माळशिरस तालुका

भाजप मध्ये घराणेशाहीला स्थान नाही- जलसंधारण मंत्री गिरीश महाजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व शेकडो कार्यकर्त्यांसह बाबाराजे देशमुख यांचा SND स्कूलच्या भव्य मैदानावर जल्लोषात भाजपा पक्ष प्रवेश.

सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील बडे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख हे पूर्वी मोहिते पाटील यांचे प्रामाणिक कट्टर समर्थक समजले जाणारे यांनी मोहिते पाटील यांना राम राम ठोकत हजारोंच्या संख्येने व जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण,औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन, मा.खासदार रणजीत सिंह निंबाळकर,मा.आमदार राजन पाटील,मा.आमदार राम सातपुते, व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करत जय श्रीराम केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की भाजप मध्ये घराणेशाहीला कोणतेही स्थान नाही,जो कार्यकर्ता मन लावून पक्षाचे कार्य करतो पक्ष त्याला योग्य संधी देत असतो.भाजप मध्ये छोट्यात छोट्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळतो याचे उदाहरण घ्यायचे तर रेल्वे स्टेशन वरती चहा विकणारे नरेंद्र मोदी तीन वेळा पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत.मी स्वतः एका सामान्य घरातील एका शिक्षकाचा मुलगा पण पक्षाचे प्रामाणिक काम करत राहिल्यामुळे मी सात वेळा आमदार तर तीन वेळा मंत्री पदावर आहे.या भागातील लोकप्रिय नेते बाबाराजे देशमुख हे पक्षात आल्यामुळे आम्हा सर्वांनाच मोठा आनंद झाला आहे. तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते सारखा दमदार नेता तुम्हाला लाभला आहे त्यांच्या हातून इथून पुढे नक्कीच मोठे काम घडणार आहे. बाबाराजे देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,माजी आमदार राम सातपुते यांनी माझा भाजप पक्ष प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जेवढे उमेदवार उभे राहतील ते पैकीच्या पैकी निवडून आणणार निश्चितच पश्चिम भागातील विकासासाठी प्रयत्न केले जातील.   माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की  पुढच्या काळात बाबाराजे देशमुख यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी उभी राहील मालोजीराजे,रणवीर देशमुख यांना सोबत घेऊन पुढे चालू तुम्ही जिथे असता तिथे डबल,टिबल नसतं सगळं काही समोरा समोर असतं.ज्या अकलूज येथे निवडणुकीत भाजप साठी बूथ वर बसायला कार्यकर्ते नसायचे आज त्याच अकलूज मध्ये चार नगरसेवक निवडून आणलेत.मोहिते पाटलांनी कार्यकर्त्यांना कधीच मोठे होऊ दिले नाही.आम्ही अकलूज मध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन उमेदवार निवडून आणले दहा हजार भाजपला मते मिळाली .माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमिपूजन येत्या काळात लवकरच होईल एमआयडीसी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज साठी प्रयत्न सुरू.तसेच धनगर आरक्षण कृती समिती अध्यक्ष हनुमंत सूळ,माजी सरपंच भानुदास राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख यांनी तर मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच,नगरसेवक  भानुदास राऊत यांनी व आभार भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र पांढरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे,प्रकाश पाटील,तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व नेते मंडळी हजारोंची संख्येने उपस्थित होते.

बाबाराजे देशमुख यांच्या उद्या होणाऱ्या भाजपा जाहीर पक्ष प्रवेशची जय्यत तयारी पूर्ण.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख व त्यांचे सहकारी यांचा उद्या शनिवार दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश होणार असून त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या प्रवेशासाठी जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते व अनेक भाजपाचे प्रतिष्ठित मान्यवर नातेपुते ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत.बहुसंख्य कार्यकर्त्यांसह .शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांचा जाहीर प्रवेश सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता एस एन डी इंटरनॅशनल स्कूल च्या भव्य मैदानावर संपन्न होणार असून
त्यांचे सहकारी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे मागच्या काही दिवसांपूर्वीच बाबाराजे यांनी जाहीर सभा घेऊन सहकाऱ्यांशी संवाद साधत नातेपुते गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जंगी जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मालोजीराजे देशमुख व समर्थक यांच्या वतीने या सोहळ्यास कार्यकर्त्यांना जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे.

संविधान अमृत महोत्सव साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी व पुणे जिल्ह्यातील जाती-अत्याचारात खून झालेला 111 कुटुंबियांच्या वारसांना तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले…वैभव गिते

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने
शासन निर्णय काढून संविधान अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये दैनंदिन उपक्रम,कार्यक्रम राबवून साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
परंतु दुर्दैवाने पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम 26 नोव्हेंबर 2025 पासून घेण्यात आलेली नाहीत.
यामुळे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे संघटना आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी यांची भेट घेऊन संविधान अमृत महोत्सव साजरा न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्राचार्य,शिक्षक,ग्रामसेवक,गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी प्रांताधिकारी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्य सचिव वैभव तानाजी गिते, राज्य सह सचिव पी.एस.खंदारे, राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर, सुनीता गरुड, लक्ष्मी ताई वाघमारे, डॉ.आम्रपाली मोहिते व पदाधिकारीभारतीय संविधान अमृत महोत्सवाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर अभियान राबवले जात आहे.
परंतु पुणे जिल्ह्यामध्ये संविधान अमृत महोत्सवाचा एकही कार्यक्रम शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये व ग्रामपंचायती गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये राबवलेला नाही.
यासाठी प्रांताधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी हे जबाबदार आहेत.पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व नगरपालिका शासकीय निमशासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम दररोज दैनंदिन होण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजाच्या बाहेर आढळून
जाब विचारला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या दोन महिन्यांमध्ये संविधान अमृत महोत्सवाचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्याबाबतचा शासन निर्णय आल्याने हे कार्यक्रम करणे प्रांताधिकारी,तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या वरती बंधनकारक आहे.
परंतु शासन निर्णय आल्यापासून आज अखेर पर्यंत 26 नोव्हेंबर संविधान दिनाचा नाममात्र कार्यक्रम सोडल्यास संविधान अमृत महोत्सवाचा एकही कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये साजरा झाला नसल्याने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या वरती फौजदारी कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
तहसीलदार गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करावी संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम करावेत. असे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत तात्काळ संबंधित सर्व विभागांना आदेश देण्यात येतील व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येईल असे आश्वासन एनडीएमजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

जि प शिक्षक साळवे दापत्यांचा सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे व त्यांच्या पत्नी सौ.माया काटे/ साळवे या दांपत्याने आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. नेहमीच दरवर्षी हे साळवे दांपत्य विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात. गेली 25 वर्ष हे विविध उपक्रम राबवत आहेत.यावर्षी त्यांनी संपूर्ण कुटुंबा समवेत पंढरपूर नजीक असलेले गोपाळपूर येथील मातोश्री वृद्ध आश्रमातील वृद्धांना भोजनदान देऊन आपला वाढदिवस वृद्धांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला. वृद्धाश्रमातील वृद्धांनी या दापत्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे औक्षण करून उत्साहामध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला.नेहमीच ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच वृक्षारोपण अशा विविध प्रकारे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात.वर्षभरात एक ते दीड लाख रुपये विविध सामाजिक उपक्रमासाठी ते खर्च करत असतात त्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक व इतर पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे.त्यामुळे पंचक्रोशीत दादासाहेब साळवे सर व त्यांच्या पत्नी माया साळवे/काटे मॅडम यांचे नेहमीच कौतुक होत असते दादासाहेब साळवे सर हे सध्या जि प शाळा पाठक वस्ती मांडवे येथे कार्यरत असून सौ.माया काटे साळवे मॅडम ह्या जिप शाळ एकशिव या ठिकाणी कार्यरत आहेत. 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने पिरळेत विविध कार्यक्रमाने संविधान साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पिरळे ता.माळशिरस येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने २६ नोव्हेंबर भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रम घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते व आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली, गावातून संविधान रॅली काढून घरो घरी संविधान उद्देशिका देण्यात आली.तसेच वैभव गिते यांचा 889 पिढीताना शासकीय नोकरी मिळवून दिल्या बाबत ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचा भारतीय संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच 126 वृक्षांचे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप,शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तकाचे वाटप,मोफत डोळे तपासणी व मोतीबंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच माळशिरस तालुक्यातील एमपीएससी परीक्षेत पास होऊन प्रशासकीय अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व केक कापून 26 नोव्हेंबर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी व पिरळे येथील शहीद झालेले सुपुत्र सुभेदार अरुण पालेकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.यावेळी राज्यसचिव वैभवजी गीते बोलताना म्हणाली की पुरोगामी महाराष्ट्र परिवाराने संविधानाला अभिप्रेत असा देखण कार्यक्रम घेतलेला आहे प्रमोद शिंदे आणि त्यांचे सहकारी असे कार्यक्रम घेऊन पिढी घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम बोलताना म्हणाल्या आज मी या पदावर आहे ते केवळ फक्त संविधानामुळे व महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच, संविधानाने आपण कसं राहावं याचे आपल्याला नियम घालून दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे ,माजी सरपंच संदीप तात्या नरोळे, पोलीस पाटील औदुंबर बुधवले, एम पी एस सी स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी सागर केशव रणनवरे(सहायक संचालक -वित्त व लेखा),दिपाली शिवाजी खरात (सहायक राज्यकर आयुक्त) माळशिरस तालुक्यातील पहिली पायलट कल्याणी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच
शितल नारायण वाघमोडे (CBSC अधीक्षक)
काजल भोसले (राजपत्रित अधिकारी) यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उद्देशिकेचे वाचन रॅलीचे आयोजन प्रा.मुख्याध्यापक संजय ढवळे सर यांनी केले.
याप्रसंगी विस्ताराधिकारी कादर शेख,मुख्याध्यापक मंदाकिनी सुतार मॅडम,दादासाहेब साळवे सर, सरपंच अमोल शिंदे, मोहन पवार,अध्यक्ष आशा बुधावले, प्रशांत खरात,विश्वास बनकर,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, हनुमंत धाइंजे, तसेच शिक्षक स्टाफ विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन हनुमंत फुले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत फुले सर संजय ढवळे सर,मीना शेंडगे मॅडम,अमोल खरात सर,पाटील सर, शिंदे मॅडम, फुले मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त पिरळे येथे विविध कार्यक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

– पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार व जि प शाळा पिरळे यांच्या संयुक्त विद्यमाने पिरळे ता.माळशिरस येथे26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे.यामध्येमोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 126 वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,सर्व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पुस्तक संच वाटप,संविधान प्रति,प्रास्ताविक व पुस्तकांचे वाटप,खाऊ वाटप. तसेच भव्य संविधान रॅलीचे आयोजन करून घर घर संविधान प्रचार , 26/11/2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना मानवंदना,शहीद सुभेदार अरुण पालेकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना,संविधान जागर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा,दादासाहेब चषक 2025 क्रिकेट स्पर्धेतील सहभागी संघांना संविधान ट्रॉफी वितरण.निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण माळशिरस तालुक्यातील MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा. या कार्यक्रमास उपविभागीय प्रांताधिकारी विजया पांगरकर मॅडम, विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके साहेब, आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी पांढरे साहेब, गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम,तहसीलदार जावीर साहेब, एपीआय महारुद्र परजणे, माळशिरस तालुका वकील संघटना सचिव एडवोकेट सुमितजी सावंत साहेब, सर्व पत्रकार बंधू, उपकार्यकारी अभियंत नातेपुते सुभाष टोणपे, विद्युत नियमक मंडळ आयोग सदस्य एस यु बाविस्कर,तसेच एम.पी.एससी परीक्षा मधून नवीन अशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेले, सागर रणवरे मानकी, दिपाली खरात गिरवी,काजल भोसले फोंडशिरस, प्रदीप गोरड गोरडवाडी, वैमानिक कल्याणी शिंदे शिंदेवाडी, आजी-माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक,तलाठी, विविध क्षेत्रातील मान्यवर.शालेय समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक बांधव,मोठ्या संख्येने ग्रामस्थ,विद्यार्थी यांच्या  उपस्थित भव्य कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सकाळी दहा वाजता सुरू होईल.

तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत पिरळे व दहिगाव शाळेचा प्रथम क्रमांक


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभाग यांच्या वतीने गुणवंत शोध चाचणी अंतर्गत तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील विविध केंद्रातील लहान गटात विस संघ मोठ्या गटात बारा संघ असे एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तर दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजेते संघाचे नृत्यशिक्षक हनुमंत फुले सर,व राजेश भांबरे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच
मोठा गट
द्वितीय क्रमांक – जि.प.शाळा- तुपेवस्ती*
तृतीय क्रमांक- जि प शाळा- निमगांव (म)*उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि प शाळा- बाभुळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि प शाळा धर्मपुरी उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा पानीव
लहान गट
प्रथम क्रमांक – जि.प.शाळा- दहिगांव
द्वितीय क्रमांक – जि.प.शाळा- तांदूळवाडी
तृतीय क्रमांक- जि प शाळा- कन्या नातेपुते
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि प शाळा- बाभुळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि प शाळा विठोबा पाटील वस्ती
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा वटपळी यांनी
पटकावला विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच त्याच ठिकाणी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून,उपस्थित बीट विस्ताराधिकारी श्री सिद्धेश्वर भरते साहेब, सरपंच अमोल शिंदे,माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,उपसरपंच संदीप वाघ सर, पोलीस पाटील औदुंबर बुधावले,पत्रकार प्रमोद शिंदे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आशा बुधावले, सुदाम बुधावले,उपाध्यक्ष पांडुरंग कोकरे, महादेव होळकर,शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य,ग्रामस्थ तसेच परिसरातील केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी मोरे मॅडम, संजय ढवळे सर ,पाटील सर, फुले मॅडम, पुनमशेंडगे मॅडम, पाटील मॅडम यांनी कळऺबोली केऺद्रातील प्रमोद सोनवळ सर,सचिन बरडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत फुले सर, अमोल खरात सर यांनी केले.तर परीक्षक
म्हणून नागेशजी दीक्षित सर,निखील माने सर व सौ आशाताई टोमके यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर येथील मंडप मधील विद्यार्थी व शिक्षक संजय ढवळे सर यांनी डीजेच्या तालावर डान्स करत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

दहिगाव येथे वार्षिक रथयात्रा 2025 उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सव
कार्तिकी वद्य सप्तमी मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
रथोत्सवाची सुरुवात सकाळी श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन भव्य पाच मजली धर्मरथामध्ये मूर्ती विराजमान करण्यात आली. पाच मजली भव्य दिव्य लाकडी सजवलेल्या धर्म रथामध्ये भगवान महावीर यांची मूर्ती विराजमान करून पारंपारिक वाद्य बँड यांच्या साह्याने वाजत गाजत, अहिंसा परमधर्म की जय, भगवान महावीर की जय घोषात ग्रामप्रदक्षिणा करत तो धर्म रथ पंडितांच्या माळावरती नेण्यात आला या धर्मरथासोबत. श्री १०५ गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व श्री १०५ अतिशयकारी विगुन सागरजी महाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले.या धर्म रथाच्या पुढे भाविकांनी गरभा पारंपारिक नृत्य करून भगवान महावीरांचा जयघोष केला.हा धर्म रथ दहिगाव परिसरातील व सर्व जाती धर्मातील मानकरी लोकांनी भगवान महावीरांचा जयघोष करत पंडितांच्या माळावरती दोरीच्या साह्याने ओढत नेला आलेल्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली या रथयात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.या धर्म रथ उत्सवास भेट देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनाली ताई गोरे,दहिगाव च्या सरपंच सोनम ताई खिलारे, शिवप्रसाद फाउंडेशनचे चेअरमन शरद बापू मोरे, माजी जि प सदस्य ऋतुजाताई मोरे व अनेक मान्यवरांनी भेट दिली.जैन बांधवांच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला. पंडितांच्या माळावरती सभामंडपाचे उद्घाटन होऊन. पुढच्या वर्षीच्या रथ उत्सवा साठी संगीतमय चढाव्यांच्या बोली घेण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना व मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी श्री 105 गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व विगुन सागरजी महाराज यांनी प्रवचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद दिले हा रथ उत्सव यशस्वी होण्यासाठी अतिशय क्षेत्र दहिगाव येथील सर्व विश्वस्त व समस्त जैन बांधव यांनी परिश्रम घेतले. तसेच अहिंसा सेवा समिती,स्व. राजेंद्र रत्नशेखर डूड्डू परिवार यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना अल्प उपहार देण्यात आला. तसेच जीवन सहारा परिवाराच्यावतीने 500 फळझाडांची रोपे मोफत वाटप करण्यात आली.

मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही गावच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय -मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख

नातेपुते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)
पूर्वी पासून मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे मोहिते- पाटील जातील तिकडे त्यांच्यासोबत असायचे परंतु गेल्या वर्षभरापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात गुप्त चर्चा होत होती परंतु काल पुढील राजकीय दिशा ठरवणे बाबत विचार विनिमय बैठकीत बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की,गावच्य विकासासाठी मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय तुम्हा सर्वांना विचारून घेत आहे कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी मी भाजपमध्ये जात नसून फक्त आणि फक्त नातेपुते गावचा विकास व गावासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात,राज्यात भाजपची सत्ता आहे.गेली 10-12 वर्षात भाजपने विकासाचे काम केले असून त्या माध्यमातून नातेपुतेसाठी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करू,मला अनेक पक्षाचे निमंत्रण होते परंतु मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रामभाऊ सातपुते यांचा मुंबईमध्ये वजन आहे नातेपुते च्या विकासासाठी रामभाऊ सातपुते व माजी खासदार निंबाळकर यांना पाठबळ देऊन नातेपुते गावचा विकास करून चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू येत्या 18 ते 20 तारखेला प्रवेशाचा जंगी कार्यक्रम होईल असे सांगितले.यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे बोलताना म्हणाली केंद्रात आणि राज्यात रिपाई आणि भाजप महायुती असून इथे सुद्धा गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आसू, तसेच अकलूज येथील सुजयसिंह माने- पाटील बोलताना म्हणाले की बऱ्याच दिवसापासून बाबाराजे आमच्या सोबत भाजपमध्ये यावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले इथून पुढे रामभाऊ सातपुते यांच्यासोबत मिळून विकासाचे काम करू तसेच अनेकांनी बाबाराजे यांना भाजपने योग्य तो मानसन्मान देऊन विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. किशोर पलंगे, सतीश सपकाळ, प्रकाश साळवे, बशीर काजी,अभिजीत वाळके सर, प्राध्यापक पिसे सर, महेश शेटे ॲड.शिवाजी पिसाळ,धनंजय भोसले,राहुल पद्मन,अनिल माने, सागर इंगवले यांनी बाबाराजे देशमुख यांच्या समर्थनात मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,रणवीर देशमुख मित्र परिवार यांनी केले.याप्रसंगी नातेपुते आणि परिसरातील बाबाराजे देशमुख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबाराजे देशमुख यांच्या तिसऱ्यांदा भाजपा प्रवेशाने माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे तसेच मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर गटाला मोठा धक्का बसणार असून भविष्यात नातेपुते येथे मोहिते- पाटील व जानकर गट कोणत्या नेत्याला ताकद देणार हा येणारा काळच ठरवेल

दहिगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्नरथोत्सवा निमित्त २५ वर्षांची परंपरा; ५५० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक१० नोव्हेंबर 2025  रोजी भव्य मोफत नेत्र, सांधे प्रत्यारोपण, आणि हृदयरोग उपचार शिबिर. ॲड. श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन, मुंबई आणि श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर अतिशय क्षेत्र, दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दहिगाव येथे रथोत्सवानिमित्त सार्वजनिक शिबिर आयोजित करण्याची गेली २५ वर्षांची परंपरा असून, यंदाचा हा २६ वा सामाजिक उपक्रम होता.शिबिराचे उद्घाटनसकाळी ९:३० वाजता दहिगाव येथील श्री जंबुकुमार गौतमचंद दोशी गुरुकुल येथे या शिबिराचे उद्घाटन झाले. मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथील डॉ. विशाल मेहता आणि संदीप विलासचंद्र दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.शिबिराचे वैशिष्ट्ये या शिबिराला श्री १०५ अतिशयकारी विगुनसागरमहाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले विकून सागर जी महाराज बोलताना म्हणाली की डॉक्टर हे शरीराचे इलाज करत असतात संत हे आत्म्याचे इलाज करतात दोन्ही इलाज खूप महत्त्वाचे आहेत याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे.शिबिरात ५५० हून अधिक रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तपासणी तसेच उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत यामध्येहृदयरोग शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण मुतखडा आणि प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया मशीनद्वारे डोळे तपासणी आणि चष्मा वाटप डोळ्यांचे ऑपरेशनतपासणी केलेल्या रुग्णांना साधारण एक लाख रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली, तसेच १०० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. पुढील मोफत शस्त्रक्रियाया शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी: साधारण ४० रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन फलटण येथील लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल, फलटण येथे मोफत करण्यात येणार आहे. हृदय आणि सांध्यांच्या आजाराविषयीचे रुग्ण आणि गरजू रुग्णांना पुढील तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथे करण्यात येणार आहे.रुग्णसेवेसाठी बारामती येथून डॉ. शैलेंद्र ठवरे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. केतन आंबर्डेकर (हृदयरोग तज्ञ), डॉ. विशाल नवले (किडनी विकार तज्ञ), डॉ. सुनील ढाके (एमडी मेडिसिन) यांसह अनेक तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. याप्रसंगी दहिगाव गावच्या प्रथम नागरिक सौ. सोनम खिलारे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सत्यशील पाटील, उपसरपंच संदीप सावंत, उपसरपंच श्री. दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील श्री. मोरे, मंदिरचे ट्रस्ट श्री. संजय दोशी, अमृतलाल गांधी  रत्नत्रय एज्युकेशनचे चेअरमन श्री. आनंदलाल दोशी, राहुल दोशी, अमित गांधी, वैभव शहा, डॉ. उदयकुमार दोशी, डॉ. अजिंक्य व्होरा, डॉ. वर्धमान दोशी, रोनक चंकेश्वरा, सोहिल दोशी, विराग गांधी, शितल गांधी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश दोशी (अकलूज) यांनी केले, प्रास्ताविक डॉ. तेजस चंकेश्वरा (नातेपुते) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नरेंद्र गांधी यांनी केले.हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. चंकेश्वरा व त्यांचे सहकारी श्री. गोमटेश दोशी, डॉ. अनुजा, मेडिकल असोसिएशनचे श्री. अमित शहा, अमोल गांधी, अमित गांधी यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.