प्रमोद शिंदे

नातेपुते परिसरातील शाळांचा बारावीचा निकाल 100% टक्के.

— पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे (नातेपुते) महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला.  यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे. त्यात नातेपुते परिसरातील बऱ्याच शाळेचा शंभर टक्के निकाल लागल आहे त्यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला सर्वात मोठी शाळा असून शंभर टक्के निकाल लागला आहे  निकाल पुढील प्रमाणे. शास्त्र100%,वाणिज्य 100%,कला 99.47%शाखा निहाय निकाल शास्त्र शाखा1)साक्षी सुनील निकम  82.77%2) सरगर छाया महादेव 82.46%3) सोरटे दीपाली शिवाजी  82.31%वाणिज्य शाखा1) पाठक प्राची प्रताप84.30%, 2)मोरे पूजा बाळासाहेब82.77%,3) राऊत वैष्णवी नितीन 82.15%,कला शाखा 1)निर्मळ कोमल कैलास86.46%2) जाधव संदीप बाळू 80.76%3) शिंदे सुनीता सोमनाथ79.23%उपप्राचार्य श्री भारत पांढरे व विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केले आहे तसेच  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यांचा निकाल निकाल-94.23% लागला असूनशास्त्र शाखा – 94. 23 %,वाणिज्य शाखा-87.50%,
 कला शाखा-66.66%, शास्त्र शाखेमध्ये1) रणजीत मल्‍हारी एकतपुरे 79. 53%,2) समीक्षा कुंडलिक सस्ते 72.30%,3) प्रतिक्षा संपत आवळे70.30%, वाणिज्य 1)योगिता किसन ननवरे79.23%, निकिता किसन नवरे77.38%, सानिका नाथा चव्हाण72.% कला शाखा- स्वाती महादेव शिंगाडे 71.84%, रविराज पोपट माने63.53%, राम कृष्ण तुकाराम वसेकर62.46%, असा निकाल असून पद्मजा देवी मोहिते-पाटील व धवलसिंह मोहिते-पाटील यांनी प्राचार्य सी बी कोळेकर व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी ज्युनियर कॉलेज पिरळे  यांचा 100 टक्के निकाल लागला आहे.  कॉलेज तसेच चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ज्युनियर कॉलेज यांचा निकाल 91.86% लागला आहे. शास्त्र विभाग 98.7%, कला विभाग82.35%, शास्त्र शाखेमध्ये 1)हिमांशू प्रताप जाधव 80.30%,2) वंदना राजू मेत्रे 70.30%,3) माया बाजीराव रुपनवर69.23%, कला शाखा -ऐश्वर्या जीवन सोरटे64%, प्रदीप कर्चे59.7%, उत्कर्ष बाळासाहेब किर्दक58%,. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील जुनिअर कॉलेज नातेपुते. कला शाखा निकाल 86.49 1)निकिता प्रभाकर मस्कर 70.76 %2)वैशाली प्रभाकर कर्चे 69.84%,3) रोशनी असिफ शेख 68.30 %यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील व प्रशाला समिती सभापती मा.श्री. राजाभाऊ लव्हाळे यांनी केले. रत्नात्रे इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे यांचा सलग दुसऱ्यांदा 100% निकाल असून चेअरमन प्रमोद दोशी व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.

तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल

तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -आजिनाथ राऊत उस्मानाबाद जवळा नि प्रतिनिधी
जवळा नि येथे कोरोना विषाणूस प्रतिबंध करण्यासाठी तालुका दंडाधिकारी अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी सय्यद साहेब, या परांडा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांनी जवळ्याचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना सक्त सुचना देत सोबत घेऊन धडक मोहीम राबविली.
तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे सरपंच नवजीवन चौधरी, उपसरपंच अशोक गवारे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत नियम मोडणाऱ्या शेकडो नागरीकांकडुन दंड वसुल केला.
त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात व चौकाचौकात फिरणाऱ्यांवर वरील सर्व अधिकारी यांनी संयुक्तरीत्या कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे. जवळा नि गावातील बाजार चौकासह विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांचेसह तालुका विभागातील अधिकारी यांनी चौकाचौकात बिनकामाचे बसण्यास बंदी घातल जवळा भांडगाव मार्गे बार्शीला जानारा रस्ता बंद करीत कारवाई केली.
अनेकजण गरज नसताना बाजारात फिरत होते. तर काही जण मास्क शिवाय फिरताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई तालुका प्रशासनातील पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत विना मास्क प्रत्येकी २०० रुपये तर चार चाकी नियम मोडून फिरणाऱ्यांकडुन प्रत्यकी ५०० रुपये असा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आणि इतर प्रशासनाच्या वतीने दिवसभर हि कारवाई सुरू होती.

कारवाई करताना प्रशासकीय अधिकारीवर्ग

*उद्या बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची आतुरता संपली*

  • आज बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची आतुरता संपली*
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
    उद्या बारावीचा चा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना निकालाचे आतुरता लागली होती. कोरणा विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या परंतु बारावीची परीक्षा झाली होती या परीक्षेचा निकाल कधी होणार? अशी चिंता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती बारावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी जीवनातील टर्निंग पॉईंट समजले जाते याच बारावीचा निकाल वरती पुढील शिक्षणाची गणित जुळवले जातात परंतु आज प्रतीक्षा संपले आहे. शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे . त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . १२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे .
    मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत . ?

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट आऊट ) घेता येईल . www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल . तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

आपले भवितव्य पेपर मध्ये लिहिताना विद्यार्थी
भवितव्य पाहताना विद्यार्थी

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन अनुसूचित जमाती जातीच्या बजेटचा कायदा पारित करावा. एन डी एम जे

महाविकास आघाडी सरकारचा सामाजिक न्याय विभागाच्या अखर्चित निधीवर दरोडा

दलितांचा निधी वळवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध…रमाताई आहिरे

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन बजेटचा कायदा पारित करावा….. वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सात कोटी चौऱ्यानव लाख एकोननव्वद हजार दोनशे आडोतीस एवढा प्रचंड प्रमाणातील अखर्चित निधी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव रवींद्र गुरव यांच्या सहीने दिनांक 9 जुलै 2020 रोजी विशेष बाब म्हणून खर्च करण्यास शासनाची मान्यता दिली आहे.असे पत्र महाविकास आघाडीच्या अधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केली गेली आहे.
हा निधी सारथी संस्था पुणे साठी वर्ग केला आहे.सारथी या संस्थेतर्फे मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मदत दिली जाते मराठा समाजातील युवकांच्या व नागरिकांच्या विरोधात आम्ही नाही मराठा समाजाची प्रगती झालीच पाहिजे.त्यासाठी शासनाकडे अनेक प्रकारचा निधी शिल्लक आहे त्यामधून सारथी या संस्थेसाठी निधी द्यावा.परंतु सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाच्या निधी वळवू नये.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून बौद्ध मातंग चर्मकार यांच्यासह अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी त्यांच्या विविध योजनांसाठी हा निधी वापरण्यात येतो महाराष्ट्रातील बौद्ध दलित आदिवासींची परिस्थिती आजही खूप हालाखीची आहे लाखो लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगताहेत बहुतांश लोक भूमिहीन असून मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतात अशी परिस्थिती असताना त्यांच्या हक्काचा निधी मराठा समाजाच्या साठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला देणे न्यायोचित वाटत नाही शिवाय बौद्ध दलित आदिवासींवर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचारच आहे
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेला निधी यापूर्वीच्या सरकारच्या काळांमध्ये सुद्धा वळवला आहे तसेच अखर्चित ठेवला आहे त्यामुळे वारंवार संस्था-संघटनांच्या वतीने अनुसूचित जाती व जमातींचा प्रगतीचा निधी वळवू नये किंवा खर्च ठेवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा अशी मागणीही झालेली आहे यासाठी विधान भवनात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित झाले आहेत प्रश्न उपस्थित करणारे सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसलेले आहेत बौद्ध अनुसूचित जाती जमातींच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेला निधी वळवू नये तसेच अखर्चित ठेवू नये म्हणून शासनाने दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलावून त्यामध्ये बजेटचा कायदा पारित करावा अन्यथा शासनाला बौद्ध दलित आदिवासींच्या रोषाला व आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे निवेदन नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आले आहे निवेदनावर राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके,राज्य विधी सल्लागार ऍड.अनिल कांबळे, राज्य सचिव वैभव गिते,राज्य समन्वयक रमाताई अहिरे,राज्य सहसचिव पी.एस खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात,राज्य सहकोषाध्यक्ष शरद शेळके,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या सह्या आहेत.

दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.
नातेपुते: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील खास पुस्तकांसाठी व राहण्यासाठी बांधलेले घर राजगृह या निवासस्थानावर काल सायंकाळी अज्ञात माथेफिरूनी दगडफेक करून बागेतील झाडे कुंड्या यांची नासधूस करून दहशत माजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या हल्लेखोरांचा निषेध व त्यांना त्वरित अटक व्हावी म्हणून मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांचे नावे मा.तहसीलदार माळशिरस यांना सम्यक सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र व समता सैनिक दल सोलापूर बटालियन यांचे वतीने निवेदन देण्यात आले.४८ तासाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास आम्ही कोरोना लॉक डाऊन चा विचार न करता या पेक्षा तीव्र आंदोलन करू व होणाऱ्या परिणामांना राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला.हे निवेदन निवासी नायब तहसीलदार माळशिरस तुषार देशमुख यांनी स्वीकारले.या निवेदनावर संस्थेच्या वतीने अध्यक्ष सौ.संध्या सोरटे,सचिव समीर सोरटे,सदस्य सागर भोसले,सागर मोरे,आप्पा सावंत,हनुमंत सोरटे, तसेच समता सैनिक दल यांचे वतीने असि.लेफ्ट.जनरल पुणे डिविजन दादासाहेब भोसले, मेजर जनरल पी एस.ढोबळे, डीव्हिजन ऑफिसर समीर सोरटे,शंकर गायकवाड,सुरेश धाईंजे यांच्या सह्या आहेत.यावेळी प्रमोद धाईंजे,शेखर ओव्हाळ,रणजित झेंडे,वैभव सावंत,सागर मोरे,सागर भोसले उपस्थित होते तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेऊन हे निवेदन देण्यात आले.

*बेशिस्त वाहनचालकांवर नातेपुते पोलिसांकडून कार्यवाही सुरू *

नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे बेशिस्त वाहनचालकांवर स्वतः कारवाई करताना
ट्राफिक हवालदार लोकांना नियम संदर्भात सांगताना

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते (प्रमोद शिंदे )-नातेपुते आणि परिसरात बेशिस्त पणे व covid-19 च्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या  नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती नातेपुते पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे.सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 5 जुलै रोजी कोरणा विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून काही नियमावली आखून दिली आहे.या नियमावलीचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय यंत्रणा यांना दिले आहेत. या आदेशाचे पालन नातेपुते पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे करण्यात येत आहे.नातेपुते येथे दुचाकीवर डबलसीट,ट्रिपल सीट विनाकारण फिरणारा वर व मास्क विना फिरणारा वर दंडात्मक खडक कारवाई सुरू केली आहे. सदर कारवाई मास्क न वापरल्यास  100 रुपये दंड,दुचाकीवर दोघे प्रवास केल्यास 500 रुपये दंड, चार चाकी व तीनचाकी तीन व्यक्तींनी पेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास प्रत्येकी 500 रुपये,निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवल्यास1000 रुपये दंड, अत्यावश्यक सेवा वगळून साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मालक किंवा नोकर  दुकानात आढळल्यास सात दिवस दुकान आदिवस दुकान सील करण्यात येणार असून होम कारण टाईम न पाळल्यास 1000 रुपये, दंड  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रु ,दुकानात पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास 500 रु, सार्वजनिक सार्वजनीक दारू,पान,तंबाखू सिगरेट चे सेवन केल्यास 500 रु, फळविक्रेते भाजीवाले मास्क न वापरल्यास 100 रूपये,अशाप्रकारे दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे दिवसभरात 47 लोकांवरती कारवाई करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.तरी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील लोकांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल येईल असा इशारा देण्यात आला आहे.

महा विकास आघाडी सरकारच्या काळात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ रिपाईचे आंदोलन- रामदास आठवले

  *महा विकास आघाडी सरकारच्या काळात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ रिपाईचे आंदोलन- रामदास आठवले 

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे (नातेपुते) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकार च्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉक डाऊन च्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.बौद्ध आणि  दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी  तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या दि.11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय; तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. 
हे निषेध  आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून  करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. 
राज्यात दलितांवरील वाढत्या  अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध   आंदोलन करण्यासाठी दि. 11 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे.दि.11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट  गोळीबार  करण्यात आला. त्यात 11 जण शाहिद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ  आंदोलन करते. त्यामुळे दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी माध्यमांना दिली आहे. 

बौध्द अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये*

वळवल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा एन डी एम जे चा इशारा

प्रमोद शिंदे (नातेपुते शासनाकडील बौद्ध अनुसूचित जाती जमाती हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये वळवल्या महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उप विभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य विकास दादा धाइंजे व एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून दिला आहे.
माजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती,बौद्ध घटकांकरिता व त्यांच्या प्रगतीचा असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी (बजेट) कोरोना covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी,महसूल,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य व वनविभागाचा हजारो कोटी रुपये निधी शासनाकडे आहे
कोरोनाच्या कोविड 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे उदरनिर्वाहाचे साधन फक्त मजुरी असल्याने दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून अनेक कुटुंब फक्त भात खाऊन उपाशी झोपत आहेत.अनेक कुटुंब उपासमारीने आत्महत्या करीत आहेत.तर अन्याय अत्याचाराने परमोच्च बिंदू गाठला आहे.
त्यामुळे बौद्ध,अनुसूचित जातीतील नागरिकांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा व त्यांच्या योजनांसाठी वापरण्यात येणारा अर्थसंकल्पीत निधी महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू किंवा अन्य कारणे सांगून वळवू नये
याउलट सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबवाव्यात विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या वेळेवर द्याव्यात,मिनी ट्रॅक्टर ऐवजी मोठे ट्रॅक्टर द्यावेत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची व्याप्ती वाढवून चालू बाजारभावाप्रमाणे जमिनी विकत घेऊन अथवा शासनाच्या ताब्यातील जमिनी भूमिहीनांना द्याव्यात.एट्रॉसिटीऍक्ट अंतर्गत अत्याचारात बळी पडलेल्या पीडितांना तात्काळ अनुदान वितरीत करावे. प्रत्येक तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेचा,रमाई आवास योजनेचा निधी वर्ग करावा .
माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर वर्ग करावी
कोरोना कोविड 19 या विषाणूचे कारण देत जर बौद्ध,अनुसूचित जाती,जमातींचा (दलित-आदिवासींचा)प्रगतीचा निधी वळवण्याचा प्रयत्न केला किंवा जाणूनबुजून अखर्चित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस व सर्व पुरोगामी विचारांच्या संस्था संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील याची असा इशारा वैभव तानाजी गिते
विकास दादा धाइंजे उपविभागीय दक्षता समिती सदस्य, वैभव तानाजी गीते राज्य सचिव एन डी एम जे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन वर विकास धाईंजे, वैभव गिते, राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा एम पी पी एस जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे, सोलापूर जिल्हा सचिव वैभव काटे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ताा कांबळे आदींच्या सह्या आहेत.

विकास दादाधाइंजे सदस्य उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती माजी सरपंच माळशिरस
वैभव तानाजी गीते राज्य सचिव एन डी एम जे
अनुसूचित जाती जमाती बौद्ध घटकांचा निधी कोणासाठी वळवू नये त्यासंदर्भात एनडीएचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन

  • रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- सोमवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने दूध दरवाढीसाठी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे.
दूध उत्पादकांना सध्या स्थिती मध्ये २० रुपये इतका दर मिळत आहे माजी.दुग्ध मंत्री महादेवजी जानकर साहेब मंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मध्ये ३५ रुपये इतका प्रति लिटर दर मिळत होता त्यामुळे शेतकरी जोमात होते सध्या या शासनाच्या काळात मिळणाऱ्या दरातून दुधाचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे दुधाला जास्त दर मिळणे गरजेचे आहे दूध उत्पादकांची स्थिती फार बिकट झाली आहे.दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा,जगविण्याचा खर्च मात्र थांबत नाही.उलट चारा,सरकी पेंड,पशुखाद्य, औषधे उपचार यासह सर्वच बाबींचा दर वाढल्याने दूध उत्पादकाचा खर्च दीडपट झाला आहे. विक्रीचे दर पडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना रोज तोटा सहन करावा लागत आहे.या सर्व बाबींचा विचार करून गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा व तालुका प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदनही देण्यात आले होते.परंतु राज्य शासनाने अद्याप कोणतेही ही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी व दुग्ध व्यवसाय यांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ए.एल.अक्कीसागर साहेब,माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब,बाळासाहेब दोडतले मा.अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ,मा.नितीनजी धायगुडे, अण्णासाहेब रुपनवर प्रदेश सरचिटणीस, माणिकराव दांगडे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, माऊली सलगरसाहेब पच्शिम महाराष्ट्र प्रभारी यांच्या आदेशाने आंदोलन छेडण्यात येणार आहे तसेच सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी 11:00 वाजता माळशिरस तहसील कार्यालय राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली सरक यांचे कडून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले की पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 35 रुपये दर व 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या मागणीसाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष माऊली सरक यांनी माहिती दिली.

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 3 – निसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून त्या मदतीत वाढ करावी. मागील महिन्यात दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला त्यात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले.त्यां पैकी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने राज्य सरकार वर कोकणवासीयांनी बाळगलेल्या अपेक्षांचाभंग झाला आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने घरांचे नुकसान झलेल्यांना केवळ दीड लाख रुपये मदत जाहीर केली असून ती रक्कम अल्प असून त्यात वाढ करून 3 लाख रुपये घर बांधणीसाठी द्यावेत. तसेच या वादळात रायगड जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना केवळ 4 लाख रुपये सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आले असून त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. घरांची अल्प पडझड झलेल्यांना केवळ 15हजार मदत जाहीर केली असून त्यात वाढ करून 40 हजार मदत देण्यात यावी.भातशेती सारख्या पिकांना हेक्टरी 50 हजार अल्प मदत जाहीर करण्यात आली असून त्यात वाढ करून 1 लाख रुपये नुकसान भरपाईसाठी मदत देण्यात यावी. तसेच आंबा; सुपारी; नारळ या बागांना वृक्षनिहाय नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच बागांची नुकसान भरपाई देताना केवळ 1 वर्षाचा विचार न करता वृक्षनीहाय किमान 3 वर्ष ते 10 वर्षांचा विचार करून बागांची नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी.निसर्गचक्रीवादळाने कोकणाला तडाखा देऊन 1 महिना झाला तरी आद्याप वादळग्रस्तांना पुरेशी मदत न मिळणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोकणवासीय वादळग्रस्तांची राज्य शासनाने उपेक्षा केल्याचे द्योतक आहे असा आरोप ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार वर केला आहे.

         

You may have missed