प्रमोद शिंदे

कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते) प्रमोद शिंदे- कोथळे घाट तालुका माळशिरस येथे भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
उमरगा व चिवरी ता तुळजापूर येथील महिलाभाविक भक्त जेजुरी येथील देवदर्शन करून शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन करण्यासाठी चाललेली असताना नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीतील फलटण ते शिंगणापूर रोडवरती मौजे कोथळी ता.माळशिरस कोथळे घाटात दिनांक 11 मार्च 2020 रोजी संध्याकाळी दहा च्या सुमारास भाविकांची क्रूजर गाडी अडवून अनोळखी सहा इसमांनी गाडीच्या काचा फोडून गाडीतील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ दमदाटी करून एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत नातेपुते पोलिसात चैतन्य सखाराम बडूरे 30 गाडी ड्रायव्हर राहणार यवती ता.तुळजापूर याचे फिर्यादीवरून भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 80/ 20 भादवि कलम 395,341,327,504,506 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
यावर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण चे मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे सूचनेप्रमाणे अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे एपीआय युवराज खाडे हे करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत व तांत्रिक माहिती मिळून सदर गुन्हा करणारे संशय हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीटभट्टीवर काम काम करत असले बाबत माहिती मिळाली सदर ठिकाणी चौकशी करता आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन येथील पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले, आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसमनामे राहुल आप्पासाहेब माळी वय 19 राहणार मुसळवाडी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्वे 22 पडेगाव ता.श्रीपुर संदीप सुरेश पिंगळे वय 22 वर्ष मानेगाव ता.सिन्नर यांना ताब्यात घेऊन त्‍यांच्‍याकडे पोलीस खाक्या दाखवत तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले आहे.सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना दिनांक 6/7/2020 पर्यंत पोलिस कस्टडी व रिमांड मंजूर केले असून गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे हे करीत आहेत उर्वरित चार आरोपींचा शोध चालू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय युवराज खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गडदे, शरद कदम,राहुल रणवरे ,राकेश लोहार,पोलीस नाईक महेश पाटील,सायबर शाखेचे रवी हातकीले,आर.एम.लांडगे,गोपनीय विभाग शिवकुमार मदभावी,बबलू गाडे यांनी कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे करीत आहे. या कामगिरीमुळे परिसरातील लोकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोथळे घाटात दरोडेखोरांनी चिवरी येथील भाविकांची गाडी फोडून भाविकांना दमदाटी करून सोन्याचे दागिने व पैसे लंपास केले
हेच ते भाविक

सौ विध्याताई आदमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी -आप्पासाहेब कर्चे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष

सौ विध्याताई आदमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी -आप्पासाहेब कर्चे मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -काल राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेडची महत्वपुर्ण ऑनलाईन मिटींग संस्थापक अध्यक्ष किशोर शेठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यावेळी युवा आघाडी पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी ओबीसी कोट्यातून विध्याताई अदमाने यांना विधानपरीषदेची उमेदवारी मिळावी व तशी मागणी शासन दरबारी करणार असल्याचे कर्चे यांनी सांगीतले त्यास राष्ट्रीय ओबीसी बिग्रेडच्या वतीने सर्वांनी सहमती दाखवून एकमाते मंजूरी दिली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर शेठे साहेब यांनी विध्याताईचा अल्पपरीचय थोडक्यात दिला
सौ.विद्याताई आदमाने ( पोटदुखे ) यामुळच्या चंद्रपुरच्या असून त्या विदर्भकन्या म्हणून प्रसिद्ध आहेत व सध्या त्या मुंबईत वास्तव्यास आहेत व तसेच मा. कै.श्री. शांतारामजी पोटदुखे (माजी राज्य ऊर्जामंत्री ) यांची नात असून मिसेस नवी मुंबई ही सौंदर्य स्पर्धा जिंकलेली असून अनेक विविध सामाजिक मंडळाच्या कार्यात सहभागी होतात व त्या विविध मंडळाच्या आयोजित स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून
स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत व तसेच त्यांनी अनेक सौदर्यस्पर्धा देखील सहभाग नोंदविला असून त्या सर्वांच्या आवडत्या सामाजिक महिला नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत ! तसेच त्या राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड ( महाराष्ट्र राज्य ) या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षापदी कार्यरत आहेत ! त्यांनी बऱ्याच सामाजिक संघटनेला आर्थिक मदतही केलेली आहे ! आणि त्यांना सामाजिक कार्याची मनापासून आवड असून त्यांचा मुंबई व चंद्रपूर या भागात जनसंपर्क गाढा असून पुढे येणाऱ्या विधान परिषदेवर भावी आमदारपदी उमेदवारी मिळावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड या सामाजिक संघटनेनी लावून धरलेली आहे

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पंढरपूर, दि. 1 जुलै:-   महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान  आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

विठ्ठल मूर्ती च्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

खामगाव बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवी च्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकल ने पूर्ण करणार आहे.
रेखा जोगळेकर अस या सुपरआजीच नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed. पर्यंतच शिक्षण केलेल आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषद ला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या सुपर आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्ती नंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजी गेल्या 3 वर्षापासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. ह्या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आई कडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात..
अगदी 70 व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा अस या सुपरआजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार 70 व्या वर्षी केला आहे.
नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत,ते सध्या यवतमाळ येथे mseb मध्ये ठेकेदारी करतात
आजी 21 जून रोजी निघाल्या आणि साधारण 22 जुलेला पोहचणार आहेत

अगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात, व रात्री एखादी मौक्याची जागा पाहत विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या सुपर आजीचं स्वागत केल्या जातं, ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल 2000 किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी असाच वाटतो…

प्रवासाला निघत असताना सकाळ पासूनच आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व आजीबाईंना निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून स्वागत करत आजीबाईंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या , आजीबाईचा हा खडतर प्रवास त्यांना सुखाचा जाओ अशी प्रार्थना करण्यात आली. अनेकांनी आजीबाईंना भेटून आजीबाईंचे दर्शन घेऊन आजीबाईंना आर्थिक मदतही केली..
हि सुपर आजी केवळ आपले परिधान करावयाचे कपडे आणि काही उनपावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन हि सुपरआजी भारत भ्रमंतीला निघाली आहे. वाटेत मिळेल तिथे मिळेल ते खाऊन आजी आपला हा प्रवास करणार आहे

रेखा जोगळेकर नामक या सुपर आजींचा हा प्रवास सुखकर होवो.

जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया

जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया नातेपुते : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातला बदल इतिहासात प्रथमच आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या पंढरीच्या पायी वारीला करावा लागला कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक वारकरी समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे. ह भ प मनोहर महाराज भगत जेष्ठ किर्तनकार नातेपुते असे मत पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना मांडले जन्माचा वारकरी येतो तुझ्या दारी पांडुरंगा घालाव ही कोरोना महामारी ज्याने थांबवली तुझी पंढरीची पायी वारी महाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. एक आहे शयनी एकादशी तर दुसरी आहे प्रबोधिनी एकादशी होय. नववधूला ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरचा ओढा असतो त्याप्रमाणे वारकरी भाविकांना पंढरीची ओढ असते भेटी लागी जीवा लागलीसे आस पंढरीये माझे माहेर साजणी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी तसेच आपुल्या माहेरा जाईन मी आता नववधूला ज्याप्रमाणे सासरी आपले माहेरच्या आई-वडील भाऊ, बहिणीची आठवण होते त्याचप्रमाणे वारकरी भाविकांना आपल्या पांडुरंगाची आठवण होते. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंग मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधीले व मी केव्हा पंढरीला जाईल, अशी तळमळ वाटते.पंढरीच्या वाटे वारकरी हुरूहुरू पाहे त्यांचे माहेर,पांडुरंग त्यांचा पिता, चंद्रभागा त्यांची बहीण, पुंडलिक त्यांचा भाऊ यांना कधी भेटेन, उंदड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे अशी मनात प्रेमाची सदिच्छा असते. सासरी बंधने माहेरी मुक्तता. सासरी दु:ख तर माहेरी सुख असते. सासरी काम असते तर माहेरी आराम असतो. कन्या सासुऱ्याशी जाये। मागे परतोनि पाहे
तैसे जाले माझ्या जीवा। केव्हा भेटसी केशवा वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे, तेच ते विचार, आचार, व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठीच चालायचे, इतरांचे विचार व अनुभव समजून घेणे, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी. प्रेमाची मात, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दावा, बुद्धीसाठी दुवा हीच पंढरीच्या वारीची हवा या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा, पदप्रतिष्ठा विसरणे म्हणजे पंढरीची वारी होय. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हे लोकमान्य होतात, देवमान्य होतात व आपलं मोठेपण विसरून गळ्यात टाळ घेऊन विठू माऊलीच्या हरिनामात दंग होतात, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल मुकी उच्चारा हे वारीचं वैभव व मोठेपण आहे. सामाजिक सहजीवनाची हाक निर्माण होणं वारी आहे. कपाळी गंध, मनाला नामाचा छंद, हृदयामध्ये गोविंद ही वारीची अंतरंग साधना आहे व गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ एकादशीला करतो फराळ, जो प्रपंच विसरतो, तो खरा वारकरी होय. सुखरुप ऐसे कोण दुजें सांगा माझ्या पांडुरंगा सारिखेंते एकनिष्ठ असणे हेच त्यांचे ज्ञान सुख आहे. शब्दांच्या रूपानं हे संतच पिढ्या-पिढ्यांचे सांगाती झाले आहेत. अटळ कृतज्ञता व चराचरांतील श्‍वास, निःश्‍वासाचं कारण केवळ विठू माउली आहे, ही अढळश्रद्धा. या श्रद्धेतच युगायुगांना ओलांडून पाझरणाऱ्या अमृतानुभवाचं रहस्य दडलं आहे. असे लक्षावधी श्रद्धामेघ टाळ-मृदंगांच्या गजरात नाचत-गात पंढरीकडे निघण्याचा हा भक्तिऋतू. चंद्रभागा होऊन, वाळवंटाचीही मखमली हिरवळ करून झपूर्झा जगण्याचा हा दिंडीक्षण. आषाढी सोहळ्याला आपल्या नादमयी व चित्रमयी दृष्टीनं संतमहात्मे शब्दबद्ध करतात, तेव्हा अवघे पंढरपूर समोर उभं ठाकते. आषाढीचा हा भक्तीचा महोत्सव हाच एक आपल्या जीवनातील अज-अमर महामहोत्सव आहे आषाढी सोहळ्यासाठी दाटून आलेली वैष्णवांची मांदियाळी तर आहेच
खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।

पिरळे येथे गँगवार लोखंडी गज व तलवारीने हाणामारी,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*

पिरळे येथे गँगवार,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) मौजे पिरळे(ता.माळशिरस) दि.२१ जून रोजी सकाळी १०.३०वा येथील राजेश नाथा दडस व नवनाथ तांबीले ( दोघेही रा.पिरळे, ता. माळशिरस ) हे दोघे चव्हाणवाडी (बांगार्डे) येथील बिरोबा देवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.या ठिकाणी त्यांच्यावर सहा जणांनी नातेवाईकांना झालेला मारहाणीचा वादाचा राग मनात धरून तलवारी व लाठया काठ्यानी वार करून‌ गंभीर जखमी केले घटना घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हकिकत अशी‌ की; सुरुवातीला अण्णा बुधावले व तुकाराम लवटे यांच्यात भांडणे झाले असतात त्यानंतर दत्तू लवटे,तुकाराम लवटे,बापू लवटे, नाथा लवटे ,नाना लवटे,यांनी शिवनेरी हॉटेल समोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अण्णा बुधावले व अंकुश चव्हाण यांना लोखंडी गज व काठीने मारहाण केली त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत यासंदर्भात नातेपुते पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी चव्हाणवाडी येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या राजेश दडस ,नवनाथ तांबीले यांना सचिन विठ्ठल बुधावले, दिपक विठ्ठल बुधावले, बिरू बिट्टू बुधावले ,राजू भाळे, शंकर बोडरे, अमोल जाधव,या इसमानी दुचाकीवरून येवुन तुमचे नातेवाईक दत्तू लवटे यांनी, आमचे नातेवाईक सुकुमार उर्फ अण्णा बुधावले ,अंकुश चव्हाण यांना का मारहाण केली यांचा जाब विचारत हल्ला करत राजेश दडस व नवनाथ तांबीले यांच्यावर या सहा इसमांनी तलवारीने व लोखंडी पाईप तसेच लाठी काठीने जोराचे वार केले .यामध्ये राजेश व नवनाथ दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत . नातेपुते पोलीस स्टेशन येथे राजेश‌ नाथा दडस यांनी या सहा इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा रंजि.नं १८५ /२० भा.द.वि कलम ३०७,५०४,५०६, १४३,१४७,१४९तसेच शस्त्र अधिनियम मु.का १३५ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.घटनेतील सर्व संशयित आरोपी फरार असून .सदर घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय युवराज खाडे करीत आहेत. या घटनेमुळे पिरळे आणि परिसरातील वातावरण दहशतीचे निर्माण झाली आहे तसेच पिरळे ग्रामस्थांकडून कायम शांतता राहण्यासाठी पिरळे येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी करण्यात यावी व येथील अवैद्य दारूचे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच एका महिन्यामध्ये कलम 307,326,324 ॲट्रॉसिटी सारखे गंभीर प्रकारचे सात गुन्हे दाखल झाले असून येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेळीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात यावी व शांतता कमिटीची बैठक घेण्यात यावे या संदर्भात ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते (प्रमोद शिंदे )-
एक शिव तालुका माळशिरस येथे लाईट जोडणे संदर्भात अमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडी एकशिव आयु दिपक अशोक झोडगे निकेतन साळवे व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे की मौजे एकशिव नविन गावठाण येथे गेली 25 वर्षे नविन गावठाण लोक वस्ती आहे .येथे एकशिव वाँटर सप्लाय डि,पी कडुन लोकवस्ती साठी लाईट सप्लाय हा कित्येक दिवसापासुन होत आहे. नविन गावठाणात अनेक अधिकृत कनेक्शन आहेत परंतु गावठाण लोक वस्तीसाठी शेप्रेट असा गावठाण डि.पी नाही शेतीच्या डिपी वरुनच लाईट लोकवस्तीला मिळत आहे.तरी या लोकवस्तीत अधिकृत अनेक लाईट कनेक्शन असताना सुध्दा शेती लाईट डि,पीनेच लाईट सप्लाय होत आहे.या शेती डिपीवर अनेक शेतीपंप मोटारी आहेत व सोबत एकशिव ग्रामपंचायत पाणी पुरवठा व करलवस्ती म्हणून 1100 लोकवस्ती याला जोडली आहे.व शेती लाईट फिडर वेगळा आहे त्यामुळे या डिपीवर जादा लोड आहे म्हणून गेले 15 दिवसतर नविन गावठाण एकशिव या ठिकाणी लाईटच नाही तरी आम्ही आमच्या लोकवस्तीसाठी एकशिव गावातील नागरिक सध्या एकशिव गावठाण लगत कित्येक दिलस बसवलेल्या नविन डि पी गावासाठी पण जोडला नाही त्यातुन जुन्या गावठाण गावाला व नविन गावठाण लोक वस्तीला दोन लाईट पोल टाकुन लाईट तारा जोडणे बाबत मागणीसाठी नातेपुते कार्यालयासमोर दि.22-06-2020 रोजी दुपारी 12 पासुन अमरण उपोषण करत आहोत. तसेच आमच्या हक्काच्या लाईट ची तातडिने सोय होई पर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार आहोत. अशा आशयाचे अनिवेदन
पालकमंत्री सोलापूर जिल्हा ,तहसिलदार माळशिरस .विधानपरिषद आमदार,विधानसभा आमदार,पं स.माळशिरस सभापती. उपसभापती. मुख्य अभियंते अकलुज.ग्रामपंचायत एकशिव

चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून कोणतीही सामुग्री निर्यात करू नका;चिनी मालावर बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  

चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून कोणतीही सामुग्री निर्यात करू नका;चिनी मालावर बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 18 – चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी लडाखच्या गलवाण मध्ये भारतीय सैन्यावर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो.चीन ला धडा शिकविण्यासाठी एकदा चीनशी आरपार चे युद्ध लढले पाहिजे तसेच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.त्यासाठी भारतीयांनी चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीन मधून कोणत्याही प्रकारच्या सामुग्री ची निर्यात करू नका ; चीन मधून मालाच्या इम्पोर्टवर बंदी आणावी; निर्यातबंदी कारावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

लडाख च्या गलवाण भागात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चिनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावता आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले.त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन धोका देत राहून युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपार चे युद्ध लढून चीन ला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे. असा ईशारा ना रामदास आठवले यांनी दिला आहे.

         

महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

’ महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देविदास माने सोलापूर प्रतिनिधी

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे हरविलेले एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शोधून ज्यांचे आहेत त्यांना परत करण्यात आले. ही घटना गुरुवारी अक्कलकोट शहरामध्ये दुपारी 01:00 वाजे च्या दरम्यान घडली.

चांगुबाई श्रीमंत राठोड राहणार-बोरोटी ता अक्कलकोट यांनी ‘ अक्कलकोट शहरातील सोन्याच्या दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र, कानफुले पैंजण,जोडवे, असे एक लाख आठहजार किंमतीचे खरेदी केलेले ‘सोने – चांदीचे’ दागिने खरेदी केले होते. घाई गडबडीत मुख्य रस्त्यावर कुठे तरी पडून ते दागिने हरवले आहेत असे सांगत सदरची महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. सदर घटनेचे ‘ गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी ‘तात्काळ डी बी पथकातील पोना चिंचोळकर , पोका राठोड,पो कॉ शिंपाळे यांना मुख्य बाजार पेठेत पाठवले. सदर कर्मचारी यांना आजूबाजूच्या ‘सिसिटीव्ही’फुटेज पाहून चंद्रकांत कटारे यांच्या दुकानात चौकशी केली असता कटारे यांनीही सदरचे सोने-चांदीचे दागिने’ सापडले आहेत. असे प्रामाणिकपणे कबूल केले. त्याबद्दल पो निरीक्षक पुजारी यांनी ‘ चंद्रकांत कटारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून ज्या महिलेचे सोने-चांदी हरवले आहे.

त्यांनाही पोलीस ठाण्यास बोलावून सोने चांदीची खात्री करूनच सुपूर्त करण्यात आले. त्यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान सर्वाना खुपच आनंद देऊन जाणारे होते. उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्यां सतर्कतेमुळे एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोने चांदी दागिने परत मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचें नागरिकातून अभिनंदन केले जात आहे.

वाशीम येथे एनडीएमजे च्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे वाटप…

वाशीम येथे एनडीएमजे च्या वतीने जीवनावश्यक वस्तू चे वाटप…
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (वाशिम)-


नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव तथा सदस्य आंतरजातीय विवाह मसुदा समिती व आकस्मिकता योजना मसुदा समिती चे मंत्रालयीन सदस्य मा एड डा केवल ऊके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या नेतृत्वात आणि एनडीएमजे चे विदर्भ विभागीय समन्वयक डाॅ. रामकृष्ण कालापाड, जिल्हा संघटक रामदास वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण सरकटे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत गवई,जिल्हा कोषाध्यक्ष कुसुमताई सोनुने, मालेगाव तालुका अध्यक्ष महादेव कांबळे, मालेगाव तालुका सहसचिव विश्वास कांबळे, मालेगाव तालुका प्रतिनिधी अर्जून लबडे, मोहन पठाडे यांच्या हस्ते अत्याचार पिडीत व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले या मध्य वानखेडे नगर वाशिम येथील पाच कुटुंबाला तर झोडगा बु. येथील दहा कुटुंबाला आणि झोडगा खुर्द येथील अकरा कुटुंब असे एकूण सव्वीस कुटुंबाला प्रत्येकी एका कुटुंबाला अन्नधान्याची किट जीवनावश्यक वस्तू दिल्या गेल्या विविध प्रकारचे वस्तू वाटप केल्याने पिडीत कुटुंबाच्या चेह-यावर खुप मोठे समाधान व आनंद दिसुन आला.
प्रारंभी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांनी कोरोणा व्हायरस च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पावसाळ्यात संसंर्ग व साथरोग संदर्भात सुरक्षितता पाळून कुटुंबाला आजारापासुन वाचविण्यासाठी माहिती दिली व काय उपाययोजना करायला पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मालेगाव तालुका व स्थानिक कार्यकर्ते गौतम गवई, विश्वास कांबळे, रमेश ताजणे, कांशीराम गवई, भीमराव गवई, कमलाबाई अडांगळे, मैनाबाई गवई, सुलाबाई ताजणे, अनिता गवई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी एनडीएमजे च्या कामाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

You may have missed