Blog

श्री शिवछत्रपती संस्थेने गरीब विद्यार्थिनीला दिला मदतीचा हात

श्री शिवछत्रपती संस्थेने गरीब विद्यार्थिनीला दिला मदतीचा
नातेपुते (वार्ताहर) : एकशिव येथील विद्यार्थिनी रूपाली दत्तात्रय खरात हे बारामती येथे एमएससी सेकंड ला इयरला शिकत असून घरी आर्थिक परिस्थिती नसल्याने व कॉलेजमध्ये शिकण्यासाठी लॅपटॉप ची गरज असल्याने ती अडचणीत होती हे अडचण श्री शिवछत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर या संस्थेच्या संचालकांनी सदर मुलीचे लॅपटॉप व इतर साहित्य तिला मदत म्हणून दिले व एक सामाजिक बांधिलकी जपली यावेळी संस्थेचे संचालक सचिन भोसले सुनील बोराटे दिपक झोडगे रवींद्र भोसले रोहित नवगिरे पांडुरंग केंगार राजेंद्र कोरटकर संजय डांगे इत्यादी उपस्थित होते

नातेपुते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात संपन्न

नातेपुते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात संपन्न
नातेपुते ( प्रमोद शिंदे )-नातेपुते तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था  यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे ही आयोजन करण्‍यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत इतिहासकार सरुडकर सर होते सर बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा यांचा जवळचा संबंध होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था काढून बहुजनांचे मुले शिकवली तसेच कर्मवी भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,यांच्यात विचार सिंचन होते. तसेच यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे ,प्राध्यापक सुनील साळवेसर ,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विकास दादा धाईंजे, एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते, मिलिंद सरतापे, लतीफ भाई नदाफ, डॉक्टर कुमार लोंढे, आखाडे सर, आदित्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पोपट साळवे ,मारुती सरगर, मारुती खांडेकर ,प्रकाश साळवे, विनोद रणदिवे, समीर सोरटे, गणेश गायकवाड, नरेंद्र भोसले, अरुण बोडरे, पत्रकार श्रीकांत बाविस्कर, बाळासाहेब बळवंतरावसर, अजित सातपुते, संघर्ष सोरटे, विशाल सोरटे, रंजीत कसबे नितीन मोरे ,प्रशांत खरात, गोरख साळवे ,प्रमोद भोसले ,वाळके सर, तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आरपीआय युवकचे जिल्हा संघटक विशाल साळवे यांनी केले होते.

* रि.पा.ई कार्यकर्त्याची निष्ठा श्रेष्ठींकडून राजकारण्यांच्या दावणीला कार्यकर्त्यांच्या हाती गाजर*

रि.पा.ई कार्यकर्त्याची निष्ठा श्रेष्ठींकडून राजकारण्यांच्या दावणीला कार्यकर्त्यांच्या हाती  गाजर* 
नातेपुते(प्रमोद शिंदे )माळशिरस विधानसभा जागेवर रिपाई क्षातील कोणत्याही पदाधीका-याला विश्वासात न घेता रिपाई च्या नावाखाली भाजपा चा उमेदवार देण्यात आला ल्यामुळे रि.पा.ई मध्ये प्रचंड नाराजी तयार झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक पने महायुतीचे काम करत असताना सुध्दा भाजपा कडून जर रिपाईचा असा अपमान होणार असेल रिपाईचा कार्यकर्ता महा युतीसोबत काम करण्यास विचार करेल महायुतीने माळशिरस ची आरपीआय ला जागा सोडून चेष्टा केल्यासारखं झाला आहे. आठवले साहेबांनी सुद्धा ही जागा रिपेअर सुटल्याचा पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्या पत्रकार परिषदेत उमेदवारीबाबत मोहिते पाटील निर्णय घेतील असं सांगितले त्यामुळे रिपाईच्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही पक्षश्रेष्ठींकडून राजकारण्याच्या दावणीला बांधल्यासारखे झाली. आरपीआयला जागा सोडून उमेदवार मात्र भाजपचा दिला असल्याने आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत नाराजी असल्याचं तालुक्यात दिसत आहे माळशिरस तालुक्यात विधानसभा लढवण्यासाठी आरपीआयचे कार्यकर्ते सक्षम असताना भाजपचा उमेदवार मोहिते पाटलांनी देण्याचे ठरवल्याने मोहिते पाटलांच्या विरोधात रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये रोश निर्माण झाला आहे. तसेच आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले साहेब यांच्यावर सुद्धा कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येत आहे.प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा रामदास आठवले यांनी विचार केला नसल्याचं बोलले जात आहे. इतर जिल्हा व तालुक्या पेक्षा माळशिरस तालुक्यामध्ये आरपीआय ची चळवळ व ताकत मोठ्या प्रमाणात असून कार्यकर्तेही आठवले साहेबांचे निष्ठावान आहेत. तरीसुद्धा ही जागा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनान देता भाजप व आर.एस.एस च्या कार्यकर्त्याला दिल्यामुळे तालुक्यातील आरपीआयचे निष्ठावंत कार्यकर्त्यावर एक प्रकारचा अन्याय झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात आरपीआयचे कार्यकर्ते कोणतं पाऊल उचलतात हे येणारा काळच सांगू शकेल उमेदवारीबाबत आरपीआयच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली असता अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांच्यामध्ये आता संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.  कार्यकर्त्यांच्या अवस्था अशी झाली आहे की “रामदासा कोणता झेंडा घेऊ हाती” याचं उत्तर रामदास आठवले यांनी देणे अपेक्षित आहे. कारण अहोरात्र काम करून आरपीआयचा बालेकिल्ला माळशिरस कार्यकर्त्यांनी मजबूत केला आहे. या बालेकिल्ल्यावर आयत्या वेळेला इतर राजकारण्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे येथील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यांची नाराजी रामदास आठवले कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं गरजेचे आहे.

माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी वंचित सह अन्य पक्षांचा 22 उमेदवारांकडून 30 अर्ज दाखल

: माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांकडून ३० अर्ज दाखल

नातेपुते (प्रमोद शिंदे)– माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातून २२ उमेदवारांना कडून ३० अर्ज दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये भाजप,राष्ट्रवादी,मनसे,वंचित,बहुजन पार्टी,सुराज्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.उमदेवारांनी अर्ज दाखल करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून उमेवारी अर्ज दाखल केले.उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी कडून,राम सातपुते यांनी भाजपकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.मनसे कडून मनिषा कर्चे,श्रीकृष्ण प्रक्षाळे बहुजन पार्टी,सुनंदा काटे राष्ट्रवादी,राजू सोनवणे वंचित,धनजंय साठे राष्ट्रवादी,अजय सकट भाजप,अशोकराव तडवळकर भारतीय सुराज्य पक्ष,डॉ.विवेक गुजर भाजप,राम जगदाळे भाजप,राष्ट्रवादी,अशोक गायकवाड राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज दाखल केले आहेत.उदय कांबळे,उत्तम मोटे,त्रिभुवन धाईंजे,अजय सकट,गोरख नवगिरे,विलास धाईंजे,बापू अहिवरे,बाळसाहेब सपताळे,सुधीर पोळ,राजश्री लोंढे,राम जगदाळे,मकरंद साठे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी,कार्यकत्यांनी तहसिल कार्यालयामध्ये गर्दी केली होती.

२७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. तर ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. तर ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख देण्यात आली आहे.
: माळशिरस विधानसभेचे उमेदवर

उदय पोपट कांबळे (अपक्ष ) उत्तम एकनाथ मोटे  (अपक्ष )  त्रिभुवन विनायक धाईंजे (अपक्ष ) श्रीकृष्ण ज्ञानदेव प्रक्षाळे (बसपा ) सुनंदा सतीश काटे (राष्ट्रवादी )  मकरंद नागनाथ साठे (अपक्ष ) उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी ) मनीषा अप्पासाहेब कर्चे (मनसे ) राजू यशवंत सोनवणे (वं ब आ ) धनंजय तुकाराम साठे (राष्ट्रवादी ) अजय जालिंदर सकट (अपक्ष व भाजपा ) अशोकराव सोपानराव तडवळकर ( भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष २ अर्ज  ) राम विठ्ठल सातपुते (भाजपा ४ अर्ज  ) गोरख सायबु नवगिरे (अपक्ष ) विलास दाजी धाईंजे (अपक्ष ) बापूराव महादेव अहिवळे  (अपक्ष )  विवेक नामदेव गुजर (भाजपा २ अर्ज )  बाळासाहेब दादा सपताळे ( अपक्ष )  सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष ) राम भारत जगदाळे (अपक्ष राष्ट्रवादी व भाजप ) अशोक हरी गायकवाड (राष्ट्रवादी ) राजश्री शंकरराव लोंढे (अपक्ष ) एकुण २२ उमेदवारांनी  ३० अर्ज दाखल केले                   

उस्मानाबाद जिल्ह्यात बौद्ध व्यक्तीची निर्गुण हत्या एन.डी.एम.जे संघटनेची आरोपींना फाशी ची शिक्षा होण्याची मागणी

*बौद्ध समाजातील सहदेव कठारे रा.सरोळे जि. उस्मानाबाद यांची निर्घृण हत्या*
उस्मानाबाद -आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मागणी
दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी पन्नास रुपये दिले नाहीत या कारणावरून सहदेव काठारे यांची हत्या करण्यात आली
भादवी 302 व एट्रोसीटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल आहे तीन आरोपींना अटक केली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत पीडित कुटुंबांनी एन.डी.एम.जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ अंगद राऊत यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली होती नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव dr.केवलजी उके साहेबांच्या आदेशानुसार व राज्य समनवयक रमाताई आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव तानाजी गिते जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी मौजे सारोळे (बु)जिल्हा उस्मानाबाद येथे भेट दिली कुटुंबांचे सांत्वन केले सर्व घटनाक्रम समजून घेतला कुटुंबास कायदेशीर मार्गदर्शन केले
आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी पीडित कुटुंबांसह लवकरच जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मंत्रालयीन अधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे पवारांची “उत्तम “खेळी

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे  पवारांची “उत्तम “खेळी
 संपादक (प्रमोद शिंदे )- माळशिरस तालुक्यात लोकसभे पासूनच राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे लोकसभेला पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी साठी मोहिते- पाटलांना डावल्या मुळे माळशिरस तालुक्याच्या राजकारणात काळोख पसरला होता मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा प्रकाश टाकला परंतु तोच प्रकाश राष्ट्रवादीसाठी काळोख ठरला त्यातच आता विधानसभेला राष्ट्रवादीकडून शरद पवारांनी भाजपचे नाराज उत्तमराव जानकर यांना टिकीट देऊन  जणूकाही  काळोखात शरदाचे चांदणे  आणले आहे व पवारांनी  राजकारणात उत्तम जानकर यांच्या माध्यमातून  उत्तम खेळी  माळशिरस तालुक्यात  केली आहे  त्यामुळे  राष्ट्रवादीला  नवसंजीवनी  मिळाली असून कार्यकर्त्या मध्ये  नवचैतन्य  निर्माण होऊन  मोहिते पाटलांन विरोधात पुन्हा एकदा मोठी फळी उभी राहिली आहे .माळशिरस तालुक्यातील  चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंचायत समिती माळशिरस चे माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच जाहीर केली असल्याने उत्तमराव जानकर गटामध्ये व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून लोकसभेच्या वेळेला मोहिते-पाटील आणि विरोधी गट एकत्र असल्याने भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला आहे. 
माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र झाल्याने माळशिरस तालुका हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा तो आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून लोकसभे पासून ओळखला जाऊ लागला त्यातच आता फूट पडली आहे व. उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उत्तमराव जानकर यांच्यामुळे मोहिते-पाटील गटाच्या  उमेदवाराला  मोठा फटका बसू शकतो.उत्तम जानकर हे खासदार रंजीत सिंह निंबाळकर यांचे निकटवर्ती असल्यामुळे माळशिरस तालुक्यातून जानकर यांना मदत होऊ शकते का हाही मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे शरद पवारांच्या उत्तम खेळीमुळे मोहिते- पाटीलांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे का हा येणारा काळ सांगू शकेल.

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*
नातेपुते( प्रमोद शिंदे)- कारुंडे तालुका माळशिरस येथील लघुपाटबंधारे तलाव कोरडा पडला असल्याने कारुंडे गावात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कारुंडे या भागात विहिरी नाले बोरवेल याचे पाणी आटले आहे. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने धीम बलवाडी धरणातील पाणी कारुंडे तलावात सोडण्याची मागणी सरपंच अमर जगताप व ग्रामस्थांनी दिनांक  26 /9 2019 ग्रामसभेचा ठराव करून केली होती.लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती याची दखल घेत लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता बोडके यांनी दिनांक 30/9/2019 रोजी पाणी सोडण्याची मंजुरी पत्राद्वारे दिली आहे.लवकरच तलावामध्ये पाणी सोडले जाईल अशी माहिती सरपंच अमर जगताप यांनी दिली.

राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा* *पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*

  • राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा*
    पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याचा खुलासा त्यांनी आज पत्रकार परिषे देत केला. ज्या बँकेत १० ते १२ हजार कोटी ठेवी आहेत त्या बँकेत २५ हजार कोटीचा गैरव्यवहार कसा होवू शकतो असे ते म्हणाले.
    यावेळी ते म्हणाले, आमचे बोर्ड जेव्हा बरखास्त झालो तेव्हा बिनविरोध निवडून आलेले होतो याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो. साखर कारखाने, सूतगिरण्या विक्रीला काढण्यात आल्या. राज्य बँक ही शिखर बँक आहे. एखादा सरकारी साखर कारखाने, सूतगिरण्या दुष्काळ किंवा अन्य संकटामुळे अडचणीत येतात तेव्हा आऊट ऑफ दी वे जाऊन मदत करावी लागते. या राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच चार कारखान्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारही करते. माझ्या काळात जे कर्जवाटप झाले ते फिटलेले आहे. सरकारने हमी दिली होती. कर्ज कारखाने विका आणि कर्ज फेडण्याचे आदेश होते. यामुळे कारखाने विकण्यात आले. आज ही बँक 285 कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. मग 25 हजार कोटींचा घोटाळा झाला तर ही बँक बुडाली नसती का, असे पवार म्हणाले. राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, दुरान्वये संबंध नाही. मात्र, त्यांचे नाव यात आल्याने मी अस्वस्थ झालो होतो, असे अजित पवार म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत अजितदादा भावूक झाले होते पुढे ते म्हणाले की पवार साहेब देतील ते आदेश आम्ही पाहणार आहोत पवार साहेब हे आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य आहे आमच्या कुटुंबांमध्ये कसलाही कलह नाही इथून पुढे पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू आम्हाला सोडून गेलेले लोक या लोकांना सांभाळण्यासाठी कदाचित आम्ही कमी पडला असेल म्हणून ते आम्हाला सोडून गेले परंतु यांच्यावरती आम्ही टीका केली नाही शिखर बँक घोटाळा प्रकरणी 69 जनां वरती गुन्हे दाखल आहेत परंतु अजित पवारांचं नाव याच्यात असल्यामुळे हा सगळा उठाठेव हे लोक करत आहेत असा आरोप अजित पवारांनी केला आहे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्या नसल्याचा ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण,
माळशिरस( प्रमोद शिंदे) 2015 मध्ये माळशिरस येथे ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली यावेळी या ठिकाणी कार्यरत असणारे अनेक कर्मचारी आकृतीबंध नुसार कमी करण्यात आले,याचा फायदा घेत तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी व भरती प्रक्रियेशी निगडीत सर्व अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मुळ पात्रताधारकांना बाजूला करून त्यांचे ठिकाणी इतर लोकांना कामाला लावले आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदेशीर व अनाधिकृत आहे .सध्या हे लोक नगरपंचायत मध्ये स्वतःचा एकाधिकारशाही नुसार कार्यभार सांभाळत आहेत माळशिरस या नगरपंचायती मध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या लोकांना व्यवस्थित बोलत नाही त्यांची कामे वेळेत करत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश थोरात यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये संबंधित विभागाकडून या कर्मचारी भरती ची संपूर्ण माहिती मागवली असता त्यामध्ये त्यांना तफावत दिसून आली त्यानुसार त्यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व ही बेकायदेशीर झालेल्या कर्मचारी -अधिकारी नियुक्तीची चौकशी करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी मा.मुख्याधिकारी नगर पंचायत माळशिरस सोलापुर येथील वरिष्ठ म्हणजेच मा.जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे वेळो-वेळी कागदोपत्री पाठपुरावा केला मात्र , तक्रारदारांचे पदरी निराशाच पडली. संबंधित अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून होते , त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही उलट याप्रकरणी अधिकारी जाणीवपुर्वक उदासीनता दाखवित असून त्या ठिकाणी सुध्दा,आर्थिक व्यवहार झाले असल्याचे मंगेश थोरात यांचे म्हणणे आहे .त्यानुसार यापुढे मा.विभागीय आयुक्त सो,(महसुल)पुणे यांचे यांचे कार्यालयात सुद्धा या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला, मात्र ,अद्यापि त्या ठिकाणी ही कोणतीच कार्यवाही, कारवाई झालेली दिसून आलेली नाही , त्यामुळे या सर्व भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ मा.विभागीय आयुक्त सो (महसूल) पुणे,विधानभवन, यांचे कार्यालयासमोर दि. १ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी ९ वाजता आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती मंगेश थोरात यांनी दिली,यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुनील ओवाळ, आदी उपस्थित होते.

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली.
सविता ढोबळे
नातेपुते ( प्रतिनिधी)
कृष्णामाई माने पाटील या आदर्श माता होत्या. त्यांनी आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे संस्कार केले. त्यांच्या प्रेरणेमुळेच सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात क्रांती केली असे मत साविता ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.
मोरजाई विद्यालय मोरोची ता माळशिरस येथे कृष्णामाई माने पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यातआली त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक विकास सुर्यवंशी, रामहरी आचार, बाळासाहेब बळवंतराव , फिरोज आतार, संपत रुपनवर, आशा महामुनी, दिपाली जाधव, सुनंदा वजाळे, रणजित बाबर, बाळासाहेब लवटे, विठ्ठल लोंढे उपस्थित होते . यावेळी कु केतकी पाटील, पुनम अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना सौ ढोबळे म्हणाल्या की, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरसच्या माळरानावर सहकार, शैक्षणिक,कृषी औद्योगिक , दुग्ध क्रांती केली आहे. त्यांच्या मातोश्री कृष्णामाईनी लहानपणी केलेल्या सामाजिक कार्याच्या संस्कारामुळे , कृष्णामाईनी आपली तिन्ही मुले कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, धर्मवीर सहाशिवराव माने पाटील, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना आदर्श घडवण्यासाठी प्रयत्न केले. इथल्या सामान्य लोकांचे दुःख दुर व्हावे यासाठी सहकारी संस्था स्थापना करुन जीवनमान उंचावण्याची प्रेरणा त्यांनी दिली . त्यांचे स्वप्न आज प्रत्येक्षात उतरलले पहावयास मिळत आहे. सहकारमहर्षिनीं स्थापन केलेल्या संस्था गरीबांची आश्रयस्थाने बनलीआहेतअसे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक भागवत यांनी केले तर आभार प्रथमेश पाटोळे यांनी मानले..