Uncategorized

*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*

*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- दहिगाव तालुका माळशिरस येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने दहिगाव मध्ये बाहेर गावाहून आलेले मजूर परंतु काम नसलेने अडकुन पडले आहेत त्यांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू श्री विजय पाटील , भारत गॅस एजन्सी मालक यांचे वतीने देण्यात आले यावेळी सरपंच ॲड रणधीर पाटील, तलाठी समाधान पाटील , पोलीस पाटील विठ्ठल मोरे , नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक माने उपस्थित होते. वाटप करते वेळेस सोशल डिस्टन्स इन चा नियम पाळून वाटप करण्यात आले.

*जीवनावश्यक वस्तूंवर जास्त दर आकारल्यास कारवाई ….विकास दादा धाईजे

*जीवनावश्यक वस्तूंवर जास्त दर आकारल्यास कारवाई ….विकास दादा धाईजे

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे निवेदन

जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतल्याने जनतेने केले भरभरून कौतुक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अकलूज )नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन सादर करन्यात आले यामध्ये देशात करोना आजाराची साथ असल्याने लॉकडाऊन चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूवरील दर मोठ्या प्रमाणात आकारले जात आहेत अश्या प्रकारच्या तक्रारी जनतेकडून सातत्याने होत असल्यामुळे आंबेडकरी चालवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी. एम.जे.च्या टीम ने प्रांत अधिकारी यांची भेट घेतली जनतेला घराच्या जवळ असलेला किराणा मालाच्या दुकानदाराकडून किराणा मालावर वस्तूच्या किमतीच्या दरापेक्षा जास्त आकारणी केली जात आहे तसेच होलसेल किराणा दुकानदार जाणून-बुजून जास्त दराने छोट्या दुकानदारांना माल देत आहेत तसेच मंडईमध्ये भाजीपाला व इतर तरकारी वर जास्त दर आकारले जात आहेत त्यामुळे सामान्य जनतेला हाताला काम नाही जवळ पैसे नाही अशा परिस्थितीमध्ये होलसेल दुकानदार व पालेभाज्या विक्रेते हे जनतेकडून चढ्या भावाने माल विकून अक्षरशः जनतेची लूट करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने स्वतः हा बनावट ग्राहक बनून या दुकानदारांवर कारवाई करावी तसेच उज्वला गॅस कनेक्शन सिलेंडर माळशिरस तालुक्यात सह सोलापूर जिल्ह्यात मोफत वितरीत करण्यात यावेत केंद्र सरकारवर व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार सर्व कार्डधारकांना व कार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात यावे गहू काढणाऱ्या मशीन मालकांना शेतकऱ्यांकडून एकरी तीन हजार अशा चढ्या भावाने पैसे घेऊन शेतकर्‍यांची लूट केली जात आहे त्यांच्यावर कारवाई करावी ग्रामपंचायत स्तरावरील 15 टक्के निधी हा वैयक्तिक लाभासाठी दिला जातो तरी तो निधी माळशिरस तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीच्या व जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वितरित व्हावे तसे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावेत शासनाच्या आदेशानुसार गावातील सर्व नागरिकांना धान्य वाटप व्यवस्थित होण्यासाठी ग्रामपातळीवर मौजे तलाठी यांच्या अंतर्गत कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे रखने कामी करण्यात येणाऱ्या उपाययोजना गाव पातळीवरील कृती समिती त्यामध्ये अन्नधान्याचा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 24 3 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार तलाठी व ग्रामसेवक यांच्या कमिट्या तात्काळ कराव्यात झालेल्या कमिट्यांची माहिती मिळावी रेशन दुकानदार सर्व जनतेला डाळीचे वाटप करत नाहीत त्यांचेवर तात्काळ कारवाई करावी राज्यातील सर्वच आशा कार्यकर्ती आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मास्क सुरक्षिततेचे सर्व साहित्य तात्काळ देण्यात यावे तसेच अशा कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच लाख विमा देण्यात यावा
अशा मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी शमा पवार यांना देण्यात आले निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले. निवेदनावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे,राजेश साळे,नवनाथ भागवत यांच्या सह्या आहेत.

नातेपुते येथील पोलीस व व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन* गरिबांना मदतीचा हात*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी देशात झालेल्या लॉक डाऊनलोड मुळे हातावरती पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांचे हाल होत  असल्यामुळे नातेपुते तालुका माळशिरस येथील व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन घडून आले आहे .नातेपुते आणि परिसरातील गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे नातेपुते व परिसरातील झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांची उपासमार होत असल्याकारणाने नातेपुते पोलीस स्टेशने चे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे व कर्मचारी यांनी नातेपुते येथील व्यापाऱ्यांना गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते ची दखल घेत नातेपुते येथील व्यापारीव्यापारी बाहुबली सेठ शंकेश्वर, महावीर नथुराम दोशी, प्रीतम ट्रेडिंग कंपनी, सिद्धांत ट्रेडिंग कंपनी, राजेश मोहनलाल दोशी, सुधीर दोशी, तलकचंद रावजी दोशी, व्यापारी असोसिएशन  च्या किराणा व्यापाऱ्यांनी गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. प्रत्यक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी व कर्मचारी पत्रकार सुनील राऊत,अपूर्व चकेश्वरा, वैभव शहा,सुयोग दोशी, सागर दोशी,पारस शहा, यश गांधी,यांनी प्रत्यक्षात झोपड्यांमध्ये जाऊन मदत दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बरोबर माणुसकीचे दर्शन घडवल्याबद्दल व्यापारी व पोलीस यांचे परिसरात कौतुक होत आहे.

फोंडशिरस येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

फोंडशिरस येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
फोंडशिरस ता माळशिरस येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका यांचे वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते या शिबिरात एक महिलांचं 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुका भाजपा तालुकाध्यक्ष सोपान काका नारनवर, बाळासाहेब सरगर माजी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब वावरे ओबीसी बीजेपी सेल अध्यक्ष, तसेच अध्यक्ष माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संतोष महामुनी , तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वारे शिवाजी सरजे, बादशहा मुंडे, पुरुषोत्तम दाते, संभाजी गोरे, दत्तात्रय गोरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बालाजी रणदिवे ,सूरज सरजे, आमीर मणेरी,अन्वर मणेरी,लक्ष्मण राऊत,यांनी परिश्रम घेतले.

माळशिरस तालुक्यातील नागरिकांसाठी समन्वय कक्ष

माळशिरस तालुक्यातील नागरिकांसाठी समन्वय कक्ष
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे ) कोरोनो व्हायरस ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत संचार बंदीमुळे लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर
यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील लोकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला असून आरोग्य सेवा उपलब्ध होत नसेल,जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत नाहक त्रास होत असेल ,नागरिकांना जाणवणाऱ्या समस्यासाठी तालुक्यातील या कार्यकर्त्यांना फोन करा आपल्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ मदत केली जाईल
जे उपाशी आहेत अशांना घरपोच जेवण दिले जाईल
संपर्क करा उत्तमराव जानकर 9860646012
धैर्यशीलभाऊ देशमुख (नातेपुते) 9422028588
बाळासाहेब धाइंजे ,सदस्य जि प 9960950105
विकास धाइंजे (माळशिरस) 8600250288
अजय सकट, सदस्य पं स 9763145615
बाबासाहेब माने
तालुकाध्यक्ष युवक रा काँ (कण्हेर )
9511205005
मारुतीअप्पा देशमुख,नगरसेवक (माळशिरस )
9960427752
जीवन जानकर (सरपंच)
8805101020
डॉ. तुकाराम ठवरे (खुडूस )
9970343321
के पी काळे विझोरी
9423070000
राहुल सावंत,जि कार्याध्यक्ष
ncp युवक (दहिगाव )
9970681020
किरण साठे जिल्हा सरचिटणीस (अकलूज )
8390459999
संदीप ठोंबरे नातेपुते
9890887970
सालार पठाण (पिलीव)
9673617617
सौरभ बागनवर (एकशिव )
9960170969
सोमनाथ पिसे (पुरंदावडे )
9730809006
भुजंगराव शिंगाडे (काळमवाडी)
8208355200
राहुल खटके (जांबड)
9960016564
गणेश भोसले (संगम)
9011724017
ज्योतिराम आवताडे (फळवणी)
7083471000
शुभंम सूळ (मोरोची)
9604133737

कोरोना पार्श्वभूमी अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे च्या वतीने पिरळे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते)  राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत नेशनल दलीत मोमेंत फोर जस्टाइस (एन.डी.एम.जे) महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका,व पिरळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने  पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर रुग्ण उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे, शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे. या मुळे विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत व पुरेशी रक्तदान शिबिर होत नाहीत.म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.भविष्यात रक्त तुटवड्याचे संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले होते यावर दोन महिलांसह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर  सर्व नियमांचे पालन करून  सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आले. या शिबिराचे  उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी लवटे, माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संदीप शेठ नरोळे, महादेव शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रशांत खरात, सुदाम बुधावले ,व अक्षय ब्लड बँक ,डॉ.वाघमोडे ,डॉ.मोरे व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी पिरळे येथील युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिदास लवटे, भारत राहुडकर, ज्ञानदेव शिंदे ,आकाश खिलारे ,मोहन शिंदे ,प्रकाश ठवरे, सुवर्णा राहुडकर ,अनिकेत लवटे ,नाथा साळवे, उदय डूडू ,दशरथ खिल्लारे ,रोहित डूडू ,संदीप नरोळे, संतोष जाधव ,राहुल खिलारे, हनुमंत बुधावले, प्रशांत खिलारे ,सचिन खिल्लारे, अमीर मुलानी ,परशुराम लांडगे ,विठ्ठल खंडागळे, दशरथ लवटे, दुर्योधन खिलारे, रुपेश साळवे, गजानन पोटे ,योगेश खिलारे ,संतोष साळवे ,सागर खिलारे ,मयुर साळवे ,अविनाश तोडकर, सुनील साळवे, बाळा बुधावले, विजय खंडागळे ,अधिक्राव यमगर, राजाराम शिंदे ,अनिल खिलारे ,संजय नरोळे, सलीम मुलानी ,उमेश जाधव, अमोल निकम, वैभव खिलारे ,चेतन खिलारे ,विशाल खिलारे ,रामचन्‍द्र राहुडकर, रमेश पांडेचेरी, शिवाजी कांबळे ,सुनील शिंदे, महादेव राहुडकर, ओमकार किर्दक ,सूरज किर्दक ,शैलेश नरोळे ,अक्षय साळवे ,पन्नालाल पैलवान, जनार्दन शिंदे ,अनिल तोडकर ,सुनील दळवी, करीम मुलानी, या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून देशहितासाठी रक्तदान केले या सर्व रक्ता त्याचे पंचक्रोशीत सोशल मीडियातून कौतुक होत असून यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे.

नातेपुते येथे महिलांसह रक्तदानास उदंड प्रतिसाद


पुरोगमी महाराष्ट्र न्यु्ज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदाना मध्ये महिलांसह अनेक तरुण युवकांनी रक्तदानात सहभागी होऊन 165 लोकांनी विक्रमी रक्तदान करून देशासोबत आम्ही आहोत हे नातेपुतेकरानी दाखवून दिलेले आहे असे माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना माहिती दिली
संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्तदानाचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी करोना शी लढण्यासाठी जीवघेण्या आपत्तीसाठी सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते
सध्या या संचारबंदी असून 144 कलम लागू आहे यासाठी उद्घाटन वगैरे न घेता पाच पेक्षा ज्यादा माणसे एकत्र न येता हे रक्तदान शांततेमध्ये व नियोजनामध्ये पार पडलेला आहे या रक्तदान शिबिरासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते व डॉक्टर एम पी मोरे यांनी सदरच्या रक्तदानात भेट दिली त्यावेळेस त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उद्घाटनाचा कार्यक्रम टाळला आणि त्यांनी रक्तदानास सदिच्छा भेट दिली सदरच्या रक्तदानांमध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदात्यांनी देशावर महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्याकरता आपले स्वतःचे रक्त देण्याकरता स्वयंस्फूर्तीने आलेले होते त्यामध्ये विशेष महिलांचाही सहभाग भाग मोठ्या प्रमाणात होता सदरचे रक्तदान यशस्वी करण्याकरता युवा नेते संदीप दादा ठोंबरे पंकज पिसे फत्तेसिंह राव वैभव पिसे सागर देवडे राहुल बोराटे माऊली खटावकर ज्ञानेश्वर शिंदे रुपेश भरते सुरज शेंडगे अक्षय झंजे आदी कार्यकर्त्यांसह ग्रीन आर्मी तील सदस्यांनी परिश्रम घेऊन स्वतः रक्तदान करून रक्तदानाचा उपक्रम यशस्वी केलेला आहे

नातेपुते येथे शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन :

नातेपुते येथे शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन : पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांनी सांगितले
संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्तदानाचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी करोना शी लढण्यासाठी जीवघेण्या आपत्तीसाठी सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने शुक्रवार दिनांक 27/ 3 /2020 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी सभाग्रह ग्रामपंचायत कार्यालयावरती नातेपुते येथे आयोजित केलेले आहे सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 144 कलम लागू आहे त्यामुळे रक्तदात्यांनी गर्दी न करता रक्तदान करून सहकार्य करायचे आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानासाठी विशेष सहकार्य अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे राहणार आहे तरी रक्तदात्यांनी माऊली पाटील,98 90 53 94 22 मदभावी साहेब,95 27 39 36 संदिप ठोंबरे 98 90 88 79 70 श्री गाडे, साहेब 70 20 29 23 24 या नंबरची संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानाच्या वेळेमध्ये ते येऊन रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशन व व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या वतीने पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे

फोंडशिरस येथील आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड

चि आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस मध्ये इ आठवी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि आदित्य संतोष गोरे याची सैनिक स्कूल चंद्रपुर साठी इ नववी प्रवेशासाठी निवड झाली. यामध्ये सर्व प्रवर्गातून त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. लेखी व वैद्यकीय चाचणीदवारेे त्याची निवड झाली. ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील मुलाचे सैनिक स्कूल साठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी विद्यालयाचे गणित विज्ञान शिक्षक श्री संदीप केंगार सर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयसिंह मोहिते पाटील, संचालक श्री संग्रामसिंह मोहिते पाटील ,संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील , संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे , सहसचिव हर्षवर्धन खराडे ,शाळेचे सभापती श्री हनुमान कुंभार, उपसभापती श्री शंकर वाघमोडे ,सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ ,प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण पालकर सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे
पुरोगामीी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– मौजे नातेपुते येथील गट नंबर 265 मधील फेरफार क्रमांक 67 10 प्रांताधिकारी यांनी अपिला मध्ये रद्द केला 2016 ला त्यानंतर 2017 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांत यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले त्यानंतर 2018 मध्ये अप्पर आयुक्त पुणे यांनी िल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले वरील वरिष्ठांचे तिन्ही आदेश नातेपुते येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही उलट त्या शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले हे सर्व प्रकरण चालू असताना त्यामध्ये अनेक खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत त्यांच्या नोंदी 67 घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे होत्या परंतु आर्थिक लालसेपोटी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्व नोंदी धरून घेतल्या त्यामुळे आज त्यांच्या समोर 67 10 रद्द करताना बाकीच्या नोंदी रद्द कराव्या लागत आहेत हे सर्व गोड बंगाल हाणून पाडण्यासाठी व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार यांवर कठोरात कठोर कारवाई तसेच दप्तर दिरंगाई अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 18 तारखेला प्रांत ऑफिस अकलूज यांच्यासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहे तरी सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे अहवान मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले आहे
चौकट = नातेपुते येथील मंडल अधिकारी व तलाठी यांचेवर गुन्हे दाखल करा दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेऊन गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आप्पासाहेब कर्चे

You may have missed