Uncategorized

फोंडशिरस येथे 85 टक्के मतदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रशांत खरात)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 फोंडशिरस येथे 85% मतदान शांततेत पार पडले आहे. वार्ड क्रमांक एक मध्ये1548 पैकी1281 मतदान झाले आहे. वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक 2)1627 पैकी1359, वार्ड क्रमांक ती3) बिनविरोध तीन उमेदवार निवडून आले आहेत. वार्ड क्रमांक चा4)1185 पैकी960, वार्ड क्रमांक5)1331 पैकी1162, तर वार्ड क्रमांक 6)1857 पैकी1468 फोन मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागले आहे.

पिरळे येथे शांततेत मतदान उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नातेपुते (प्रमोद शिंदे)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 पिरळे  येथे शांततेत मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.किरकोळ वगळता तिरळे ग्रामस्थांच्यावतीने मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामपंचायत 11 ची बॉडी असून. एकूण 85 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2847 मतदानापैकी2489 पोल मतदान झाले आहे. एकूण पुरुष 1490 मतदान पैकी1332 मतदान झाले आहे. एकूण महिला1465 मतदानापैकी1157 मतदान झाले आहे. पिरळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार वार्ड आहे. त्यापैकी वार्ड क्रमांक 1)689 पैकी573, पुरुष-345 पैकी291, महिला344 पैकी282 मतदान झाले आहे., वार्ड क्रमांक 2) एकूण मतदान850 पैकी-769, पुरुष450 पैकी416, महिला469 पैकी353, वार्ड क्रमांक 3)633 पैकी568, पुरुष332 पैकी308, महिला300 पैकी260, वार्ड क्रमांक 4) एकूण675 पैकी589, पुरुष363 पैकी317,महिला352 पैकी262. अशा पद्धतीने शांततेत मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात NDMJ चे निदर्शने

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात निदर्शने करन्यात आली….

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने आंदोलन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, रामदासजी आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र शासनाने कमी केली आहे रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केली आहे यामुळे राज्यातील मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. रामदास आठवले हे गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात कोरोना covid-19 च्या प्रादुर्भाव मध्ये सुद्धा त्यांनी भारतभर दौरे करून गोरगरिबांच्या अडचणी सोडवले आहेत ते सध्या केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेत कपात करून त्यांच्या गाडीच्या मागील एस्कॉर्ट सुद्धा काढून घेतले आहे. आठवले साहेबांचे राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा हा रडीचा डाव आहे. हा खोडसाळपणा मागासवर्गीय जनता खपवून घेणार नाही महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याविरोधात विरोधी पक्षात असलेले मंत्रीगण यांची सुरक्षा कपात केल्याचे दिसून येत आहे नियम सर्वांना समान असायला हवा तात्काळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नेहमीप्रमाणे झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्यशासनास नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिला आहे.
प्रास्ताविक एन.डी.एम.जे संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते भगवान भोसले यांनी केले त्यांनीसुद्धा राज्य शासनाचा निषेध करत रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे जोरदार मागणी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरस तालुक्याचे नेते रविराज बनसोडे यांनीसुद्धा शासनाचा निषेध करून तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस बोलून दाखवला यानंतर अकलूज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महापुरुषांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नारायण झेंडे,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सतिश शिंदे,समीर नवगिरे,संजय नवगिरे व आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले साहेबांना सुरक्षा वाढवावी म्हणून एनडी एम जे च्या वतीने प्रांत कार्यालयावर निदर्शने करताना राज्य सचिव वैभव जी गीते साहेब व कार्यकर्ते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा कमिटीच्या वतीने राजमाता मा.जिजाऊ जयंती साजरी करून वार्षिक आढावा बैठक संम्पन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ऑल इंडिया एस.सी.एस.टी.असोसिएशन शाखा कल्याण (ओ. एच. ई.) कल्याण येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा कमिटीच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जंयती साजरी करण्यात आली.* यावेळी एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव अँड. डॉ. केवलजी उके सर होते. तसेच एन.डी.एम.जे. राज्य समन्वयक आदरणीय मा. रमाताई आहिरे व राज्य संघटक आयु. शरदजी शेळके, मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बुध्द वंदना घेऊन महापुरुषाच्या प्रतिमेस व राजमाता जिजाऊ याच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करून आणि अगरबत्ती-मेणबत्ती प्रज्वलित करून वंदन करण्या आले.

यावेळी राज्य व विभागीय कार्यकारिनितील काही मुख्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा व इतर शहर आणि तालुका कार्यकारिणीची घोषणा करून पदाधिकारयांची नियुक्ती पत्र देवून पदनियुती करण्यात आली. ठाणे जिल्हा नवनिर्वाचित समिती मध्ये अध्यक्ष पदी मा.विजय कांबळे, उपाध्यक्ष पदी प्रा.संतोष बनसोडे, सहसचिव पदी मा. सुनिल ठेंगे, जिल्हा संघटक पदी मा.,संदेश भालेराव यांची निवड करण्यात आली.
तसेच …
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष पदी अ‍ॅड. प्रविण बोदडे, उपाध्यक्ष पदी मा.राजेश साबळे, सचिव पदी मा. संदिप घुसळे आणि जिल्हा संघटक पदी मा.अशोक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच आयु. प्रभाकर एस.कोंगळे व मा. विलास शिवराम जाधव यांची जिल्हा सहसंघटक पदी निवड करण्यात आली.

शहापुर तालुका अध्यक्ष पदी मा.रविंद्र गजानन संगारे, बदलापूर शहर अध्यक्ष पदी मा.किरणजी पवार व सचिव पदी मा. अमोल निर्मळ आणि कल्याण पुर्व अध्यक्ष पदी मा. जितेंद्र बुकाणे यांची निवड करण्यात आली.

तसेच एन.डी.एम.जे. राज्य महासचिव आदरणीय डॉ. केवल उके सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. राज्य समनव्यक मा.रमाताई आहिरे व राज्य संघटक आयु.शरद शेळके यांनी सुध्दा मार्गदर्शन करून राजमाता मा.जिजाऊ याच्या जीवनावरील विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सचिवआयु.विनोद श्यामसुंदर रोकडे* व जिल्हा समितीच्या सर्व पदाधिकारयांनी मिळुन केले तर सूत्र संचालन मा. जितेंद्र बुकाणे यांनी केले.

गोरगरिबांच्या जगण्याचा व मरण्याचा प्रश्न गंभीर होत असताना महाराष्ट्रातील मंदिरांची देखभाल करण्यासाठी राज्यशासनाने 101 कोटींची तरतूद करण्यासाठी 2021-22 या वर्षात मान्यता देण्यात आली आहे.यास आमचा कडाडून विरोध आहे………..वैभव गिते.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसर्व राज्यांच्या तुलनेत कोरोनाने मृत्यू होण्याचा महाराष्ट्राचा मृत्यूदर जास्त आहे.कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 70 टक्के रोजगार बुडाला आहे.अनेक कंपन्या बंद पडून कर्मचारी बेरोजगार झाला आहे.हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैशाची लूट सुरू आहे.राज्यशासनाने टाळे बंदी जरी उठवली असली तरी अद्याप उद्योगगधंदे गतिमान झाले नसल्याने अर्थव्यवस्था गतिमान झालेली नाही.या अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतायेत.मागासवर्गीयांच्या महामंडळांना निधी मंजूर नसल्याने तरुण वर्गास उद्योगधंद्यांसाठी कर्ज मिळत नाही.अनेक कर्जप्रकरने मंजूर आहेत पण त्यांनासुद्धा राज्याने व केंद्राने निधी दिला नाही.अश्या परिस्थितीत राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत व पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आव्हान राज्यशासनापुढे आहे.गोरगरिबांच्या जगण्याचा व मरण्याच्या प्रश्नासोबतच भाकरीचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या हक्कचा प्रगतीचा कोट्यवधी निधी अखर्चित ठेवून इतर विभागांना वळवन्याचा सपाट सुरू आहेच.
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिरांच्या देखभालिसाठी 101 कोटींची तरतूद करणे हे योग्य नाही
गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये.राज्यशासनाने मंदिरांसाठी 101 कोटींची तरतूद केली आहे याचा फेरविचार करून ही सर्व तरतुद गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी,आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या व दलित आदिवासींच्या हत्या थांबवण्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते राज्य समनवयक रमाताई आहिरे,राज्य सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य महिला संघटक पंचशीला कुंभरकर यांनी केली आहे.

भंडारा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीची केंद्रीय पथकाकडून चौकशी करा….लोकप्रिय नेते वैभव गिते

राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाख रुपये मदत करावी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात शिशु मृत्युमुखी पडली आहेत.ही घटना हृदयाला पीळ घालणारी असून याची केंद्रीय पथकाकडून चौकशी झाली पाहिजे.केंद्रीय पथकाने केरळ किंवा कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांकरवी तपास करावा.राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाखाची तातडीची मदत द्यावी.फक्त फायर ऑडिट न करता महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळतात का?महात्मा फुले जण आरोग्य योजनेची अंमलबजावणी होते किंवा नाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणारे उपचार मोफत व योग्य प्रकारे मिळतात का? रुग्णांकडून पैशाची लूट होते का? याचे सुद्धा संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.तसेच धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये दहा टक्के खाटा राखीव असतात परंतु या दहा टक्के राखीव खाटांवर गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात का? प्रत्येक जिल्ह्याचे शल्यचिकित्सक या योजनांच्या अंमलबजावणीचे अध्यक्ष असतात ते नियमितपणे बैठका घेतात का? हे सर्व प्रश्न भंडारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.त्यामुळे सरकारने फक्त फायर ऑडिट करून वरवरची मलमपट्टी करू नये व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाच लाख रुपयांची घोषणा करून हात वर करू नये मार्च 2013 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या बारामतीच्या कुटुंबास 15 लाख रुपये मदत त्यावेळी दिली होती मग भंडारा दुर्घटनेत फक्त पाच लाखाची तुटपुंज्या मदतीची घोषणा करता हा भेदभाव का करता?असा सवाल राज्यशासनास लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी केला आहे.सत्ताधार्यांनी,विरोधी पक्षांनी व संघटनांनी या दुर्घटनेचे राजकारण न करता या विषई माणुसकीच्या दृष्टकोणातून पाहिले पाहिजे इच्छाशक्तीचा वापर करून गंजलेली व बुरसटलेली तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेली आरोग्य व्यवस्था सामान्य गोरगरिबांसाठी सुरळीत करावी असे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते,राज्य समनवयक रमाताई आहिरे,सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,महिला संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य उपाध्यक्ष शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य सहसंघटक दिलीप आदमाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने


अतिक्रमणे नियमित होत नसतील तर तहसीलदारांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही….विकास धाइंजे
घरकुले बांधायला शासकीय जागा दिली नाही तर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार…..वैभव गिते
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण” राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,आवास योजना पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व इतर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करनेसंदर्भात ज्या शासकीय,गावठाण, गायरान,शेती महामंडळ, व इतर जागेतील जागा व घरे नियमाकुल करण्याच्या संदर्भात तालुका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल अथवा कार्यवाही केली नाही त्यामुळे शासन निर्णयांची व शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे अनेक जाती धर्मातील गोरगरीब घरकुल लाभार्थी हक्काच्या घरापासून व जागा व घरे नियमानूकुल होण्यापासून वंचित आहेत.
माळशिरस यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणाऱ्या लोकांच्या नोंदी नमुना नंबर आठ ला नोंदी घेतलेल्या नाहीत.ग्रामसेवकांनी आर्थिक तडजोडी करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व चुकीची दिशाभूल करणारा अहवाल ऑनलाईन पंचायत समितीस व तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयास पाठवला आहे.(उदा.नातेपुते,कुरबावी),नव्याने तालुक्यातील सर्व गावांचा फेरसर्वे करावा.सर्व नोंदी कायदेशीर घेण्यात याव्यात.कुणावरही अन्याय होणार नाही कोणीही या सर्व लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत) अकलूज यांनी दिनांक 20 मार्च 2020 रोजी तहसीलदार यांना शासकीय जागेतील अतिक्रमणे कायम करणेबाबत शासन निर्णय व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कार्यवाही करावी असे पत्र पाठवले आहे तसेच दिनांक 14/9/2020 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत)अकलूज याना शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानूकुल करण्यासाठी पत्र पाठवले आहे.तरीसुद्धा माळशिरस तहसील,पंचायत समीती या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना अहवाल मागितला आहे परंतु आजअखेर ग्रामसेवकांचा अहवाल आलेला नाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कार्यवाही करावी.सर्व संबंधित विभागांची व संघटनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी
तरी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास VBयोजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास ग्रामीण राबवून सर्व शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानुकूल न केल्याने व घरकुल साठी शासकीय जागा न दिल्याने माळशिरस जि.सोलापूर या तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी प्रास्तविक करताना विकास दादा धाइंजे यांनी सर्व शासननिर्णय शासनाचे धोरण पंचायत समिती व तहसीलदार यांनी आजपर्यंत केकेल्या कामकाजाचा चुकारपणाचा पाढा जनतेपुढे मांडला व एक महिन्यात सर्व अतिक्रमणे नियमित न केल्यास माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी माळशिरस तालुक्यातील 108 गावांमध्ये अनेक जाती-धर्माच्या नागरिकांना घरकुले मंजूर आहेत परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्याने घरकुले माघारी जात आहेत.शासनाने ज्यांना घरकुलांसाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय गायरान गावठाण व इतर जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत तरीसुद्धा तालुका प्रशासन जाणून-बुजून लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देत नाही म्हणून प्रशासनाचा निषेध केला ताबडतोब घरकुलांसाठी जागा न दिल्यास माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधण्याचा इशारा यावेळी वैभव गिते यांनी दिला.सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे यांनी नातेपुते पश्‍चिम भागातील सर्व अतिक्रमणे नियमित करावेत अशी मागणी केली. माळशिरस शहराचे माजी अध्यक्ष यांनी मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला डॉ.कुमार लोंढे यांनी तहसीलदार यांचा कडक शब्दात निषेध नोंदवला.उपस्थित जनसमुदायामधील प्रशासनाच्या प्रति रोष व निदर्शनाची तीव्रता लक्षात घेऊन माळशिरस तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी जनसमुदायासमोर घेऊन तात्काळ संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती,अधीक्षक भूमिअभिलेख, तहसील या विभागांची बैठक घेऊन हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाईंजे व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.यावेळी प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,प्रशांत खरात,रणजित धाइंजे, रणजित सातपुते,दयानंद धाइंजे,संघर्ष सोरटे,रजनीश बनसोडे व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसह माळशिरस तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थि
त होते.

नातेपुते येथील ज्ञानदीप इन्स्टिट्यूट पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पत्रकारांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते येथील ज्ञानदीप इन्स्टिट्यूट आयटीआय व पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पत्रकार दिनानिमित्त संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच कॉलेजमध्ये नव्याने विविध ट्रेड साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज भूषण नानासाहेब देशमुख( एस एन डी )इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संदीप पानसरे व प्रशासकीय अधिकारी शकूर पटेल सर हे होते.तसेच सत्कार मूर्ती म्हणून नातेपुते येथील पत्रकार बांधव उपस्थित होते प्राचार्य संदीप पानसरे व प्रशासकीय अधिकारी शकूर पटेल,आंबेडकरी चळवळीचे नेते पत्रकार एन.के.साळवे,ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई नदाफ, प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर  मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार अभिमन्यू आठवले,श्रीकांत बाविस्कर,आनंदकुमार लोंढे, मनोज राऊत, विलास भोसले,सचिन रणदिवे, संचालक हनुमंत माने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.र्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष एम.डी.ढोबळे सर व सी.डी ढोबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नातेपुते येथील पै.अक्षय भांड परिवाराच्यावतीने पत्रकारांचा सन्मान *


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते येथील  राष्ट्रवादीचे युव नेतृत्व पैलवान  अक्षय भांड  व आप्पासाहेब भांड यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई एन के साळवे यांनी मनोगत व्यक्त केले  तसेच आभार व्यक्त करताना अक्षय भांड  म्हणाले की झ्या प्रत्येक घडामोडी मध्ये पत्रकार बंधूंचे मार्गदर्शन मला लाभते व योग्य वेळी मला योग्य मार्ग दाखवण्याचे काम हे पत्रकार बंधू मला करत असतात त्यामुळे त्यांच्या बद्दल मला नेहमीच आपले पणा वाटतो. तसेच यावेळी पत्रकार  श्रीकांत बाविस्कर आनंदकुमार लोंढे,मनोज राऊत,प्रमोद शिंदे,विलास भोसले, प्रशांत खरात ,हनुमंत माने, सचिन रणदिवे, तसेच रियाज शेख,दादा अटक,राजन चैघुले,संकेत लाळगे,विकी तारळकर,गणेश कुंभार,रवी वाघमारे व माझे सहकारी उपस्थित होते.

गोंदवलेच्या वनराईला ठाण्याच्या इंजिनाने पाणी..

..

नववर्षाची भेट, रोहित-रक्षिता भावंडांसाठी 51 हजारांची मोठी मदत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे :
गोंदवले खुर्द येथील भावंडांनी पर्यावरण रक्षणासाठी डोक्यावरुन पाणी नेऊन वनराई फुलविली. झाडे मोठी झाल्याने त्यांना डोक्यावरून पाणी नेलेलं पुरेना, याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील श्री स्वामी समर्थ ट्रस्ट चे महेश कदम यांनी या भावंडांना तब्बल 51 हजार रुपयांची डिझेल इंजिन, पाईप देऊन नववर्षाची भेट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोंदवले खुर्द ची भावंडे रोहित बनसोडे व रक्षिता बनसोडे ही गेल्या तीन वर्षांपासून अखंडितपणे माणदेशी दुष्काळी भागात पर्यावरण रक्षणासाठी झुंज देत आहेत.

बोडक्या माळरानावर त्यांनी हजारो झाडांची वनराई साकारली आहे. झाडे लहान असताना पाणी डोक्यावर वाहून ती जगविली, पण आता झाडे भरपूर प्रमाणात लावल्याने त्यांना पाणी घालणे कठीण जात होते. ताकदीच्या आवाक्याबाहेर पाणी घातले जात होते. ही बाब लेखक अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून महेश कदम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी डिझेल इंजिन आणि पाईपलाईन घेण्यासाठी ही यंत्रसामग्री देऊन रोहित-रक्षिताला अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववर्षाचा मुहूर्त साधला
गोंदवले येथील रोहित आणि रक्षिता या भावंडांनी केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी महेश कदम यांनी नववर्षाचा मुहूर्त साधला. दोघांनी कष्टाने उभा केलेल्या वनराईत वेळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही कायमस्वरूपी मदत करण्याचे आश्वासन दिले. वनराई फुलवण्याचं या दोन्ही भावंडांचे काम इतरांसाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे, असे कदम म्हणाले.

माणदेशी मातीसाठी इथल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही झाडे लावून जगवत होतो. गेल्या तीन वर्षापासून आम्ही ज्या यातना, कळा सोसल्या त्या कदम यांच्या दातृत्वाने भरून पावलं आहे. भविष्यातही हिरवाई स्वप्न निरंतर ठेवू. – रक्षिता बनसोडे गोंदवले

You may have missed