माळशिरस तालुका

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक 20/10/2021 रोजी 00.29 वाजता फिर्यादी नामे – बापू नाना वाघमोडे वय – 35 वर्ष राहणार, फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली की
फिर्यादीची मौजे फोंडशिरस फुले मळा तालुका माळशिरस येथे जमीन गट नंबर 1413 जमीन आहे सदर सामाईक जागेवरून फिर्यादीचे वडील नामे – नाना अण्णा वाघमोडे वय – 70 वर्ष यांचे बरोबर भावकीतले नामे 1. किरण महादेव वाघमोडे व 19 वर्षे 2.अंकुश महादेव वाघमोडे वय 27 वर्ष 3. धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय 35 वर्षे यांनी संगणमत करून वडील नाना अण्णा वाघमोडे यांना लोखंडी पाईप ने डोकीत मारून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले म्हणून वैगरे मजकुराची फिर्याद वरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गुर नंबर 365/ 2021 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 302 307 323 504 506 34 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला होता,सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर हे करीत होते सदर दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली दप्तरी सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे यांनी काम केले तसेच तपासाचे दरम्यान आरोपी विरुद्ध सबळ असा पुरावा हस्तगत करून सदर आरोपीविरुद्ध माननीय सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोप पत्र दाखल केले होते माननीय सेशन कोर्ट न्यायाधीश श्री एल डी हुली सत्र न्यायालय यांनी सदर गुन्ह्याचे ट्रायल चालूउण सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने i) भा.द.वि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी 5000रुपये दंड,दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास तसेच 504,506,34, मध्ये 1वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे ।। आशी शिक्षा सुनावली आहे सदर केससाठी पुण्यातील सबळ पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन उत्कृष्ट पने कर्तव्य पार पाडलेले आहे सरकारी वकील एस एस पाटील ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे ,पोलीस नाईक मारुती शिंदे यांनी काम पाहिले आहे
सदरची कामगिरी माननीय डी वाय एस पी शिरगावकर साहेब प्रभारी अधिकारी सपोनी महारुद्र परजणे साहेब ,तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर साहेब, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे मा.सरकारी वकील एस एस पाटील साहेब ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे, पोलीस हवालदार मारुती शिंदे यांनी केली आहे

सहकार महर्षींनी माळशिरस च्या माळरानावर नंदनवन फुलवलं-पद्मजादेवी मोहिते

पाटील-संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे श्रेष्ठ – पद्मजादेवी मोहिते-पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे उद्देशाने दिनांक सात जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले यामध्ये प्रा. नारायण माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुले- मुली यांच्या कबड्डी, खो-खो आदी क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, गायन, निबंध लेखन, पुष्प सजावट,रांगोळी, हस्ताक्षर, पारंपारिक दिन या सारखे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आटपाडी येथील प्रा शहाजी पारसे यांचे ‘ सहकार महर्षी आणि त्यांचे जीवनकार्य‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले,सामान्य माणसाविषयी त्यांच्या मनात अपार श्रध्दा होती. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ते तत्पर असत. वंचितांचे, उपेक्षितांचे आणि शेतकऱ्यांचे- शेत मजुरांचे जीवनमान उंचावले जावे. त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे या विचाराने ते समाज सेवा करीत राहिले. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अकलूज येथे शैक्षणिक संकुल उभा केले. अनेकांना रोजगार निर्माण व्हावा शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती साधता यावी यासाठी त्यांनी दूध संघ, कुकुटपलान, जर्सी गायी छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते म्हणाले
माळशिरस च्या माळरानावर सहकार महर्षींनी नंदनवन फुलवलं तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी समाजकार्य वा राजकारण करताना भेदभाव कधी केलानाही.
सहकार महर्षी यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, या हेतूने तालुक्यातील सर्व संस्थांची सहकार तत्त्वावर उभारणी केली. आज त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज आहे, असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयात सहकार महर्षीच्या १०७ व्या जयंतीनिमित्त बोलताना
ते पुढे म्हणाले, महर्षींनी राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने त्यांचे राजकारण होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुनील राऊत, निनाद पाटील, एन. के. साळवे, समीर सोरटे, अभिमन्यू आठवले, मनोज राऊत, सुनील गजाकंस,श्रीकांत बाविस्कर,, सुनील ढोबळे, संजय पवार , या सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ , डायरी पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार प्रमोद शिंदे यांची द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निनाद पाटील, सुनील राऊत आपल्या मनोगतातून सहकार महर्षी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
प्र प्राचार्य डॉ रज्जाक शेख, डॉ दत्तात्रय साळवे आणि विद्यापीठ सुवर्णपद विजेता अजय कुंभार यांचा विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक विभागातील प्रा नितीन देशपांडे, प्रा सौ पुष्पा सस्ते, प्रा सौ रब्बाना शेख, प्रा. दयानंद साठे, प्रा राजेंद्र साठे, प्रा. उत्तम सावंत, प्रा जगदीशचंद्र मुळीक, प्रा श्रीकांत पवार,प्रा डॉ बाळासाहेब निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ रज्जाक शेख यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे यांनी केले तर प्रा. सुहास नलवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

रायझिंग डेनिमित्त नातेपुते पोलिसांकडून 6 लाखाचा चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादिला दिला गिफ्ट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते पोलीस ठाणेकडील चोरी घरफोडी सारख्या विविध उघडकीस आणलेल्या गुन्हयामधील व चोरी झालेले २० मोबाईल असे एकुण ०६,१६,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे व मोबाईल “महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह” निमीत्त मुळ फिर्यादीस परत करून दिले गिफ्ट


याबाबत हकीकत आशिकी
नातेपुते पोलीस ठाणेस मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो। सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो। अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे हददीत दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्राो ०२:०० वा ते ०३:४५ वा चे दरम्यान फिर्यादीनामे श्री सुभाष नरहरी केंजळे वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा केंजळेवस्ती धर्मपुरी ता माळशिरस यांचे राहते घर फोडुन घरफोडी झालेबाबत फिर्याद प्राप्त झाली होती. त्यांची तक्रारीवरुन नातेपुते पोलीस ठाणे येथे २५३/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने नातेपुते पोलीस ठाणे हे करीत होते. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळवुन सदर गुन्हा करणारे वेगवेगळे आरोपीना नातेपुते पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी श्री विक्रांत डिगे पोलीस उपनिरीक्षक व पोहकॉ राहुल रणनवरे पोहेकॉ नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे पोना राकेश लोहार पोकॉ नवनाथ चव्हाण यांनी आरोपीनामे देवगण बापु उर्फ विजय पवार रा आटपाडी सांगली यास अटक करुन त्यांचेकडुन वरिल गुन्हयातील २,००,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले होते सदरचे सोने फिर्यादीस देणेबाबत श्री. यु बी पेठे मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्यायालय यांचे आदेश झाल्याने तसेच नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले वेगवेगळया कंपणीचे मोबाईल पोकॉ रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे, पोकॉ रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक विश्लेशन करुन सुमारे ४,१६,०००/-रु किंमतीचे वेगवेगळया कंपणीचे २० मोबाईल हस्तगत केले असुन वरिल एकुण ६,१६,०००/- रु किंमतीची मुददेमाला “महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह” चे औचित्य साधुन वरिल मुददेमाल मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोो सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोा अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपुर्वक वरिल सर्व गुन्हयातील फिता यांना बोलावुन घेवुन त्यांना सोन्याचे दागिणे व मोबाईल परत करण्यात आले त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे श्री महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ महादेव कदम, पोना राकेश लोहार, पोकॉ रणजित मदने, पोकॉ दिनेश रणनवरे, पोकॉ नितीन पन्नासे, पोकॉ अमोल बंदुके, पोकॉ सोमनाथ मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकॉ गणेश कुलकर्णी, पोकॉ रमेश कर्चे, पोकॉ अमोल देशमुख, पोकॉ नवनाथ थिटे, मपोकॉ नेहा बोंदर यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रणजीत कागदे यांना पीएच.डी.प्रदान


माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
दसूर येथील रणजीत कागदे हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. त्यांनी वेलटेक युनिव्हर्सिटी चेन्नई येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम विथ रिस्क लेव्हल इव्हॅल्युएशन इन वायरलेस सेन्सर नेटवर्क युजींग ऑप्टिमायझेशन असिस्टेड डिप लर्निंग मेथडस् या विषयामध्ये पीएच.डी पूर्ण केली. यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.एन विजयराज यांनी मार्गदर्शन केले. कागदे यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला. त्यांचे पाच शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज, पदवी शिक्षण बी.ई. (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी), स्वेरी, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण: एम.ई. (संगणक अभियांत्रिकी), सिंहगड इन्स्टिटयूट, पुणे येथे झाले आहे.
कागदे यांच्या या यशाबद्दल दसूर गावासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

नितेश माने वाढदिवसानिमित्त261 जणांनी केले रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते येथे नितेश माने यांच्या वाढदिवसानिम्मित संयुक्त प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस लोकांचा पार्टी करण्याचा,एन्जॉय करण्याच्या दिवस तरी पण शिना माने यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर 261जनानी रक्तदान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला.या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.रक्तदान 7:30 वाजता संपल्या नंतर ही मित्र परिवार रक्तदान करण्यासाठी येत होताच पण वेळेअभावी त्यांना रक्तदान करता आले नाही.हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी संयुक्त प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम  घेतले या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकावर नातेपुते पोलिसांकडून कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस ठाणे अंतर्गत आगामी नवीन वर्षाच्या अनुषंगाने सर्व वाहनधारकाने ” वाहतुकीचे नियम पाळावे व अपघात टाळावे ” तसेच जे वाहनधारक हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आशा वाहनधारकावर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेले आहे
1) वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे 13 केसेस 13,000/ दंड
2) विना हेल्मेट वाहन चालविणे 58 केसेस 58,000,/हजार रुपये दंड3) ट्रिपल सीट वाहन चालवणे 28 केसेस 28,000/ हजार रुपये दंड4) वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभा करणे 40 गुन्हे दाखल केले.वाहनधारकाने रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून मोटर वाहना अधिनियम अन्वये 2115 किसेस करून जवळपास 12,25,400/- रुपयापर्यंत दंड आकारणी केलेली आहे तसेच मध्य प्राशन करून वाहन चालवले म्हणून 22 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच आगामी नवीन वर्ष स्वागत अनुषंगाने काही वाहनधारक हे दारू पिऊन गाडी चालवतात आशा तळी रामावर नातेपुते पोलीस स्टेशन मार्फत वेगवेगळ्या पथके नेमलेले असुन त्यामध्ये Api महारुद्र परजने, psi विक्रांत दिघे , पोलीस कॉन्स्टेबल , विश्वास जानकर, सुधीर हंगे, गणेश कुलकर्णी, रमेश करचे ,सोमनाथ मोहिते, सचिन चव्हान अमलदार , अधिकाऱ्यांची पथके नेमलेले असून सक्त करवाई करण्यात येत आहेत याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस API महारुद्र परजने यांनी माहिती दिली.

जय भीम शिवपालक अध्यक्ष आमचा लढवय्या नेता गेला- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
धनाजी तुकाराम शिवपालक यांचा दिनांक 25/12/2024 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रक्षा विसर्जन दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 7.30 वाजत होणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते धनाजी शिवपालक यांच्या अकाली अचानक झालेल्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार राज्य महासचिव
ऍड. डॉ. केवलजी उके यांनी श्रद्धांजली पर मनोगतात सांगीतले.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले की आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज,ढाण्या वाघ,
धनाजी शिवपालक यांच्या निधनाच्या नंतर आम्ही शिवपलक यांच्या कुटुंबीयांच्या सोबत शेवट पर्यंत आहोत.
सर्वांनी पार्थिवाचे अंतीम दर्शन घेतले.
धनाजी शिवपालक यांच्यासारखा निस्वार्थी वाघासारखा लढणारा शेवटपर्यंत साथ देणारा मित्रत्व जपणारा नेता आम्ही हरवला आहे… असे उदगार आंबेडकरी चळवळीचे नेते व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे यांनी काढले.
यावेळी मुंबईहुन उद्योजक सामजिक कार्यकर्ते विनोद जाधव व मुंबई प्रदेश सचिव शशीभाऊ खंडागळे, ऍड.सुमित सावंत,महेश शिंदे मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनीही शिवपालक यांना श्रद्धांजली दिली. हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले संविधान वय 10 वर्ष अनिरुद्ध 6 वर्ष अशी मुलांची नावे आहेत.
धनाजी शिवपालक हे अन्याय अत्याचाराच्या विरोध लढणारे एक लढवय्या योद्धा होते. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता.
धनाजी शिवपालक हे मातंग व बौद्ध समाजाला जोडणारा मौल्यवान महत्त्वाचा दुवा होते. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांच्या अडचणीमध्ये धावून जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे हा शिवपालक यांच्या स्वभावाचा एक भाग होता. आपल्या स्वभावाने माणसांना जोडत राहणे हा त्यांचा विशेष गुण होता.
उंबरे पागे तालुका पंढरपूर या गावात बौद्ध मातंग दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता हा अन्याय धनाजी शिवपालक यांनी मोडून काढला शिवपालक यांनी मंदिर प्रवेश करून मंदिर सर्वांसाठी खुले केले होते. पण ते स्वतः कधीही मंदिरात जात नव्हते.जे मंदिर सर्व समाजासाठी खुले आहे फक्त दलितांना सोडून ही बाब त्यांना खटकत होती. तहसील कार्यालय पंढरपूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलने मोर्चे काढून अनेक आंदोलन त्यांनी यशस्वी केली.
त्यामुळे धनाजी शिवपालक यांना समाजभूषण पुरस्कार,
फुले शाहू आंबेडकर पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वाशिम येथे घेण्यात आलेल्या महाअधीवेशन दरम्यान धनाजी शिवपालक यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात बौद्ध मातंग चर्मकार होलार व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे अकरा खून प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरी जमीन व पेन्शन मिळवून देण्यात धनाजी शिवपालक यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग सिंहगर्जना केल्यासारखे भाषण, वाघाच्या डरकळ्या फोडल्यासारख्या महापुरुषांच्या घोषणा धणाजी शिवपालक द्यायचे.. आझाद मैदान मुंबई येथे देखील त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी कंटिजंसी प्लॅन लागू होण्यासाठी आंदोलन केले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाल्याच्या नंतर संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी धनाजी शिवपाल हे सज्ज झाले होते. भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास त्यांचा चालू होता.
धनाजी शिवपालक यांचे ऐतिहासिक सामाजिक कार्य पाहून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने धनाजी शिवपालक यांना सोलापूर जिल्ह्याच्या सर्व शासकीय उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वरती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
प्रांत,तहसीलदार,डी.वाय.एस.पी,पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे शासन निर्णय,परिपत्रकाचे दाखले देणे व गोरगरिबांची कामे करणे यामध्ये शिवपालक यांचा हातकंडा होता. अनेक नव्याने आंबेडकरी चळवळीत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी शिवपालक एक ऊर्जा स्त्रोत होते. नवख्या पदाधिकाऱ्यांना नवख्या नेत्यांना शिवपालक नेहमी मार्गदर्शन करायचे.

माझ्या खांद्याला खांदा लावून मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख बजावने, माझा शब्द खाली न पडू देने, माझ्या सुरक्षेची काळजी घेणे, असा ऑलराऊंडर नेता आज आमच्यात राहिला नाही. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे कायम अमर राहील.
धनाजी शिवपालक यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला. मातंग समाजाला आंबेडकर वाद शिकवणारा संविधान समजावून सांगणारा, मातंग व बौद्ध या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधनारा सामंजस्य निर्माण करणारा कोहिनूर हिरा म्हणजे धनाजी शिवपालक होय.
सकाळी उठले की जय भिम, झोपताना जय भीम, जय भीम हा शब्द म्हणजे शिवपालक यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला.
मी महाराष्ट्रातली अनेक हत्या व हत्याकांड पाहिले आहेत. अनेक प्रकारच्या केसेस हाताळले आहेत परंतु माझ्या डोळ्यात कधी पाणी आणले नाही. आज धनाजी शिवपालक यांनी या दगडासारख्या मनाच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आणले.

माणुस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य धनाजी शिवपालक यांच्यासाठी तंतोतंत लागु होते.

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
सदस्य जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती पुणे
8484849480

श्री अंकुश भाऊ सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विविध उपक्रम नातेपुते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

श्री अंकुश भाऊ सुर्वे फाउंडेशन व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांचे मार्फत मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अंकुश भाऊ सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये रक्तदान वृक्षारोपण जि. प . प्राथमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात आले.कै. अंकुश सुर्वे यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. जनसामान्य लोकांना मोठा आधार दिला .त्यांचे कार्य दीपस्तंभ सारखे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार आर. जी. रुपनवर यांनी केले .अंकुशभाऊ सुर्वे प्रतिष्ठान आणि विनायक भैय्या सुर्वे मित्रपरिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख होते. पुढे बोलताना रुपनवर यांनी अंकुश सुर्वे यांच्या अनेक आठवणी, अनेक समाज उपयोगी कार्यावर प्रकाश टाकला .यावेळी बोलताना बाबाराजे देशमुख म्हणाले, स्वतःची गरीब परिस्थिती असतानाही अंकुश सुर्वे यांनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला. लोकांच्या साध्या साध्या अडीअडचणी ते भागवत असत . बी.वाय. राऊत म्हणाले, अंकुशभाऊ लोकांच्या उपयोगी पडत असत. त्यामुळे त्यांचे जीवन हा आपल्या सर्वांच्या पुढे एक आदर्श आहे.  विनायक सुर्वे यांनीही त्याच्या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला आहे. कै. अंकुश सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानच्या वतीने नातेपुते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन एलईडी टीव्ही, तीन प्रिंटर, तीन ग्रीन बोर्ड ,शाळांचे रंगकाम याचबरोबर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  स्पोर्ट ड्रेस, तसेच इतर शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एलईडी टीव्ही नगराध्यक्ष अनिता लांडगे आणि नगरसेविका शर्मिला चांगण यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी विचार प्रवर्तक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांच्या रंगभरण, चित्रकला स्पर्धा ,तसेच वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा अनिता लांडगे ऋतुजा मोरे , शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा महामुनी ,एड.बी वाय राऊत, धैर्यशील देशमुख , ,माऊली पाटील, सतीश सपकाळ अर्जुन जठार, अतुल बावकर, रावसाहेब पांढरे ,अमित चांगण शशिकांत कल्याणी ,राहुल पद्मन हे उपस्थित होते. औदुंबर बुधावले व संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले आभार विनायक सुर्वे यांनी मानले.

माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क- प्रमोद शिंदे

जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन माळशिरस वकिलामार्फत करण्यात आले असून त्याची सूरवात वकिल संघटनेचे अध्यक्ष सौ. मोहिनी देव यांच्या हस्ते माळशिरस वकिल संघटनेच्या कार्यालयात झाले असून
पथनाट्य स्पर्धेसाठी
पहिले बक्षीस : १०,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रदुसरे बक्षीस : ७,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रतिसरे बक्षीस : ५,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्ररांगोळी स्पर्धेसाठीपहिले बक्षीस : 1HP आटा चक्की
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रदूसरे बक्षीस : मिक्सर ग्राईंडर
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रतिसरे बक्षीस : डिनर सेट
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश विनामुल्य राहणार असून स्पर्धकांना वयाची व शिक्षणाची अट नाही
नाव नोदणी ची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 असून
स्पर्धा ही दि. १९/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. माळशिरस येथे सुरू होईल व स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण दि.२५/०१/२०२५ रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला / संघाला प्रमाणपन्न देण्यात आल्याची माहिती आयोजक समितीचे ॲड. सुमित सावंत आणि ॲड. धनंजय बाबर यांनी दिली आहे.आयोजक समिती मध्ये
ॲड. सुनिता सातपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. अमृत भोसले ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे ॲड. सुयश सावंत, ॲड. धैर्यशिल भोसले, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.संपर्कॲड. सुमित सावंत मो. 9970944991ॲड. भारत गोरवे
मो.9850736190ॲड. सुयश सावंत मो.848384404ॲड. वैशाली कांबळे
मो.8329525003

रत्नत्रयइंग्लिश स्कूल मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

 मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो. त्यामुळे लहान मुलांना   लहापणापासूनच फळे खाण्याची सवय लागावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये घेण्यात येतो. नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते,  त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचा हा उपक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे मुलांमध्ये असणारे कला गुण दर्शविण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देणे. मुलांमध्ये स्टेज डेरिंग निर्माण करणे हा आहे.  या दरम्यान मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी    सचिन लवटे ,  राहुल लवटे,  रघुनाथ वाघमोडे,  अरुण वाघमोडे, जतेंद्र निंबाळकर,  ज्योतीराम शिंदे, सौ माधुरी शिंदे, सौ रूपाली शिंदे, सौ पूनम खांडेकर, सौ ताराबाई वाघमोडे, सौ दिपाली वाघमोडे, सौ सोनाली वाघमोडे, सौ निकिता सोनवणे, सौ प्रतीक्षा सोनवणे,  उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मेघा सुतार मॅडम यांनी केले.फळवाटप दातार:श्री शशिकांत पंडित सर.