Uncategorized

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पटवर्धन कुरोली येथील  बंधार्‍यावरून  भीमा नदीच्या पात्रात  उसाचा ट्रॅक्टर कोसळला याबाबत हकीकत अशी की चालकाचा ताबा सुटला अन् ट्रॅक्‍टर ट्रॉलींसह भीमा नदीत कोसळला ; चालक गंभीर जखमी; “दलित महासंघ युवा आघाडी माळशिरस तालुका प्रमुख “प्रदीप नाईकनवरे यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखाना, लि श्रीपुरचे कार्यकारी संचालक मा यशवंत कुलकर्णी यांना आवे ते जांभुड बंधा-यावरून होत. असलेली ऊस वाहतुक बंद करण्याचे लेखी निवेदन दि 6/11/2020,तसेच दि 13/12/2020 निवेदन दिले होते व दि 7/12/2020 रोजी धरणे आंदोलन केले होते परंतु कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी वाहतुक बंद करण्याचे  लेखी अश्वासन दिले होतो परंतु या उलट यशवंत कुलकर्णी हे वाहतुकदारास पाठीशी घालत असुन  पदाचा गैरवापर करत आहे .अशी माहित प्रदीप नाईकनवरे यांनी दिली व कारखाना प्रशासना विरूद्ध आंदोलनाचा  इशारा दिला आहेकोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून जड वाहतूकीसाठी बंदी असताना ही जड वाहतुक  सुरू आहे  यामध्ये चालक सतीश कडाळे (रा.भोसे, ता. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.मंगळवारी (ता. 15) दुपारी अडीचच्या सुमारास हा ट्रॅक्‍टर बंधाऱ्यावरून जात होता. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्‍टर व दोन ट्रॉलींसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे.खेडभोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुखे यांचा हा ट्रॅक्‍टर असून, तो ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. या ट्रॅक्‍टरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रॅक्‍टर चालक बराच काळ उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून पडला होता. अपघात झालेला पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी त्याला बाहेर काढले. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.बंधाऱ्यावरून जड वाहतुकीसाठी बंदी असताना सुद्धा येथून मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, ऊस वाहतूक केली जाते. या वाहतुकीमुळे या बंधाऱ्यावर अनेक वेळा अपघात घडले आहेत. या बंधाऱ्यावरील जड वाहतूक बंद करावी यासाठी दलित महासंघ युवा आघाडी माळशिरस तालुका प्रमुख प्रदीप नाईकनवरे यांनी  अनेक वेळा निवेदनेही दिली आहेत; मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष घातलेले नाही.दलित महासंघ  आक्रमकबंधाऱ्यावरून वाळू, खडी, मुरूम व दगड आदींचे वाहतूक होत आहे. यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या वाहतुकीमुळे बंधाऱ्याला भेगा पडलेल्या आहेत. या बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा. जड वाहतूक बंदी करावी, अशी मागणी वेळोवेळी पाटबंधारे विभागाकडे करूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. जड वाहतूक बंद न केल्यास दलित महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.असा इशारा प्रदीप नाईकनवरे यांनी दिला

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –महाळुंग  (ता. माळशिरस) येथील माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना तालुकाध्यक्ष उदय साळुंके साहेब यांच्या मातोश्री शालन तुकाराम साळुंखे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. १७/१२/२०२० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार  महाळुंग पायरी पूल येथे करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुःख निधनाने माळून परिसरात शोकाकुल पसरले आहेत.

स्कायवॉकवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १० संशयित ताब्यात

स्कायवॉकवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १० संशयित ताब्यात

कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर तरुणीची छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर जागे झालेल्या कल्याण पोलिसांनी या स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन करून १० संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव कल्याण ठाणे – सरकार कोणाचेही असो त्यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत केवळ हमी देण्यात येते, मात्र अध्यापही महिलांचे असुरक्षीततेचे भय संपलेले नाही. त्यामुळे आजही महिलांना ‘पावला पावला वर असते भय, अन म्हणे संरक्षणाची केली सोय’ असा परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर समोर आला होता. या स्कायवर एका तरुणीची छेड काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यामध्ये ८० पोलिसांच्या ताफ्याने १० संशयितांना ताब्यात घेतेले. मात्र आजही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.

.. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नाहीच-

देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार, छेडछाडी, अन्याय प्रकणारात दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा केला. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नसल्याचे समोर आले आहे.

स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य –
कल्याण पूर्व पश्चमेला जोडणारा स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य बनला आहे. परवा रात्रीच्या सुमारास स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका तरुणीचा गर्दुल्ल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने केलेल्या आरडाओरडामूळे जमा झालेल्या नागरिकांनी या गर्दुल्ल्याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार समोर आला होता. परवाचा छेडछाडीचा हा प्रकार घडून 24 तासही उलटत नाहीत तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता.
कल्याण स्कायवॉकवर लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्कायवॉक आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळेस घडलेल्या या दोन्ही गुन्हेगारीच्या गंभीर घटनांनंतर तरी प्रशासन जागे आणि बुधवारी सायंकाळच्या सुमारास ८० पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन १० संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

धनगर आरक्षण ना ला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध

धनगर आरक्षण ना ला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध
मुंबई येथे चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशना दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क -आमदार व महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षणा बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात मध्ये विधान भवन मध्ये जात असताना प्रशासनाने त्यांना गेट वरती आडवून धनगराचे भूषण असणारा ढोल हिसकावून घेतला व त्यांना धक्काबुक्की करण्यात आली याचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी नायब तहसीलदार तूषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब सरगर सोपान नारनवर बाळासाहेबवावरेे नागेश वाघमोडे युवराज वाघमोडे दादासाहेब खरात गणेश वगरे आदी मान्यवर उपस्थित होते
या निवेदनामध्ये महा विकास आघाडी सरकारने पुर्वी लागू केलेल्या महामेश शेळी मेंढी खरेदी योजनेसह 22 योजना देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केल्या होत्या व धनगराच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती त्यापैकी एक रुपया या सरकारने खर्च केला नाही व धनगर आरक्षणा बाबतीमध्ये एक वर्षांमध्ये एक बैठक अथवा एक चकार शब्द सुद्धा काढला नाही याचा निषेध म्हणून हे निवेदन देण्यात आले यापूर्वी भाजप सरकार सत्तेमध्ये असताना अजित पवार जयंत पाटील धनंजय मुंडे हे धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात मध्ये विधान भवनामध्ये प्रवेश करून निवेदन दिले परंतु त्यांना त्यावेळी प्रशासनाने आडवले नाही आज मात्र गोपीचंद पडळकर यांची अडवणूक करून हे सरकार धनगर समाजाची जाणून-बुजून जाणून-बुजूवन अडवणूक करत असल्याचे दिसत
आहे

शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट

शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुरोगामी विचार परखडपणे मांडणारे प्रख्यात शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट दिली त्यांच्या हस्ते पुरोगामी विचारांच्या महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक शांत खरात यांच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत केल्याबद्दल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रणव थोरात व प्राध्यापक विक्रम मगर उपस्थित होते.

विश्वभुषण भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण कृती पुतळया संदर्भात बैठक


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेरााव कल्याण- कल्याण पूर्व प्रभाग क्षेत्रात पुर्ण कृती पुतळ्या संदर्भात दि.10 डिसेंबर रोजी लोकसभा ठाणे जिल्हा-कल्याण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली नगरसेवक महेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील डोंबिवलीत बैठक पार पडली
सदर बैठकीत पुर्णकृती पुतळ्या साठीआवश्यक आसलेला निधी संदर्भात चर्चा केली आसता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाचकोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे बैठकीत असलेल्या आंबेडकरी अनुयायीनां सांगितले
त्या प्रसंगी दलित मित्र अण्णा रोकडे,

महादेव रायभोले,मिलिंद बेळमकर,विवेक जगताप, भारत सोनवणे,भारती जाधव, शोभाताई केदारे,ललिताआखाडे,शेखर केदारे,सुमेध हुमणे,प्रशांत बोटे,अतिष गायकवाड, मनिष बनकर,इत्यादी उपस्थित होते

*भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ अभिवादनास प्रतिबंध नको.* *(योग्य उपाययोजना कराव्यात,) डॉक्टर राजन माकणीकर


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क मुंबई दि (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यापासून अनुयायांना रोकू नये. ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंबेडकरी रोषाला सामोरे जाल असे मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यंक्त केले.

कोरोना सदृश्य स्तिथी पाहता देशासह सर्वत्र विविध उपाययोजना करण्यात आल्या व येत आहेत, सर्व प्रार्थना स्थळे सरकारने उघडी ठेविली असून सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचा सरकार विचार करत आहे, किंतु आंबेडकरी अनुयायांचे सर्व उत्सव व अभिवादन घरात बसून करा असे सांगत आहे या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करत असल्याचेही डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

14 एप्रिल 20 रोजी महामानव विश्वरत्न डॉ. आंबेडकर म्हणजेच भीम जयंती उत्सव, बुद्ध पौर्णिमा, अशोक विजयादशमी दसरा प्रामुख्याने बौद्धांचे प्रमुख उत्सव साजरे करण्यास सक्तीने बंदी आणली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनि अभिवादन करण्यास मज्जाव केला, अनुयायांनी शांत बसून घरातूनच उत्सव व अभिवादन केले, मात्र: आता सरकारने 1 जानेवारी 2021 ला भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यास रोखू नये.
अशी इच्छा डॉ माकणीकर यांनी व्यक्त केली.

अभिवादन करण्यास एक नियमावली बनविण्यात येऊन जागोजागी सरकारने सॅनिटायजर चे फवारे उभारावेत, अभिवादन करण्यास रोखण्याऐवजी अनुयायांच्या अस्मितेचा प्रश्न जाणून भावणेचा सन्मान करावा व योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा सरकार वरील आंबेडकरी अनुयायांचा रोष लवकरच उद्रेक घेईल अशी भीती डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

आंबेडकरी जनता भोळी भाबडी असली तरी शिक्षित आहे, त्यांना प्रसंगावधान कळते, त्यामुळे सरकारने आंबेडकरी अनुयायांबाबत साशंकता बाळगू नये, त्यांना विनम्रपणे अभिवादन करू द्यावे पोलिस बळाचा व कायद्यांच्या कलमांचा वापर करून दबावतंत्राणे आंबेडकरी अनुयायांना वेठीस धरू नका योग्य त्या उपाययोजना करा अन्यथा आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जाल असा इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिला आहे.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महाराष्ट्र व पुणे जिल्हा कार्यक्रणीच्या उपस्तिथीत शेकडो डेमोक्रॅटिक रिपब्लिकन्स कार्यकर्ते अभिवादन करणार असून असेल हिम्मत तर कार्यकत्यांना रोखून दाखवावे असेही आवाहन डॉ. माकणीकर व कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड यांनी केले आहे.

भाजपचे आमदार किसन कोथोरे यांच्या गाडीच्या अपघाताने दुचाकीस्वार जागीच ठार

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण संदेश भालेरावठाणे जिल्हा-मुरबाड मतदार संघातील भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या कारने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे , तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील दहा गाव आपटी रस्त्यावर घडली असुन घटना स्थळी कल्याण पोलिस दाखल झाले असुन

कार मधील जखमी आणि मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकी वरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे मात्र अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होउन दुचाकी वरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे

                                        

मंत्रालयात रंगीबेरंगी पोशाखाला बंदी केल्याने मला मंत्रालयात प्रवेश मिळेल का? केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा मिश्किल सवाल


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 13 – महाराष्ट्र राज्यसरकारने  मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल ? असा मिश्किल सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. 
ना. रामदास आठवले हे रंगीबेरंगी नक्षीकाम वाले पोशाख परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मीश्किलीपणे खुसखुशीत विनोद करण्यात ही ते प्रसिध्द आहेत. त्यानुसार मंत्रालयात ड्रेसकोड च्या बातमीवर ना.रामदास आठवले यांनी मिश्किलपणे आपल्याला मंत्रालयात प्रवेश मिळेल का असा  प्रश्न विचारला आहे.    
         

अवैद्य दारू विक्री करणाऱ्यां वर कडक कारवाई केली जाईल- एपीआय मनोज सोनवलकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे व व परिसरात  अवैधरित्या चोरून दारूविक्री सुरू असल्याने पिरळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम बुधावले यांनी उत्पादन शुल्क  सोलापूर  व नातेपुते पोलीस स्टेशन यांना पिरळे येथे चोरून मोठ्या प्रमाणात दारू विक्री चे धंदे सुरू असले बाबत तक्रार केली असता नातेपुते पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी चोरून दारू विक्री करणार्‍यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले तसेच ते म्हणाले असे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधा दारू विक्री करणाराचा लगेच बंदोबस्त केला जाईल  असे सांगितले.

You may have missed