Uncategorized

मेरे येथे पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )मेरे तालुका माळशिरस  येथे वाढत्या कोरोना  प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस  आरोग्य संख्येमध्ये वाढ होत आहे  व  त्या रुग्णांना रक्त साठ्यांचा तुटवडा भासत असल्याने शासन वेळोवेळी नागरिकांना रक्तदान शिबिर करण्याचे आव्हान करत आहे याच आवाहनाला प्रतिसाद देत मेरे गावचे पोलीस पाटील शहाजी गेजगे व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान घेण्यासाठी  सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक यांनी सहकार्य केले. हे शिबिर प्रशासनाच्या सर्व  नियमांचे पालन करून  पार पडले, शिबिरास मेरे गावातील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला  शिबिराचे आयोजन पोलीस-पाटील शहाजी गेजगे यांनी केले. यावेळी,अक्षय ब्लड बँकेचे  डॉ.मोरे  माळशिरस येथील डॉ.वाघमोडे  तसेच येळीव गावचे पोलीस पाटील  राजकुमार वाघमोडे  गावातील, युवक कार्यकर्ते  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेरे येथे पोलीस पाटील शहाजी गेजगे  यांच्या पुढाकाराने  रक्तदान शिबिराचे आयोजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस येथे ओबीसी मोर्चा च्या वतीने कोरोना पुरस्कार व वृक्षारोपण संपन्न

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार राम सातपुते व भाजपा जिल्हा नेते धैर्यशील भैया मोहिते पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर तसेच पदाधिकारी
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ विद्यालय माळशिरस व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोवीड सन्मान-पुरस्कार वृक्षारोपण,आधी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते यांच्या करण्यात  आले. तसेच  या कार्यक्रमस प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे भाजपा नेते धैर्यशील भैया मोहिते-पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संजय देशमुख,नगरसेवक अशोक देशमुख, संचालक महादेव माने, गौरव गांधी,आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माळशिरस तालुक्यात कोरोना काळामध्ये पोलिस- पाटील,आशा वर्कर,पत्रकार यांनी  उल्लेखनीय काम केल्याबद्दल  त्यांचाही  सन्मान ओबीसी मोर्चा वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात धैर्यशील भैया मोहिते-पाटील व बाळासाहेब सरगर यांनी मार्गदर्शन केले.
भाजपा जिल्ह्याचे नेते धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचा सत्कार करताना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर
पुरस्कार देताना आमदार राम सातपुते धैर्यशील भैया मोहिते पाटील बाळासाहेब सरगर आप्पासाहेब देशमुख व मान्यवर

साखर संचालका सोबत लवकरात लवकर बैठक लावून संबंधित शेतकर्याच्या खात्यावर्तत उसाचे बिल जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू -धर्मराज पुजारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापुर –साखर संचालका सोबत लवकरात लवकर बैठक लावून संबंधित शेतकर्याच्या खात्यावर्ती उसाचे बिल जमा करा अन्यथा या वेळी रस्त्यावर उतरू.जनहित शेतकरी संघटना दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष धर्मराज पुजारी यानी दिली आहे.
2019 मधील गळीत हंगामातील गळीत जालेल्या उसाची 27 डिसेंबर नंतर गाळप जालेल्या ऊस धारक शेतकरी लोकांची बिले गोकुळ साखर कारखाना थकवली आहे. यामुळे महारास्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या उपस्तीत 7 सप्टेंबरला बेमुदत अंदोलन करण्यात आले होते.
पण जिल्हाधिकारी साहेब साहेबांच्या मद्यस्तीने 14 तारखेला साखर कारखाना संचालका बैठक लावण्यात येणार मंटल्यावर ही अंदोलन मागे घेण्यात आली होती.
14 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांच कोरोना आढावा मुळे मुख्यमंत्री साहेबा बरोबर वीडियो कॉन्फरन्स होते माणून ही बैठक रद्द झाली करण्यात आली आहे.
पन सरकारी कामत अडथळा नको म्हणून जनहित शेतकरी संघटना गप्प आहे .
जिल्हाधिकारी साहेबनी शेतकर्याची परस्थिती लक्षात घेवून लवकरात लवकर बैठक लावुन संबंधित शेतकरयाच्या खात्यावर 2600 रुपयने त्वरित बिल जमा व्हावे अन्यथा जनहित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन कारणार आहे.प्रसंगी साखर आयुक्तांच्या कार्यालयात घुसून जाब विचारु

जनहित शेतकरी संघटनेचे नेते धर्मराज पुजारी

पिरळे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूूूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे तालुका माळशिरस येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लोकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम आयुर्वेदिक गोळ्यांचे ह्युमॅनिटी बुस्टर होमिओपॅथिक डोस चे पिरळे ग्रामपंचायत च्या वतीने वाटप करण्यात आले.

हा उपक्रम पिरळे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानदेव शिंदे यांच्या कल्पनेतून तसेच 14 वा वित्त आयोग फंडाच्या व्याजाच्या पैशातून करण्यात आला हा उपक्रम राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशाताई सेविका यांच्या मदतीने घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सरपंच ज्ञानदेव शिंदे,पत्रकार प्रमोद शिंदे,ग्रामसेवक रमेश जामदाडे,माजी सरपंच शिवाजी लवटे-पाटील महादेव शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता सूर्यवंशी, लैला आत्तार, मुक्ताबाई चव्हाण, मनीषा कांबळे, मदतनीस आत्तार मॅडम, भोसले मॅडम,नफिसा आत्तार, बुधावले मॅडम,तसेच आशा ताई सेविका सुवर्णा शिंदे, मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान,इत्यादी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश खिलारे, अनिल वाघमोडे, नितीन खिलारे यांनी वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले.

जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे अंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (सोलापूर )शेतकर्याना उसाचा बिल न मिळाल्याने प्रभाकर भैया देशमुख यांच्या उपस्तीतीत जनहित शेतकरी संघटना यांच्यावतीने बेमुदत धरणे अंदोलन करण्यात आली होतो अंदोलनात दक्षिण सोलापूर चे उपाध्यक्ष धर्मराज पुजारी अणि 200 शेतकरी बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले यावर कलेक्टर साहेबनी साखर कारखाना संचालक यांची मिटींग घेतली व उसाचे बिल देण्याचे आश्वासन दिले यावर संघटनेने निवेदन दिले अणि अंदोलन मागे घेतले. कारवाई न झाल्यास पुन्हा बेमुदत तीव्र आंदोलन करणार इशारा जनहित शेतकरी संघटनेने दिला आहे

जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापन दिन उत्स्फूर्तपणे साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मांडवे),प्टेंं रत्नत्रय शैक्षणिक संकुलात मंगलमय सूर, आकर्षक सजावट, लक्षवेधी रांगोळी, आशा चैतन्यदायी वातावरणात रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापनदिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित उत्स्फूर्तपणे पार पडला. संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व रत्नत्रय पतसंस्था चेअरमन विरकुमार दोशी,
रत्नत्रय इंग्लिश स्कूल, व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, प्रशाला कमिटी सदस्य संतोष गुरव, बाहुबली दोशी, आनंद शेंडगे, ज्ञानेश राऊत, दत्ता भोसले, यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात भगवान महावीर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. अध्यक्षीय भाषणात बोलताना दादा म्हणाले ” शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकणार नाही. या ससंस्थेतील विद्यार्थी यशाची विविध शिखरे पादाक्रांत करेल आशा प्रकारचे काम सर्व शिक्षकानीं करावे ” त्या नंतर त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. चेअरमन प्रमोद दोशी म्हणाले ” रत्नत्रय ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून चालणारी शिक्षण संस्था आहे. म्हणूनच ही संस्था अल्पवधितच विश्वासास पात्र झाली आहे.
पुढे ते म्हणाले सर्व शिक्षकांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ती साठी काम करावे. तसेच सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैवत वाघमोडे सर, सूत्रसंचालन माधवी रणदिवे मॅडम तर आभार प्रदर्शन पिसाळ मॅडम यांनी केले.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

*एन.डी.एम.जे. च्या वतीने न्याय मिळविण्यासाठी “क्वेस्ट फॉर जस्टिस” या पुस्तकाचे दिल्लीतून ऑनलाईन प्रकाशन*


पुरोगामी महाराष्ट्र दिल्ली(प्रमोद शिंदे)नॅशनल दलित मुव्हीमेंट फोर जस्टीस( एन.डी.एम.जे.), एन.सी.डी.एच.आर. व एट्रोसिटी कायदा सशक्तिकरण राष्ट्रिय महासंघ या संस्थेच्या वतीने “आस न्यायाची”, “क्वेस्ट फॉर जस्टीस” या इंग्रजी अहवालरूपी पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन झूमॲप द्वारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी.जी बालकृष्णन साहेब तसेच एन.डी.एम.जे चे जनरल सेक्रेटरी डॉ.रमेश नाथन,नेपाळचे खासदार मिनी विश्वकर्मा,विद्यापीठ अनुदानआयोगाचेअध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात, अशीया फोरम अध्यक्ष पॉल दिवाकर,भारतीय दलित अभ्यास संस्था छत्तीसगड सुश्री ममता कुजूर,तामिळनाडू पीपल्स वॉच चे कार्यकारी संचालक दलित आर्थिक आंदोलन सरचिटणीस बिना पॉल्पिकल,ॲड.राहुल सिंग,ॲड.केवल उके, तसेच अनेक मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत “क्वेस्ट फॉर जस्टीस”अहवाल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
हा अहवाल दलित आणि आदिवासी यांच्याविरुद्धच्या हिंसाचाराचे स्वरूप आणि त्याचे प्रमाण व विश्लेषण यावर आधारित आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षात अत्याचाराची एकंदर अंमलबजावणी कशी केली गेली हे सादर केले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश नाथन यांनी केले. मा.न्यायमुर्ती बी.जी बालकृष्णन यांनी क्वेस्ट फॉर जस्टीस हवालाा बद्दल एन.डी.एम.जे व एन.सी.डी.एच.आर.चे कौतुक केले तसेच ते म्हणाले की या कायद्याचा कसाउपयोग केला जातो?.ॲट्रॉसिटी कायदा मध्येेे शिक्षेचे प्रमाण खूूपच कमी आहे याचे कारण तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर दबाव आणला जातो. गुन्हेगारी,न्यायालयीन प्रशासकीय यंत्रणा गंभीरपणे दखल घेत नाही. ती अपयशी ठरत आहे.यावर एफ.आय.आर.दाखल करायलाा हव पीडीतांवर पोलीस काउंटर गुन्हे दाखल करतात दुर्लक्ष,कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकार्‍यांंवर गुन्हे दाखल करावेत.  न्यायालया मधील प्रकरणांची लढाई वाढत आहे.तसेच या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.तसेच नेपाळ चे खासदार मिनी विश्वकर्मा, डॉ.रमेश नाथन,डॉ.पॉल दिवाकर,ॲड.राहुल सिंग अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्तत केले.या कार्यक्रमास ऑनलाइन झूम ॲप द्वारे नेपाळ तसेच भारतातून महाराष्ट्र,तमिळनाडू ,दिल्ली,बिहार,राजस्थान,छत्तीसगड,मध्यप्रदेश,अनेक राज्यांतून एन.डी.एम.जे.पदाधिकारी मोठ्या संख्येनेेे उपस्थित होते.

डॉ. एन डी एम जे जनरल सेक्रेटरी रमेश नाथनएन.डी.एम.जे. च्या वतीने न्याय मिळविण्यासाठी “क्वेस्ट फॉर जस्टिस” या पुस्तकाचे दिल्लीतून ऑनलाईन प्रकाशन करताना
एन.डी.एम.जे. च्या वतीने न्याय मिळविण्यासाठी “क्वेस्ट फॉर जस्टिस” या पुस्तकाचे दिल्लीतून ऑनलाईन प्रकाशन*
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बीजी बालकृष्णन ऑनलाइन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना
एन डी एम जे महाराष्ट्र राज्य महा सचिव एडवोकेट केवल उके कार्यक्रमात सहभागी
सर्वोच्च न्यायालयाचे मा.न्यायाधीश बी.जी बालकृष्णन

ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन, दुःखद निधनापूर्वी यापूर्वी पत्रकार प्रमोद शिंदे यांना केला होता व्हिडिओ कॉल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )दुःखद बातमी ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन झाले.ॲड.जितेंद्र मन्द्रे साहेब अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती होते.माझे जवळचे निकटवर्ती मित्र होते.अनेक गरीब लोकांना त्यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली आहे व पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्याबाबत काल एक खूप खूप वाईट किस्सा घडला काल दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12:42 मिनिटांनी त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला होता त्यावेळेस मी अश्विनी हॉस्पिटल नातेपुते डॉक्टर माधव लवटे यांच्या हॉस्पिटल ला होतो. त्यावेळेस मंद्रे साहेबांचा मला अचानक व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मध्ये त्यांच्या तोंडाला व्हेंटिलेटर लावलेला दिसत होता. त्यांना श्वास नाला व बोलायला त्रास होत होता.तरीदेखील त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करून ,त्यांना मला काहीतरी बोलायचे होते. परंतु त्यांचा आवाज व्हेंटिलेटर लावल्यामुळे येत नव्हता त्यांचा आवाज ऐकण्याचा मी खूप प्रयत्न केला.त्यांना मी विचारलं साहेब काय अडचण आहे.तुमच्या सोबत कोण आहे त्यांना फोन द्या मंद्रे साहेब फक्त माझं बोलणं ऐकत होते व मला बोलण्याचा प्रयत्न करत होते.परंतु नेटवर्कमुळे आमच्या दोघांचं संभाषण एकमेकांना कळू शकले नाही.त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं त्यावेळेस मी अचानकपणे मोबाईल वरती हात फिरवला त्याचा स्क्रीन शॉट निघाला मी आणखीन एक स्क्रीन शॉट घेतला व त्यांना म्हणालो साहेब तुमच्याजवळ कोण असेल तर त्यांना मला फोन करायला सांगा परंतु हॉस्पिटलमध्ये नेटवर्क नसल्याने मी ही त्यांना बोलू शकलो नाही थोड्या वेळाने फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर माझे परममित्र दैनिक लोकमतचे वार्ताहर श्रीकांत उर्फ बापू बाविस्कर यांचा फोन झाला की पीडब्ल्यूडी चे कर्मचारी नातेपुते येथील रहिवाशी आमचे मित्र कन्हेरकर साहेब यांचं कोरोना ने दुःखद निधन झालं त्यांचाही नेहमी आमचं बसणे उठणे होते. त्यांची बातम्या ऐकताच वाईट वाटलं. बाविस्कर यांना त्यावेळी मी मंद्रे साहेबांचा हा किस्सा सांगितला व त्यांना म्हणालो मंद्रे साहेबांचा मला व्हिडिओ कॉल आला आहे.त्यांच्याजवळील कोण नातेवाईक असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा व त्यांची काय अडचण आहे ते जाणून घ्या त्यांचा नंबर मेळावा आपण त्यांना संपर्क साधून ते हो म्हणाले व त्या नातेवाईकांना बापूंनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.अखेर शेवटी आज सकाळी बातमी ऐकायला मिळाली मंद्रेसाहेब यांचे दुःखद निधन झाले.अत्यंत दुःख वाटले व डोळ्यात पाणी आले. शेवटच्या क्षणी आपल्याला व्हिडिओ कॉल केला ते काय सांगणार होते ते नेटवर्कमुळे कळालं नाही. त्यांना शेवटी मदत करू शकलो नाही हीच मोठी खंत मनाला लागून राहिली. साहेब तुम्ही शेवटपर्यंत आठवणीत राहाल.

ॲडव्होकेट मद्रे साहेब व कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली- पत्रकार प्रमोद शिंदे*

टीप- नातेपुते व परिसरातील सर्व हितचिंतक मित्र परिवार तसेच नागरिकांना विनंती आहे की आता तरी जागे व्हा कोरोना ला सहज घेऊ नका स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या सुरक्षतेसाठी प्रशासन ज्या काही सूचना देत आहे त्या सूचनांचे पालन करा स्वतःची टेस्ट करून घ्या वेळीच योग्य तो उपचार घ्या मृत्यूच्या पुढे काहीच नाही आपण जगला तर काहीही करू शकतो आपली समाजाला व परिवाराला गरज आहे* -पत्रकार प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार *

एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब यांचा शेवटचा पत्रकार प्रमोद शिंदे व्हिडिओ कॉल
मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब
पीडब्ल्यूडी चे कर्मचारी माननीय कै.कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या…

राज्यातिल प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये आन्नपरिक्षन समिती गठित करा…

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
राज्यातिल प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये आन्नपरिक्षन समिती गठित करा…

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके) हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मध्ये रुग्नांना देन्यात येनार्या जेवनामध्ये पांढर्या रंगाच्या मोठ्या अकाराच्या आळ्या निघाल्या सदर बाब ही गंभिर स्वरूपाची असुन रूग्नांच्या जिवनावर बेतनारी आहे, एकिकडे शासन प्रशासन स्तरावर कोरोना ग्रस्तांसाठी करोडो रूपये निधी खर्च केला जात आहे परंतु आसे आसतांना हिंगोली जिल्ह्यातिल रूगनांच्या जिवनाशी खेळल्या जात आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये देन्यात येनारे जेवन कंत्राटदारामार्फत आत्यंत निकृष्ट दर्जाचे देन्यात येत असुन सदर जेवनामध्ये आळ्या निघल्या आहेत म्हनुन सम्बंधित कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करून गुन्हे नोंद करन्यात यावेत जेने करून इत्तर क्वारंटाईन सेंटर मध्ये जेवनाचा पुरवठा करनार्या कंत्राटदारांवर कायद्याचा धाक राहील व आशा प्रकारच्या अप्रिय घटना महाराष्ट्रामध्ये घडनार नाहित म्हनुन तात्काळ सम्बंधित कंत्राटदाराला पाठिशी न घालता त्यांच्यावर कठोर कार्यवाही व महाराष्ट्रातिल प्रत्येक क्वारंटाईन सेटरवर रूग्नांना देन्यात येनार्या जेवनावर आन्नपरिक्षन समिती गठित करावी आन्यथा महाराष्ट्रभर एन डि एम जे चर्या वतिने आंदोलन छेडन्यात येईल आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके जिल्हानिरिक्षक अ.हाफिज अ. हादी प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके जिल्हासंघटक विजय अनंता दिपके कचरू बळीराम चव्हान औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष राजरत्न भगत, यशवंत पंडित, राहुल पुंडगे, करन ईंगोले, अनिल राउत, ईत्यादी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या

मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)-

आज मुस्लिम आरक्षण या मुद्द्यावर मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे तहसील कार्यालय माळशिरस याठिकाणी निवेदन देण्यात आले त्यामध्ये मुस्लिम समाजाला १०% आरक्षण मिळावे, निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थिती झालेली आहे. संविधानातील कलम 15  व 16 नुसार  शिक्षण आणि सरकारी नोकरी मध्ये  आरक्षण देण्याची तरतूद आहे त्या तरतूदीनुसार मुस्लिम समाजास नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात 10%  आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे निवेदन माळशिरस तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष  समन्वय समिती महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष अमीर शेख, प्रदेशाध्यक्ष रशीद शेख, महाराष्ट्र राज्य  मीडिया प्रमुख सलमान शेख, शाहाबाज शेख माळशिरस तालुका अध्यक्ष सलिम मुलाणी.आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

You may have missed