अक्षय वाईकर युवराज वाघमोडे ,शेखर माने,बंडू खंडागळे,श्रीकांत दोरकर.व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संग्राम भाऊ देशमुख यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –माळशिरस येथे नक्षत्र कॉम्प्लेक्स मसवड रोड याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम भाऊ देशमुख यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी आप्पासाहेब देशमुख यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब वावरे,भाजपाचे ज्येष्ठ नेतेके के पाटील, सोपान काका नारनवर,भाजपा तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर,मुक्तार कोरबु, संजय देशमुख,युवराज वाघमोडे आकाश सावंत,संतोष वाघमोडे,संतोष महामुनी,आबा धाईजे,सुभाष गोसावी,ॲड मारुती वाघमोडे, शरद मदने,अक्षय वायकर,महादेव कावळे,भैय्या चांगण,महेश सोरटे, दादासाहेब खरात इत्यादी उपस्थित होते.

You may have missed