सोलापूर

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-

मुख्याध्यापक मुकुंद मोरे चव्हाण सर फुले सर पाटील सर माने सर निर्मळ सर सर्व शिक्षक वर्ग हे स्वतः माजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना निमंत्रण देत आहेत

प्रगत शिक्षण संस्थेचे
दहिगाव हायस्कूल दहिगाव यांच्यावतीने 20 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता 1968 ते 2022 या कालावधी मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात सुवर्ण महोत्सवानिमित्त तब्बल ५४ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटणार आहेत.याची उत्सुकता सर्व माजी विद्यार्थ्यांना लागली आहे.दहिगाव हायस्कूल दहिगाव ने अनेक गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले आहे. या हायस्कूल मधून अनेक उच्चपदस्थ अधिकारी मोठे व्यावसायिक विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी घडवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना 54 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे काम संस्थेने केले आहे. असे म्हणतात की “ऋणानुबंधाच्या जिथे पडल्या गाठी… भेटीत दृष्टांता मोठी!”विविध ठिकाणी व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संस्थेच्या वतीने माजी शिक्षक यांचा सन्मान व सर्वांना प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व कमिटीच्या वतीने निमंत्रित करण्यात आला आहे.

श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने आरोग्याच्या दृष्टी कोणातून चांगले काम केले आहे-डॉ श्रेणिक शहा

नातेपुते प्रमोद शिंदे-
श्री 1008 महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने सलग 23 व्या वर्षी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बोलताना ते म्हणाले की संस्थेने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे.तेवीस वर्षात अनेक रुग्णांवर उपचार संस्थेने केले आहेत.तसेच या शिबिरामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना फायदा होत आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळेल सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.तसेच ट्रस्टी नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले थोड्याच दिवसात ट्रस्टच्या वतीने ब्रह्म महती सागर आयुर्वेदिक चिकित्सालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे.तसेच दहिगाव येथील भारतातील सर्वात सुंदर मेरू तयार झाला आहे.सी आर दोशी सरांचे स्वप्न होते की मोठी आरोग्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून उभी करायची आहे.ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत.रथ उत्सव हा दहिगाव चा मानबिंदू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. कार्यक्रम उद्घाटनास श्री108 शुभंकीर्ती महाराज यांचे सानिध्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे दातार व उद्घाटक हिंगणगावकर दोशी परिवार हे होते. शिबिरात रुग्ण तपासणीसाठी डॉ.श्रेणिक शहा इंदापूर,डॉ.समीर दोशी अकलूज,डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.महावीर गांधी, डॉ उत्कर्ष गांधी,डॉ निखिल फडे,डॉ अजिंक्य होरा, डॉ.सीमा गांधी यांनी 650 रुग्णांना मोफत सेवा दिली.मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीड लाख रुपयांची औषधं मोफत देण्यात आली.या कार्यक्रमास आजी माजी सरपंच,उपसरपंच सोसायटी चेअरमन पदाधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टी,श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

मानसाला नामस्मरणाशिवाय पर्या नाही-धैर्यशील भाऊ देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माझा राम सखा,मी
रामाचा,यश दे रामा,नको तूझी सत्ता”फक्त यश हवे असेल तर राम नाम जपा, आजच्या वेगवाण जीवनात नामस्परणाशिवाय पर्याय नसल्याचे मत चैतन्य जपसंकूलाचै कार्याध्यक्ष तथा शिबीर प्रमूख धैर्यशील देशमूख यांनी व्यक्त केलै.
लोंढैवस्ती(कांरूडे) यैथे चैतन्य जप संकूलाच्या २२व्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले ,नामस्परण केल्यास सूख ,समाधान मिळते,द्बेष ,कटूता, बाजूला ठेऊन प्रेम निर्माण करावे,महात्मा गांधी सारखी सहनशीलता अंगी बाळगा,ज्ञानाची भूक कधीहीसंपत नाही.
जपकारात फक्त हिंदूच नाहीत ,तर मूस्लीम,जैन,बौद्ब,पारशी,खीश्चन,या सर्व धर्माचे जपकार आहेत,या शिबीरात महाराष्टातील सर्व जिल्हातील जपकार सहभागी झाले आहेत,जपकाराने जात,धर्म न मानता,भगवंताचे नामस्परण करावे,
या शिबीरातुन अनेकांचे संसार वाचले आहेत,दारू,गूटखा,तंबाखू हि व्यसने सोडवाण्यात जप संकूलामूळे यश मिळाले.
जपकाराचे वर्तन आदर्श असले पाहिजे,औधंचे पंतप्रतिनिधी गोंदवलेकर महाराजाचे भक्त होते,ते नित्य नियमाने महाराजाच्या दर्शनास येत असत,
या कार्यक्रमास धनजंय पवार,राजेंद्र मोरे,विजय लोंढे,सूरेश लोंढे,सौ अश्विनी देऊस्कर,सतिश बर्गे,साहेबराव देशमूख,अर्जून काटे,ज्ञानेश्वर लावंड,हनूमंत पाटिल!प्रभाकर मस्कर,यूवराज सांळूखे,संजय गोसावी,नितीन लोंढे,सतिश बडवे,संपराव पांढरे,नितीन वायाळ,तूषार पवार,दत्ताञय नागमल,दिगंबर लाळगे,सूनिल देशपांडे,रामचंद्र सलगर,महादेव जाधव,माऊली ठोंबरे,उपस्थित होते

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वार्षिक रथोत्सवास दहिगाव ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी रथोत्सवाची सुरुवात झाले आहे .सकाळी नऊ वाजता परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत स्व.श्री चंद्रकांत जीवराज गांधी पिलीव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी व सौ समता प्रशांत गांधी,श्री व सौ प्रज्योती शितल गांधी दहिगाव, गांधी परिवार यांच्या वतीने भगवान श्री यांचा अभिषेक होऊन तसेच मंदिरामध्ये संगीतमय भक्तामर विधान दुपारी दोन वाजता संपन्न झाला. तसेच परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात25 वर्षानंतर नूतनीकरण केलेल्या पाच मजली लाकडी धर्म रथाचे उद्घाटन करण्यात आले आहे व श्री 1008 भगवान महावीर यांच्या पालखीची शोभायात्रा पंडितांच्या माळावर वाजत गाजत काढण्यात आली प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते.

आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून सुवर्णा रणदिवे मजूर महिलेची अवघड शस्त्रक्रिया पार पडली


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पिरळे येथील गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या महिलेची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.याबाबत हकीकत आशिकी पिरळे ता माळशिरस येथील मोल मजुरी करणारी सुवर्णा बिट्टू रणदिवे या महिलेला अनेक दिवसांपासून शारीरिक त्रास होत होता.त्या फलटण,बारामती,पुणे येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेल्या होत्या.परंतु त्या ठिकाणी अवघड शस्त्रक्रिया असल्याने उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला शस्त्रक्रियासाठी डॉक्टरांनी अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता. घरची परिस्थिती नसल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नव्हती म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारामध्ये सुवर्णा रणदिवे व त्यांचा भाऊ अनिल खिलारे यांनी आमदार राम सातपुते यांची भेट घेतली व घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.आमदार सातपुते यांनी तात्काळ त्यांची दखल घेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठवले व डॉक्टरांना फोनवरून पेशंटची काळजी घेण्यास सांगितले आमदार राम सातपुते यांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया मोफत पार पाडली व सुवर्णा रणदिवे या पेशंटला जीवदान दिले.पेशंट व त्यांच्या कुटुंब तसेच पिरळे ग्रामस्थांकडून आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.यासाठी ऍड तुकाराम शेंडगे,महेश इटकर,नानासो कोथमीरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथोत्सव यात्रेनिमित्त नूतनीकरण रथ उद्घाटन

अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथोत्सव यात्रेनिमित्त नूतनीकरण रथ उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे  
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वार्षिक रथोत्सवास दहिगाव ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी रथोत्सवाची सुरुवात होत आहे.सकाळी नऊ वाजता परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत स्व.श्री चंद्रकांत जीवराज गांधी पिलीव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी व सौ समता प्रशांत गांधी,श्री व सौ प्रज्योती शितल गांधी दहिगाव, गांधी परिवार यांच्या वतीने भगवान श्री यांचा अभिषेक होऊन तसेच मंदिरामध्ये संगीतमय भक्तामर विधान दुपारी दोन वाजता. 25 वर्षानंतर नूतनीकरण केलेल्या पाच मजली लाकडी धर्म रथाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.    इथूनच यात्रा उत्सवात सुरुवात होते.यंदा रथ यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 14/11 2022 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिर व संगीतमय बोलिया अभिषेक चे आयोजन कार्तिकी वैद्य सात दिनांक 15 /11/ 2022 रोजी सुशोभित धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची मूर्ती विराजमान करून सालाबाद प्रमाणे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेआहे.तसेच त्याच दिवशी स्व.सीआर दोशी यांना समाज रत्नपुरस्कार प्रदान, कथा महतीसागरांच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन,रथा मधून मूर्ती मंडपात घेऊन तीर्थप्रसाद व संगीताचा कार्यक्रम अशाप्रकारे रथ उत्सव कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे माळशिरस तालुक्यात २५१ कोटींचे जलजीवन *फोंडशिरससाठी १७ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपुरवठा योजनेस मंजूरी*

तत्वत मंजुरी दिल्याबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस व वाडी वस्त्यांकरीता भविष्यकालीन पुढील ३० वर्षांचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत १७ कोटी ८३ लक्ष रूपयांच्या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजूरी मिळाली असल्याची माहीती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील प्रत्येकाच्या घरात दरात नळ कनेक्शनद्वारे फिल्टर केलेले पिण्यायोग्य पाणी पोहचावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल २५१ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना आणलेल्या असून आ.मोहिते-पाटील यांनी खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी *जलजीवन मिशनच* राबवत असल्याचे म्हणावे लागेल
*चौकट*उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आ.मोहिते-पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या पाणी पुरवठा योजना
१)निमगाव(म)३३ कोटी रूपये२)बोरगाव माळेवाडी 13 कोटी रूपये३)फोंडशिरस १७ कोटी ८३ लक्ष रूपये४)वेळापूर ७२ कोटीं( तत्त्वतः मान्यता)५)संग्रामनगर ४९कोटी ०८ लक्ष रूपये६)यशवंतनगर ६६ कोटी ६७ लक्ष रूपये- उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी पातळी व पाण्याची उपलब्धतेच्या कमतरतेमुळे फोंडशिरस वाड्या वस्त्यांवरीलग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने फोंडशिरस येथील तलावात बुडीत क्षेत्रात नवीन विहीर घेऊन त्यातून पंपाद्वारे पाणी उचलून तलावापासून ४ किलोमीटर अंतरावरील बाणलिंग मंदिरासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रा जवळच जुन्या टाकी शेजारीच नवीन २,२०,००० लिटर तसेच मोटेवडी येथे १,५८,००० लिटर व बोराटे मळा येथे ८२,००० लिटर  क्षमता असणाऱ्या नवीन तीन टाक्या बांधण्यात येणार असून या नवीन टाक्यामधून फोंडशिरस व वाड्या-वस्त्याकरीता नळ कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याचे वितरण होणार आहे.

अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षाचालक “प्रकाश बनकर” याचा प्रामाणिकपणा

अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षाचालक “प्रकाश बनकर” याचा प्रामाणिकपणा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षा चालक प्रकाश हरिभाऊ बनकर यांच्या प्रामाणिकपणामुळे एका रुग्णाच्या नातेवाईकांना त्याचे रिक्षात विसरलेले ए.टी.एम.कार्ड. रोख रक्कम 5000 रु.मनी मंगळसूत्र रुग्णांची हाॕस्पिटल ची फाईल व इतर साहित्य प्रामाणिकपणे परत केल्याने त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की अकलूज येथील अकलूज क्रिटी केअर ट्रॉमा सेंटर येथून दुपारी 4 वाजता एका रुग्णाला घेऊन हा रिक्षा चालक पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे गेला त्या रुग्णासोबत त्याचे नातेवाईक हर्षदा कांबळे उदय नगर या होत्या परंतु त्या रुग्णाला लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे ऍडमिट करून न घेतल्याने त्या रिक्षाचालकाने त्या रुग्णाला नातेवाईक यांना परत अकलूज (शंकर नगर) येथील नातेवाईकाच्या घरी रात्री 9 वाजता सोडले त्यानंतर रिक्षा चालक घरी आल्यानंतर पाहिले की आपल्या रिक्षात रुग्णाच्या नातेवाईकाचे साहित्य विसरले असून त्यामध्ये बँक ए.टी.एम. रुग्णाची हॉस्पिटल फाईल. आधार कार्ड. रोख रक्कम 5000 रुपये आणि मंगळसूत्र होते. रिक्षा चालकाने तातडीने 9/30 वाजता त्या रुग्णाच्या नातेवाईकाला कॉल करून तुमचे साहित्य रिक्षामध्ये विसरले असल्याचे सांगितले त्यानंतर रिक्षाचालकाने विलास गायकवाड, आजिनाथ जाधव, हर्षदा कांबळे यांचे नातेवाईक दशरथ नवगिरे, यांच्या समक्ष त्यांचे रोख रक्कम5000/- मनी मंगळसूत्र , फाईल एटीएम कार्ड नातेवाईक दशरथ नवगिरे यांच्या स्वाधीन केले रिक्षा चालक प्रकाश बनकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी अकलूज

वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मौजे वेळापूर व मौजे पिलीव ता माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा. अशी मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते, यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्राद्वारे केली होती , त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत .
आ राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघात मौजे वेळापूर व मौजे पिलीव हे दोन्ही येत असून तसेच राष्ट्रीय महामार्ग देखील या गावातून जात आहे.
या दोन्ही गावांची लोकसंख्या देखील एक लाख आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने मतदारसंघातील नागरिकांना सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार राम सातपुते यांनी मौजे वेळापूर व मौजे पिलीव या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी १५ सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली होती.त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही – शेखर खिलारे

माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही
– शेखर खिलारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– सतत डोक्यात गोधळ घालणाऱ्या कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची गर्दी असणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जाण्याचा घाट वारकरी बांधव घालत आहेत.सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु एरवी वारी गावातून येऊन गेली तर वारीच्या मार्गावर व्हायरल इन्फेक्शन ताप,सर्दी,खोकला असे,आजार लोकांना होतात लोक आजारी पडतात. सध्याच्या काळात महामारी पुढे जगाने गुडघे टेकले आहेत वारीमध्ये एखादा जरी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर थोड्या काळात वारीच्या मार्गावरील गावा गावांमधून लाखोंच्या संख्येने लोक पॉझिटिव्ह होतील याचा विचार वारकरी संप्रदायाने करावा…!
११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले,१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,७ मे बुद्ध पौर्णिमा, तसेच १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.या महापुरषांचा जयंती उत्सव कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन जनतेने शासन व प्रशासन यांना सहकार्य करत घरातच समजूतदार पद्धतीने साजरा केला.
• मग तुमचाच हट्ट का ?
संत तुकोबाराय व संत ज्ञानेश्वर माऊली.या दोन्ही महाराजांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून जातात.आमच्या तालुक्यात एकही पेशंट नाही.
आमचा वारीला विरोध नाही संत तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आम्हाला ते पूजनीय आहेत आमच्या मनात संत तुकोबारायां बद्दल नितांत आदर आहे आपल्या कीर्तनातून त्यांनी बहुजन समाज सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न करून बहुजनांना सुधारले आहे.
संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज ,यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.परंतु सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पालख्या पंढरपूर पर्यंत घेऊन येणे योग्य नाही.एवढा कडक लॉकडाऊन असून सुद्धा महाराष्ट्रात कोरोना रोगाची संख्या वाढत आहे.आणि वारीत एखादा जरी पेशंट आढळला तरी या महाराष्ट्राला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व अजित दादा पवार यांची धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही.सरकारने वारी काढण्यास परवानगी देऊ नये.तरीसुद्धा परवानगी दिली तर आम्ही संत तुकोबाराय,संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आमच्या शहरातुन जाऊ देऊ.परंतु पादुका व्यतिरिक्त एक ही माणूस शहरातून जाऊ देणार नाही.याची नोंद घ्यावी सदरचे निवेदन या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हा अधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष सोलापूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मा.तहसीलदार माळशिरस,अकलुज पोलीस निरीक्षक अकलुज व सरपंच ग्रामपंचायत अकलूज यांना देण्यात आले आहे .