माळशिरस तालुका

रत्नत्रय पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न ( रत्नत्रय पतसंस्था देणार सभासदांना 15 टक्के लाभांश )

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

रत्नत्रय पतसंस्थेस सन २०२४ २५ या आर्थिक वर्षात 32 लाख 67 हजार 489 रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना या वर्षी पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल (दादा) दोशी यांनी 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना दिली
यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी व्हा चेअरमन डॉक्टर निवास गांधी संचालक प्रमोद दोशी, अजय गांधी,रामदास गोफणे,जगदीश राजमाने,सोमनाथ राऊत, विलास साळुंखे,अनघा गांधी,सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह सभासद उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या व तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व आक्का साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली पुढे बोलताना अनंतलाल दोशी म्हणाले या पतसंस्थेची स्थापना परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्याची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आले असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद ठेवेदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देती आहे आर्थिक व्यवहाराबरोबरच ही संस्था अनेक सामाजिक कार्य ही करत आहे
प्रास्ताविक संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक मा.श्री.प्रमोद (भैय्या)
दोशी यांनी केले त्यांनी सांगितले की संस्थेमार्फत सभासदांसाठी भारतात कुठेही आरटीजीएस एनएफटी ची सोय डीडी काढण्याची सोय क्यू आर कोड पेमेंटचे सोय पिग्मी तसेच लखपती मासिक व्याज ठेव अशा विविध सोयी संस्थेमार्फत सभासदांसाठी चालू केलेल्या आहेत तरी या सर्व सेवेंचा लाभ सभासदांनी व ठेवीदारांनी घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले
संस्थेचा अहवाल वाचन चेअरमन मा.श्री.विरकुमार (भैया) दोशी यांनी केले व संस्थेची स्थापना व तिचे उद्दिष्ट काय आहेत हे त्यांनी सांगितले व संस्थेची चालू वर्षाची आकडेवारी सभासद समोर मांडली 31 मार्च 2025 अखेर संस्थेकडे 23 कोटी 57 लाख रुपये ठेवी असून कर्जवाटप 19 कोटी 15 लाख रुपये केले आहे तसेच संस्थेची गुंतवणूक 9 कोटी 97 लाख रुपये इतकी आहे संस्थेची एकूण वसूल विभाग भांडवल 48 लाख 84 हजार रुपये आहे तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 2 कोटी 92 लाख रुपये असून खर्च 2 कोटी 59 लाख रुपये झाला असून संस्थेचा चालू वर्षाचा नफा 32 लाख 67 हजार रुपये झालेला आहे व संस्थेचे यावर्षीचे ऑडिट शशांक पत्की अँड असोसिएट सोलापूर यांनी केले असून संस्थेला त्यांनी ‘अ ‘ वर्ग दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश राऊत यांनी 21व्या वार्षिक सभेचे नऊ विषयाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक पत्रकाची माहिती दिली व सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून सर्व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले…
त्यानंतर संस्थेचे सभासद शिवाजी मदने पंकज पानसरे व भगवान शिंदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी यावेळी संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले
तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक सुभाष ओवाळ द्वितीय क्रमांक सीमा गुरव तृतीय क्रमांक शिवाजी मदने यांना अनुक्रमे बक्षिसे लागली तसेच सर्व हजर सभासदांना देखील गिफ्ट देण्यात आले व त्यानंतर सर्व सभासदांना स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमृता मोहिते मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जगदीश राजमाने यांनी मानले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी मोलाचे सहकार्य केले…..

शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटपहा कार्यक्रम घेण्यात आला.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

. दि.28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : दहिगाव ग्रामपंचायत समोर, मारुती मंदिर नजीक दहिगाव ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 1500 (दीड हजार) नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.उपस्थिती : मा.श्री.शरद (बापु) मोरे,
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
वैभव (भैय्या) मोरे, तेजस (दादा) मोरे, बाळासाहेब चिकने, राहुल निकम, धनाजी खुसपे, मधुकर किर्दक, महादेव केसकर, बाळासाहेब निकम, प्रकाश वलेकर, गणेश वलेकर, सागर शिंदे, योगेश चिकणे, अमोल सावंत, डॉ.लताताई मोरे, डॉ. मगर मॅडम, शिवाजी सावंत, सूर्यवंशी सर, सुरज अवघडे, रमेश चिकणे, भारत फुले, सोमनाथ शिंदे, दादा पवार, संजय किर्दक, उद्धव सावंत, सुशांत पाटील, सुधीर मोरे, सोमनाथ बुधावले, सौदागर चिकणे, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

माळशिरस तालुक्यातील रोड रोमियो बाबत मुख्याध्यापकांची तात्काळ मीटिंग आयोजित करा…. हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे
माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेचे फार मोठ्या प्रमाणात जाळे आहे परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळांना भेटी देत असताना किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या येताना मुलींना रोड रोमण्याचा त्रास शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोड रूमवर मोटरसायकल वरून कर्णकर्ता आवाज करीत मुलींच्या मागे पुढे फिरताना दिसतात याबाबत या तक्रारी अनेक महिला पालकांकडून शिवसेनेकडे प्राप्त झाल्या असल्याकारणाने मी दि.५/४/२०२४ रोजी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब गटशिक्षणाधिकारी तत्कालीन डीवायएसपी भोरे मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी निर्भया पथकातील सर्व कर्मचारी वृंद आणि त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती त्याच धर्तीवर आताही परिस्थितीत हाता बाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने श्रीमती सुषमा महामुनी मॅडम गटशिक्षणाधिकारी माळशिरस यांना राजकुमार हिवरकर पाटील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले राज्यामध्ये नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवाच्या दरम्यान वरील बैठकीचे नियोजन करावे आयोजन करावे व नारीशक्ती सशस्त्र होण्यासाठी जिजाऊ सावित्रीच्या लेकिन साठी प्रशासन सक्षम रीत्या त्यांच्या पाठीशी उभेआहे.याची प्रचिती येण्यासाठी त्याच बरोबर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घातलं जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीचा तात्काळ आयोजन करावे अशी निवेदनाद्वारे मागणी राजकुमार हिवरकर पाटील गटशिक्षण अधिकारी त्याचबरोबर श्री रघुनाथ पांढरे गट विकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती व श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनाही देण्यात आलं.
यावेळी शिवसेनेचे महाळुंग शहर प्रमुख रोहित रेणके नातेपुते दक्षिण शहर प्रमुख दादा वाघमारे तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख दहीगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे प्रतीक ओव्हाळ दत्तनगर शाखाप्रमुख संजय खुसपे ग्रामपंचायत सदस्य दहिगाव दत्तनगर शाखाप्रमुख सोनू वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

नातेपुते येथे बारामतीचे चंदूकाका सराफ सोने-चांदी दुकान भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

महाराष्ट्रात व देशात सुप्रसिद्ध 1827 पासूनअसणारे शुद्ध व चोख सोने-चांदीसाठीओळखले जाणारे बारामतीचे चंदूकाका सराफ सोने-चांदी दुकानाचे भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील,मा.आमदार रामहरी रुपनवर,खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.प्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बोलताना म्हणाले की नातेपुते या ठिकाणी चंदुका सराफ यांची सोळावी शाखा सुरू होत आहे.यामुळे नातेपुते परिसरातील लोकांना चांगल्या पद्धतीचा सोनं मिळणार असून येथील युवकांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.तसेच त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीचे चेअरमन किशोरकुमार जीवनदत्त शहा बोलताना म्हणाले की बऱ्याच वर्षापासून नातेपुते व परिसरातील ग्राहकांची चंदूकाका सराफ सुवर्ण पेढेची मागणी होत होती म्हणून नातेपुते या ठिकाणी सोळाव्या शाखेचा शुभारंभ केला आहे.या सुवर्ण पेढीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. व्यवसायासोबत आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकारचे समाज उपयोग सामाजिक उपक्रम राबवले आहे नातेपुते मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबवत आहोत. तसेच ग्राहकांसाठी आकर्षक योजना जाहीर केली 22 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत 30,000 व त्यापेक्षा जास्त खरेदी व गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक रॉयल एनफिल्ड बुलेट विजेता योजना जाहीर केली आहे.तसेच त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत स्वागत केले.याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील,मा.आमदार रामहरी रुपनवर,माजी जिल्हा परिषद  उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,मामासाहेब पांढरे,यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक ॲड.डी वाय राऊत, हनुमंत सुळ, मा.पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,डॉ.एम पी मोरे,नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली सेठ शंकेश्वर,नगराध्यक्ष अनिता ताई लांडगे,पत्रकार सुनील राऊत,मा सरपंच संदीप सेठ नगरसेवक रावसाहेब पांढरे, अतुल बावकर,रणवीर देशमुख,रणजीत पांढरे,उद्योजक राजू शेठ रुपनवर, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद लाल दोशी, चेअरमन प्रमोद दोशी,सरपंच सोनम खिलारे नंदू लांडगे,बाबा बोडरे, वीरेंद्र पांढरे,आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी चेअरमन किशोरकुमार शहा,डायरेक्टर नेहा शहा, मॅनेजिंग डायरेक्टर साम्यक शहा यांनी सर्वांच्या स्वागत केले.

शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : शिंदेवाडी मारुती मंदिराजवळ चावडी शिंदेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प. सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 750 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.उपस्थिती : मा. श्री. शरद (बापु) मोरे, सौ. ऋतुजाताई शरद मोरे, सुभाष रणवरे, तुषार निकम, किरण शिंदे, लतेश शिंदे, अविनाश देवकर, चेतन शिंदे, रवी मोटे, नीता झेंडे (सरपंच धर्मपुरी), शारदा देवी शिंदे (सरपंच शिंदेवाडी), छगन शिंदे, दत्ता देशमुख, हनुमंत देशमुख, प्रशांत देशमुख, चेअरमन घाडगे, सोमाबापू शिंदे, अनिल पवार, अमोल भोसले, लालासो देवकर, रणजीत देशमुख, प्रणिल देशमुख, अभिषेक देशमुख, अजय देशमुख, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी,

माळशिरस तालुका वकिल संघटनेत सचिव पदी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस तालुका वकिल संघटनेच्या सन 2025-26 या निवडणुकीत सचिव पदासाठी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदार या पदांवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सचिव पदासाठी फक्त ॲड. सावंत यांचाच अर्ज दाखल झाल्याने, आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.उर्वरित सर्व पदांसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.ॲड. सुमित सावंत हे माळशिरस तालुक्यात नामवंत वकिल म्हणून परिचित असून त्यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले आहे. ते भारत सरकारचे नोटरी म्हणूनही कार्यरत आहेत.सचिव पदी बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल तालुक्यातील वकिल बांधवांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नातेपुते येथे अजित ज्वेलर्स या सोने-चांदी दुकानाचे उद्घाटन थाटात संपन्न उद्घाटन प्रसंगी खा.धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यासह आजी माजी आमदारांची उपस्थिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते येथे अजित ज्वेलर्स शाखा नंबर दोन या सोने-चांदी दुकानाचे उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच आमदार उत्तमराव जानकर, शांताराम गिरी महाराज, बाळूमामा देवालयाचे कारभारी शिंगारे मामा, मंगू तात्या शिंगारे, बी वाय राऊत, हनुमंत सूळ,मामासाहेब पांढरे, माऊली पाटील,उपनगराध्यक्ष अतुल पाटील, डॉक्टर एम पी मोरे, मालोजीराजे देशमुख,बाळासाहेब सरगर, संजय पाटील, जि प सदस्य ऋतुजाताई मोरे, मुंबई आयुक्त मुख्याधिकारी मुंबई यांच्या पत्नी विद्याताई मोठे, चित्रादेवी देशमुख, तुकाराम देशमुख, गोल्डमॅन अक्षय अर्जुन तसेच पंचक्रोशीतील सरपंच पदाधिकारी मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच हनुमंत सुळ यांनी मनोगत व्यक्त केले.मनोगत व्यक्त करताना मान्यवर म्हणाले की रुपनवर बंधूंनी अथक परिश्रम घेऊन जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर नातेपुते सारख्या शहरात दोन दुकाने उभा केली. व चांगला व्यवसाय चालवला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्व मान्यवरांसाठी रुपनवर परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन,राजू रुपनवर, अजित रुपनवर महावीर रुपनवर व रुपनवर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात सुरू झाले आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या असून चोख सोन्याची खरेदी फक्त अजित ज्वेलर्स मधूनच करा
. आमचा पत्ता दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने पिरळे येथे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती कार्य शाळा सन 2025-26वर्ग क्रमांक एक संपन्न.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मौजे पिरळे हनुमान मंदिर,ग्रामपंचायत पिरळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने
फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती कार्य शाळा, सन 2025-26वर्ग क्रमांक एक आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी अमित गोरे यांनी केली, शेतीशाळेचा उद्देश, उत्पादनात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली व याच सभेत शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.
यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी रणजीत नाळे यांनी डाळिंब पीक व्यवस्थापन पूर्व तयारी, मृदा परीक्षण, हस्त बहार व मृग बहार याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.उप कृषी अधिकारी नातेपुते एक श्री गोरख पांढरे यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजना, हवामानाचे धोके व विमा संरक्षण याविषयी माहिती दिली.
मंडल कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे यांनी सुधारित वाणांची निवड व लागवड विषयी माहिती दिली. डाळिंब जीआय मानांकन, डाळिंब निर्यात याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यानंतर उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी श्री ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर, पिरळे यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पंढरमीसे यांनी रोप लागवडीविषयी घ्यावयाची काळजी, पावसाळ्यामधील तन व पाणी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमावेळी पिरळे गावचे सरपंच श्री अमोल शिंदे, ग्रामस्थ, बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, नातेपुते अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे साहेब, उप कृषी अधिकारी श्री गोरख पांढरे साहेब, उप कृषी अधिकारी श्री उदय साळुंखे साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी रणजीत नाळे साहेब, दत्तात्रय पांढरमिसे साहेब, नवनाथ गोरे साहेब, विश्वनाथ दुधाळ साहेब, हनुमंत खरात साहेब, दिनेश नाळे साहेब, गणेश जाधव साहेब उपस्थित होते.कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना चहा नाश्टा देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमित गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दादा किर्दक यांनी केले.


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

सेट परीक्षेत अमोल बाळासाहेब बंडगर यांच्या यशाबद्दल आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

(ता. माळशिरस): शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनं नसून समाजाला दिशा देणारी, संस्कार रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET) मध्ये यश संपादन केल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अमोल बंडगर हे विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
बंडगर सरांनी जीवन विज्ञान या विषयामधून 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र SET परीक्षेला बसले होते. 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल जाहीर झाला असता ते यशस्वी ठरले. यामुळे ते आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. SET परीक्षा ही UGC मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्यांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली अत्यंत प्रतिष्ठेची पात्रता मानली जाते.
सध्या बंडगर सर अकरावी-बारावी विज्ञान शाखेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून देताना त्यांची पद्धत, संयम आणि विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते. “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हे ते प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना पटवून देतात.
काल निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल बंडगर सरांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्याचा अभिमान वाढला आहे.
अमोल बंडगर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि तरुण शिक्षकांना दिशा देणारे आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
श्रीपूर परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग त्यांच्या या यशाकडे अभिमानाने पाहत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणखी उंच भरारी घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री उत्तमराव जानकर साहेब जी यांनी सत्कार पर भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी युवा नेते श्री. जीवन भैय्या जानकर आणि माळेवाडी चे माजी सरपंच श्री खंडागळे सर यांनीही शुभेच्छा दिल्या .


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

उस्फुर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजे नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्स ची दुसरी शाखा – जयंत चिंचकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


२३ सप्टेंबर २०२५ रोजी “अजित ज्वेलर्स” शाखा नंबर २ या नवीन फर्मचे उदघाटन होत आहे.त्यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचे अजित ज्वेलर्स यांना शुभेच्छा व शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे त्याचा अनुषंगाने नातेपुते येथील सुप्रसिद्ध विचारवंत सामाजिक कार्यकर्ते जयंत चिंचकर यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित ज्वेलर्स यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते म्हणतात की….   साधारणतः सहा वर्षांपूर्वी “अजित ज्वेलर्स” हे सराफी दुकान नातेपुते नगरीत सुरू झाले.दुकान निश्चितच नवे होते,पण दुकान मालकाचा या व्यवसायातील अनुभव खुप मोठा असल्याकारणाने अल्पावधीतच नातेपुतेकरांनी व आजूबाजूच्या पंचक्रोशीने “अजित ज्वेलर्स” या दुकानाला स्वीकारले,आपल्या ह्रदयात स्थान दिले.ग्राहकांच्या या उस्फूर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजेच नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्सची ही दुसरी शाखा…      अजित ज्वेलर्स या दुकानाचे मालक श्री.अजित रूपनवर हे साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले एक साधे राहाणीमान असलेले व्यक्तिमत्त्व..! सुमारे २४ वर्ष दुसर्‍याच्या दुकानात काम करून आज सहा वर्ष झाले स्वतःचा स्वतंत्र सराफी व्यवसाय मोठ्या नेटाने निर्माण केला.     मुळातच “प्रामाणिकतेचा दागिना” परिधान करून वावरणाऱ्या अजित रूपनवर यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासी तेजच त्यांच्या यशोगाथेतीची महती सांगते. आजही एकत्र कुटुंब हीच खरी अजित रूपनवर यांच्या व्यवसायाच्या यशोगाथेतेची खरी ताकद आहे.तीन भाऊ आजही एकत्र, एका मनाने,मताने झोकून देऊन व्यवसाय करतात.तिघेही अतिशय प्रामाणिक, प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले…यांच्या दुकानातील प्रत्येक दागिना यांच्या अंगी असणाऱ्या प्रामाणिकतेच्या कोंदणातून झळाळून आपली एक वेगळीच झळाळी प्राप्त करतोय.आज विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजेच “अजित ज्वेलर्स”हे नातेपुतेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्याचेच द्योतक म्हणजे येत्या २३ सप्टेंबर रोजी रूपनवर बंधु आपली “अजित ज्वेलर्स”ही दुसरी शाखा नातेपुतेकरांच्या सेवेसाठी सुरू करत आहेत.    येत्या २३ सप्टेंबर रोजी या “अजित ज्वेलर्स”शाखा नंबर २ ला भेट देऊन, रूपनवर बंधूंना आपला पाहुणचार करण्याची संधी द्या….  “प्रामाणिकतेचे तेज,अजित ज्वेलर्सच्या प्रत्येक दागिन्यात झळाळून दिसते”.


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉