आंतरराष्ट्रीय

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना वेळापूर पोलिसांकडून दोन तासात अटक

 वेळापूर पोलीसांची दमदार कामगिरी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ता. माळशिरस येथील वेळापूर पोलीस ठाण्यात १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्या नंतर वेळापूर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील तीनही आरोपींना दोन तासात इदांपूर येथून अटक करून दमदार कामगिरी केली आहे.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेळापूर पोलीस ठाण्यात दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,मौजे उघडेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी बलात्कार केल्याचा गुन्हा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.मात्र वेळापूर पोलिसांनी तातडीने आपली तपास यंत्रणा सुरू करून या आरोपींना अवघ्या दोन तासात बेड्या ठोकण्यात यश आले.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस फौजदार रेगुडे, पोलीस हवालदार जनार्दन करे ,पोलीस कॉन्टबेल नवनाथ थिटे, वाहन चालक पोलीस कॉन्टबेल विठ्ठल बंदुके यांच्या पथकाने सापळा रचून या तिनही आरोपींना गुन्हा दाखल झाले पासून अवघ्या दोन तासात इदांपूर येथून ताब्यात घेतले आहे.
उघडेवाडी येथील युवराज गोडसे,रणजित कोळेकर व रोहण दत्तात्रय भोसले, रा. खंडाळी या तरुणांविरुद्ध वेळापूर पोलिसांत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे ३७६ ,३६६ , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे ४ आणि ८ , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार) प्रतिबंधक १९८९ प्रमाणे ३(१)(w)(i) व ३(१)(w)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर तीनही आरोपींना पंढरपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ०३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टाळेबंदी काळात दलित-आदिवासींवरील वाढलेल्या अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घ्यावा.. ॲड.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव मुंबई: आज दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके आणि मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष आयु.बंदिश सोनावणे यांनी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्री.किशोर मेढे यांचे पुषगुच्छ देवून अभिनंदन केले. तसेच टाळेबंदी काळात वाढलेल्या दलित-आदिवासींवरील अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्यांनी पुढाकार घ्यावा अश्या मागणीचे निवेदन दिले.

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सन २००५ मध्ये सामाजिक न्याय तत्व प्रभावीपणे राबवण्यासाठी व अनुसूचित जाती जमातींच्या न्याय हक्कांचे रक्षण करण्यासाठी “राज्य अनुसुचित जाती जमाती आयोग” पहिल्यांदाच नेमण्यात आला होता. आयोगाने वर्ष २०२० जुलै महिन्यापर्यंत आपली कामगिरी बजावत राज्यातील वंचित दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण केले सुद्धा. परंतु जुलै २०२० मध्ये आघाडी सरकारने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सर्व आयोग बरखास्त केले. तेव्हा पासून आयोगातील सर्व पदे रिक्त असल्यामुळे आणि अनुसूचित जाती जमातीचे संरक्षक असलेले आयोगचं जवळपास १५ महिने नसल्यामुळे या समुदायाचे सेवा सुविधा संबधित अनेक जटिल प्रश्न निर्माण झाले आणि दलित-आदिवासींवरील अत्याचाराच्या घटनेत सुद्धा झपाट्याने वाढ झाली.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेने याची गांभर्याने दखल घेतली. दिनांक २६ जुलै २०२१ रोजी एन.डी.एम.जे.संघटनेच्या शिष्टमंडळाचे सदस्य राज्य महासचिव ॲड.केवल उके, मुंबई उच्च न्यायालयाचे एड.अनिल कांबळे, राज्यसचिव मा.वैभव तानाजी गिते, उद्योजक आयु. विनोद जाधव, मा. दिक्षा जगताप, मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनावणे, राज्य सहसंघटक मा. शरद शेळके आणि ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.संदेश भालेराव यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री.भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून आयोगातील रिक्त पदे त्वरित भरण्याचे व आयोग त्वरित स्थापन करण्याची मागणी केली व राजभवन सचिवालयाने तसे निर्देश सुद्धा काढलेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागासह वेळोवेळी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालय व मंत्रालयाच्या अनेक विभागात पाठपुरावा सुद्धा केला. अखेर महाराष्ट्र शासनाने दिनांक २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी शासन निर्णय काढून राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगावरील रिक्त असलेल्या अध्यक्ष या पदावर श्री.ज.मो.अभ्यंकर व सदस्य(सेवा) या पदावर श्री.आर.डी.शिंदे आणि सदस्य (सामाजिक व आर्थिक) या पदावर श्री.किशोर मेढे यांची नियुक्ती केली. सदर शासन निर्णयाचे व सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजय मुंढे यांचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते सभामंडपाचेभूमिपूजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धनाज शिवपालक पंढरपूरपागे तालुका पंढरपूर येथे माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.बबनदादा शिंदे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या २५१५ मधील वावरे वस्ती डांबरीकरण (१०लाख) आणि आमदार निधीतून खंडोबा मंदिर सभामंडप (७लाख) या कामांचे भूमिपूजन माढा विधानसभा मतदार संघाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य मा. रणजितभैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख, जळोली सरपंच ज्योतीराम मदने,बार्डी चे अभिजीत कवडे, पोपटमामा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी मा.सरपंच ज्ञानदेव कोरके, भारत वावरे, ज्ञानदेव ढोबळे, चांगदेव कदम, परमेश्वर लोंढे, पांढरे भाऊसाहेब ,हरीनाना कानगुडे, सरपंच कांताबाई शिंदे, उपसरपंच नागनाथ कानगुडे, राष्ट्रवादी यु.काँ. जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे, स्वाभिमानी तालुका अध्यक्ष अमर इंगळे, कॉन्ट्रॅक्टर संतोष लांबगुडे, विठ्ठल माळी, विलास सलगर, ब्रह्मदेव कानगुडे, विजय मुजमुले, सागर हुबाले, अंबादास कदम,दिपक ढोबळे, अशोक पाटील,लक्ष्मण हुबाले, विजय गुजर,बापु कानगुडे तसेच उंबरे ग्रामस्थ उपस्थित होते*

शिवपुरी येथे भव्य पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , राम सातपुते, गोपीचंद पडळकर धैर्यशील मोहिते-पाटील , अर्जुंनसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीत उद्योजक दत्तात्रय शेळके यांना आदर्श समाजरत्न पुरस्काराचे वितरण.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- एकशिव तालुका माळशिरस येथे स्मृती क्रिकेट क्लब व श्रीकेशभैय्या वरुडे मित्रपरिवार यांच्या वतीने उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या सहकार्याने शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक भव्य नाईट पेप्सी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दीपावली निमित्त बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 20 21 रोजी सायंकाळी सहा वाजता शुभारंभ प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय समोर शिवपुरी ( एकशिव) येथे होणार असल्याचे श्रीकेशभैय्या वरुडे यांनी बारामती झटक्याशी बोलताना माहिती दिली.
भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी प्रवेश फी 1001 रुपये राहणार आहे प्रथम पारितोषिक 210 21 रुपये व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक पाच फूट उंचीचा, द्वितीय पारितोषिक 15015 रुपये व शहाजीदादा चषक चार फोटो उंचीचा, तृतीय पारितोषिक 11011 रुपये व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक तीन फूट उंचीचा, यासह फायनल वैयक्तिक बक्षीस मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज ,सलग सहा षटकार ,उत्कृष्ट झेल ,सलग सहा चौकार ,उत्कृष्ट खेळाडू यासाठी प्रत्येकी रक्कम रुपये 2101 व चषक देण्यात येणार आहे.


भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 20 21 रोजी सायंकाळी सहा वाजता विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, उद्योजक दत्तात्रय शेळके, एकशिवचे सरपंच शहाजीदादा धायगुडे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार सोनवलकर, इंन्स्ट्रक्टर मार्शल कॅडेट फोर्सचे सिंहान : राजू गोसावी ,साई इंटरप्राईजेस पुणेचे सतीशतात्या ढेकळे,शुटींगबॉलचे कर्णधार आमीर काझी माळशिरस आद्य क्रांतिवीर भावी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लखनभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष संजयभाऊ चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बशीरभाई काझी, मार्शल कॅडेट कोर्स चे संचालक गणेश बोराटे सर, आकुर्डी चे उद्योजक प्रवीण शेठ पांढरकर, विजय सोप इंडस्ट्रीजचे व पिरळे गावचे सरपंच संदीप रामलिंग नरोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात एक्शिव ग्रामस्थांच्या वतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार उद्योजक दत्तात्रय शेळके यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरच्या क्रिकेट स्पर्धा रज्जाक आतार सर महेश दादा खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सहकार्य महिंद्रा अँड महिंद्रा, भाजपचे तालुका उपाध्यक्ष भारत रुपनवर, भगवानआप्पा पाटील, राजाभाऊ पाटील, डॉक्टर सचिन पाटील, नवनाथ रुपनवर, लक्ष्मण रुपनवर, बाजीराव खताळ, अनिल पाटील ,निकेतन साळवे, दत्ता कांबळे, रणजीत पाटील, पोपट जाधव, अमोल पाटील, निवेदन औदुंबर बुधावले सर, विठ्ठल सूर्यवंशी सर ,अमोल सुळ सर, सुनील खंडागळे सर, अतुल जाधवर सर, यांचे विशेष सहकार्यातून संपन्न होणार आहे .तरी इच्छुकांनी इरफान मुलांनी 9284466154, श्रीकेश वरुडे 9545730092, महेश कांबळे 8208081906. प्रतीक वरुडे 9890470470 या नंबरची संपर्क साधावा क्रिकेटचे सर्व नियम व अटी राहणार असून स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार कमिटीकडे राखून ठेवलेले आहेत फायनल संघास दत्तात्रय शेळके साहेब व सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने टी-शर्ट देण्यात येणार आहे . सदर स्पर्धेचे आयोजक श्रीकेशभैय्या वरुडे व मित्रपरिवार शिवपुरी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना 48 वा गळीत हंगाम शुभारंभ

श्री शंकर सहकारी साखर कारखाना 48 वा गळीत हंगाम शुभारंभ

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

श्री शंकरसहकारी साखर कारखाना सदाशिवनगर २०२१-२२ च्या ४८व्या गळीत हंगामाचा शुभारंभ  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी सहकार महर्षी चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,राजसिंह मोहिते पाटील,मार्केट कमिटीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.राम सातपुते, अर्जुनसिंह मोहिते पाटील व्हा.चेअरमन मिलींद कुलकर्णी,सहकार महर्षीचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील,प.स.उपसभापती प्रतापराव पाटील,मामासाहेब पांढरे,बाजिराव काटकर,सर्व संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी,ऊस उत्पादक शेतकरी,सभासद आदी उपस्थित होते.

https://youtu.be/w5exOywSNGU बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क9975903040,7770076737

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मोहिते कलेक्शन चे उद्घाटन थाटात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) नातेपुते येथे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मोहिते कलेक्शन अँड होलसेल डेपो या भव्य दुमजली कापड दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,माजी उपसरपंच अतुल पाटील,एडवोकेट शिवाजी पिसाळ,एडवोकेट रणधीर पाटील, गुरु कर्चे व इतर मान्यवर उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांनी मोहिते कलेक्शन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशांत मोहिते व निखील मोहिते यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसे चे नेते आप्पासाहेब कर्चे यांनी केले. मोहिते कलेक्शन या नवीन कापड लोकांमध्ये नवनवीन कपड्यांच्या व्हरायटीज असून दिवाळीनिमित्त ग्राहकांना 20 टक्के पर्यंत डिस्काउंट दिला आहे.

मोहिते कलेक्शनचे फित कापून उद्घाटन करताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील
आमदार राम सातपुते यांची मोहिते कलेक्शन ला भेट
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची मोहिते कलेक्शन मध्ये एन्ट्री

मनसे च्या वतीने ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्याच्या विरोधात निवेदन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर सहकार महर्षी साखर कारखाना यशवंतनगर पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर माळी शुगर सहकारी साखर कारखाना माळीनगर ओंकार प्रायवेट लिमिटेड चांदापुरी यांनी अजून दर जाहीर केला नाही तसेच पुणे सांगली सातारा येथील काही कारखाने ऊस घेऊन जात आहेत ते पण अजून दर जाहीर करीत नाहीत
तसेच काही कारखाने ऊस गाळप परवाना नसताना सुरु केले जात आहेत त्यांच्या वर कारवाया केल्या नाहीत तर मनसे खर्डा भाकरी आंदोलन व बोंबाबोब आंदोलन करण्यात येईल व परवाना नसणाऱ्या कारखान्याच्या चेरमनला तालुक्यामध्ये फिरू देणार नाहीअसे निवेदन तहसीलदार निंबाळकर यांना देण्यात आले त्यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने तालुका उपादक्ष्य बाबा ननावरे व इतर मनसैनिक उपस्थित होते

मैत्री नेटवर्क सामाजिक संघटनेच्या वतीने ३ दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क मुंबई (संदेश भालेराव)दी.२७/१०/२०२१ रोजी नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सरांच्या आदेशावरून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष
ॲड.प्रविण बोदडे यांनी सदर कार्यशाळेत ऍट्रॉसिटी ऍक्ट या विषयावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले
तेव्हा मैत्री नेटवर्क या सामाजिक संघनटनेच्या माध्यमातून ३ दिवसांची कार्यशाळा आदरणीय रेश्मा ठोसर यांनी बांद्रा (बसस्टॅन्ड) retrete house या ठिकाणी आयोजित केली होती.या कार्यक्रमासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. प्रविण बोदडे यांना आमंत्रित केले होते. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टिस या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजय कांबळे उपस्थित होते. व मैत्री नेटवर्क सामाजिक संघटने चे पदाधिकाऱ्यांसह सदस्य उपस्थित होते.

धवलसिंह मोहिते-पाटील यांचा वीज वितरण संघटनेच्यावतीने यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कर भारतीय काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष. .धवलसिंह(दादा)प्रतापसिंह मोहिते पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या सोलापुर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वीज काँग्रेस(इंटक) संघटना सोलापूर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. श्री शिवशंकर वीज कामगार पतसंस्था अकलूज येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास माजी आमदार  श्री. रामहरी रुपनवर सौ. शेख मॅडम महिला काँग्रेस अध्यक्ष सोलापूर ,आनंदराव पाखरे साहेब कार्यध्यक्ष इटंक जयकुमार वनकुंदरे साहेब जिल्हा समन्वय समिती प्रमुख इंटक संघटना सोलापूर प्रदीप सुरवसे साहेब चेरमन श्री.शिवशंकर वीज कामगार पतसंस्था अकलूज श्री.राजाराम घुगेसाहेब सर्कल सेक्रेटरी,सोलापूर लेरेंस डोंगरे, युवराज यालगुलवर,.कुबेर बोबडे विभागीय सचिव अकलूज विभाग, महावीर जाधव विभागीय सचिव, पंढरपूर सौ संगीता अकोले मॅडम विभागीय सचिव, सोलापूर ग्रामीण विभाग आदी उपस्थिती होते.     या कार्यक्रमाच्या वेळी लाईनमन संतोष शिवाजी चव्हाण यांची महाराष्ट्र वीज कामगार काँग्रेस इंटक संघटना नातेपुते उपविभाग सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली तसेच.संतोष विठ्ठल पवार यांची माळशिरस उपविभाग सेक्रेटरी या पदी निवड करण्यात आली. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

साई सेवा दल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न*


नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे )

नातेपुते येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या आई सेवादल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार राम सातपुते व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. साई सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्रत अनेक उपक्रम राबवले जातात अनेक गरजू व गरीब लोकांना मदत केली जाते.साई सेवा दलाच्या वतीने गरजू व गरीब लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा दिली जाते आशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील शाहिद भाई मुलांनी,अविनाश दोशी बाबा बोडरे डॉक्टर साईनाथ भोसले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साई सेवा दलाचे संस्थापक गुरु कर्चे,अध्यक्ष बाबा कांबळे,सचिव सोमनाथ भोसले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed