माळशिरस तालुका

आरक्षणाच्या रक्षणासाठी कुणबी रस्त्यावर, आझाद मैदानावर धडक! मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका!!

राठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी कुणबी समाजाने आज रस्त्यावर उतरून थेट आझाद मैदानावर धडक दिली. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी करीत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.’ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा’, ‘मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका’, ‘मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका’ अशा गगनभेदी घोषणांनी मैदान दणाणून गेले.मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले होते. यावेळी लाखो मराठा बांधव मुंबईत धडकले होते. यानंतर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 58 लाख मराठी कुणबी नोंदी सापडल्याने 58 लाख मराठे ओबीसीत समाविष्ट होणार आहेत, मात्र ओबीसी समाजातून या निर्णयाला विरोध होत आहे. ओबीसी प्रवर्गात 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच स्तरांवर स्पर्धा वाढेल अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे, दरम्यान ओबीसी प्रवर्गातील मूळ कुणबी समाजानेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.कुणबी समाजाचे नेते अशोक वालम यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. ‘ज्या दिवशी हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढला तो 2 सप्टेंबरचा काळा दिवस आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास नसतानासुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदींमध्ये दिलेले बोगस जातीचे दाखले तत्काळ रद्द करण्यात यावेत. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुनः पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी,’ अशी मागणी वालम यांनी केली.गांधी टोप्या आणि पारंपरिक वेशभूषाकुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे कुणबी समाजाने आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. काही कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर ‘जय कुणबी’ लिहिलेल्या गांधी टोप्या घालून, हातात निषेधाचे फलक घेऊन मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानावर मोठं व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आला होता.सरकारने घेतली आंदोलनाची दखलया आंदोलनाची सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारच्या वतीने आंदोलकांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली असून येत्या आठ दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री लोढा यांनी आंदोलकांना यावेळी दिले.अशा आहेत मागण्यासरकारने शोधलेल्या 58 लाख मराठा–कुणबी नोंदी तत्काळ रद्द कराव्यात.मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती बरखास्त करा.ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करून नोकऱ्यांमधील अनुशेष भरा.जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करा.कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल! – अनिल नवगणे, अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ

पुढील ४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी – यादी पाहून थक्क व्हाल!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान थोडं बदलणार आहे. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे की ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांत राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काही भागांत हवामान कोरडे आणि उन्हाळे राहील.तज्ज्ञांच्या मते, या काळात हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. जेव्हा हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा पावसाची शक्यता कमी होते. त्यामुळे आकाशात ढग दिसले तरी पाऊस फारसा पडणार नाही. त्याचबरोबर सकाळच्या वेळी थोडी थंडी जाणवेल, कारण किमान तापमानात घट होऊ लागली आहे.राज्याच्या वेगवेगळ्या भागांनुसार पावसाचा अंदाज असा आहे –कोकण विभागात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे-पालघर):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २५ मिलीमीटर पाऊस पडू शकतो.
रत्नागिरी आणि ठाणे-पालघर जिल्ह्यात ५ ते १५ मिलीमीटर,
तर रायगडमध्ये ५ ते १० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर):
या भागात ५ ते २० मिलीमीटर इतका हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये मात्र ३ ते १० मिलीमीटर इतका हलका पाऊस अपेक्षित आहे.उत्तर महाराष्ट्रात (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव):
येथे पावसाचे प्रमाण कमी असेल.
नाशिक आणि धुळे येथे ५ ते १५ मिलीमीटर,
तर नंदुरबार आणि जळगाव येथे ३ ते १० मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे.विदर्भ भागात (पूर्व, पश्चिम आणि मध्य विदर्भ):
इथे फारसा पाऊस होणार नाही.
पूर्व विदर्भात १ ते २ मिलीमीटर,
तर पश्चिम आणि मध्य विदर्भात फक्त १ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.एकूण अंदाज असा आहे की, पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी राहील. काही ठिकाणी थोडा पाऊस होईल, पण बहुतांश भागांत हवामान ढगाळ पण कोरडे राहील. सकाळी थंड वारा आणि थोडी थंडावा जाणवणारे वातावरण असेल.

तिसरी झाली आता लवकरच चौथी मुंबई तयार होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिकांना या विमानतळाच्या उद्घाटनाची प्रती-क्षा होती आणि आज बुधवारी (ता. ८ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदींनी त्याचे उद्घाटन केले आहे यावेळी, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना एक महत्त्याची घोषणा केली. फडणवीसांनी वाढवणजवळ चौथी मुंबई होणार असल्याचीघोषणा केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या विमानतळाची उभारणी चार टप्प्यात होणार आहे. या विमानतळावरून प्रवासी बाह-तूक आणि कार्यों वाहतूक सुरू होण्यास साधारण दोन महिन्यांचावेळ लागू शकतो. पण या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले देवेंद्र फडणवीस ज्या प्रमाणे तुम्ही नेहमी महाराष्ट्रासोबत उमे असता, तसे कायम उभे राहा, अशी विनंती सुद्धा यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींना केली. तर, आजचा दिवसस्वप्नपूर्तीचा दिवस आहे, कारण गेली १० वर्ष मोदींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत, त्या प्रत्यक्ष या ठिकाणी लोकार्पित होत आहेतही खन्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. हे विमानतळ नब भारताचे प्रतीक आहे, कारण या विमानतळाची संकल्पना ही ९० च्या दशकातील होती. आम्हीजेव्हा मुंबई पुणे प्रवास करायचो, तेव्हा केवळ विमानतळाचा बोर्ड पाहात होतो.पण कोणतेच काम होत नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. याचवेळी भाषण करताना शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला प्रगतीप थावर नेण्यासाठी मी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाचेही आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्री के. नायडू मघाशी म्हणाले, ‘आपलं पुढचं लक्ष्य हे वाढवण बंदर असेल’ हे बंदर मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिले आहे. तिथेच देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारणार आहोत. आपल्या नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे. तर, त्यानंतर आता बाढ़वणजवळ चौथी मुंबई होईल, असा विश्वास मी यानिमित्ताने तुम्हाला देऊ इच्छितो, असे म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे चौथ्या मुंबईची सुद्धा घोषणा केली आहे. त्यामुळे आता फडणवीस या चौथ्या मुंबईबाबत आणखी काय माहिती देतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

मेस्मा’ लागू, वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला असतानाच दुसरीकडे व्यवस्थापनाकडून चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणने राज्यभरातील यंत्रणा सज्ज गंभीर ठेवली आहे. तव घेतलेल्या कारणास्तवरजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे. संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये यांचावीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी झाली आहे किंवा ज्यांची नुकतीच थेट भरती प्रक्रियेत निवड झाली आहे ते संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येणार आहे. तसेच सुरवातीचे तीन वर्ष कंत्राटी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा, संपात सहभागी झाल्यास रद्द होणार आहे. नियमित झालेले कर्मचारी सेवेत सहभागी झाल्यास त्यांच्या सेवेत खंड देण्याच्या कारवाईची तरतूद आहे.

शिवसेना पक्षचिन्हाचा फैसला लांबणीवर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे:

केंद्रीयनिवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, याप्रकरणी आज (०८ ऑक्टोवर) सर्वो च्च न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित होती. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार होती. शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू गांडणारे वकील असीग सरोदे यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच पक्षचिन्ह प्रकरणाचीसुनावणी आज पूर्ण होईल का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. अशातच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला पुढील १२ आणि १३ नोव्हेंबर तारीख मिळाली आहे.राज्यात होणा या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशीमागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, थेट टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला, 1 नोव्हेंबरपासून 25 टक्के.

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कशावर टॅरिफ लावतील, याचा नेम राहिला नाही. अमेरिकेच्या टॅरिफविरोधात अनेक देश मैदानात उतरताना दिसत आहेत. ब्राझीलने अमेरिकेला थेट मोठा इशारा दिला.हेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आमचे आणि अमेरिकेचे आता कोणतेही संबंध राहिले नाहीत. भारत आणि ब्राझीलवर एकसोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावला. आता मध्यम आणि अवजड ट्रकवर तब्बल 25 ‘टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. अगोदर हा टॅरिफ 1 ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता. मात्र, तो आता 1 नोव्हेंबरपासून लागू होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयावर अधिकारी आणि पुरवठादारांनी चिंता व्यक्त केल्याने त्याची मुदत पुढे ढकलण्यात आली.डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली की, जड आणि मध्यम ट्रकवरील टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागेल. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल आपण उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. आता याचा थेट परिणाम हा अमेरिकेत आयात होणाऱ्या ट्रक उत्पादनावर होईल. अनेक देश अमेरिकेमध्ये ट्रक आणि त्याचे पार्ट निर्यात करतात. मात्र, त्यामुळे अमेरिकेत बनणाऱ्या ट्रकची मागणी घटल्याचा दावा त्यांनी केला.अमेरिकेतील व्यापाराला संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.ट्रम्प यांनी सुरुवातीला असे म्हटले होते की, राष्ट्रीय सुरक्षेमुळेच आपण 1 ऑक्टोबरपासून जड ट्रक आयातीवरील कर लागू करतोय. आता त्यांनी त्यांचे विधान पूर्णपणे बदलले आहे.किल्ल्या हा माझा सर्वात आवडतीचा शब्द असल्याचे काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफमुळे अगदी कमी काळात आपण श्रीमंत होऊ शकतो. अमेरिकेत यापूर्वी कधीही जितका पैसा आला नाही, त्यापेक्षा अधिक पैसा येत आहे. काही देश फक्त आपल्याकडून फायदा करून घ्यायचे आणि त्या बदल्यात आपल्याला काहीच देत नसत. अशांना हा मोठा धडा आहे.

फोंडशिरस येथे शरद बापू मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्य वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

कार्यक्रम घेण्यात आला.दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालया समोर, हनुमान मंदिर, फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच श्री.पोपट बोराटे व ग्रामस्थ
यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 1000 (एक हजार) नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. या कार्यक्रमास उपस्थिती : मा.श्री.शरद (बापु) मोरे,
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
मा.श्री.रमेश (आप्पा) मोरे
वैभव (भैय्या) मोरे, डॉ.लताताई मोरे, डॉ. मगर मॅडम, पोपट बोराटे (सरपंच), तेजस गोरे (सरचिटणीस), सुनील गोरे (व्हा. चेअरमन शिवप्रसाद वाहतूक संघटना),
मनोज गोरे, संजय कोडलकर, मच्छिंद्र वाघमोडे, माधव दाते, अक्षय कदम, दादा रणदिवे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

२ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती नाही

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
मुंबई : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी कुणबी मराठाआरक्षणासंदर्भात लागू केलेल्या शासन निर्णयाविरुद्ध अनेक ना ओबीसी संघटना न्यायालयात दाद मागत आहेत. याप्रकरणी, हैदराबाद गॅझेटियर निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी संपन्न झाली. या सुना-वणीत न्यायालयाने याचिकाकत्यांच्या मागणीनुसार, संबंधित जीआरला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या न या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले असून ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे.

हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शास-नाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आले. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला बसणार असून हा राज्यातील ओबीसी नेत्यांना मोठा धक्का आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे. तर हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय नसून अजून कुठलाही निकाल लागलेला नाही, असा दावाही हाके यांनी केला आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

 शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अशा स्थितीत पीक करपून गेले, पाण्याखाली गेले, जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थितीही उरली नाही.आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला. त्याची शंभर टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे. ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे.देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले.तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

You may have missed