आंतरराष्ट्रीय

बारामतीच्या नावाला साजेशी कामगिरी,शैक्षणिक क्षेत्रात घडणार इतिहास

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बारामती दि २४

पुण्याला विद्येचे महेर घर म्हंटले जाते हे सर्वाना माहित आहेच परंतु आपली बारामतीची देखील पुणे पाठोपाठ शैक्षणिक दृष्ट्या खूपच प्रगत झाली आहे.

क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी

बारामती मध्ये असणाऱ्या विविध नामांकित शिक्षण संस्थांनी वारंवारच बारमातीची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. बारामतीची शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या बारामतीमधील क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीने या वेळी NEET २०२०-२१ चा संभाव्य निकाल काय असेल हे Answer Key पडताळून पहिली असता निकाल काय असू शकतो याबाबत माहिती दिले आहे.

क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक एस.टी.काळे सर व बी. आर.घाडगे सर यांनी माहिती दिली आहे कि यावेळी क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे NEET २०२०-२१ मध्ये बायोलॉजी या विषयात साधारणतः ३ विदयार्थी पैकीच्या पैकी गुण म्हणजे ३६० पैकी ३६० गुण मिळून संपूर्ण भारतात बारामतीचे नाव करतील तर त्याचबरोबर NEET ओव्हर ऑल विषयात ७२० पैकी ६३१ पर्यंत विद्यार्थी मजल मारतील असा अंदाज करण्यात आला आहे.
NEET हि सर्वात कठीण वैदयकिय पात्रता परीक्षा मानली जाते व हे परीक्षा राष्ट्रीय एजन्सी ( NTA) द्वारे दरवर्षी घेण्यात येते. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची हे पात्रता परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे.
साधारणतः ऑक्टो महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात NEET चा निकाल लागण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे

नवसाला पावणारी ग्रामदैवत आई श्री. सोमजाई देवी चा नवरात्रोतसव भक्तिभावाने ग्रामस्थांन कडुन साजरा होणार आहे.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

नवसाला पावणारी ग्रामदैवत आई श्री. सोमजाई देवी चा नवरात्रोतसव भक्तिभावाने ग्रामस्थांन कडुन साजरा होणार आहे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई महेश कदम महाड, वाकी येथे आई श्री. देवी सोमजाई देवस्थान च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही पारंपारिक पद्धतीने आईची घटसथापना दिनांक ०७/१०/ २०२१ गुरुवार ते १५/१०/२१ पर्यंत (आईची घटसथापना पासून ते दसरा पर्यंत) नवरात्रोतसव वाकी बु. ता. महाड, जि. रायगड येथे भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

आई सोमजाई देवी, भैरी जोगेशवरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी विविध पाशान ईतिहास काळीण मुर्ती येथे आहेत, नवरात्रोतसव संपुर्ण परिसर पाऊसामुळे हिरवे गार निसर्गसौंदर्य असतो, प्रवेश द्वार पासुन ते मंदिरा पर्यंत रोशनायी असते, मंदिरा छान सजवलेले असते, रांगोळी काढली जाते, आईची मुर्ती सुंदर पद्धतिने सजवलेले व नटवलेली असते, त्यात मुर्ती चे रुप तेजस्वी व आकर्षक दिसुन येते.

कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे:
गुरुवार ०७/१०/२१ रोजी दुपारी २:०० वाजता घटसथापना व महा आरती हरिजागर गावठण ग्रामस्थ मंडळ करणार आहे. दररोज ९ दिवस सकाळी ८ ते ९ व सायं ८ ते ९ वाजता महाआरती जागर होणार असुन दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद चा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच प्रतेक ग्रामस्थ मंडळा तर्फे हरिजागर, भजन, धनगरी नृत्य, कीर्तन असे विविध कार्यक्रम नवरात्रोतसवात साजरे होणार आहे, ह्यात गावठण, शिवाजी नगर, नानेमाची, शेवते, खरकवाडी, आंब्याचा माळ, आदिवासी वाडी, शेंदुरमळई, पेडामकरवाडी, नांदुरुकवाडी, नारायण वाडी, अशा प्रतेक वाडीतील ग्रामस्थांन तर्फे नवरात्री चा कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे.

बुवा श्री. संजय घाडगे भजन सम्राट, स्वर गंध बुवा भजनी मंडळ कांबळे ता. बिरवाडी ह्यांचा वतीने शनिवार ०९/१०/२१ रोजी भजन साजरे केले जाणार आहे. दुर्गा अष्टमी निमित्त मंदिरात होम हवन सकाळी १० वाजता होणार असुन शुक्रवार १५ रोजी दुपारी ३:०० वाजता बळीदान व विसर्जन होणार आहे. असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

यंदा म्हामुणकर भावकी खरकवाडी यांची या वर्षी देवीची पूजा आरती करण्याचा मान आहे.
ह्या कार्याला विशेष सहकार्य सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम कदम, उपाध्यक्ष श्री. प्रकाश चंद्रु दरेकर, सचिव श्री. श्रीरंग भागोजी भोसले, खजिनदार श्री. अमोल भाऊ जाधव व विश्वस्त श्री. मोहन म्हामुणकर, श्री. सुरेश म्हामुणकर, श्री. गणवत सालेकर, श्री. दिपक कदम, श्री. बबन मोरे, श्री. सदाशिव मोरे, श्री. प्रदिप कदम, श्री. रोहिदास जाधव, श्री प्रभाकर म्हामुणकर (कदम) असे सर्व मान्यवर उपस्थित रहाणार असुन सहकार्य करणार आहेत. मुंबई, पुणे, गुजरात असे अनेक ठिकाणी राहणारी मंडळी आईची ओटी व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम शासनाचे नियम पालुन भक्तिभावाने, शिस्त पद्धतीने होणार आहे ह्याची दखल समस्त ग्रामस्थ गावकरींकडुन घेतली जाणार आहे. असे गावचे सरपंच माननीय श्री. द्वारकानाथ जाधव व सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. तरी सर्वांनी आईचा दर्शन व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आई सोमजाई देवीचा ऊदे ऊदे.

दरोड्या सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन च्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा कडून प्रशिक्षण शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक7  ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 .00 वा मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते  येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा यांच्यामार्फत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे शिबिर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चोरी दरड यासारख्या घटना वाहन चोरी महिला संदर्भात गुन्हे अपघात लहान मुलं हरवणे वन्य प्राण्यांचा हल्ला आग जळीत यासारख्या घटना मध्ये लोकांना तातडीची मदत मिळण्यासाठी चादूर घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. तरी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पत्रकार बंधु ,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील , ग्रामसेवक  ,तलाठी,  तसेच किराणा दुकानदार व्यापारी नातेपुते पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक युवक यांनी ग्रामसुरक्षा प्रशिक्षणाबाबस हजर राहावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर यांनी केले आहे.सदर प्रशिक्षण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव ,अकलूज  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून या शिबिरामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा बाबत माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचे प्रकार रोखण्यासाठी या प्रशिक्षण शिबिरात ग्रामसुरक्षा यंत्रणा अँड्रॉइड मोबाईल ॲप बाबत माहिती देण्यात येणार असून या प्रशिक्षण शिबिरासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन  पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे  .

वंचितच्या रणरागिनी कडून तृतीय पंथीयांना मद्दत

वंचितच्या रणरागिनी कडून तृतीय पंथीयांना मद्दत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनेश लोंढे मुबंई, दि. २७
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी  तृतीय पंथी यांना वंचित बहुजन आघाडी नालासोपारा पुर्व ऑफिस मधून राशन वाटप करण्यात असून ४० जणांना आज राशन वाटप झालं आहे . प्रमुख उपस्थित वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि रेणुका सचिन जाधव वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते , दुर्गा कांबळे, राजेश्वरी गुप्ता , निशा गुप्ता, गुडिया सोनी, माया प्रसाद , संध्या दुबे, संगीता प्रसाद,आकाश गायकवाड , गौतम कांबळे, प्रतीक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते वरील कार्यक्रम खाना चाहिए फाउंडेशन चे मंगेश सर आणि पारस सर यांच्या विद्यमाने तृतीय पंथीयांना रेणुका सचिन जाधव यांनी धान्य वाटप केले .

सरोली येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ई-श्रम योजना नोंदणीचे आयोजन

केंद्र सरकार आयोजित ई -श्रम कार्ड योजना शहापूर तालुक्यातील सावरोली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शहापूर तालूका अध्यक्ष अनिलभाई कांबळे यांच्या वतीने कॅम्प आयोजित

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव- वंचित बहुजन आघाडी शहापूर तालूका अध्यक्ष अनिलभाई कांबले यांच्या आयोजनाने , किन्हवली विभाग अध्यक्ष शंकर गायकवाड च्या वतीने इ श्रम कार्ड
महानोंदणी

असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?

१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे
९. न्हावी
१०. घरगुती कामगार
११. भाजीपाला विक्रेते
१२. फळ विक्रेते
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार
१७. आशा कामगार
१८. दूध उत्पादक शेतकरी

  1. सामान्य सेवा केंदरचालक
  2. स्थलांतरित कामगार
    यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.
    इ श्रम नोंदणी साठी निकष
    १. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी
    २. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी
    ३. ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी
    ४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी
    इ श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
    १. आधार कार्ड
    २. मोबाइल नंबर
    ३. बँक पासबुक
    ४. शैक्षणिक माहिती ( वैकल्पिक )
    ५. उत्पन्न दाखला ( वैकल्पिक )
    इत्यादी तसेच या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा
    तरी आज सावरोली (सो) मध्ये वंचित बहुजन आघाडी शहापुर तालुका अध्यक्ष मा अनिलभाई कांबळे यांच्या सौजन्याने व किन्हवली विभागाच्या सहकार्याने स्थानिक शाखा सावरोली च्या व महिला आघाडीच्या सहकार्याने कॅम्प संपन्न होत आहे,कॅम्प मध्ये ता कोषाध्यक्ष सागर रोकडे,विपुल पंडित,नितिन जाधव,रोहित रोकडे, किन्हवली विभागीय अध्यक्ष मा शंकर गायकवाड, उपाध्यक्ष मा विकास वाढविंदे, सचिव मा सुधिर उबाळे, संघटकसचिव मा पांडुरंग धनगर, विठ्ठल केदार, दशरथ केदार ग्राम शाखा अध्यक्ष व महिला ग्राम शाखा अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी उपस्थित होती तसेच सावरोली गावच्या ग्रामस्थांनिही या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे. कॅम्प लावण्याचा हेतू असा की असंघटित घटकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा, व त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कृषी विभागाकडून शास्त्रज्ञ , शिवारफेरी, प्रक्षेत्र भेट व क्षेत्रदिन कार्यक्रम साजरा

कृषी विभागाकडून शास्त्रज्ञ , शिवारफेरी, प्रक्षेत्र भेट व क्षेत्रदिन कार्यक्रम साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक धान्य विकास कार्यक्रमामध्ये निटवेवाडी ‘ लोणंद ‘ पिपरी ‘ धर्मपुरी ‘ बागर्डे येथे बाजरी प्रात्यक्षिक एक एकर २५ लामार्थीचे क्षेत्रावर असे एकूण ६ गावात १५० शेतकरी यांचे क्षेत्रावर खरिप हंगाम घेण्यात आला आहे या प्रकल्प अंतर्गत विस्तार कार्यक्रमा साठी तालुका ५ वर्षाची सरासरी बाजरी उत्पादकता ६४७ किलो हेक्टर चा विचार करून या प्रकल्पासाठी ११०० किलो प्रति हेक्टर उत्पादकता उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे हे उदिष्ट पूर्ततेसाठी बीजप्रक्रिया प्रथिक्षण लागवड पद्धत ‘ रुंद सरी वरंबा ‘ उगले तंत्रज्ञान ‘ मुलस्थांनी जलसंधारण ‘ आपत्कालीन पीक व्यवस्थापन मातीपरिक्षण व त्यावरील खत व्यवस्थापन ‘ एकात्मिक कीड व्यवस्थापन या वर पीकाच्या लागवडीपासून वाढीचे अवस्थेत प्रशिक्षण घेऊन बाजरी तंत्र व मंत्र शेतकर्यांना अवगत केले आहेत प्रक्षेत्र भेट शिवार फेरी शात्रज्ञ भेट व क्षेत्रदिन शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन या गावात करण्यात आले होते . यासाठी कृषिविज्ञान केंद्र मोहोळ येथील शात्रज्ञ डॉ श्री सुरज मिसाळ यांनी बाजरी काढणीत्तर तंत्रज्ञान ‘श्री सतिश कचरे कृषि अधिकारी यांनी बाजरी मुल्यवर्धन‘ श्री उदय साळूंखे कृप यांनी बाजरीचे आहारातील महत्व श्री रणजीत नाळे कृस- प्रकल्प सांगता यशोगाथा बाबत चर्चा केली श्री नवनाथ गोरे कृस पीक कापणी व उदिष्टपूर्ती साठी पीक कापणी प्रयोगा यावर महिती दिली या कार्यक्रमासाठी श्री लालासो माने, श्री विजय कर्णे, श्री दिडके, श्री. अमित गोरे, श्री नवनाथ गोरे, श्री रणजीत नाळे या कृस यांनी त्यांचे प्रकल्प गावातील २५ लामार्थी शेतकरी यांची क्षेत्रदिन शेतीदीन प्रत्यक्ष शेतावर शात्रज्ञ भेट व शिवारफेरीसाठी नियोजन व आयोजन केले यामध्ये ६ गावातील १५० लामार्थीनी व मंडल कार्यालय सर्व कृस कृसे यांनी उपस्थिती दर्शविली श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी अभारप्रदर्शन व सुत्रसंचालन केले

४२ वर्षीय शिक्षकाचा अल्पवीयन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकर्णी एन.डी.एम.जे संघटणे चा निषेध

धक्कादायक..! ४२ वर्षीय शिक्षकाचा अल्पवीयन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकर्णी एन.डी.एम.जे संघटणे नी निषेध वेक्त केल

सदर प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली व ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन……

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव –नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांच्या अदेशा नुसार व मा.विजयजी कांबळे ठाणे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध वेक्त करून
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण

बाजारपेठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.यशवंत चव्हाण यांना निवेदन दिले

अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. असे याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी एन.डी.एम.जे.संघटनेनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

बाजारपेठ पोलीस ठाणे
खासगी शिवकणीत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिकवणीतील शिक्षकाचे लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी नराधम शिक्षकास अटक केली आहे. न्यायालयाने त्या शिक्षकाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. एका ४२ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचारा केल्याच्या घटनेमुळे कल्याणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह लैंगिक अत्याचाराच्या कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. “मुदुर तालवाला”, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिम भागातील एका उच्चभ्रू वस्तीत पीडिता कुटुंबीयांसह राहते. त्याच परिसरात आरोपी शिक्षक व त्याची पत्नी खासगी शिकवणी घरात चालवतात. याच शिकवणीत पीडित विद्यार्थिनी शिकवणीसाठी जात होती. दीड महिन्यांपूर्वी आरोपीची पत्नी माहेरी गेल्याने तो घरात शिकवणी घेत होता. त्यातच त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार सुरू केले. मात्र, दिवसागणिक हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने शिकवणी जाण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक केली आहे.
तरी आरोपीवर कोठार कारवाई करण्यास निवेदन देताना
उपस्थित पदाधिकारी मा. विजयजी कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा.ॲड.प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष,
मा विनोदजी रोकडे ठाणे जिल्हा सचिव,
मा.संदेशजी भालेराव ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,
कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे, संघटक कुशल निकाळे, शहापूर तालुका मनोहर गायकवाड, संघटक सुमित जाधव,
व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्या चे एन.डी.एम.जे. संघटनेची मागणी

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली व ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन……

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेरावदिनांक २४\९\२०२१रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांच्या अदेशा नुसार व मा.विजयजी कांबळे ठाणे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध वेक्त करून
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण

बाजारपेठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.यशवंत चव्हाण

डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त मा.मोरे साहेब यांना निवेदन दिले
२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटनेने पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाई करण्यास निवेदन दिले आहे.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटनेत २३ आरोपींना अटक झाली आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करण्याच्या निवेदन पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. असे याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी एन.डी.एम.जे.संघटनेनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन पीडितेवर ३३ नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य सलग नऊ महिने केले अत्याचार
१५ वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे ९ महिन्यापर्यत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भादवि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कल्याण पोलीस परीमंडळ ३ मधील इतर पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील ४ पोलीस पथकांनी आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढले. २३ जणांपैकी २ बालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आला आहे. या गुन्ह्यातील उर्वरीत १० आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन आणि सोनाली ढोले करत आहेत.
निवेदन देत्या वेळेस
उपस्थित पदाधिकारी मा. विजयजी कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा.ॲड.प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष, मा.शशिकांतजी खंडागळे , मुंबई ठाणे प्रदेश सचिव,
मा विनोदजी रोकडे ठाणे जिल्हा सचिव,
मा.संदेशजी भालेराव ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, लाईव महाराष्ट्र टुडे संपादक राहुल सावंत,
कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे, सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव कल्याण डोंबिवली सदस्य संघटक कुशल निकाळे, शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, संघटक सुमित जाधव,
व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

दलित-आदिवासींवरील अत्याचारच्या घटनेत लक्षणीय वाढ: ॲड.(डॉ) केवल उके


दलित-आदिवासींवरील अत्याचारच्या घटनेत लक्षणीय वाढ: देशात वाढत्या ॲट्रॉसिटीच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांकऍड.डॉक्टर केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

शनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या “क्राइम इन इंडिया रिपोर्ट-२०२०” या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशात दलित आणि आदिवासींवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०(५०,२९१) मध्ये अनुसूचित जातींवरील अत्याचार/गुन्हे ९.४% वाढले आहेत (४५,९३५). उत्तर प्रदेशमध्ये (१२,७१४ प्रकरणे) सर्वाधिक अत्याचार झाले आहेत अनुसूचित जाती (एससी) २५.२%, त्यानंतर बिहार १४.६%(७३६८) आणि राजस्थान २०२० दरम्यान १३.९% (७०१७). सूचीमध्ये पुढील दोन राज्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहेत १३.७%(६८९९) आणि महाराष्ट्र ५.१%(२५६९).वरील पाच राज्यांमध्ये अनुसूचित जातींवरील अत्याचाराच्या एकूण ७२.५% घटनांची नोंद आहे. अनुसूचित जाती विरुद्ध अत्याचाराच्या अलीकडील दिल्ली, छत्तरपूर, मध्य प्रदेश, बिजनौर आणि यूपी मधील घटना या तळागळातील कठोर वास्तव प्रतिबिंबित करतात. 
अनुसूचित जमातींवरील अत्याचार/गुन्हे २०१९ (७५७०) च्या तुलनेत २०२० मध्ये (८२७२) म्हणजे  ८.४ % ने वाढले आहेत. मध्य प्रदेश मध्ये अनुसूचित जमाती (एसटी)  विरुद्ध अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणे म्हणजे २४०१ (२९.२ %), प्रकरणे नोंदवली गेलीत. त्यानंतर राजस्थान २२.७ % (१८७८ प्रकरणे) आणि तिसरा क्रमांक पटकावत महाराष्ट्रात २०२० च्या दरम्यान ८.१ % (६६३) प्रकरणांची नोंद आहे . त्यानंतर ओडिसा पुढील यादीत आहे, या मध्ये ७.५४ % (६२४) सह तेलंगणा ६.९ % (५७३) हा पाचव्या क्रमांकावर आहे. वरील शीर्ष पाच राज्यांमध्ये अनुसूचित जमातींवरील अत्याचाराची एकूण ७४.१७ % प्रकरणांची नोंद केली गेली. 
सदर अहवालानुसार अनुसूचित जातीच्या महिलांवरील एकूण बलात्काराच्या प्रकरणांपैकी ६.७०% (३३७२) प्रकरणांची नोंद केली गेली. या मध्ये बलात्काराची प्रकरणे, बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंग व अपमान करण्यासाठी  केले गेलेला हल्ले यांची एकत्रितपणे आकडेवारी ही १२.६ % (६८३५) एवढी आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या महिलांवरील एकूण बलात्काराच्या प्रकरणांपैकी १३.७ % (११३७) प्रकरणांची नोंद आहे. या मध्ये बलात्काराची प्रकरणे, बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंग व अपमान करण्यासाठी  केले गेलेला हल्ले यांची एकत्रितपणे आकडेवारी ही २४.७ % (२०४७) एवढी आहे.अनुसूचित जातीच्या महिलांविरुद्ध हत्या, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत याची अनुक्रमे ८५५ , ११९ आणि १५८७ अशी नोंदवली गेली. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातींसाठी, खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीची प्रकरणे अनुक्रमे १७२, १४४ आणि १२५ एवद्ढे नोंदवले गेलेत. ज्यावेळेस देश अजूनही दिल्ली, छत्तरपूर, बिजनौर येथील दलित महिलांवरील हिंसाचाराच्या न्यायासाठी विनवणी करत असतांना हा अहवाल राष्ट्रासाठी धक्कादायक आहे. 
वर्ष २०२० च्या अखेरीस अनुसूचित जातींवरील अत्याचाराची मागील वर्षाच्या प्रकरणांसह एकूण ६८४५६ प्रकरणे तपासासाठी प्रलंबित होती. त्याचप्रमाणे, अनुसूचीत जमाती विरोधातील अत्याचाराची एकूण ११२०० प्रकरणे तपासासाठी प्रलंबित होती. अनुसूचित जातींवरील अत्याचाराची एकूण ४८५६० प्रकरणे आणि ७८४० प्रकरणे अनुसूचीत जमाती वरील अत्याचारांच्या घटना पोलिसांनी तपासदरम्यान निकाली काढल्या. अत्याचारासाठी चार्जशीटची टक्केवारी ही अनुसूचित जाती विरुद्ध ८०.६ % आणि अनुसूचित जमातींसाठी ८२.७ % एवढी आहे.
या अहवालानुसार वर्ष २०२० च्या अखेरीस अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचाराचे एकूण २६७३०५ खटले म्हणजे अनुसूचित जातीची एकूण २३०६५३ प्रकरणे आणि अनुसूचित जमातींची एकूण ३६६५२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणांपैकी, अनुसूचित जातीवरील अत्याचाराच्या ७६३७ आणि अनुसूचित जमातीं १२१९ प्रकरणे ही न्यायालयात निकाली काढण्यात आली आहेत. भारतीय दंड संहिते सह अॅट्रॉसिटी  (अजा. अज.अप्र) कायद्याअंतर्गत दोषसिद्धीची टक्केवारी ही अनुसूचित जातीसाठी ४२.४ % आणि जमातीसाठी २८.५% एवढी आहे. निर्दोष सुटकेची टक्केवारी (यामध्ये डिस्चार्ज समाविष्ट आहे) ही अजासाठी ५७.५ % आणि अज करीत ७१.५ % एवढी आहे. वर्षाच्या अखेरीस अत्याचाराच्या खटल्याच्या प्रलंबनाची टक्केवारी ही अनुसूचित जातींवरील ९६.७% प्रकरणे, तर अनुसूचित जातींसाठी ९६.६ % एवढी आहे. 

गणेशोत्सवानिमित्त पिरळे येथ कोविशील्ड लसीकरण उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे तालुका माळशिरस येथे गणेश उत्सवा निमित्त कोविशील्ड19 लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.कोरणा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचे महत्व लक्षात घेऊन पिरळे येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात कोविशील्ड 19 लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.या लसीकरणाचे उद्घाटन पिरळे गावचे सरपंच उद्योजक संदीप सेठ नरोळे,फोंडशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे लसीकरण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी किर्तीसिंह पाटील यांच्या नेतृत्वात एल.एच.व्ही.विजया चव्हाण, आरोग्य सेविका विजया शिंदे,आरोग्य सेवक विशाल काशीद,आशा वर्कर सुवर्णा शिंदे,मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान यांनी पार पाडले.यावेळी पोलीस पाटील औदुंबर बुधावले सर,उपसरपंच उमेश भैय्या खिलारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस,शिवाजी लवटे-पाटील सर्व व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच पिरळे ग्रामपंचायत, ग्रामसेवक रमेश जमदाडे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, सर्व शिक्षक/शिक्षिका ,ग्रामपंचायत कर्मचारी ,बाळासाहेब खिलारे, अनिल वाघमोडे, नितिन खिलारे ,धनंजय साळवे तलाठी कपिल मसलखांब, कोतवाल विश्वास बनकर यांनी लसीकरण यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. पिरळे गावातील सर्व ग्रामस्थांचे 100% लसीकरण करणार असल्याचं सरपंच संदीप नरोळे यांनी सांगितले.दोन दिवसात तेराशे ग्रामस्थांना लसीकरणाची नियोजन केले आहे.तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य फोंडशिरस वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

You may have missed