Blog

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले उमेदवा, उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेने माळशिरस तालुक्यातील राजकारणाला कलाटणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता असून एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना यापैकी एका जागेवर संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती.काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल. काशी माहिती सूत्रांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे माळशिरस तालुक्‍यातील राजकीय वातावरणाला कलाटणी मिळणार आहे उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाला टक्कर देण्यासाठी तसेच माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तालुक्यात जरी भाजप ची ताकत वाढले असली तरी राष्ट्रवादीची सुधा जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जर उत्तम जानकरांना विधानपरिषद मिळाली तर माळशिरस तालुक्यात तीन आमदार होतील. व या तीन आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याशिवाय राहणार नाही. विकास कामासाठी कोणता आमदार सरस ठरणार हा येणारा काळच ठरवेल.

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
एकनाथ खडसे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे

जि.प.शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

जि प शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेला विद्यार्थी अमित शिंदे
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेली विद्यार्थ्यांनी विजया लवटे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-(प्रमोद शिंदे)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जि प शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे इयत्ता पाचवी सध्या इयत्ता सहावी हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून पिरळे ग्रामस्थांच्यावतीने या दोघांचे कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जब्बार मुलाणी सर यांनी मार्गदर्शन केले असून मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर वर्गशिक्षक खरात सर व इतर शाळेतील मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून दोघांचे कौतुक होत आहे.

माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील समस्याबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती उपकेंद्रात करणेची पंचायत समिती सदस्यांची मागणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस
माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध समस्याबाबत व उपकेंद्रात बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करणेची माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व पंचायत समितीचे गटनेते रणजितसिह जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांची भेट घेऊन मागणी केली आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील खालील समस्यांबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करावी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाकडे बी.ए.एम.एस. डॉक्टराची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात करण्याच्या संदर्भात 2017 पासून आमचा सतत पाठपुरावा आहे. त्या अनुषंगाने शासनाने अनेक जिल्ह्यामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये केलेली आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय आरोग्य यंत्रणा बर्‍यापैकी काम करत असून याहीपेक्षा उत्तम आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यासाठी सोलापूर जिल्हा तसेच माळशिरस तालु्नयातील 76 आरोग्य उपकेंद्रामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती तत्काळ करण्यात यावी त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व सीईओना करावेत जेणेकरुन ते तत्काळ नियुक्ती करतील त्याचप्रमाणे माळशिरस तालुख्यातील नातेपुते,माळशिरस व अकलूज उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना चालू करावी,माळशिरस तालुक्रातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरीत भरण्यात यावीत तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांची पदेही त्वरीत भरण्यात यावीत,नातेपुते व माळशिरस या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात यावा,निवृत्त वैद्यकिय अधिकाऱ्यांना मानधन तत्वावर ओपीडी करन्यास परवानगी द्यावी,अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचे असून शासनाकडून 100 बेडसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे परंतू जागा नसल्याने इमारत उभी नाही परंतू सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आहे त्या 50 बेडच्या उपरुग्णालयात 100 बेडची आकृतीबध्द (वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी) निर्माण करण्यात यावेत जेणेकरुन त्या पदाचा वापर करीत अकलूज व परिसरात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबविण्यात येईल तसेच या उपजिल्हा रुग्णालयात एम.डी.जनरल फिजीशीयन व मेडीशीयन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात याव्यात या पध्दतीने आरोग्य विभागाच्या अडचणी दूर झाल्यास ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांला त्याचा लाभ होईल व ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सुटल्या जातील

माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील समस्याबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती उपकेंद्रात करणेची पंचायत समिती सदस्यांची मागणी

हाथरस प्रकरणी पिडीत कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने महाराष्ट्र सह भारतभर आंदोलन

हाथरस प्रकरणी  पिडीत कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने महाराष्ट्र सह भारतभर आंदोलन *
*जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

बीड येथे निवेदन देताना एन डी एम जे कार्यकर्ते
दौंड येथे निवेदन सादर करताना एमडीएम चे कार्यकर्ते
हिंगोली येथे एन.डी.एम.जे कार्यकर्त्यांचे आंदोलन
बुलढाणा येथे एन डी एम जे च्या वतीने आंदोलन
मुंबई येथे एनडीएच्या संघटिका रमाताई अहिरे निवेदन देताना
कल्याण टीम निवेदन देताना
एन डी एम जे उस्मानाबाद च्या वतीने निवेदन देताना कार्यकर्ते

    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे  झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी  निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन  कुटुंबांना नैसर्गिक न्याय द्यावा या मागण्यासाठी एन.डी.एम.जे या संघटनेच्या वतीने डॉक्टर रमेश नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉक्टर केवल उके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह भारत वर निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले .त्यामध्ये  महाराष्ट्र तमिळनाडू,कर्नाटक,उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली,राजस्थान,ओडिसा,हरियाणा पंजाब,इत्यादी ठिकाणी आंदोलन करण्यात आले.तसेच महाराष्ट्रात सोलापूर हिंगोली,वाशिम,परभणी,पुणे,मुंबई,ठाणे,रायगड, बीड,लातूर,अहमदनगर ,सांगली ,सातारा,औरंगाबाद,बुलढाणा,यवतमाळ,चंद्रपूर,  अमरावती,गोंदिया,अकोला,धुळे, या सर्व जिल्ह्यांसह माळशिरस तालुक्यातील प्रांताधिकारी,तहसीलदार,नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना  नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन डी एम जे ) संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी .  या निवेदनामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पाडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे याकरिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.  या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत.  या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादा धाईजे एनडीएमचे वैभव गीते, प्रमोद शिंदे, संजय झेंडे, दत्ता कांबळे,बाबासाहेब सोनवणे,रणजीत कसबे,सचिन रणदिवे आदींच्या सह्या आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन* *जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

*उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ  येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन*
*जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ  येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन*
माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देताना आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे

   पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)    उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुक्त निष्पक्ष आणि निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन  कुटुंबांना नैसर्गिक न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन माळशिरस तालुक्यातील प्रांताधिकारी तहसीलदार नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना  नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन डी एम जे ) संघटनेच्या वतीने देण्यात आले.       यावेळी .  या निवेदनामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पाडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे याकरिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार कलम 3(1)r,s.,3(2)(5अ)’IPC 1860 च्या कलम 297,201,323,324,340,342,504,506, नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.  या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत.  या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादा  धाईजे एनडीएमचे राज्य सचिव वैभव गीते, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,रणजीत कसबे,सचिन रणदिवे आदींच्या सह्या आहेत.

बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि.8 – आरे कॉलनीत मजुरी करणाऱ्या दाम्पत्यांच्या अवघ्या साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार करणाऱ्या पशुहून हीन वृत्तीच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा ; बलात्काराचे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करुन कायद्याची जरब बसवावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.

आरे कॉलनीतील साडेचार वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या परिवाराची भेट घेऊन केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी रिपाइं तर्फे 50 हजार रुपयांची मदत केली जाहीर

आरे कॉलनी येथील युनिट नंबर 32 येथील साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या आरे कॉलनीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. अत्याचार पीडित मुलगी रुग्णालयात दाखल असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या परिवाराला रिपब्लिकन पक्षातर्फ़े 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; विजय कांबळे;धनराज; ऍड अभयाताई सोनवणे ; उषाताई रामळु आदी अनेक रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.

             

नातेपुते येथील समर्थ क्लीनिकल लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्ट साठी अधिकृत मान्यता

  • नातेपुते येथील समर्थ लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्टसाठी अधिकृत मान्यता
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे )- ज्ञादीप पॅरामेडिकल कॉलेज मधील समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी नातेपुते यास कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट प्रयोगशाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली आहे, या प्रयोगशाळेचे उद्घाटन पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रि.पा.ई चे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन. के. साळवे , ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बावीसकर,आनंद लोंढे सर,प्रमोद शिंदे,मनोज राऊत,प्रशांत खरात संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे एम. डी, प्रयोग शाळेचे संचालक डॉ.हनुमंत माने, आप्पा शेंडगे, इंजिनीअर कोडलकर साहेब आदी उपस्थित होते, यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे व प्रयोग शाळेचे संचालक डॉ. हनुमंत माने म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला व इमर्जन्सी पेशंट यांना कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट करणेस बऱ्याचदा अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व समाजसेवा या उदात्त भावनेने रॅपिड ऑंटीजन टेस्ट अधिकृत प्रयोग शाळेसाठी प्रस्ताव दाखल केला व त्याची अधिकृतपणे मान्यता मिळाले आहे माळशिरस तालुक्यातील ही पहिलीच अधिकृत प्रयोगशाळा आहे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रयोगशाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली .

माजी एस.आर.पी.पोलीस शिवाजी मिसाळ यांचे दुःखद निधन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शिवाजी नामदेव मिसाळ माजी एस.आर.पी.पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांनी सेवेत असताना चांगल्या प्रकारे काम केले आहे त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात तीन मुली व नातवंड असा परिवार आहे पत्रकार बाळासाहेब रणदिवे यांचे के सासरे होते. त्यांच्या जाण्याने परिसरात दुःख व्यक्त होत आहे.

हाथतरस बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या मुस्लिम आरक्षण संघर्ष संघर्ष समन्वय समिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने युपी हाथरस मध्ये दलित समाजातील मुलीवर जो आत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ व आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन माळशिरस तहसील कार्यालय येथे देण्यात आले त्यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य चे मिडिया प्रमुख-सलमान शेख शाहबाझ शेख, शौकत शेख, फिरोज मुल्ला, आफताब तांबोळी व आदि पदाधिकारी उपस्थित होते

You may have missed