माळशिरस तालुका

सांगलीत सर्वात मोठी कारवाई! १ कोटीच्या बनावट नोटा जप्त

सांगलीमधील मिरजजवळीनिलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं. त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या ५००रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

नातेपुते पोलीसांचा रोडरोमिओंना चोप, वाहनांवर कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शाळेशी संबंध नसलेले तरुण शाळेच्या आवारात आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही. तसेच बस स्थानत व इतर ठिकाणी मोटर सायकल घेऊन फिरणे, हॉर्न वाजवणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्या तरुणावर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांचे वाहन जप्त करण्यात येईल. तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये तसे निदर्शनास आल्यास अल्पवयीन मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. नातेपुते व परिसरातील नागरिकांनी वाहन नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.महारुद्र परजणे शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड काढणाऱ्या, व ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोडरोमिओंची नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पो.ह. देवीदास धोत्रे, पो. अमंलदार सारिका देशमुख,पो.कॉ. सोनवणे, पो.कॉ. गोधार, पो. कॉ. शेंडे या पोलिस कर्मचारी यांनी रोडरोमिओंनाधरपकड करून चांगलाच चोप दिला. शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शाळा भरतेवेळी व सुटण्याच्या वेळी दाते प्रशाला पुणे पंढरपूर रोड, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला दहिगाव रोड, अक्षय शिक्षण संस्था फडतरी रोड, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय या ठिकाणी कॉलेजशी संबधित नसलेल्या काहीरोडरोमीओंना नातेपुते पोलिसांनी चोप देऊन समज दिली. अच ानक झालेल्या या कारवाईमुळे इतर तरुणांनी धूम ठोकली. तसेच मेनपेट, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व गर्दीच्या ठिकाणी मोटर वाहनावर ट्रिपल सीट फिरणे, विना नंबर प्लेट व विना लायसन्स वाहन चालवणे या वेगवेगळ्या मोटर ऍक्ट नुसार वाहन विभागाचे वाहतुक पोलीस कर्मचारी रमेश बोराटे, नितिन पना से यांच्याकडून वाहनांवर कारवाई नुसारकरण्यात आली असून अल्पवयीन मुलांच्या वडिलांना नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलवून समज दिली व यातील काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकारची मोहिम सातत्याने राबवावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मोहीम अचानक आणि सातत्याने राबविली गेली तरच रोडरोमीओंना चाप लावता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मोठी घोषणा. “राज्यभरात शाळांमध्ये आता.”

पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळेत,तसेच शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास अशा कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहेत.त्यामुळे या प्रारुपाची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल, अशा घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.‘टी ४’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या पुरस्काराची मानकरी ठरली. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी शाळेलाही भेट दिली.आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, योजना विभागाचे संचालक कृष्ण कुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक या वेळी उपस्थित होते. भुसे यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, शाळेकरिता जागा देणाऱ्या व्यक्ती, सीएसआर निधी देणाऱ्या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमावेळी जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोल्यात उत्साहात उदघाटन

लोक कलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकटगावकर यांचे हस्ते उदघाटन,कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी


सांगोला /प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग व सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ वा विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव “उन्मेष सृजनरंगचा २०२५” याचा भव्य उदघाटन सोहळा सांगोला महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककला अभ्यासक मा. योगेश चिकटगावकर यांनी उदघाटक म्हणून उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटऩ केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी भूषविले.यानंतर उदघाटक म्हणून बोलताना योगेश चिकटगावकर यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “लोककला, संस्कृती आणि सृजनशीलतेतून समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते. युवकांनी आपल्या कलागुणांद्वारे भारतीय परंपरेचा संदेश जगभर पोहोचवावा.”

लोकसंस्कृती, स्त्रीशक्ती आणि सामाजिक समतेवर भाष्य करताना त्यांनी भावनिक शैलीत सांगितले“हजार मुलांमागे दीडशे मुली कमी आहेत, कारण आपण त्या मुलींना जन्म घेऊ देत नाही. तीच मुलगी आई, बहीण, माय माऊली असते तिच्यामुळेच घर उजळते.”“प्रत्येक घरातून एक शिवबा, एक सावित्री जन्माला यावी,” असे आवाहन करत त्यांनी जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण केले.

शिवचरित्र आणि लोककला यांची सांगड घालत चिकटगावकर यांनी पारंपरिक ‘पिंगळा’ कला पुन्हा जिवंत केली आणि “माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला” या गीताने वातावरण भारावून टाकले.या प्रसंगी स्वागतपर भाषणात संस्था अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण विद्यापीठ परिवाराचा आहे. प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी एकत्रितपणे सहभाग नोंदविल्यास हा खरा आदर्श महोत्सव ठरेल.”

कुलगुरूंनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, “युवा महोत्सव म्हणजे विद्यापीठातील विविध संस्कृतींचा संगम आहे. अशा मंचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो, संघभावना आणि संस्कार यांचा विकास होतो.”ही स्पर्धा पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. जिंकणारेच नव्हे तर भाग घेणारेही खरे विजेते आहेत. पूरस्थितीमुळे आलेल्या अडचणींवर मात करून युवा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सांगोला महाविद्यालयाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “हा आपला स्वतःचा कार्यक्रम आहे, थोडीफार उणीव झाली तरी ती आपलीच आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.युवा महोत्सव उदघाटन सोहळयापूर्वी सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पूरग्रस्‍तासाठी मदत निधी संकलन केंद्राचे उदघाटन मा.कुलगुरु महोदयांच्याहस्ते संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाच्या मुख्य रंगमंचावर पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यासाठी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.  या चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला, साहित्य, वाद्य, काव्यवाचन, पोस्टर प्रस्तुती, आणि लोककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५३ महाविद्यालयांमधील १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत, सांगोला महाविद्यालयाच्या परिसरात कलात्मकता आणि सृजनशीलतेचा उत्सव फुलला आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लक्ष्मीकांत दामा (प्र.कुलगुरू), डॉ. अतुल लकडे (प्र-कुलसचिव, विद्यापीठ) डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) संस्थेचे अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, सचिव मा. उदय (बापू) घोंगडे, सहसचिव मा. साहेबराव ढेकळे, मा. विश्वनाथ चव्हाण, माजी सचिव झिरपे सर, रावसाहेब ताठे, शामराव लांडगे, सुरेश फुले, सुधीर उकळे, चंद्रशेखर अंकलगी, दिनानाथ लोखंडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, समन्वयक डॉ. रामचंद्र पवार, सहसमन्वयक डॉ. राजकुमार ताठे व प्रा. संतोष लोंढे, यावेळी विविध स्पर्धांचे परीक्षक, विद्यापीठ परीक्षेत्रातील सहभागी महाविद्यालयांचे संघनायक व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

उदघाटऩ सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.कॅप्टन संतोष कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवक कार्यरत असून परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सांगोला शहरात सणासारखा उत्साह 

नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचावसाठी एल्गार

नागपूर : २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने

काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळा जीआर या रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाने अकोला येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्म हत्या केल्याचे वृत्त आहे.ओबीसींचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच वाव पारंपरिक ओबीसी समाजाच्या असंतोषाचे कारण ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठा समाज सामाजिकदृष्टया मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात साम ावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे.

तरुणांनी आदर्श घ्यावा असे तरुणाईचे प्रेरणास्थान एडवोकेट राहुल , व आनेश वाघमोडे -पाटील बंधूंच्या कार्याची होतेय सर्वत्र चर्चा

माळशिरस तालुक्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले उपमुख्यमी एकनाथ शिंदे यांचे पी.एस.ओ. अॅड. राहुल वाघमोडे पाटील, बंधू अनेश वाघमोडे-पाटील ही जोडी तालुक्याच्या प्रत्येक भागात चर्चेचा विषय ठरली -आहे.दोन्ही बंधूनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. तसेच नव्या योजनांना चालना मिळत आहे.तसेच माळशिरस शहरात संघर्ष करिअर अॅकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो तरुणांना महाराष्ट्र पोलीस, आर्मी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक इत्यादी अनेक क्षेत्रात घडविण्याचे काम या २ बंधूच्या माध्यमातून झाले आहे. तसेच अॅड. राहुल वाघमोडे-पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईसाठीविविध शाळा, कॉलेज, तसेच स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी, सामाजिक संस्थेमध्ये हजारो प्रेरणादायी व्याख्याने घेऊन तरुणाईचे भविष्य उज्वल करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला.माळशिरस तालुक्याची माती व माणसांशी असलेले त्यांचे आत्मीय नातं, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि तरुणांसाठीअसलेली प्रेरणादायी भूमिका यामुळे वाघमोडे-पाटील बंधू तालुक्यातील तरुणाई, महिला, शेतकरी व कामगार वर्गाचे खरे आकर्षण बनले आहेत. अशाच प्रकारे माळशिरस तालुक्याचा विकास, तरुणांचे नेतृत्व, उज्वल भविष्यासाठी कार्यरत राहो अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

बाळूमामाचं चांगभलं,चा जयघोष करत आजी-माजी आमदार यांच्या उपस्थितीत कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते शेंडगे कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न.

नातेपुते येथे कपड्यासाठी प्रसिद्ध असणारे शेंडगे कापड दुकान,टेक्सटाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकान शोरूमचे उद्घाटन
बाळूमामा भक्त श्री विठ्ठल बिरदेव व श्री सिद्धनाथ भाकणूक कथाकार मानकरी कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते व आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृष्णात ढोणे महाराज बोलताना म्हणाले की शेंडगे बंधू हे अतिशय प्रामाणिक असे बाळूमामाचे भक्त आहेत त्यांच्यावर बाळूमामा चा कृपा आशीर्वाद राहणार आहे. परंतु आपल्याला विनंती आहे नडलेला ग्राहक तुमच्याकडे आला तर त्याला मदत करा त्याच्या रूपाने तुमच्याकडे देव सुद्धा येऊ शकतो.असं केल्यास आजूबाजूच्या पंचवीस गावात आपली दुकान होतील.तसेच माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की शेंडगे यांचं भव्य दिव्य कापड दुकान असून अतिशय कष्टाने व मेहनतीने दुकान उभ केला आहे.तसेच उत्तमराव जानकर यांनी शेंडगे यांची यशोगाथा सांगत शुभेच्छा दिल्या.तसेच रामभाऊ सातपुते व ह भ प अमोल सूळ बोलताना म्हणाले की सुरेश शेंडगे व शंकर शेंडगे या दोघांनीही कधी ही प्रामाणिकपणा सोडला नाही प्रामाणिक व नम्रतेच्या जोरावर यश संपादन केले आहे. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच बी वाय राऊत, एपीआय महारुद्र परजणे साहेब,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, धैर्यशील भाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य,माऊली पाटील, उपसभापती,किशोर सुळ,बाळासाहेब सरगर, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मधुकर पाटील, बाळू महाराज नरोटे, ऋतुजा ताई मोरे, संदीप ठोंबरे, सतीश सपकाळ, बाहुबली शेठ चंकेश्वराअतुल शेठ बावकर, बाळूमामा संस्थानातील महाराज व महंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश शेठशेंडगे व शंकरशेठ शेंडगे व शेंडगे परिवार यांनी सर्वांचा सन्मान केला.

सौ ऋतुजाताई मोरे व शरद मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न

दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालया समोर, मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 900 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
यावेळी गावचे सरपंच श्री.तात्यासाहेब शिंदे, इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.उपस्थिती : मा.श्री.शरद (बापु) मोरे,
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई, तात्यासाहेब शिंदे (सरपंच), कुमार बबन पाटील (मा.सरपंच), दिपक माने-देशमुख (चेअरमन),
सुनील खुडे (ग्रा.पं.सदस्य), विलास ननवरे, रामभाऊ गायकवाड (मा.डिप्यूटी सरपंच) तानाजी पालवे (मा.पंचायत समिती सदस्य), विजय कोल्हाळे, आनंदा पालवे, गुणवंत ढोबळे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ !

शासनाच्या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंदोत्सव

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी भरघोस मानधन वाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील पन्नास हजारावर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक शासनवेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे.कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, सन २०१६-१७ पूर्वी सेवेत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.सद्यस्थितीत राष्ट्रीयआरोग्यआरोग्य मिशन, महाराNHMअभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. पंधरा टक्के पैकी पाच टक्के मानधन वाढ सरसकट लागू होणार असून उर्वरित मानधन वाढ ही कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकन (परफॉर्मन्स रिपोर्ट) नुसार करण्यात येणार आहे.एनएचएम कर्मचाऱ्यांचा आरोग्यसार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची गेले अनेक वर्षापासून भरीव मानधन वाढीची मागणी होती. तेसच त्यासाठी राज्याव्यापी कामबंद आंदोलनही केले होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंत्रणा बळकटी करणात महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे सम ायोजन, एनएचएम कर्मचाऱ्यांना अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे. कर्मचाऱ्यांचाळे गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधीउभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे. या निर्णयाम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणाम कारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४९० कोटींचा निधी

मुंबई/वृत्तसंस्था : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभाथ्यांना सप्टेंबर महिन्याचा देण्यासाठीसामाजिक न्याय विभागा-चा ४१०.३० कोटींचा निधी बळता करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभाथ्यांस-ाठी हा निधी वापरण्यात याव्यात अशा सूचना केली आहे. सामाजिकन्याय विभागांतर्गत येणान्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनांचा लाभमिळणार नाही. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभा गाअंतर्गत ३९६० कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबरमहिन्यातील पात्र लाभार्थी महिल-पात्रांना हप्ता देण्यासाठी एक पत्र काही हप्ता दिवसांपूर्वी पाठवित निधी वितरणा-ची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानामधील ४१०.३० कोटी इतका निधी महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभा-गाने बुधवारी मंजुरी दिली आहे. या निधीला मंजुरी देताना सामाजिक न्याय विभागाने महत्त्वपूर्ण सूचना महिला व बालविकास विभागाला केली आहे. ज्यानुसार महिला व बालविकास विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्याची सूचना यावेळी केली आहे. त्याचबरोबर उपलब्ध निधी हा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभाथ्यांसाठी होईल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय विभा-गाअंतर्गत संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजने अंतर्गत पात्र लाभाथ्यांना लाडकी बहीण योज-नेचा हत्या मिळणार नाही, दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.

You may have missed