माळशिरस तालुका

मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहणार राजकुमार हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग तथा पालखी महामार्ग क .965 चे काम चालू आहे . या कामामध्ये शासकिय तसेच हायवेचे अधिकरी कॉन्ट्राक्टर भौगोलिक परिस्थिीचा विचार न करता काही गावे हायवे ना जोडता ती खंडित केलेली आहेत नातेपुते मांडवे रस्ता हा ब्रिटीश कालीन असल्याने नातेपुतेला जेथे जोडला जातो त्याठिकाणी तो खंडीत करण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकरी विदयार्थी त्या परिसरात राहण्या – या लोंकाना पर्यायी मार्गाचा वापर करवा लागणार आहे बायपासला भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल केल्यास हे अंतर 5 कि.मी. येणार आहे . हा बायपास नेमका कुणाच्या हितासाठी आहे हा जनतेच्या मनात प्रश्न आहे.पुरंदावडे येथील 94 / 260 मध्ये उड्डाण पुल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा वरिल चैनेज मध्ये गावाच्या उजव्या बाजूला मुस्लीम दफन भुमी आहे डाव्या बाजूला हिंदूची स्मशान भूमी आहे . एखादा नागरिक मुत्यु झाल्यास अंत्यविधी करणे हे भुयारी मार्ग नसणे अडचणीचे ठरत आहे

तरी काम चालू आहे तोपर्यत भुयारी मार्ग केल्यास त्या ठिकाणी जि.प.प्राथमिक शाळा सुध्दा आहे त्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटेल . नातेपुते येथील बायपास शहराच्या 5 कि.मी बाहेर गेल्याने येथील जुना पालखी मार्ग नादरुस्त अवस्थेत आहे पूर्वीच्या ग्रामपंचायतीने या कोणत्याही गोष्टींचा भविष्यातील विचार न केल्याने खड्ड्याचे सांम्राज्य झाले आहे . तो तात्कातळ दुरुस्ती करुन खुला करुन द्या . नातेपुते बायपास ते नातेपुते शहराला जोडणा – या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे . नातेपुते पालखी महामार्गावरील मा . नितिन गडकरी साहेबांच्या डिम प्राजेक्ट मधील सायकल ट्रॅक जुन्या महामार्गाच्या बाजूने तयार करण्यास वरील कंपनीस आदेश देण्यात यावेत . जुन्या महामार्गावर स्ट्रीट लाईट लावून मिळावेत.

तालुक्यातील महसुली सज्जावर तलाठी व कोतवाल दिवसभर उपलब्ध व्हावेत . तलाठी तालुक्याच्या गावी गेलातरी कोतवाला मार्फत नागरीकाची कामे मार्गी लागतील. ज्या गावासाठी महा ई सेवा केंद्र मंजूर आहेत ते केंद्र त्याच गावा मध्ये चालू असावेत त्यामुळे नागरिकाची सोय त्याच ग्रामीण भागमध्ये होईल बहुताशी महा ई सेवा केंद्र ग्रामीण भाग सोडूण भलत्याच ठिकाणी चालू आहेत.माळशिरस तालुक्यातील सेतू सेवा केंद्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास चालवण्यास मिळावे त्यासाठी कायदेशीर दस्तवेज पुर्ण करुण ते नांगरिंकासाठी मोफत चालवली जातील अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांनी मा नितीनजी करीर महसूल सचिव, राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले यावेळी प्रकाशबापू पाटील यांच्यासह तालुका जिल्हा प्रशासन उपस्थित होते

अशी माहिती राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिली

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेकडून बांधकाम विभागाचा निषेध

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –दहिगाव-पिरळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.
पिरळे दहिगाव, हा रस्ता सतत वर्दळीचा असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत
. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिक ये जा करत असतात खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो परंतु पडलेल्या खड्ड्यावर बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने एन.डी.एम.जे.चे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रमोद शिंदे यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाशी संपर्क करून या संदर्भात रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुळे काल एन डी एम जे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे यांच्या नेतृत्वात पिरळे-दहिगाव रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असेही सांगण्यात आले आहे.तात्काळ पिरळे-दहिगाव, पिरळे-फोंडशिरस,नातेपुते-पिरळे या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती 30 जानेवारी च्या आत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्त झाले नाही तर एक फेब्रुवारीला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध

नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात तसेच २९ उमेदवारांची माघार


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते(प्रतिनिधी) : नातेपुते नगरपंचायत सर्वसाधारण निवडणूक २०२१ अनुषंगाने आज दिनांक १३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत तीन वाजेपर्यंत होती. निवडणुकीसाठी ८३ उमेदवार पात्र होते. व आज १३ डिसेंबर रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये तब्बल २९ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून मिळाली.

५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तरी त्यांना १४ डिसेंबर रोजी निवडणुकीचे चिन्ह मिळणार अशीही माहिती मिळाली

निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार खालील प्रमाणे

१) सौरभ सावता बोराटे प्रभाग क्रमांक११
२) श्यामल हनुमंत लाळगे प्रभाग क्रमांक १७
३) महेश किसन ननवरे प्रभाग क्रमांक ११
४) अतुल सुभाष बावकर प्रभाग क्रमांक १६
५)राकेश भारत सोरटे प्रभाग क्रमांक ३
६) कन्हैया हनुमंत देवकाते प्रभाग क्रमांक ५
७) असलेशा भारत सोरटे प्रभाग क्रमांक १२
८) विशाल नारायण बोराटे प्रभाग क्रमांक ११
९) कांचन दादा लांडगे प्रभाग क्रमांक १३
११) रणजीत राजाभाऊ पांढरे प्रभाग क्रमांक ६
११) जहिदा रफिक शेख प्रभाग क्रमांक १५
१२) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे प्रभाग क्रमांक १६
१३) आम्रपाली अभिजीत वाळके प्रभाग क्रमांक ४
१४) मनिषा संतोष काळे प्रभाग क्रमांक २
१५) स्वाती न्यानेश्वर सर्जे प्रभाग क्रमांक १७
१६) हर्षा राहुल काळे प्रभाग क्रमांक २
१७) स्वाती अतुल बावकर प्रभाग क्रमांक ४)
१८) राहुल शैलेश बोराटे प्रभाग क्रमांक १६
१९)अंकुश लक्ष्‍मण कचरे प्रभाग क्रमांक ६
२०) वंदना विनायक पदमन प्रभाग क्रमांक १४
२१) शशिकांत मल्लाप्पा कल्याणी प्रभाग क्रमांक ६
२२) धोंडीराम पांडुरंग काळे प्रभाग क्रमांक १
२३) प्रवीण शिवाजी काळे प्रभाग क्रमांक १
२४) सचिन मुरलीधर भोजने प्रभाग क्रमांक १६
२५) सागर विलास बोराटे प्रभाग क्रमांक १६
२६) सागर बाबुराव बिचुकले प्रभाग क्रमांक ६
२७) अमरजित शंकर जानकर प्रभाग क्रमांक १६
२८) अश्विनी सचिन लांडगे प्रभाग क्रमांक १३
२९) अजय चंद्रशेखर भांड प्रभाग क्रमांक १६

या उमेदवारांनी नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेतली असून उर्वरित उमेदवार निवडणूक लढवणार अशी सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून प्राप्त झाली

उंबरे पागे ग्रामसभा शांततेत पार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धनाजी शिव पालक पंढरपूरदिनांक 1/11/ 2021 रोजी उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष कांताबाई शिंदे सरपंच होत्या ग्रामसेवक पांढरे यांनी लोकांचे स्वागत करून ग्रामसभेला सुरुवात केली असता नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी ग्रामसभा तहकूब करावी अशी सूचना मांडली कारण ग्रामसभेमध्ये अवघ्या पंचवीस लोक उपस्थित होते जोपर्यंत शंभर लोक उपस्थित असतील तर ग्रामसभा घ्या तोपर्यंत ग्रामसभा घेऊ नये असा ग्रामसभेमध्ये शिव पालक यांनी सूचना मांडली त्यानंतर काही वेळ ग्रामसभेचे कामकाज थांबले बराच वेळाने लोक जमा झाल्यानंतर ग्रामसेवकाने मागील आराखडा वाचून दाखवला पांदन रस्त्याचे कामे काँक्रिटीकरण डांबरीकरण सभामंडपाचे काम हाय मस्त दिवा कनेक्शन शासन निर्णय असे सर्व विषय ग्रामसेवक पांढरे यांनी वाचून दाखवले पुढे covid-19 च्या काळामधील लोकांचे पाणीपट्टी घरपट्टी ग्रामपंचायतीने वसुलीसाठी तगाटा लावू नये व गावामध्ये चिकनगुनिया सारख्या आजाराने लोक त्रस्त आहेत गावामध्ये ज्या ठिकाणी सांड पाणी साठले आहे आशा ठिकाणी कीटकनाशक फवारून जेणेकरून डास मरतील असे औषध धुरळणी करावी असे अनेक जनतेचे प्रश्न धनाजी शिव पालक यांनी लावून धरले त्याचबरोबर प्रहारचे तालुकाध्यक्ष नानासो इंगळे यांनी ग्रामसेवक माहिती अधिकारांमध्ये माहिती देत नसल्याबाबत खंत व्यक्त केली ग्रामपंचायतीची विकास कामे सर्व मेंबरांना वाटून द्या आणि आम्हाला पण द्या अशी अजब मागणी बापू मोहिते यांनी केली तसेच बाळासाहेब उर्फ केरु कसबे व माऊली लक्ष्मण गायकवाड उमेश गायकवाड यांनी आपल्या समस्या ग्रामसभेमध्ये मांडल्या परंतु ग्रामसभेला आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग तलाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वायरमेन असे शासकअधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु ग्रामसभे मधील प्रमुख मागणी लावून धरल्यामुळे तात्काळ उंबरे गावचे सरपंच कांताबाई शिंदे व ग्रामसेवक पांढरे यांनी अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण गावामध्ये कीटकनाशक धुरळणी करून घेण्यात आली आम्हाला ग्रामसभा माहीत नव्हती असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने ग्रामसभा दवंडी देऊन घेण्यात यावी असा सूर जनतेतून उमटू लागला

नातेपुते येथे उद्या होणार मोहिते कलेक्शनचे उद्घाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते दहिगाव रोड येथे उद्या दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दिवाळी आगमनानिमित्त भव्य मोहिते कलेक्शनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनास नातेपुते व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असणार आहेत.यामध्ये माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, माजी उपसरपंच अतुल पाटील,माऊली पाटील, रणधीर पाटील, दयानंद काळे, मानसिंग मोहिते ,सुरेश मोहिते,शिवाजी पिसाळ,सदाशिव ननावरे,वालचंद काळे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास निखील मोहिते, प्रशांत मोहिते यांनी प्रियजनांना जाहीर निमंत्रण दिले आहे. या दिवाळीच्या खरेदीसाठी मोहिते कलेक्शन ला आवश्य भेट द्या

साई सेवा दल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न*


नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे )

नातेपुते येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या आई सेवादल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार राम सातपुते व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. साई सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्रत अनेक उपक्रम राबवले जातात अनेक गरजू व गरीब लोकांना मदत केली जाते.साई सेवा दलाच्या वतीने गरजू व गरीब लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा दिली जाते आशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील शाहिद भाई मुलांनी,अविनाश दोशी बाबा बोडरे डॉक्टर साईनाथ भोसले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साई सेवा दलाचे संस्थापक गुरु कर्चे,अध्यक्ष बाबा कांबळे,सचिव सोमनाथ भोसले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई संदेश भालेराव- माळेवाडी बोरगाव येथे मातंग समाजातील व्यक्ती वर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार न करू दिले बाबत अपर पोलिस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) महाराष्ट्र राज्य मुंबई.यांच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकारी यांच्याशी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन दिले.सविस्तर वृत्त असा की,माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी येथे मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस स्मशानभूमीत रस्त्याने जाण्यासाठी अडवण्यात आले.त्यामुळे नाईलाजाने ग्रामपंचायतीच्या पुढे जाळावे लागले.याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.तरीही सादर प्रकरणी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे वैभव गिते व संदेश भालेराव हे तीन दिवसांपासून मंत्रालयात ठाण मांडून बसले आहेत.घटनेचे गंभीर्य वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन मातंग समाजातील साठे या पीडित कुटुंबास न्याय मिळण्याकरिता कायदेशीर,प्रामाणिक व खडतर पाठपुरावा करीत आहेत.

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते

एम ए कस्तुरे हायस्कूल व गोपाळ विद्यालयात 74 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

एम.ए.कस्तुरे हायस्कूल मराठी माध्यम , व गोपाळ प्राथमिक विद्यालय सोलापूर येथे  संयुक्त संयुक्तपणे  15 ऑगस्ट स्वतंत्र दिन  “74” वा वर्धापन  कोवीड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला यावेळी माध्यमिक चे मुख्याध्यापक मा. श्री. सुहास गायकवाड सर व प्राथमिक च्या मुख्याध्यापिका मा. सौ. पुकाळे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी तंबाखू मुक्ती व पर्यावरण संवर्धन सामूहिक शपथ घेण्यात आली, कोरणा कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्या विना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विश्रांतीनंतर नातेपुते परिसरात पावसाची दमदार एंट्री


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथे सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली असून परिसरातील शेतकरी आनंदी झाला आहे.मध्येच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती.सध्या कोरोना ने थैमान घातले असून याचा परिणाम शेतीवर व शेतकऱ्यावर झाला असून त्यामध्ये पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.आजच्या या पावसाच्या दमदार एंट्री मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून शेतीच्या कामासाठी लागणार आहे.यामुळे महाराष्ट्र व देशात ला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

विश्रांतीनंतर नातेपुते परिसरात पावसाची दमदार एंट्री

पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

 

पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-  फोंडशिरस तालुका माळशिरस येथील संशयित आरोपी नामे मनोज पांडुरंग राऊत राहणार फोंडशिरस व इतर तीन आरोपी यांनी संगनमत करून मयत पत्नी सौ.पल्लवी मनोज राऊत वय 29 हिस मारहाण करून जागीच जीवे ठार केल्याची घटना घडली आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नवनाथ माने पोलीस नाईक यांनी समक्ष हजर राहून जबाब दिला की दिनांक 29/6/2021 रोजी ठाणे अंमलदार एस.डी.राऊत यांनी आकस्मात मयत दाखल केले होते. त्यात खबर देणारे पोलीस पाटील लक्ष्मण भिमराव कुंभार हे पोलीस पाटील म्हणून काम करत आहेत.सुमारे दीड वर्षापासून मनोज राऊत व त्याची मयत पत्नी पल्लवी मनोज राऊत वय वर्ष 28 यांचे घरगुती कारणावरून तक्रार झाल्यानंतर पल्लवी राऊत ही घरातून न सांगता निघून गेली होती.    नंतर ती परत आली. दिनांक 28/6/2021 रोजी रात्री आठच्या सुमारास पल्लवी हिने घरात गळफास घेतल्याचे समजले.त्यावर पोलीस पाटील घटनास्थळी गेलेअसता.त्यांना पल्लवी मयत झाल्याचे व पोलीस ठाण्यात खबर दिली नाही व तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानभूमीकडे येऊन गेल्याचे समजले.यावर पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात यांनी पोलीस पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले तेव्हा पोलीस पाटलांनी मयत स्मशानभूमीकडे नेले आहे.अस सांगितले तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात स्मशानभूमीत दाखल झाले.तेव्हा स्मशानभूमीत पल्लवी मयत झाल्याने तिला स्मशानभूमीत चितेवर ठेवून आग लावण्यात आली होती.त्यावेळी तिथे एक स्त्री व तीन पुरुष होते.पोलिसांना पाहता ते तिथून निघून गेले. चितेवरील आग पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात व पोलीस पाटील कुंभार यांनी विझवली व नंतर पती मनोज राऊत यांच्याकडे विचारणा केली असता. पोलीस स्टेशनला का कळवले नाही असे विचारल्यानंतर त्याने सांगितले घरामध्ये गळफास घेऊन पत्नी मयत झाले आहे.मयत झाल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल थोरात यांनी मयत पल्लवी हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे शवविच्छेदना साठी आणला तिच्या अंगाला जखमा असल्याचे निदर्शनास आले.तसेच पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.तसेच ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे झालेले पी.एम रिपोर्ट मध्ये मरणाचे कारण सांगितले.Death due to shock due to bilateral haemothorax with blunt trauma chest with fracture ribs with fracture right forearm bones with head injury या कारणाने मयत झाल्याचे सांगितले यावरून पल्लवी मनोज राऊत वय 29 राहणार फोंडशिरस हिस आरोपी नामे पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत,आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी दोघे राहणार दसुर यांनी मयत पल्लवी हिस मारहाण व गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची फिर्याद देण्यात आली आहे. यांचे विरुद्ध भा.द.वि कलम302,201,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून.पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने कबूली दिल्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले.पुढील तपास सपोनि मनोज सोनवलकर करीत आहे.

You may have missed