माळशिरस तालुका

भीषण अपघातानंतर नातेपुते पोलिसांनी शिंगणापूर पाटी येथे दिशादर्श फलक लावले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

रविवारी पहाटेच्या सुमारास दिशादर्शक फलक न दिसल्याने रॉंग साईडने वाहने जाऊन भीषण अपघात झाला व त्या अपघातात पाच लोक मृत्युमुखी पडले दोन जन जखमी झाले व मृत चालकावर अपघाता संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची नातेपुते पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दखल घेऊन.तात्काळ शिंगणापूर पाटी पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग येथे. मोठे दिशादर्शक फलक लावून.रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली. व त्या ठिकाणी स्वतः उभे राहून लोकांमध्ये जनजागृती केली. अपघात झाल्यानंतर वर्तमानपत्राद्वारे ठिकठिकाणी हे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती. याचीच दखल घेत एपीआय महारुद्र परजणे व पोलीस कर्मचारी यांनी फलक लावल्यामुळे परिसरातून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत.

लोककलावंत शांताबाई गडपाईले यांना वालचंद नगर येथे आदरांजली अर्पण. 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


कशाला मी जाऊ कुणाच्या गटात,
सुखी आहे मी माझ्या भिमाच्या झोपडीत,
कशाला करु कुणाची हांजी हांजी,
स्वाभिमानी माणसं आहेत माझी”
असा आपल्या गायिकेच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या लोककलावंत माई उर्फ शांताबाई राजाराम गडपायले यांचे वृद्धापकाळाने सप्टेंबर महिन्यात निधन झाले. त्यांचे पती महाकवी, गायक राजानंद गडपायले यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरविले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवलेले एकमेव कवी, गायक म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले. या दांपत्याने आंबेडकरवादी चळवळ गतिमान व मजबूत करण्याचे महान कार्य केले. पतीच्या पश्चात व मुलाच्या निधनानंतर ही गावोगावी जाऊन शांताबाई यांनी प्रबोधन केले. तिन पिढ्यांच्या लोकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. व वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. घाटकोपर ला झालेले रमाबाई नगर मधील हत्याकांड व मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढाईत आपल्या शाहिरी च्या माध्यमातून चळवळीची ज्योत तेवत ठेवली. आंबेडकरवादी चळवळीतील या दांपत्याने योगदान अनन्यसाधारण आहे.
अशा माई उर्फ शांताबाई राजानंद गडपायले यांच्या निधनाबद्दल रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(ग्रामपंचायत हॉल) मध्ये “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली होती. यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे सुरजभैय्या वनसाळे,प्रा.डॉ.अरूण कांबळे, रिपाइं चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पत्रकार प्रमोद शिंदे, विशेष सरकारी वकील ॲड. अमोल सोनवणे यांनी भाषणातुन त्यांचा जीवनपट उलगडून आदरांजली वाहिली तत्पूर्वी प्रास्ताविक, सूत्रसंचालन जेष्ठ पॅंथर सु.ग. साबळे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे, शाहिद जितेंद्र धाईंजे, गायक राहुल क्षिरसागर, गायक बाळासाहेब सरवदे, गायक दिलीप भोसले यांनी गीतांच्या माध्यमातून काव्यरुपी पुष्पांजली वाहीली. यावेळी प्रा.सर्वगोड सर,”मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे अनिल केंगार, सौरभ धनवडे, सोनु मोरे, अशोक मिसाळ,बौद्ध धम्म प्रसारक आनंद फरतडे, किशोर काळे तसेच अनेक लोककलावंत, भिमसैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज वनसाळे, सु.ग. साबळे, विजय सरतापे, राहुल क्षिरसागर यांनी प्रयत्न केले.

नातेपुते नजीक कारुंडे पुलावर कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार दोन जखमी

नातेपुते प्रतिनिधी: (प्रमोद शिंदे)
कास पठार पाहण्यासाठी जात असताना नातेपुते नजीक कारुंडे पुलावर चुकीच्या मार्गाने जात असताना कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार तर दोन जन जखमी झाले आहेत.
हकीकत आशिकी. नातेपुते कडून फलटण मार्गे कास पठारला जात असताना. नवीन रस्त्याच्या कामामुळे रस्ता चालकाच्या लक्षात न आल्यामुळे तसेच रस्त्यालगत सुचक बोर्ड कमी प्रमाणात असल्यामुळे
चुकीच्या मार्गाने निघालेल्या कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला व मायलेकासह पाचजण ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील नातेपुते जवळील कारुंडे (ता. माळशिरस) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या अपघातात राजेश अनिल शहा (वय ५५, रा. जंक्शन, ता. इदापूर), दुर्गेश शंकर घोरपडे (२८, लासुर्णे, ता. इदापूर), कोमल विशाल काळे (३२), शिवराज विशाल काळे (१०), आकाश दादा लोंढे (२५) हे जागीच ठार झाले, तर अश्विनी दुर्गेश घोरपडे (२४) व पल्लवी पाटील (३०, रा. वालचंद नगर) हे जखमी झाले आहेत.
सदर मिळालेल्या माहितीवरून लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कॉन्ट्रॅक्टर राजेश शहा हे कारने (एच ४२ एक्यू ०५६४) आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पठार पाहण्यासाठी निघाले होते. ते रस्ता लक्षात न आल्यामुळे नातेपुते येथून राँगसाइडने निघाले होते. नातेपुते नजीक कारुंडे, ता. माळशिरस येथील पुलापवर
एक्यू ३३९२) आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोखाली कार चक्काचूर झाली होती. घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र पराजणे व पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना तत्काळ ॲम्बुलन्स च्या साह्याने अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले. याबाबत दुर्गेश मोतीराम घोरपडे (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून मृत कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश घोरपडे यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर दुर्गेश यांची पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवाय कोमल काळे व त्यांचा दहा वर्षांचा मुलगा शिवराज काळे या मायलेकाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

सदर अपघात हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत असून पुणे पंढरपूर हा पालखी मार्ग महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा होते. त्यामध्ये रस्त्याचे काम संत गतीने चालू असून ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधी मधी रस्ता वळवण्यात आला आहे. व तेथे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकाच्या लक्षामध्ये रस्ता वळवलेला येत नाही. तसेच नातेपुते शहरातून निघताना शिंगणापूर पाठीजवळ फलटण कडे जाण्याच्या मार्गासाठी मोठा बोर्ड असण्याची आवश्यकता आहे. परंतु त्या ठिकाणी मोठा बोर्ड नाही मोठा बोर्ड नसल्यामुळे. वाहने रॉंग साईडने जातात. व सतत या ठिकाणी अपघात होतात. याकडे बांधकाम विभाग तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोकांना प्राण गमवावे लागतात अशा प्रकारचे मत जनसामान्यातून येत आहे. तसेच महामार्गावरती लवकरात लवकर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

रत्नत्रय प्री स्कूल नातेपुते मध्ये फॅन्सी ड्रेस शो

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आज दिनांक २८/९/२४(शनिवार) रोजी रत्नत्रय फ्री स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस शो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलालजी दादा दोशी, मा. नगरसेविका नातेपुते नगरपंचायत माननीय सौ शर्मिला संजय चांगण, मा. सौ अनिता रामा काळे संचालिका बळीराजा ग्रा.बि.शे. पतसंस्था नातेपुते, स्कूलचे सभापती माननीय श्री वैभव शहा यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला. मुख्याध्यापिका सौ माधवी रणदिवे मॅडम यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित नगरसेविका नगरपंचायत नातेपुते शर्मिला चांगण यांचा सत्कार सौ निकिता शहा व सौ अनिता काळे संचालिका यांचा सत्कार सविता देसाई यांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंताजी दादा दोशी यांचा सत्कार श्री वैभव शहा यांनी केला. यानंतर सौ चांगण यांनी त्यांचे स्कूल विषयीचे मनोगत व्यक्त केले. श्री अनंतलालजी दादा दोशी यांच्या अध्यक्षीय मनोगता नंतर फॅन्सी ड्रेस शो कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्लेग्रुप ते इयत्ता पहिली पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला होता. प्ले ग्रुप-अंजली काटवटे-आदिवासी स्त्री, सक्षम देसाई-बाल शिवाजी महाराज
नर्सरी क्लास-साईराज नाळे-कृष्ण, पूर्वा नलवडे-सावित्रीबाई फुले, अल्फाज मुलानी-सोल्जर
ज्युनिअर केजी क्लास
सुमेध ठोंबरे वारकरी, आयात आतार-मुस्लिम पारंपारिक स्त्री (कलमा आयात पाठांतर केलेली) शिवांश निकम-शेटजी, अनुश्री अंधारे-आईस्क्रीम,
सिनियर केजी क्लास
दिव्यांसी शहा-झाशीची राणी, रुद्राली सावंत-फुलपाखरू, समर्थ इंगोले-तमिळ अण्णा, श्रेयश गटकुळ-व्हाट्सअप, विराज अवघडे आदमापूरचे बाळूमामा तर माऊली हरणवळ-फळ विक्रेता या विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या. सहशिक्षिका सौ पूजा दोशी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला बॅकग्राऊंड म्युझिक दिले व कार्यक्रम बहारदार करण्यास मदत केली. सौ सविता देसाई (उपमुख्याध्यापिका, मांडवे रत्नत्रय स्कूल) यांनी सर्वांचे आभार मानले. फळ वाटप व प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग झाल्याने स्कूल तर्फे वही व पेन्सिल गिफ्ट देण्यात आले. सौ अवघडे, सौ पूजा दोशी, सौ देसाई मॅडम, सौ निकिता शहा, सौ प्रीती दोशी,सौ निकम, सौ आतार, सौ रेश्मा ठोंबरे, सौ गटकुळ, सौ सीमा सावंत, सौ शाहीन शेख, सौ मनीषा हरनवळ, सौ पूजा नलवडे, सौ इंगोले, सौ अर्चना देसाई, सौ अंकिता काटवटे, सौ नाळे आधी महिला पालक या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची” मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)  – “लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ” (Lord Buddha International University) महाराष्ट्र शासनाने स्थापन करणेबाबत शासनाकडे मागणी करण्यात येत असून, पुढील संदर्भीय १.क्र. कक्ष १७। नोडल / पुणे । २०२२-२३/२४२८ दि. १९ / १२ / २०२२ रोजी मा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व लशश अधिकारी, वनभवन, नागपुर ४४०००१ यांचे पत्रा नुसार जमिनीची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाशी दि. २५ फेब्रुवारी २०२२ पासून पाठपुरावा चालू असून मौजे घेरा पुरंदर ता. पुरंदर जि. पुणे येथे “लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ” महाराष्ट्र शासनाने स्थापन करावे या करिता घेरापुरंदर येथील वनविभगाच्या अखत्यारितील डोगराळ व पडीक एकूण ७३६.६३ हेक्टर जमिनी पैकी २५० एकर जमीन उपलब्ध करून द्यावी अशी कृती समितीची मागणी आहे. या विद्यापीठामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, औद्योगिक, संविधानिक, राजकीय, पर्यावरण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, आतरराष्ट्रीय व्यापार, अर्थनीती, शैक्षणिक पर्यटन, कृषी विकास, आधुनिक तंत्रज्ञान, मुल्य विकसित करण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आणि वंचित घटकाचा विकास करणे शक्य होईल, कारण महाराष्ट्रात बहुतांश विद्यापीठे जिल्हयाच्या ठिकाणी व गजबजलेल्या शहरात कार्यरत आहेत. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहराकडे येणारे विद्यार्थी व पालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून शहरातील नागरी समस्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे अभ्यासात दिसून येते. हा शहरांवर पडणारा अतिरिक्त भार कमी करण्याच्या उद्देशाने ग्रामीण व शहरी भागाचा शैक्षणिक आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी मौजे घेरापुरंदर या ग्रामीण, डोंगराळ व अतिदुर्गम भागात हे विद्यापीठ स्थापन करण्याची गरज असून याकरिता मौजे घेरापुरंदर ता. पुरंदर जि. पुणे येथील वनविभागाच्या अखत्यारितील जमिनीची मागणी समाजातून होऊ लागली आहे. मौजे घेरापुरंदर येथे गट क्रमाक ५०, १५१, १९६ डोगराळ, पडीक व अतिदुर्गम भागातील एकूण ७३६. ६३ हेक्टर क्षेत्र असून सदरचे क्षेत्र राखीव वन घोषित झालेले असून त्यास वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या तरतुदी लागू होतात. त्यामुळे सदर गट क्रमाक ५०, १५१, १९६ कोणतेही वनेतर कामे करावयाची झाल्यास त्यास केंद्रशासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडे वन (संवर्धन) अधिनियम १९८० अतर्गत सविस्तर प्रस्ताब सादर करून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. असे मा. अपर प्रचान मुख्य वनसंरक्षक व फेटस्थ अधिकारी, वनभवन, नागपूर ४४०००९ यांनी क्र. कक्ष १७। नोडल पुणे / २०२२-२३ । २४२८ दि. १९ १२ / २०२२ रोजी कृती समितीस मिळालेल्या पत्रातून कळविले आहे, म्हणून यासंदर्भातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 

१. सदर जमीन विद्यापीठासाठी उपलब्ध करण्याकरिता केंद्रशासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडे वन (१), १९८० अतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा.

२. शासन स्तरावरून “लॉर्ड बुद्धा आतरराष्ट्रीय विद्यापीठ” मौजे घेरापुरंदर ता. पुरंदर जि. पुणे येथे सुरु करण्याविषयीची शैक्षणिक व शासकीय प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात यावी.

३. मौजे घेरा पुरंदर ता. पुरंदर जि. पुणे येथील गट क्रमाक ५०, १५९, १९६ वन विभागाच्या अखत्यारितील डोगराळ, पडीक व अतिदुर्गम भागातील एकूण ७३६.६३ हेक्टर क्षेत्रापैकी २५० एकर जमीन “लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ” करिता उपलब्ध करावी.

    याबाबत लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मौजे घेरापुरंदर, ता. पुरंदर, जि. पुणे येथील वन विभागाच्या अखत्यातील डोंगराळ पडीक व अतिदुर्गम एकूण ७३६.६३ हेक्टर क्षेत्रपकी २५० एकर जमीन उपलब्ध करण्याविषयी योग्य ती कायवाही करण्याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन सूचना, निर्देश, आदेश निर्गमित करावेत, या. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना दिले आहे असे लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कृती समितीचे मुख्य संयोजक, संस्थापक, संचालक, अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यानी सागितले त्यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर जिल्हा कृती समिती प्रमुख उपस्थित होते. यासंदर्भात सर्व हितचिंतकांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर वर्षावासानिमित्त बौद्ध भंतेना चिवर दान व भोजनदान केले.

यानिमित्ताने नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत..

महाराष्ट्रातील समस्त बौद्ध व अनुसूचित जाती, दलित,मागासवर्गी यांच्या कल्याणाचे मंत्रालयीन खाते म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत.

1) बौद्ध व अनुसूचित जातीतील भूमिहीन नागरिकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दोन एकर बागायती व चार एकर जिरायती जमीन देण्याची योजना अस्तित्वात आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील एकाही बौद्ध व अनुसूचित जातीतील भूमिहीन नागरिकांना दोन एकर बागायती व चार एकर जीरायती जमीन मिळालेली नाही शिवाय ही योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी म्हणून यामध्ये कसल्याही प्रकारचा योग्य बदल केलेला नाही.

2) बौद्ध व अनुसूचित जातीतील स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना सुरू आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री झाल्यापासून एकाही जिल्ह्यात मिनी ट्रॅक्टरची योजना सुरू झाली नाही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावर अर्ज मागवून घेण्यात आले व तोंडाला पाने पुसण्यासाठी तुटपुंजा निधी दिला व या योजनेच्या अंमलबजावणी केली नाही.

3) याप्रमाणे हर घर तिरंगा हे अभियान भारतभर राबविण्यात आले याच धरतीवर भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने हर घर संविधान हे अभियान राबवावे म्हणून राज्यातील सर्व बौद्ध बांधवांनी एकमताने मागणी करून देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या मागणीची अंमलबजावणी केली नाही.

4) महाराष्ट्रात जातीय अत्याचारामध्ये खून होऊन उध्वस्त झालेल्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी जमीन व पेन्शन देण्याची फाईल सही करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात ते मुख्यमंत्री झाल्यापासून धुळखात पडली आहे परंतु मुख्यमंत्र्यांना या फाईल वरती सही करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बौद्ध मातंग चर्मकार यांच्यासह अनुसूचित जातीतील 632 खून प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या व त्यांच्या वारसांना नोकरी जमीन व पेन्शन मिळत नाही.

5) बौद्ध अनुसूचित जाती च्या नागरिकांच्या प्रगतीचा निधी इतरत्र वळवू नये अखर्चित ठेवू नये म्हणून बजेटचा कायदा करण्यात यावा ही मागणी व या कायद्याचा कच्चा ड्राफ्ट माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये अडगळीत पडलेला आहे.

6) बौद्धांच्या व अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रगतीचा निधी इतरत्र वळवू नये म्हणून सर्व बौद्ध बांधव मागणी करत असताना देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत पंढरपूर येथे वारकरी महामंडळ स्थापन करून वारकरी महामंडळास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी वापरण्यात येणार आहे. शिवाय सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना तीर्थ पर्यटन दर्शन योजना देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतूनच करण्यात येईल याचाही शासन निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत काढलेला आहे याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी याच निधीमधून वारकरी महामंडळास व तीर्थ पर्यटन दर्शन योजनेसाठी हा निधी वापरण्यात येईल.

7) बौद्ध व अनुसूचित जातीतील नागरिकांच्या प्रगतीसाठी अस्तित्वात असलेल्या महामंडळांना अध्यक्ष नेमलेला नाही शिवाय या महामंडळांना भरघोस असा निधी देखील दिलेला नाही त्यामुळे तरुणांची प्रगती खुंटली या उलट मराठा समाजासाठी कार्यरत असलेल्या मा. अण्णासाहेब पाटील महामंडळास अध्यक्ष नेमून या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देखील दिलेला आहे व कर्जवाटप देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

8) बौद्ध व अनुसूचित जातींच्या नागरिकांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यांच्या योजनांच्या अंमलबजावणी न झाल्यास राज्यात अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना आहे परंतु आयोगावर अध्यक्ष व सदस्य नसल्याने याचे काम ठप्प होते परंतु गेल्या आठवड्यामध्ये आपण सर्व शासकीय नियम डाउलुन माजी न्यायमूर्ती,सनदी अधिकारी,IAS,IPS यांना अध्यक्ष न नेमता आपण माजी खासदार यांना या आयोगावर अध्यक्ष व पक्षांच्या प्रवक्त्यांना सदस्य नेमले हे पक्षाचे सदस्य आयोगावर असल्यावर निष्पक्ष न्याय करतील काय?हा येणारा काळच सांगेल.

9) अंतरजातीय विवाह मसुदा कायदा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 2018 साली आंतरजातीय विवाह कायदा करण्याकरिता शिफारशी केली आहेत या शिफारशीच्या अंमलबजावणी मुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जबाबदारी स्वीकारल्यापासून अद्याप याची अंमलबजावणी केली नाही शिवाय आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना तीन लाख रुपयांची घोषणा केली परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही.

9) या सर्व योजना चालू असल्याचे भासवण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी व एसटी महामंडळाच्या गाड्यांवरती जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्यापर्यंत बौद्ध बांधवांपर्यंत अनुसूचित जातींपर्यंत योजना पोहोचलेल्या नाहीत किंवा पोहोचू नयेत याची दक्षता घेण्यात आली आहे.

माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वर्षा बंगल्यावर वर्षावासाच्या निमित्ताने भोजनदान व चिवरदान करण्याचा कार्यक्रम हा शुद्ध हेतूने घेणे आवश्यक होते परंतु विधानसभेच्या निवडणुका जवळ आले असून आचारसंहिता थोड्याच दिवसात लागू होईल या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मी वर नमूद केलेले योजना याची अंमलबजावणी न करता जीवनाचा व भोजन वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम हा फक्त दिखावा आहे.
आपण मुख्यमंत्री झाल्यापासून व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री असल्यापासून एकदाही शासनाच्या वतीने बुद्ध जयंतीचे महोत्सव साजरी केलेले नाहीत.
अजून देखील वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री महोदयांनी वर नमूद मागण्या व योजनांची अंमलबजावणी करावी. व बौद्ध बांधवांवरील व बौद्ध भंतेंनवरील प्रेम हे निष्पक्ष असल्याची खात्री महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांना द्यावी.

वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले – हिवरकर पाटील

अत्यंत हलाखीची परिस्थिती असून सुद्धा माझ्या मुलाला मी पोलीस बनवणारच ह्या स्वप्नाला उराशी बाळगून मूळचे सदाशिवनगर येथील पिंटू ओवाळ सध्या राहणार पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडई मध्ये हमाली करणाऱ्या एका बापाचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा अनिकेत नावाचा मुलगा अवघ्या 20 व्या वर्षी सोलापूर एस आर पी एफ मध्ये पोलीस पदावर विराजमान झाला

अनिकेत ओवाळ हे सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत बारावी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून पोलीस व्हायचं आणि वडिलांचे स्वप्न आहे की मुलाला वर्दी ही मिळालीच पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून अवघ्या दोनच वर्षात सोलापूर येथे झालेल्या एस आर पी एफ या पदासाठी गवसणी घातली आहे
त्यांचं अभिनंदन करताना राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी म्हणाले की खूप कमी वयात मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या वीर जवानांच्या हाती आली म्हणजे आपला भारत देश पूर्ण तरुणांच्या हाती आला तसेच बोलताना पुढे म्हणाले की वडिलांनी जी हालाखीची परिस्थिती बघितली ती माझ्या मुलाच्या नशिबात येऊ नये म्हणून त्यांनी अनिकेतला चांगले शिक्षण त्याचबरोबर संस्कार ही चांगले दिले. मूळचे सदाशिवनगर येथील रहिवासी असलेले ओवाळ कुटुंबीय आहे पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास गेले तिथे जाऊन त्यांनी मोलमजुरी करत पिंपरी चिंचवड भाजी मंडई येथे हमाली करत आहेत. हमाली करत असताना त्यांना रोज नवीन नवीन पोलीस आणि वर्दी याचं आकर्षण वाटू लागलं व माझ्या मुलाला मी पोलीसच बनवणार असं स्वप्न त्यांनी बाळगलं त्यातच बारावी झाल्यानंतर अनिकेत ने चांगला अभ्यास करून पोलीस पदी विराजमान झाला असे गौरवोद्गार काढले त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी उपस्थित भाजपाचे मनोज जाधव तेजस गोरे,विनोद बोराटे, रोहित ओवाळ, सोमनाथ भोसले, आदित्य सावंत, अनिकेत मिसाळ होते

बचत गट कर्जाची रक्कम घरातून चोरी करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी

नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते ता माळशिरस येथे दिनांक १२/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:००वा ते ०३:३० वा. चे दरम्यान यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस व सचिव स्वाती रविद्र पाठक यांनी त्यांचे यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते यांना मंजुर झालेले कर्ज रक्कम ४,९३,००० /- रु आय सी आय सी बैंक नातेपुते येथील खात्यावरुन काढुन यातील फिर्यादी यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस राहते घरी घेवुन आलो असताना सौ.पौर्णिमा राजेंद्र सोनवळ किचनमध्ये चहा बनवायला गवती चहा आणन्यासाठी घराबाहेर गेली असता त्यांचे घरातील शिलाई मशिन वरती सॅकमध्ये ठेवलेले ४,९३,००० रु रोख रक्कम ही सॅक सह कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे उघड्या दवाज्यातुन प्रवेश करुन चोरुन घेवुन गेले म्हणुन त्याबाबत यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (), प्रमाणे दिनांक १५/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार हे करीत होते.

सदरचा गुन्हा महिला बचत गटाचे वाटप होणारे कर्जाचे रक्कम चोरीच्या संदर्भात असल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांन समोर मोठे अव्हाण होते. सदरचा गुन्हा उघडकिस आणने करीता मा. श्री अतुल कुलकर्णी साो पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा.मा श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग अकलुज यांनी सक्त सुचना दिल्या होत्या त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/२११ राहुल रणनवरे, पोहेकॉ / ८५० नवनाथ माने, पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोना/५६२ राकेश लोहार, पोकॉ/११४५ नितीन पनासे, पोका / २०५८ अस्लम शेख, सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/०५ युसुफ पठाण यांनी गुन्हा दाखल होताच पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोकॉ/ २०५८ अस्लम शेख, यांनी सीसी टीव्ही फुटेज चेक करुन गोपनिय बातमिदारांना सर्तक केले व पोना/५६२ राकेश लोहार यांनी कौशल्य पुर्ण तांत्रिक विश्लेषन करुन आरोपीचा शोध घेवुन सदर गुन्हयात अभिषेक अनिल चव्हाण रा पोलीस मुख्यालय जवळ भावना नगर न्यु पाच्छा पेठ सोलापुर ता उत्तर सोलापुर जि सोलापुर यास ताब्यात घेवुन त्याला विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (a), प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्हयात चोरीस गेलेले ४,९३,०००/- रु रोख रक्कम सॅक सह व गुन्हा करतेवेळी वापरलेली ५०,०००/- रु किंमतीची होंडा कंपनी ची युनिकॉर्न मोटारसायकल तिचा आर.टी.ओ नंबर MH-42-J-6117 असा एकुण ५,४३,०००/- रु मुददेमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील ग्रामस्थांनी नातेपुते पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत.

दहिगाव हायस्कूल, दहिगावला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (प्रमोद शिंदे)
प्रगत शिक्षण संस्थेचे दहिगाव हायस्कूल, दहिगाव शाळेला माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथे
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुभाषराव माने सर,जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप साहेब,प्राथमिक शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार घेण्यासाठी
प्रगत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वंदनादेवी विठ्ठलराव पाटील, मुख्याध्यापक श्री. विलास चव्हाण सर,प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हा पुरस्कार मिळण्यामध्ये संस्थापक व माजी अध्यक्ष कै. विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांचे अनमोल योगदान आहे. या पुरस्कार प्राप्ती मुळे संस्थेचे तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे पालक व परिसरातून कौतुक होत आहे.

मातीच्या गोळ्याला आकार देणारा महान गुरु म्हणजे शिक्षक : अनंतलाल दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

रंग ,रूप, धर्म ,जात या पलीकडे जाऊन शिष्याला आत्मज्ञान करून देणारा गुरु म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाची व्याख्या पटवून देताना क्षत्रिय कर्णाचे व गुरु परशुराम यांचा दाखला दिला तसेच कोणत्याही शिष्याने ठरवल्यास तो आपल्या गुरुच्या पुतळ्याकडूनही ज्ञान प्राप्ती करुन घेता येते हे एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांचा दाखला देत अनंतलाल दोशी यांनी कार्यक्रमावेळी प्रतिपादित केले.
आज एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन कार्य पाहून आनंद द्विगुणीत झाला आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थी शिक्षण देताना पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाही. विद्यार्थ्यांनी आपले नाव जगाच्या पातळीवर उज्वल करावे, या पेक्षा मोठा त्यांच्या शिक्षकांचा सन्मान नाही. रत्नत्रय स्कूल मधील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहे याचे समाधान वाटते.
हे सर्व केवळ शिक्षकांमुळेच आम्ही याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे रत्नत्रय स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केले. दिनांक 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा यांचा वाढदिवस रत्नत्रय इंग्लिश मीडियम ,विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचा एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सन्मान केला. शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रत्नत्रय सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा मा. श्री. अनंतलाल दोशी , स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी , वैभव शहा,बबन‌ गोपने , सुरेश धाईंजे , मुख्याध्यापक वाघमोडे सर,शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे इ.बारावी, दहावी इंग्रजी व सेमी व चे शिक्षक दिनानिमित्त झालेले सर्व शिक्षक वृंद ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुकन्या सरतापे हिने केले तर आभार समीक्षा शिंदे हिने केले.

You may have missed