आंतरराष्ट्रीय

पिरळे येथील लक्ष्मण बल्लाळ यांचे दुःखद निधन


लक्ष्मण शिवराम बल्लाळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) पिरळे येथील लक्ष्मण शिवराम बल्लाळ यांचे आज पाटे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.लक्ष्मण बल्लाळ हे जिद्दी,कष्टाळू,मनमिळावू होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली,मुलगा सून नातवंड असा परिवार आहे. त्यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित….

फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे विजयादशमी दिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र,धायरी येथे दुपारी रिक्षाचालक अरुण शितोळे यांची कन्या पूर्वा शितोळे नॅशनल रायफल शुटर हिचा संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले गीत चरीत्र व थोर ऐतिहासिक शूरमहिला हे ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आले.
पूर्वा शितोळे ही हुजूरपागा संस्थेची माजी विद्यार्थिनी असून कॉलेज शिक्षण घेत असताना एन. सी.सी.जॉईन केल्यामुळे रायफल शुटिंगची तिला आवड निर्माण झाली.ती एन. सी.सी.बी व सी परीक्षा पास असून आजपर्यंत राफल शुटिंग मध्ये महाराष्ट्र व भारत देशाचे वतीने 10 व 50 मीटर रायफल शुटिंग मध्ये वेस्ट बंगाल, इंदोर, गुजरात, भोपाळ , केरळ ,मुंबई असे विविध ठिकाणी तिने सहभाग घेऊन उत्तम बक्षीस मिळवत अंतरदेशीय सुध्दा खेळ गाजवीत आहे.2019 ला पिपरी चिंचवड मेयर कप पण प्रथम नंबर ने जिकून आपली छाप तिने दाखविली आहे परंतु तिने एक खंत व्यक्त केली की इतर राज्याच्या मानाने महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या मदत कोणी करीत नाहीत त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी जाणे अवघड होते.सरकारने याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.
यावेळी ढोक म्हणाले की अशा खेळाडूंना स्थानिक नेते, आमदार, खासदार यांनी नॅशनल खेळाडू म्हणून वेगळा निधी राखीव ठेवून मंदिरे, समाज मंदिरे न बांधता तो निधी अभ्यासिका ,जिम,क्रीडांगण उभी करण्यासाठी वापरला पाहिजे , चांगल्या गरजवंत खेळाडूंना आर्थिक मदत करून हे खेळाडू सहजपणे आलोंपिक ,एशियाड पर्यंत कसे पोहचतील याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.तसेच मोठया उद्योजक व कंपनीने तसेच पुणे मनपाने पूर्वा सारखे खेळाडूंना दत्तक घेऊन आर्थिक मदत ,प्रॅक्टिस साठी हॉल ,मैदान उपलब्ध करून दिले पाहिजे असे देखील ढोक म्हणाले.
याप्रसंगी पूर्वा चे वडील अरुण शितोळे म्हणाले की रिक्षा चालक म्हणुन मी कमी पडत असलो तरीही मुलींसाठी वेळप्रसंगी कर्ज काढुन तिला स्पर्धा ठिकाणी पाठवीत असतो पण राजकारणी मंडळी स्थानिक भेटून देखील मदत करीत नाहीत याचे वाईट वाटते पण एखादाच दुसर्याभागातील आमदार रोहित पवार सारखा रायफल घेण्यासाठी मदत करतो त्यावेळी मनाला बरे वाटते असे देखील ते बोलले.
यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस पूर्वा व तिचे वडील अरुण यांचे शुभहस्ते हार अर्पण केला तर आज विजयादशमी असल्याने तिच्या 10 मीटर रायफल चे सत्यशोधक ढोक व आशा ढोक यांनी पुजन करून पूर्वा ला पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मदत मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार याचे आश्वासन देऊन आपल्या भारत देशाचे रायफल शुटिंग मध्ये जगभर नाव झळकेल अशी कामगिरी करावी म्हणून आशिर्वाद दिला.तर आकाश क्षितिज यांनी आभार मानले.

ॲड.डॉ.केवल उके यांना २०२१डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१ प्रदान

ॲड.डॉ.केवल उके यांना २०२१डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१ प्रदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ठाणे बंदिष सोनवणेआज शनिवार दिनांक .डी.एम.जे.संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांना दादर-मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचारमंच महाराष्ट्र या संस्थे च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधीरत्न पुरस्कार २०२१” प्रधान करून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.भिमरावजी यशवंत आंबेडकर हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मा.विनोद जाधव आणि स्वागताध्यक्षपदी प्राचार्य सुरेश कुराडे उपस्थित होते. 
 “डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचारमंच महाराष्ट्र” या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, कायदा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले. प्रामुख्याने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मा.प्रभाकर पोखरिकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध निर्माता निर्देशक मा.सुदाम वाघमारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मा.संदीप धम्मरक्षित, मा.शिवराम हरळकर, मा. प्रदीप कांबळे, मा.चंद्रकांत जगताप, प्राचार्य विजय मोहिते, मा.एम.के.कांबळे इत्यादी मान्यवरांना पुरस्कार, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व मानाचा निळा पट्टा देवून सन्मानित करण्यात आले. 
या वेळेस कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष , मा.मनोज जाधव, मा.सुनिल सुरेखा आणि मा.जितेंद्र मोहिते यांनी केले तर निवेदन भिमशहीर जनार्दन मोहिते यांनी केले. या कार्यक्रमासाठी कवयत्री रिया पवार, कविता काळे, संदेश सावंत, उमेश पवार इत्यादीसह संस्थेच्या अनेक जिल्ह्यातील सदस्यांनी परिश्रम घेतले

अनुसूचित जमातीच्या लोकांना वस्तीत जाऊन तहसीलदार यांनी जातीचे दाखले व रेशन कार्ड द्यावे एन.डी.एम.जे ची मागणी.

अनुसूचित जमातीच्या लोकांना वस्तीत जाऊन तहसीलदार यांनी जातीचे दाखले व रेशन कार्ड द्यावे एन डी एम जी ची मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर प्रतिनिधी ;अनुसूचित जमातीच्या वाड्यावर तांड्यावर प्रत्येक वस्तीत जाऊन त्या कुटुंबांना रेशन कार्ड जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्र आधार कार्ड व इतर लागणारे दाखले जाग्यावर देण्यात यावे अशी मागणी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे कामे याबाबत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबविण्याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प सोलापूर यांनी दिनांक 13/ 9/ 20 21 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना लेखी आदेश दिले आहेत परंतु पंढरपूर तहसीलदार यांच्याकडून अद्याप कारवाई झाली नसल्याने नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस चे आदिवासी विभाग जिल्हाप्रमुख जिल्हा श्याम काळे व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर ती कारवाई न झाल्यास नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदनाद्वारे म्हटले आहे

नातेपुते येथे मुंबई गारमेंट्स भव्य कापड दुकानाचे उद्घाटन

नातेपुते येथे मुंबई गारमेंट्स भव्य कापड दुकानाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेनातेपुते तालुका माळशिरस येथे दसऱ्याच्या निमित्ताने मुंबई गारमेंट्स या भव्य कापड दुकानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे कापड दुकान नातेपुते येथील दहिगाव रोड वर असून दोन मजली भव्य दुकान आहे.या दुकानांमध्ये लहान मुलांच्या कपड्यांसह मुली,महिला व पुरुषांचे सर्व प्रकारच्या असंख्य कपड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत.या भव्य गारमेंट च्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,रंजीत काळे,उद्योजक राजकुमार पांढरे, मा उपसरपंच अतुल पाटील,मा.ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलानी, रासपचे बशीर काझी,रियाज काझी व नातेपुते परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचे सुलतान सय्यद,बाबूलाल सय्यद,शब्बीर सय्यद,यांनी स्वागत केले.

वनविभागाच्या हद्दीतील आपट्याची झाड तोडणारा वर गुन्हा दाखल करणार- वनअधिकारी सोमनाथ शिरसागर

वनविभागाच्या हद्दीतील आपट्याची झाड तोडणारा वर गुन्हा दाखल करणार-वन अधिकारी सोमनाथ शिरसागर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेनातेपुते फोंडशिरस वन परिमंडळ हद्दी मध्ये आपट्याची अगर इतर झाडे तोडणारा वर वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करणार असल्याचं वन परिमंडळ अधिकारी सोमनाथ शिरसागर यांनी सांगितले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपट्याची पानं सोने म्हणून देण्याचा परंपरा आहे यासाठी विविध भागात मोठ्या प्रमाणात चोरून आपट्याची झाडे तोडली जातात याचा परिणाम पर्यावरणावरती होतो वनविभाग हे मोठ्या कष्टाने खडकाळ भागात डोंगर भागात वन विभागाच्या हद्दीमध्ये झाडे लावत असतात एक झाड येण्यासाठी वर्षानुवर्ष लागते पण तू काही कारणानिमित्त एका दिवसासाठी अनेक वर्ष चे झाड तोडले जाते हे चुकीचं असून आपण सर्वांनी वनसंरक्षण केले पाहिजे झाडांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते आपट्याचे झाड हे वनौषधी असून त्याचे अनेक फायदे आहेत अशा झाडांना विनाकारण तोडू नये उलट दसऱ्याच्या दिवशी एक झाड लावून पर्यावरण राखत नागरिकांनी दसरा साजरा करावा त्याचा फायदा भविष्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी होईल असे आव्हान वनाधिकारी शिरसागर यांनी केले.जर कोणी वनविभागाच्या हद्दीत आपट्याचे झाड अगर कोणते झाड तोडताना आढळल्यास त्याच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल

ऊसतोड कामगारांना ओळख पत्र मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने माळशिरस तेथे आंदोलन


एका तासात प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत सर्व ग्रामसेवकांना दिले आदेश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने प्रथमच राज्यात ऊसतोड कामगारांना ओळख पत्र मिळण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले होते.हे आंदोलन आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व एन डी एम जे राज्य महासचिव ऍड केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होतो. 21 सप्टेंबर 2021 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासनाने ऊसतोड कामगार चे राहणीमान उंचावण्यासाठी ऊसतोड कामगारांना विविध योजना मिळण्यासाठी ओळखपत्र देण्याबाबत शासन निर्णय काढला होता.परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली गेली नाही म्हणून नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय वर ऊसतोड कामगारांच्य विविध मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले हो. हे राज्यात प्रथमच तोड कामगारांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची  प्रशासनाने तात्काळ दखल घेत गट विकास अधिकारी यांनी एका तासाच्या आत माळशिरस तालुक्यातील एकशे आठ गावातील ग्रामसेवकांना ऊसतोड कामगारांची नोंदणी करून घेण्याबाबत आदेश दिले आहेत. ऊसतोड कामगारांसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन केले असून भविष्यात ऊसतोड कामगारांसाठी शासन विविध योजना जाहीर करणार आहे.यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी आवश्यक आहे.शासन निर्णय  निघून सुद्धा एक महिना होत आला अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.दसऱ्यानंतर ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी आपल्या गावातून परगावी ऊस तोडण्यासाठी जात असतात जवळपास सहा महिने त्यांना बाहेरगावी राहावे लागते. त्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहू शकतात त्यासाठी त्यांची नोंदणी तात्काळ होणे गरजेचे आहे. म्हणून नॅशनल दलीत मोवेमेंत फोर जस्टीस या संघटनेने ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळवून योजनेचा लाभ मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटल्याचे दिसून आले.ऊसतोड कामगारांनी आपापल्या ग्रामसेवकांना भेटून स्वतःची नोंदणी करून घ्यावी सोड मजुरांचे नोंदणी करण्यास ग्रामसेवक व संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असेल अशा ऊसतोड मजुरांनी तात्काळ संघटनेच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आव्हान राज्य सचिव वैभव गीते यांनी केले आहे. या आंदोलनास आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे राज्य सचिव वैभव गीते, प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे,डॉक्टर कुमार लोंढे,रिपाई तालुका सरचिटणीस रोहित सोरटे, संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, महेश शिंदे,प्रशांत खरात,धनाजी शिवपालक,गणेश गायकवाड,रंजीत कसबे, संघर्ष सोरटे ,विशाल सोरटे नाना गायकवाड,भगवान भोसले,वींद्र झेंडे, नवनाथ भागवत,राजू शिंदे कार्यकर्त्यांसह ऊसतोड मजूर व मुकदम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपने देश लुटला -माजी आ.ऍड रामहरी रुपनवर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धैर्यशील भाऊ देशमुख निषेध सभेत मनोगत व्यक्त करताना

भाजपने देश लुटला -माजी आ.ऍड रामहरी रुपनवर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी)भाजपने देश लुटला आहे असे प्रतिपादन विधान परिषद माजी आमदार ऍड रामहरी रुपनवर यांनी महा विकास आघाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या निषेध सभेत करण्यात आले.नातेपुते तालुका माळशिरस येथे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माझे आ.रामहरी रुपनवर यांनी कडाडून टीका केली.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केले आहेत. म्हणून त्याच्या वरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे
परंतु केंद्रातील गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकरी गाडीखाली चिरडले या सरकारला सात वर्षात एक ही नवीन योजना आणता आली नाही.देशातील स्वायत्त संस्था हातात घेतल्या आहेत.हे जुलमी सरकार आहे. सरकारला घालवले शिवाय आम्ही राहणार नाही. जनतेचा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला जातो. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे.अशा प्रकारे भाजप वर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर यांनी टीका केली. तसेच राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते धैर्यशील देशमुख बोलताना म्हणाले की भारत बंद असताना देखील आम्ही व्यापारांचा विचार करून निषेध सभेचे आयोजन केले आहे.भाजप सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ वाढवले आहेत.पत्रकारांना सुद्धा मारण्याचं काम हे सरकार करत आहे. अशाप्रकारे भाजपा सरकार चा निषेध व्यक्त केला यावेळी अक्षय भांड, हनुमंत साळुंखे,किशोर झगडे, सागर बीचुकले, विशाल साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी राजकुमार हिवरकर, सेनेचे अमोल उराडे, रावसाहेब पांढरे, सुरेश पांढरे, विठ्ठल ठोंबरे,संदीप ठोंबरे,शुभम सोरटे तसेच महाविकास आघाडीतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

फोंडशिरस येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हाईमास्ट लॅम्प चे उद्घाटन

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आमदार फंडातून फोंडशिरस येथे हाईमस्ट लॅम्प चे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-फोंडशिरस तालुका माळशिरस येथे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार  फंडातील हाईमास्ट लॅम्प चे उद्घाटन आ.रंजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते महामुनी हॉस्पिटलच्या आवारात रोपण करण्यात आले यावेळी आ.रणजीतसिंह मोहितेपाटील,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, पं.स.माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे सामाजिक कार्यकर्ते संतोष महामुनी डॉ. केशव कदम  विठ्ठल महामुनी,महामुनी गुरुजी, डॉक्टर नानासाहेब महामुनी, डॉक्टर विवेक महामुनी ,डॉक्टर संदीप महामुनी ,मनोज गांधी लक्ष्मण गोरे, सनद गांधी,पुरुषोत्तम दाते,गुरव गुरुजी, बापूराव  कुंभार ,नवनाथकुंभार ,व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख श्रीफळ फोडताना
कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे फलकाचे अनावरण करताना
माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करताना
ोंडशिरस येथील डॉक्टर विवेक महामुनी वृक्षारोपण करताना

सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास समाजसेवक ग्रुप च्या वतीने सामाजिक उपक्रम

सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास समाजसेवक ग्रुप च्या वतीने सामाजिक उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- सिंधुताई सपकाळ यांच्या श्री मनशांती छात्रालय शिरूर येथे समाज सेवक ग्रुप यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले श्री मनशांती छात्रालय हे शिरूर येथे असून हे अनाथ आश्रम द मदर ग्लोबल फाऊंडेशन पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माध्यमातून चालत असून या आश्रमाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही याचेच भान ठेवून समाजसेवक ग्रुपने या आश्रमाला भेट देऊन येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच खाऊ वाटप केले आहे.समाज सेवक ग्रुप हा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे काम करत असून चांगले काम करत असणाऱ्या अनेक सामाजिक संस्था ना त्यांच्याकडून मदत केली जाते.गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात या ग्रुपच्या माध्यमातून केला जातो या ग्रुप मध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज समाजसेवक समाविष्ट आहेत.यामध्ये विद्यार्थी,नोकरदार वर्ग युवकांचा समावेश असून संकट समयी लोकांच्या मदतीला एकत्र येऊन धावून जातात हा ग्रुप व्हाट्सअप वरती सक्रिय असून सोशल मीडियाच्या द्वारे विचारांची देवाण-घेवाण करत असतात.

You may have missed