माळशिरस तालुका

गावठी पिस्तूल कमरेला घेऊन फिरणाऱ्या एकास नातेपुते पोलिसांकडून अटक

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली. दि. 20/09/2025 रोजी पहाटे 03.25 वाजता मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले.तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके व स.पो.नि. श्री. संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एएसआय श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली.

जगातील सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे आई आणि बाप -वसंत हंकारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  – प्रमोद शिंदे-
जगातील सगळ्यात पहिलं मोठं शिक्षण आणि विद्यापीठ म्हणजे आई आणि बाप आई आणि बाप हेच आपले पहिले गुरू आहेत.अशा प्रकारचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे यांचा व्याख्यान व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कै.नानासाहेब देशमुख, शंकररावजी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन बाबाराजे देशमुख, वसंत हंकारे व इतर मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे बोलताना म्हणाले की मला गुरु शोधण्यासाठी बाहेर जायची गरज लागली नाही दादांच्या रूपाने मला घरामध्येच गुरु मिळाला. दादांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. रॉयल जीवन कसं जगायचं दादांनी शिकवलं. दादांसोबत राजकारणापलीकडे अनेक लोकांनी नातं जोडला आहे. पंचभक्कम केला तर आपल्या इतर ठिकाणी बर करत नाहीत अशी शिकवण दादांनी दिली. दादांनी शेतीवर खूप प्रेम केले आहे. तसेच बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त न समजलेले आईबाप याविषयी व्याख्यान देताना वसंत हंकारे यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थी व उपस्थित त्यांना व्याख्याने द्वारे भावनिक केले.आई आणि बाप या विषयी अनेक दाखले देत आई वडिलांचे जीवनातील महत्त्व सांगितली.ते म्हणाले की जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा आई ,बाप गेले की भिंतीवरचा बाप आणि आई परत येत नाहीत. लाखो करोडो रुपयांचा परत उपयोग नसतो. तुमचा एकच देव असायला पाहिजे आई आणि बाप. मुलींनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना ताकद बनवले पाहिजे, मुलांनी बापासाठी व्यसन न करण्याची शपथ घ्यावी डोळ्यातील अश्रूंना परिवर्तनात बदलले पाहिजे. अशाप्रकारे हंकारे यांनी न समजलेले आई आणि बाप याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाबाराजे उर्फ शहाजीराजे देशमुख,माजी वैद्यकीय अधिकारी एमपी मोरे, मचाले सर ,मा.सरपंच बी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, ए.पी.आय महारुद्र परजणे,धैर्यशील भाऊ देशमुख, बाहुबली शेठ चनकेश्वरा,नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, माऊली पाटील, शक्ती पलंगे, एडवोकेट शिवाजीराव पिसाळ, महेश शेटे, अडवोकेट रणवीर देशमुख ,संतोष काळे, मा सरपंच संदीप नरोळे, महादजी शिंदे, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ.नरेंद्र कवितके,तसेच नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते पालक शिक्षक स्टाफ व विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठ्या थाटात उत्सव साजरा…

प्रतिनिधि.संदेश भालेराव [मुरबाड ठाणे जिल्हा]
दि. १२\०५\२०२५ रोजी शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव, भारतीय बौद्ध महासभा, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत सिध्दार्थगौतम बुद्ध यांचीवैशाखी पौर्णिमा अर्थात २५६९वी जयंतीआणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली….
सर्व प्रथम
तथागत सिद्धर्थगौतम
बुद्ध छत्रपती शिवाजीमहाराज विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलेभगवान गौतम बुद्ध यांची२५६९वी जंयती आयोजित स्थळी महिलांनी सामुहिकरित्या पंचशिल त्रिशरण बुध्द वंदना
करण्यात आली होती.
सकाळी १०.०० वा. धम्म देसना भन्ते -राहुल बोधी यांचे बुद्धांच्या जीवनावर प्रवचन झाले.
दुपारी ३.००वा.
भव्य मिरवणूक काढण्यात आली
सायं. ६.०० वा. जाहीर सभा संम्पन्न झाली
रात्री ८.०० वा.
स्नेह भोजन झाले
रात्री ९.३० वा. । बुद्ध भीम प्रबोधन पर गीतांचा कार्यंक्रम झाला.
. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय आयु. भूपेंद्रजी अनंता भालेराव सर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयु. भाऊसाहेब रातांबे (अध्यक्ष, भीमाई स्मारक समिती )आयु. उल्हासभाऊ बांगर (माजी जिल्हा परिषदसदस्य,ठाणे), आयु. बाळा शेठ घरत (कोशाध्यक्ष, भाजपा), मुरबाड तालुका )आयु. सचिन चौधरी. आयुनी. स्वराताई चौधरी (माजी सभापती, पंचायत समिती मुरबाड.) आयु. दिनेश उघडे (अध्यक्ष मुरबाड तालुका RPI(A) आयुनी. वैशालीताई उघडे (सदस्या, जिल्हा परिषद ठाणे)आयुनी. योगिताताई खंडागळे (अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, महिला ) आयुनी. ज्योतीताई अहिरे सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका (महिला) मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीसाठी कसे उपयुक्त आहेत, हे प्रतिपादित केले. आयु. भूपेंद्रजी भालेराव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान याचे महत्व पटवून देत असतांना स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. संतोषजी भालेराव सर तसेच आभार प्रदर्शन आयु. नरेशजी जाधव यांनी केले.
ह्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजक शांतीदुत फ्रेन्ड सर्कल मधील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांसह सदस्य,
ग्रामस्थ मंडळ आंबेगांव,भास्करजी भालेराव,कृष्णाजी खंडागळे,सुरेशजी भालेराव,आनंताजी भालेराव,रमेशजी खंडागळे , जगदीशजी भालेराव. गणेशजी भालेराव किरणजी भालेराव, बाळाशेठ घरत, सतीश गायकवाड, संतोष बंडू घरत, कैलास एगडे भाऊसाहेब, अरुण घरत, नंदू कंथोरे, धनाजी घरत, भगवान घरत, एकनाथ घरत शरद एगडे यांचे विशेष सहकार्य लाभले

दहिगव येथील अक्षय जयसिंग मोरे याची बँक असिस्टंट पदी निवड

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

अक्षय मोरे यांची बँक असिस्टंट पदी निवड झाली असून दहिगाव परिसरात उत्साहाचे वातावरण नर्माण झाले आहे आहेअक्षय जयसिंग मोरे यांनी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दहिगाव येथुन घेतले 11 वी ते 12 पर्यंतचे शिक्षण नातेपुते येथील बा.ज.दाते प्रशाला येथुन घेतले परत पुढील शिक्षण विश्वासराव रणसिंग कॉलेज कळंब मधुन घेतले अक्षय याचे पहिल्यापासून स्वप्न  पोलिस होण्याचे होते. थोड्या थोड्याच मार्कत पोलिस होण्याचे स्वप्न राहिले घरची परिस्थिती मध्यम होती सामाजिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे  जयंती महोत्सव व इतर कार्यक्रम अस  स्वतः पुढाकार घेऊन ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत असे. तसेच राजकारणातील आवड मोठ्या मोठ्या लोकांची जीवाभावाचे संबंध खूप मोठा मित्रपरिवार तसेच खूप संघर्ष करत आपल्याला काय तरी बनायचे आहे ही जिद्द चिकाटी व कष्ट अभ्यास करून कधी कधी डायव्हिंग, पेंटींग चे शेतातील कामे,वेल्डिंगची काम करत  कंपनी मध्ये पण काम केले CA यांच्या ऑफिस मध्ये काम केले आहे .बजाज फायनान्स मध्ये पण लोन  ऑफिसर म्हणून काम केले  अक्षय मोरे यांनी अजुन अभ्यास चालू ठेवला असून आता त्याची बँक अकाऊंट असिस्टंट म्हणून निवड झाली आहे. त्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबोली चे मुख्याध्यापक दादासाहेब साळवे सर व मित्रपरिवार यांचे मार्गदर्शन लाभले.

रत्नत्रय प्री स्कूल नातेपुतेच्या बाल चमू चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय धूम धडाक्यात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
‌. ‌‌. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नात्रेय प्री स्कूल नातेपुते, येथे दिनांक १०/३/१५(सोमवार) रोजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम, घनवट बिल्डिंग, मोरे हॉस्पिटलच्या प्रांगणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय डॉक्टर श्री एम पी मोरे (वैद्यकीय अधिकारी) , ॲड. मयूर शहा (कर सल्लागार), नातेपुतेचे ए पी आय महा रुद्र पपरजने साहेब, नगरसेविका शर्मिला चांगण श्री हनुमंत धालपे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास रत्नत्रय परिवारातील रत्नत्रय स्कूल मांडवे चे सचिव माननीय श्री प्रमोद दोशी, रत्नात्रेय प्री स्कूलचे सभापती व वेवस्थापक श्री वैभव शहा, उपसभापती श्री प्रीतम दोशी, संचालक श्री विनय दोबाडा श्री अमित शहा, सुरेंद्र शहा रत्नत्रय पतसंस्थेचे मॅनेजर राऊत सर, रत्नत्रय प्री स्कूल व अकॅडमीचे मुख्याध्यापक (दहिगाव) श्री सतीश हांगे सर, रत्नत्रय आयटीआय दहिगाव चे प्रिन्सिपल ,जगताप सर रत्नत्रय प्री स्कूल माळशिरस च्या मुख्याध्यापिका व वनिता निंबाळकर, रत्नत्रय एज्युकेशन च्या मांडव्याच्या मुखादक दैवत वाघमोडे उप मुख्याध्यापिका सविता दे साई मॅडम, मांडवे येथील शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. नातेपुते गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रौनक चंकेश्वरा , श्री बाहुबली चंकेश्वरा श्री नीलम कुमार गांधी, पत्रकार मनोज राऊत, वैभव आठवले स्कूलचे पालक हितेश सावंत, रोहित गांधी, तुषार देसाई, सुभाष इंगोले, अतुल नाळे, संभाजी अवघडे, रविराज नलवडे, सौ अर्चना गटकुल, सौ निकिता शहा सौ प्रीती दोशी शाहीन मुलांनी, सो आता र, पूजा नलवडे, सौ शीतल पटेल वर्षा नाळे, मनीषा हरनवळ, सीमा सावंत, अंकिता गांधी, संजना चकेश्वरा, असा बहुसंख्य महिला वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात नाविन्य वेद असलेल्या फॅशन शो ने करण्यात आली. यानंतर रत्नोत्तरे प्री स्कूलचे पापा मेरे पापा हा डान्स अंश वी काटवटे या प्ले ग्रुपच्या विद्यार्थिनींनी सादर केला, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारा सोशल मीडियावरील डान्स ,सुनो गोरसे हे देशभक्तीपर गीत तसेच सर्व विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यांचा असलेला एकटी एकटी घाबरलीस ना प्री स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जुबी डुबी या गाण्यावर सर्व बालचंदूनी खूप सुंदर डान्स केला, तर बम बम बोले साठी सर्व मुले आनंदाने नाचली. या कार्यक्रमात दिव्यांशी शहा व निकिता शहा या यांच्या जोडीने सुद्धा अतिशय सुंदर डान्स केला . रुद्रली सावंत या विद्यार्थिनी ने सुद्धा उत्कृष्ट डान्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेपरी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच न्यारी झाली होती. या कार्यक्रमात बक्षीस वितरण सुद्धा घेण्यात आले शाळेत घेतलेल्या स्पोर्ट्स व क्वीज कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण तसेच महिला दिन दिनानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण या समारंभात घेण्यात आले. सर्व विद्यार्थी बक्षीस घेऊन अतिशय खुश झाले होते. तसेच पाककलेतील बक्षीसांसाठी सौ सीमा सावंत-१, सौ अंकिता गांधी-२, सौ सविता इंगोले-३ यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सभापती वैभव शहा यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री सतीश हांगे व मुख्याध्यापिका माधवी रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व रत्नत्रय प्री स्कूलचे सहशिक्षिका पूजा दोशी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कोरिओग्राफी करत सुंदर डान्स बसवले होते.व सर्वाना स्कूल तर्फे नास्ता ची सोय केली होती . वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे सभापती श्री वैभव शहा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नातेपुते रत्नत्रय प्रीस्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोरे हॉस्पिटल शेजारी घनवट बिल्डींग येथे सोमवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. आयोजित करण्यात आल्याची माहिती स्कूलचे सभापती व व्यवस्थापक वैभव शहा यांनी माळशिरस लाईव्हशी बोलताना दिली.

या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ.एम.पी.मोरे यांचे प्रमुख उपस्थित कर सल्लागार मयूर शहा व नातेपुते पोलीस स्टेशन सह. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, उपसभापती प्रितम दोशी, सदस्य विनय दोभाडा, अमित शहा, मुख्यध्यापिका माधवी रणदिवे व समस्त प्रशाला समिती यांनी पालक, शिक्षणप्रेमी नागरिका यांनी या बाल कलाकरांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे वतीने २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष विविध उपक्रम राबवीत अनंत अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था साजरे करणार आहे. या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थीच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून बालचमूची बहारदार कला पाहण्यासाठी पालकासह, शिक्षण प्रेमी नागरिक आतुरले आहेत.

विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यास दिग्गजांसह लाखो मान्यवरांची उपस्थिती.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीतील  चिरंजीव विश्वतेजसिंह व चिखली जि वाशिमचे श्री उदयसिंह सरनाईक यांची कन्या चि सौ का शीवांशिका यांच्या शाही विवाह सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग आदी क्षेत्रातील लाखो मान्यवरांची उपस्थिती लाभली . गोरज मुहूर्तावर  सुमारे दीड लाख निमंत्रित मित्र परिवारांनी वधूवरास शुभाशीर्वाद देत याची देही याची डोळा मोहिते पाटील परिवारातील चौथ्या पिढीचा शाही विवाह सोहळा पाहिला .या विवाह सोहळ्यास खा.शरदचंद्र पवार , सौ.प्रतिभा पवार , ना..रामदास आठवले , ना.शिवेंद्रराजे भोसले, ना.शंभूराज देसाई , सौ.स्मिता देसाई, खा.उदयनराजे भोसले , कल्पनाराजे भोसले सातारा , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , विश्वजीत कदम , सौ.स्वप्नाली कदम , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , आ. किरण सरनाईक, माजी मंत्री   हर्षवर्धन पाटील , खा शाहू महाराज छत्रपती , खा..निलेश लंके , खा.बजरंग सोनवणे , .संजीवराजे नाईक निंबाळकर , सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर .श्रीनिवास पवार , सौ.शर्मिला पवार , क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना दत्तात्रय भरणे , आ दिलीप सोपल., आ सचिन कल्यानशेट्टी , आ नारायण पाटील , आ उत्तमराव जानकर, आ समाधान आवताडे , आ अभिजीत पाटील , आ राजू खरे , माजी आ दिलीप माने , दीपक साळुंखे ,  धनाजी साठे , सिध्दाराम म्हेत्रे , प्रशांत परिचारक , प्रकाश पाटील पानीवकर,बाबाराजे देशमुख, कल्याणराव काळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते , सहकार , शिक्षण , उद्योग , सामाजिक , नाट्य , चित्रपट क्षेत्रातील असंख्य मान्यवर तसेच सोलापूर तसेच इतर जिल्ह्यासह माळशिरस तालुका मोहिते पाटील प्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.तसेच जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी वरातीमध्ये लेझीम खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ रणजितसिंह मोहिते पाटील, खा धैर्यशील मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्यासह परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. .

रत्नत्रय पतसंस्थेचा 21वा वर्धापन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील रत्नत्रय संस्थेचा 21 वा वर्धापन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल (दादा) दोशी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच‌ मा.श्री.विरकुमार भैया दोशी .शंकर कारखान्याचे संचालक मा.श्री.रामदास करणे डी.सी.सी बँकेचे शाखाधिकारी लोंढे साहेब कर्तव्य दक्ष संचालक प्रमोद दोशी संचालक रामदास गोफणे , जगदीश राजमाने अजय गांधी सोमनाथ राऊत तज्ञ संचालक सुरेश काका कुलकर्णी विलास साळुंखे व सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला….
कार्यक्रमाचे प्रस्तावित कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी यांनी यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रत्नत्रय पतसंस्था ही 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे व 22 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असताना संस्थेने 22 कोटींच्या ठेवीचा आकडा पार केलेला आहे हा आकडा संस्थापक व संचालक मंडळावर सर्व ठेवेदारांनी ठेवलेला विश्वास आहे आपली संस्था ही संपूर्ण संगणिकृत असून ऑनलाईन व्यवहार करीत आहे सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढण्याची आरटी जिएस एनएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे तसेच सर्व वाहनाचे इन्शुरन्स नवीन पासपोर्ट पॅन कार्ड काढणे क्यूआर पेमेंट अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहेत असे ते म्हणाले.
यानंतर संस्थेचे संस्थापक मा श्री .अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले की लवकरच आपली पतसंस्था ही .स्वमालकीच्या जागेत भव्य अशी इमारत बांधत आहे व यापेक्षाही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले यानंतर तज्ञा संचालक सुरेश काका कुलकर्णी यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले व पुढील काळात ही संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी .कायम संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे सांगितले
तसेच महिला दिनानिमित्त पतसंस्थेने रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचेही बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल (दादा) दोशी यांच्याा शुभहस्ते करण्यात आले
खुलागट रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक प्रीती राम कुलकर्णी द्वितीय क्रमांक अमृता महेश मोहिते तृतीय क्रमांक प्राजक्ता मनोज दांगट
खुला गट चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक मेघा संदीप चव्हाण द्वितीय क्रमांक स्वाती रामचंद्र शेंडगे तृतीय क्रमांक निकिता राहुल मगर
लहान गट चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक मयुरी तानाजी सालगुडे
द्वितीय क्रमांक आदिती अमितकुमार करणे‌‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌
तृतीय क्रमांक श्रुती दत्तात्रय शिंदे उत्तेजनार्थ अक्षता निलेश गांधी.
लहान गट रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक समीक्षा नाना कोकरे
द्वितीय क्रमांक समीक्षा महेंद्र कापसे
तृतीय क्रमां श्रीलेखा दीपक जाधव
या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन मा.श्री. वीरकुमार (भैया) दोशी यांनी मानले तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी वैभव मोडासे मंगेश जगताप टी.डी.देशमुख नीता रणवरे विक्रम पालवे युवराज वळकुंदे रणजीत गोरडे यांनी काम पाहिले..

बारामती हिंदुस्तान कॅटल फीड च्या वतीने समता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅग वाटप

पुरोगाम महाराष्ट्रा न्युज नेटवर्क प्रमोद शिंदे

बारामती हिंदुस्तान कॅटल फीड लिमिटेड कंपनी तसेच श्री विष्णू नारायण दूध संकलन केंद्र चे  चेअरमन संदीप तात्या नरोळे यांच्या सौजन्याने  समता माध्यमिक विद्यालय श्री भिवाई देवी जुनियर कॉलेज पिरळे येथील 175 मुलींना स्कूल बॅग व सॅनिटरी पॅड  वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व समता माध्यमिक विद्यालय संस्थापक अध्यक्ष कै. मानसिंगराव (आबासाहेब) शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  हिंदुस्तान फीडस् चे  तांत्रिक विस्तार अधिकारी श्री अक्षय गावडे  व मार्केटिंग ऑफिसर श्री मयूर शेळके माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,पत्रकार प्रमोद शिंदे,प्राचार्य दीपक शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी संस्थेचे चेअरमन महादेव शिंदे,दत्तात्रय लवटे पाटील, मुख्याध्यापक गायकवाड सर शिक्षक स्टाफ व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेली भुतोजी महाराज खळदकर यांच्या हस्ते रुद्र मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

पुरोगाम महाराष्ट्र न्युज नेटवर्क- प्रमोद शिंदे


दहिगाव तालुका माळशिरस येथे रुद्र मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या या औषधांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा श्री शिवयोगी तेली भूतोजी नाना महाराज खळदकर (मुख्य मानकरी, शिखर शिंगणापूर )यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी दहिगाव गावच्या सरपंच सौ सोनम ताई रंजीत खिलारे, उपसरपंच संदीप अण्णा सावंत युवा नेते बाळासाहेब कदम, रामचंद्र दादा पाटील, संभाजी फुले सर राहुल सावंत, रमेश मोरे, खळद पंचक्रोशी चे अमोल टिळेकर, अजित काका खळदकर, तात्यासाहेब राणे,धनाजी बापूराव चिकणे, संग्राम धनाजी चिकणे ,बिबीशन धनाजी चिकणे,शिवशक्ती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.