प्रमोद शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त पिरळे येथे विविध कार्यक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

– पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार व जि प शाळा पिरळे यांच्या संयुक्त विद्यमाने पिरळे ता.माळशिरस येथे26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे.यामध्येमोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 126 वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,सर्व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पुस्तक संच वाटप,संविधान प्रति,प्रास्ताविक व पुस्तकांचे वाटप,खाऊ वाटप. तसेच भव्य संविधान रॅलीचे आयोजन करून घर घर संविधान प्रचार , 26/11/2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना मानवंदना,शहीद सुभेदार अरुण पालेकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना,संविधान जागर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा,दादासाहेब चषक 2025 क्रिकेट स्पर्धेतील सहभागी संघांना संविधान ट्रॉफी वितरण.निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण माळशिरस तालुक्यातील MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा. या कार्यक्रमास उपविभागीय प्रांताधिकारी विजया पांगरकर मॅडम, विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके साहेब, आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी पांढरे साहेब, गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम,तहसीलदार जावीर साहेब, एपीआय महारुद्र परजणे, माळशिरस तालुका वकील संघटना सचिव एडवोकेट सुमितजी सावंत साहेब, सर्व पत्रकार बंधू, उपकार्यकारी अभियंत नातेपुते सुभाष टोणपे, विद्युत नियमक मंडळ आयोग सदस्य एस यु बाविस्कर,तसेच एम.पी.एससी परीक्षा मधून नवीन अशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेले, सागर रणवरे मानकी, दिपाली खरात गिरवी,काजल भोसले फोंडशिरस, प्रदीप गोरड गोरडवाडी, वैमानिक कल्याणी शिंदे शिंदेवाडी, आजी-माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक,तलाठी, विविध क्षेत्रातील मान्यवर.शालेय समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक बांधव,मोठ्या संख्येने ग्रामस्थ,विद्यार्थी यांच्या  उपस्थित भव्य कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सकाळी दहा वाजता सुरू होईल.

तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत पिरळे व दहिगाव शाळेचा प्रथम क्रमांक


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभाग यांच्या वतीने गुणवंत शोध चाचणी अंतर्गत तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील विविध केंद्रातील लहान गटात विस संघ मोठ्या गटात बारा संघ असे एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तर दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजेते संघाचे नृत्यशिक्षक हनुमंत फुले सर,व राजेश भांबरे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच
मोठा गट
द्वितीय क्रमांक – जि.प.शाळा- तुपेवस्ती*
तृतीय क्रमांक- जि प शाळा- निमगांव (म)*उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि प शाळा- बाभुळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि प शाळा धर्मपुरी उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा पानीव
लहान गट
प्रथम क्रमांक – जि.प.शाळा- दहिगांव
द्वितीय क्रमांक – जि.प.शाळा- तांदूळवाडी
तृतीय क्रमांक- जि प शाळा- कन्या नातेपुते
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि प शाळा- बाभुळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि प शाळा विठोबा पाटील वस्ती
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा वटपळी यांनी
पटकावला विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच त्याच ठिकाणी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून,उपस्थित बीट विस्ताराधिकारी श्री सिद्धेश्वर भरते साहेब, सरपंच अमोल शिंदे,माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,उपसरपंच संदीप वाघ सर, पोलीस पाटील औदुंबर बुधावले,पत्रकार प्रमोद शिंदे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आशा बुधावले, सुदाम बुधावले,उपाध्यक्ष पांडुरंग कोकरे, महादेव होळकर,शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य,ग्रामस्थ तसेच परिसरातील केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी मोरे मॅडम, संजय ढवळे सर ,पाटील सर, फुले मॅडम, पुनमशेंडगे मॅडम, पाटील मॅडम यांनी कळऺबोली केऺद्रातील प्रमोद सोनवळ सर,सचिन बरडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत फुले सर, अमोल खरात सर यांनी केले.तर परीक्षक
म्हणून नागेशजी दीक्षित सर,निखील माने सर व सौ आशाताई टोमके यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर येथील मंडप मधील विद्यार्थी व शिक्षक संजय ढवळे सर यांनी डीजेच्या तालावर डान्स करत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

दहिगाव येथे वार्षिक रथयात्रा 2025 उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सव
कार्तिकी वद्य सप्तमी मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
रथोत्सवाची सुरुवात सकाळी श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन भव्य पाच मजली धर्मरथामध्ये मूर्ती विराजमान करण्यात आली. पाच मजली भव्य दिव्य लाकडी सजवलेल्या धर्म रथामध्ये भगवान महावीर यांची मूर्ती विराजमान करून पारंपारिक वाद्य बँड यांच्या साह्याने वाजत गाजत, अहिंसा परमधर्म की जय, भगवान महावीर की जय घोषात ग्रामप्रदक्षिणा करत तो धर्म रथ पंडितांच्या माळावरती नेण्यात आला या धर्मरथासोबत. श्री १०५ गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व श्री १०५ अतिशयकारी विगुन सागरजी महाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले.या धर्म रथाच्या पुढे भाविकांनी गरभा पारंपारिक नृत्य करून भगवान महावीरांचा जयघोष केला.हा धर्म रथ दहिगाव परिसरातील व सर्व जाती धर्मातील मानकरी लोकांनी भगवान महावीरांचा जयघोष करत पंडितांच्या माळावरती दोरीच्या साह्याने ओढत नेला आलेल्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली या रथयात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.या धर्म रथ उत्सवास भेट देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनाली ताई गोरे,दहिगाव च्या सरपंच सोनम ताई खिलारे, शिवप्रसाद फाउंडेशनचे चेअरमन शरद बापू मोरे, माजी जि प सदस्य ऋतुजाताई मोरे व अनेक मान्यवरांनी भेट दिली.जैन बांधवांच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला. पंडितांच्या माळावरती सभामंडपाचे उद्घाटन होऊन. पुढच्या वर्षीच्या रथ उत्सवा साठी संगीतमय चढाव्यांच्या बोली घेण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना व मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी श्री 105 गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व विगुन सागरजी महाराज यांनी प्रवचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद दिले हा रथ उत्सव यशस्वी होण्यासाठी अतिशय क्षेत्र दहिगाव येथील सर्व विश्वस्त व समस्त जैन बांधव यांनी परिश्रम घेतले. तसेच अहिंसा सेवा समिती,स्व. राजेंद्र रत्नशेखर डूड्डू परिवार यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना अल्प उपहार देण्यात आला. तसेच जीवन सहारा परिवाराच्यावतीने 500 फळझाडांची रोपे मोफत वाटप करण्यात आली.

मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही गावच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय -मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख

नातेपुते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)
पूर्वी पासून मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे मोहिते- पाटील जातील तिकडे त्यांच्यासोबत असायचे परंतु गेल्या वर्षभरापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात गुप्त चर्चा होत होती परंतु काल पुढील राजकीय दिशा ठरवणे बाबत विचार विनिमय बैठकीत बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की,गावच्य विकासासाठी मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय तुम्हा सर्वांना विचारून घेत आहे कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी मी भाजपमध्ये जात नसून फक्त आणि फक्त नातेपुते गावचा विकास व गावासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात,राज्यात भाजपची सत्ता आहे.गेली 10-12 वर्षात भाजपने विकासाचे काम केले असून त्या माध्यमातून नातेपुतेसाठी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करू,मला अनेक पक्षाचे निमंत्रण होते परंतु मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रामभाऊ सातपुते यांचा मुंबईमध्ये वजन आहे नातेपुते च्या विकासासाठी रामभाऊ सातपुते व माजी खासदार निंबाळकर यांना पाठबळ देऊन नातेपुते गावचा विकास करून चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू येत्या 18 ते 20 तारखेला प्रवेशाचा जंगी कार्यक्रम होईल असे सांगितले.यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे बोलताना म्हणाली केंद्रात आणि राज्यात रिपाई आणि भाजप महायुती असून इथे सुद्धा गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आसू, तसेच अकलूज येथील सुजयसिंह माने- पाटील बोलताना म्हणाले की बऱ्याच दिवसापासून बाबाराजे आमच्या सोबत भाजपमध्ये यावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले इथून पुढे रामभाऊ सातपुते यांच्यासोबत मिळून विकासाचे काम करू तसेच अनेकांनी बाबाराजे यांना भाजपने योग्य तो मानसन्मान देऊन विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. किशोर पलंगे, सतीश सपकाळ, प्रकाश साळवे, बशीर काजी,अभिजीत वाळके सर, प्राध्यापक पिसे सर, महेश शेटे ॲड.शिवाजी पिसाळ,धनंजय भोसले,राहुल पद्मन,अनिल माने, सागर इंगवले यांनी बाबाराजे देशमुख यांच्या समर्थनात मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,रणवीर देशमुख मित्र परिवार यांनी केले.याप्रसंगी नातेपुते आणि परिसरातील बाबाराजे देशमुख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबाराजे देशमुख यांच्या तिसऱ्यांदा भाजपा प्रवेशाने माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे तसेच मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर गटाला मोठा धक्का बसणार असून भविष्यात नातेपुते येथे मोहिते- पाटील व जानकर गट कोणत्या नेत्याला ताकद देणार हा येणारा काळच ठरवेल

दहिगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्नरथोत्सवा निमित्त २५ वर्षांची परंपरा; ५५० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक१० नोव्हेंबर 2025  रोजी भव्य मोफत नेत्र, सांधे प्रत्यारोपण, आणि हृदयरोग उपचार शिबिर. ॲड. श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन, मुंबई आणि श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर अतिशय क्षेत्र, दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दहिगाव येथे रथोत्सवानिमित्त सार्वजनिक शिबिर आयोजित करण्याची गेली २५ वर्षांची परंपरा असून, यंदाचा हा २६ वा सामाजिक उपक्रम होता.शिबिराचे उद्घाटनसकाळी ९:३० वाजता दहिगाव येथील श्री जंबुकुमार गौतमचंद दोशी गुरुकुल येथे या शिबिराचे उद्घाटन झाले. मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथील डॉ. विशाल मेहता आणि संदीप विलासचंद्र दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.शिबिराचे वैशिष्ट्ये या शिबिराला श्री १०५ अतिशयकारी विगुनसागरमहाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले विकून सागर जी महाराज बोलताना म्हणाली की डॉक्टर हे शरीराचे इलाज करत असतात संत हे आत्म्याचे इलाज करतात दोन्ही इलाज खूप महत्त्वाचे आहेत याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे.शिबिरात ५५० हून अधिक रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तपासणी तसेच उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत यामध्येहृदयरोग शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण मुतखडा आणि प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया मशीनद्वारे डोळे तपासणी आणि चष्मा वाटप डोळ्यांचे ऑपरेशनतपासणी केलेल्या रुग्णांना साधारण एक लाख रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली, तसेच १०० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. पुढील मोफत शस्त्रक्रियाया शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी: साधारण ४० रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन फलटण येथील लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल, फलटण येथे मोफत करण्यात येणार आहे. हृदय आणि सांध्यांच्या आजाराविषयीचे रुग्ण आणि गरजू रुग्णांना पुढील तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथे करण्यात येणार आहे.रुग्णसेवेसाठी बारामती येथून डॉ. शैलेंद्र ठवरे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. केतन आंबर्डेकर (हृदयरोग तज्ञ), डॉ. विशाल नवले (किडनी विकार तज्ञ), डॉ. सुनील ढाके (एमडी मेडिसिन) यांसह अनेक तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. याप्रसंगी दहिगाव गावच्या प्रथम नागरिक सौ. सोनम खिलारे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सत्यशील पाटील, उपसरपंच संदीप सावंत, उपसरपंच श्री. दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील श्री. मोरे, मंदिरचे ट्रस्ट श्री. संजय दोशी, अमृतलाल गांधी  रत्नत्रय एज्युकेशनचे चेअरमन श्री. आनंदलाल दोशी, राहुल दोशी, अमित गांधी, वैभव शहा, डॉ. उदयकुमार दोशी, डॉ. अजिंक्य व्होरा, डॉ. वर्धमान दोशी, रोनक चंकेश्वरा, सोहिल दोशी, विराग गांधी, शितल गांधी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश दोशी (अकलूज) यांनी केले, प्रास्ताविक डॉ. तेजस चंकेश्वरा (नातेपुते) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नरेंद्र गांधी यांनी केले.हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. चंकेश्वरा व त्यांचे सहकारी श्री. गोमटेश दोशी, डॉ. अनुजा, मेडिकल असोसिएशनचे श्री. अमित शहा, अमोल गांधी, अमित गांधी यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.

शिवप्रसाद राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देते- चेअरमन शरद मोरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते येथे शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे, सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील पंधरावा आरोग्य शिबिर नातेपुते येथे घेण्यात आली. यावेळी प्रथम शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. या आरोग्य शिबिरास तरूणापासून वृद्ध बालकापासून सर्व रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना शिबिर राचे संयोजक शिवप्रसाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद उर्फ बापू मोरे म्हणाले की शिवप्रसाद संस्थेने आज तागायत अनेक चढउतार बधितले आहेत समाजकारण करताना नेहमीच गोरगरिबांना आरोग्याच्या समस्येविषयी ग्रासताना बघितले असताना शिवप्रसाद फाउंडेशनने एक मोठा निर्णय घेऊन तालुक्यामध्ये कमीत कमी २० आरोग्य शिबीर वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचे ठरवले व त्याप्रमाणे हे पंधरावे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये कोणतेही राजकारण नसून शिवप्रसाद नेहमी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त लक्ष देते त्याचा आम्हाला अभिमान आहे आतापर्यंत जवळजवळ ५००० चा टप्पा रुग्णाचा तपासण्याचा व ऑपरेशन मोफत चष्मे हा पार पाडण्यात आला आहे व भविष्यात ही शिवप्रसाद फाउंडेशन ही माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमामध्ये ५) मोफत हृदयरोग तपासणी ( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी), मोफत यूरोलॉजी तपासणी (लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट), ३) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप (तिरळेपणा, २)बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले रेटीना), ४) मोफत कॅन्सर तपासणी, ५) मोफत रक्त तपासणी, ६) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, ७) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया, ८) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ९) मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट वरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा ६४० नागरिकांनी लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ. लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेचऑपरेशनची तपासणी केली.या कार्यक्रमास शरद (बापू), एन के साळवे (आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) मोरे, सौ. अनिताताई लांडगे (नगराध्यक्ष), अतुल बापु पाटील (उपनगराध्यक्ष), मामासाहेब पांढरे (अध्यक्ष ि कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती), अॅड. शिवाजीराव पिसाळ (मामाश्री पतसंस्था जेष्ठ संचालक), महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ग्राहक तक्रार निवारण मंच चे सोलापूर अध्यक्षम श्रीकांत बाविस्कर, सुनील राऊत (पत्रकार), संजय मामा उराडे (जेष्ठ व्यक्तिमत्व), मोहित जाधव (उद्योजक), अतुलशेठ बावकर (अध्यक्ष-वि अतुल उद्योग समुह) राजेंद्र पांढरे पाटील (इगझ शहराध्यक्ष), महेश शेटे साहेब (व्हा.चे. रेणुका पतसंस्था), माऊली उराडे (नगरसेवक), डॉ. लताताई मोरे, बळीराम गेजगे, बाळासाहेब निकम, बशीर काझी, पत्रकार,मनोज राऊत, प्रमोद शिंदे , सुनील ढोबळे , संजय पवार सर, समीर सोरटे, सुशांत पाटील उपस्थित होते, शिबिर पार पाडण्यासाठी सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 30 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


शुक्रवार दिनांक 07/11/2025 रोजी अकलूज पोलिस स्टेशन हद्दीतील लवंग ता. माळशिरस जिल्हा_ सोलापूर, गावातील निशांत पाटील यांच्या ऊसाला सायंकाळी 5:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे,हे कळताच गावचे पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी आले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 30 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.लवंग ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.
आजवर लवंग गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी 35 वेळा वापर करण्यात आला आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1030 गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील 11.63 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.आजवर जिल्ह्यात 19480 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होतआहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य होत आहे.

उद्या शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने नातेपुते येथे भव्य आरोग्य शिबीर

शिवप्रसाद फाऊंडेशन शरद बापू मोरे व ऋतुजा तई मोरे, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते तालुका माळशिरस येथे भव्य उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी वाजेपर्यंत पर्यंत भव्य आरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मोफत हृदयरोग तपासणीइसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीमोफत युरोलॉजी तपासणीलघवीचे आजार, किडनी, मुत्राशयाचे आजार, प्रोस्टेटमोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपतिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण पापणी पडलेले-रेटीनमोफत कॅन्सर तपासणीमोफत रक्त तपासणीमेंदुचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रियाअल्पदारात मोतीबिंदू शस्त्रक्रिया खालील आजारांच्या तपासणी / उपचारासाठी नोंदणी सुरु आहे.मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे, अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट करण्यात येणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रसाद फाउंडेशन चे चेअरमन शरद बापू मोरे व मा. जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई मोरे रमेश आप्पा मोरे यांनी आवाहन केले आहे.

यासाठी संपर्क – रोहन कोरटकर : ९१७२५७३९२१ |सुशांत पाटील : 9860915001 |शिवप्रसाद फाऊंडेशन : 9552594950

शिबिरासाठी पत्ता : शिवप्रसाद अर्बन शेजारी, दहिगाव रोड, नातेपुते ता. माळशिरस या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दीन होय…. वैभव गिते

 7 नोव्हेंबर 2025 हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांतिकारी दिवस होय! 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस! महान शिल्पकार – विद्यार्थी दिवस!! आज सात नोव्हेंबर सिम्बॉल ऑफ नॉलेज,शिक्षण तज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम शाळा प्रवेश!! म्हणजेच राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच नागरिकांना लाख लाख शुभेच्छा!  पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे, पुस्तक म्हणजे जीव की प्राण असणारे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर. विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी घेतला. हा निर्णय शासनास शिव,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घ्यावयास भाग पाडला.तेव्हापासून सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित करून दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित कराव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रताप सिंग हायस्कूल सातारा येथे प्रथम शाळा प्रवेश झाला. आणि तोच विद्यार्थी दिवस म्हणून पुढे आला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुस्तकावर खूप प्रेम केले. अत्यंत गरिबी हालाखीची परिस्थिती. चातुर्वरण्य व्यवस्थेने व अस्पृश्यतेने काहूर माजवलेले दिवस,गरिबीच्या झळांच्या सोबतच पोटाला चिमटे घेऊन जगण्याचा ससेहेलपटपणाअशा या संघर्षातून शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही असे जाणून बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी त्यांना प्रथम शाळेत घातले आणि शिक्षण घेण्याचा संदेश दिला. लहानपणापासूनच अतिशय हुशार व चौकस बुद्धीचा असलेले बाबासाहेब वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत.बाबासाहेबांना शाळेचे गोडी निर्माण झाली. वाचनाचे वेड लागले,   वाचनातूनच ते स्वतः घडले. उच्च विद्या विभूषित झाले आणि  समाजाला घडवले व देशाला घडवण्याचे मौल्यवान कार्य केले. जगात सर्वात सुंदर असे संविधान या भारतासअर्पण केले.म्हणून आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी, शिक्षण प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा ठरेल.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब परिस्थितीला तोंड देत परिस्थितीवर विजय मिळवत यशाचे शिखर गाठले.त्यांचे बुद्धीचातुर्य त्यांचे, ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले!! आणि त्यामुळेच त्यांना आदराने विश्वरत्न म्हटले जाते. आज सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांपासून खूप मोठी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची, संघर्षातून मार्ग काढत यशाचे शिखर गाठण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा विद्यार्थी उद्या देश घडविणारा आहे. आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे.म्हणून तो प्रामाणिक, चरित्रवान कार्य कुशल, कर्तव्यदक्ष देश प्रेमी, समाज हिताचा विचार करणारा घडला पाहिजे,  म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय आहे हा दिलेला संदेश बाबासाहेबांचे देशावरील प्रचंड प्रेम दाखवते.लोक राहण्यासाठी घर बांधतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं व हजारो पुस्तके त्या घरामध्ये ठेवली त्याचं नाव राजगृह होय!ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे त्यामुळे माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन करत रहावे असा संदेश देत मी आजीवन विद्यार्थी आहे असे बोलून शिक्षणाबद्दल व ज्ञानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूक किती मोठी होती याचा विचार करता येईल.अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही डॉ.आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे लागतील.या देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच तारू शकतात.हा शाळा प्रवेश दिन प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा घेऊन साजरा करायचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम या गीताचा 150 वा वर्धापन दिनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळा महाविद्यालयात विद्यार्थी दिन योग्य प्रकारे साजरा होतो किंवा कसे ? विद्यार्थी दिवस साजरा करून घेण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची व कार्यकर्त्यांची आहे.आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन!——————————-——–
मा. वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस निमंत्रित सदस्य: जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणेमो.8484849480

शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर व चष्मे वाटप

शिवप्रसाद फाउंडेशन, श्री सदूरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे आणि सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिक्षक कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा मोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मी पूजनाने करण्यात आले.या शिबिरात हृदयरोग, डोळे, अस्थिरोग, स्त्रीरोग, किडनी, मधुमेह,त्वचारोग, कॅन्सर, कान-नाक-घसा तसेच मेंदू व मज्जातंतू विकारांसह विविध आजारांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सेवासदन हॉस्पिटलच्या डॉ.मोफत महा आरोग्य शिबीरगोफत धध्ने वाटपलताताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. एकूण ४३० नागरिकांनी या शिबिराचा लाभघेतला.कार्यक्रमास शरद मोरे, ऋतुजा मोरे, डॉ. लता मोरे, नगराध्यक्ष विजय देशमुख, नगरसेवक रावसाहेब देशमुख,वैभव जानकर, उद्योजक हसन मुल-ाणी, अनिरुद्ध शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम गेजगे, नानासाहेब हांडे, तसेच सेवासदन हॉस्पिटलचे डॉक्टर्स, शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed