माळशिरस तालुका

गुरववाडीच्या लक्ष्मी पुजारी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोटतालुक्यातील गुरववाडीच्या कार्यक्षम सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे असा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सरपंच आहेत.स्वराज्य सरपंच सेवा संघ, म हाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये त्यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आले. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात दि. ३० ऑक्टोबर रोजी हा सोहळा पार पडला. सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांनधील ४५ सरपंचांना गावपातळीवर उत्कृष्ट कार्यच सेवा संघ महाराष्ट्र्केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यात गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी गावच्या चौफेर विकासासाठी केलेले काम पाहून या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. लक्ष्मी माळप्पा पुजारी व गावचे विकासरत्न, माजी सरपंच माळप्पा पुजारी या दांपत्याचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार,सचिव बाबासाहेब पावसे, संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावशे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेतेमंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुढील आठवड्यात न.पा. निवडणुकीची घोषणा२१ दिवसात प्रक्रिया पार पडणार

पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. २१ दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सगि तीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणामहापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.मुंबईसह राज्यातील २९ म हापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचेवेळापत्रक जाहीर केले जाईल.अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील म दतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या सम जते. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सवर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

देशातील शाळांमध्ये तिसरीपासून ‘एआय’ अभ्यासक्रमशैक्षणिक साधने, सामग्री डिसेंबरमध्ये तयार होणार

देशातील सर्व शाळांमध्येतिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी डिसेंबर २०२५ पर्वत अभ्यासक्रमाचे साहित्य, हँडबुक आणि डिजिटल संसाधने तयार केली जाणार आहेत. एआय आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली.राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखडा २०२३ नुसार अर्थपूर्ण आणि समावेशक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस आणि एनव्हीएससारख्या संस्थांनाकेंद्रीय शिक्षण मंत्रालय सहकार्य करत आहे.यासाठीचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीसाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बैठक घेण्यात आली.यावेळी सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस, एनव्हीएस आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एआय आणिकृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू सार्वजनिक हितासाठी एआयचा वापर वाढवण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. शिवाय एआयमधील गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तसेच एआयच्या नैतिक वापराच्या दिशेने टाकलेले एक नवीन परंतु महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण या तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुरुवात इयत्ता तिसरीपासून होईल, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले.सीटी अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्जा समिती स्थापन केली आहे.

सर्वात भ्रष्ट कुटुंबातील २ युवराज मला शिव्या देतायत नरेंद्र मोदी

एक देशातीलसर्वात भ्रष्ट घराण्याचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात करप्ट घराण्याशी संबंधित आहे. या दोघांनी मिळून आता खोट्या आश्वासनांचे दुकान सुरू केले आहे. हे दोघेही मला भर-भरून शिव्या देत आहेत. मात्र बिहारची जनता यांच्या जाळ्यात अडकणार नाही. बिहारने विकासाची गती पकडली आहे. अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूर येथीलमोतीपूर साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.मोदी पुढे म्हणाले, दोन्ही युवराज हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो. हे नामदार लोक कामगारांना शिव्या देऊनच दिवसाची सुरुवात करतात. मागास आणि दलित सम ाजाचा अपमान करणे हा ते त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजतात. एका चहावाला इथवर पोहोचला, हे त्यांना अजूनही पचत नाही.पंतप्रधान म्हणाले, राजद आणि काँग्रेसचा. भ्रष्ट कुटुंबातील तेल आणि पाण्यासारखा आहे. यांचे कदीच पटू शकत नाही. बाहेरून एक दिसतात. पण आतून वेगवेगळे आहेत. त्यांचा हेतू केवळ सत्तेवर कब्जा करणे एवढाच आहे. एवढ्या एका लालसेपोटीच ते सोबत आहेत. जेनेकरून पुन्हा बिहार लुटता यावा. यावेळी म ोदींनी लालू प्रसाद यादवांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण देश पूजतो, त्यांचा हे लोक अपमान करतात. बिहारमध्ये एनडीएला सर्वात मोठा विजय मिळणार असून राजद-काँग्रेस आघाडीला इतिहासातील सर्वात मोठा पराभव होईल. बिहारचे मतदार ६ नोव्हेंबरला मतदानाद्वारे या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले दक्षिण सोलापूर पंचायत

दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (उइ) रंगेहाथ पकडले. कामाचा मंजूर बिलेची रक्कम ग्रामपंचायत खात्यातून काढून देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार मि ळताच एसीबीने पडताळणी आणि सापळा रचून ही कारवाई केली. येळेगाव येथे १५व्या वित्त आयोगांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. कंत्राटदाराने कामाबाबतचे एक लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे प्रस्तावदाखल केला होता. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा तक्रारदार करत असताना विस्तार अधिकारी खरबस यांनी २००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ३० ऑक्टोबर २०२५ रोजी एसीबीकडे करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच उइ पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान खरबस यांनी लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदाराकडून २ हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोह. अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली. शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ उइ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले.

सत्ता उलथविण्यासाठी दिल्ली दंगल पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

पोलिसांनी सर्वो च्च न्यायालयात दाखल केलेल्या १७७ पानी प्रतिज्ञापत्रात २०२० च्या दिल्ली दंग्यांविषयी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. पोलिसांच्या मते, हा हिंसाचार सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला एक सूनियोजित कटाचा होता.हे प्रतिज्ञापत्र उमर खालिद, शरजील इमाम, मीरान हैदर आणि गुलफिशा फातिमा यांसारख्या आरोपींच्या जामीन अर्जाना विरोध करताना सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान प्रत्यक्ष, दस्तऐवज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले गेले आहेत, ज्यातूनया आरोपींचा थेट संबंध या कटाशी असल्याचे स्पष्ट होते. प्रतिज्ञापत्रानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील विरोधाचा वापर भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर प्रहार करण्यासाठी करण्यात आला. पोलिसांचा दावा आहे की, ही हिंसा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यादरम्यान घडवून आणण्यात आली.

शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणीमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्रांच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा, महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकरकाय आहेत नवीन आदेश ?जोपर्यंत मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ (कलम ५) किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (कलम १४३) अन्वये दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित प्रकरण दप्तरी दाखल (बंद) करण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने अंतिम आदेश पारित केल्यानंतर, पुढील ७ दिवसांच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खात्री करणे बंधनकारक आहे. ही खात्री केवळ तोंडी न करता, त्यासाठी रीतसर स्थळपाहणी पंचनामा करणे व जागेची जिओ-टॅग छायाचित्रे घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा पंचनामा आणि जिओ-टॅग फोटो संबंधित प्रकरणाच्या मूळ संचिकेमध्ये समाविष्ट करणे अनिवार्य असेल.करणे या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. या समितीने अनेक प्रकरणांमध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे किंवा सरबांधावरून रस्ता देणे याबाबत सक्षम अधिकारी आदेश देतात. मात्र, त्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन नागरिकाला रस्ता मिळाला की नाही, याची कोणतीही खात्री केलीजात नव्हती, यावर अभ्यास केला. अनेक प्रकरणे तपासली. आदेश मिळूनही अर्जदाराच्या तक्रारीचे पूर्णतः निराकरण होत नव्हते, असे तथ्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी हितासाठी सक्त निर्णय घेतला. परिपत्रक काढून करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

: जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का? असा शंका उपस्थित केली जात होती. मात्र भारतीय महिला संघाने इतिहास घडवत कांगारुंचा विजयरथ यशस्वीपणे रोखला.

माळशिरस येथे शिवप्रसाद फाउंडेशन श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, माळशिरस शिक्षक कॉलनी म्हसवड रोड माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माळशिरस ग्रामस्थ तसेच मान्यवर यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
9) मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे
अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल
रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंटरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा 430 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
मा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, मा.श्री.विजय देशमुख (नगराध्यक्ष), मा.श्री.रावसाहेब देशमुख (नगरसेवक), मा.श्री.वैभव जानकर (नगरसेवक), मा.श्री.हसन मुलाणी (उद्योजक), मा.श्री.अनिरुद्ध शिंगाडे (उद्योजक) मा.श्री.बळीराम गेजगे (सा. कार्यकर्ते) मा.श्री.नानासाहेब हांडे (सा. कार्यकर्ते), मा.श्री.गुजरे सर, श्री.सुशांत पाटील, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

सत्ता उलथविण्यासाठी दिल्ली दंगल पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

पोलिसांनी सर्वो च्च न्यायालयात दाखल केलेल्या १७७ पानी प्रतिज्ञापत्रात २०२० च्या दिल्ली दंग्यांविषयी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. पोलिसांच्या मते, हा हिंसाचार सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला एक सूनियोजित कटाचा होता.हे प्रतिज्ञापत्र उमर खालिद, शरजील इमाम, मीरान हैदर आणि गुलफिशा फातिमा यांसारख्या आरोपींच्या जामीन अर्जाना विरोध करताना सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान प्रत्यक्ष, दस्तऐवज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले गेले आहेत, ज्यातूनया आरोपींचा थेट संबंध या कटाशी असल्याचे स्पष्ट होते. प्रतिज्ञापत्रानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील विरोधाचा वापर भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर प्रहार करण्यासाठी करण्यात आला. पोलिसांचा दावा आहे की, ही हिंसा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यादरम्यान घडवून आणण्यात आली.

You may have missed