आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न
आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे )-मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुरी तालुका माळशिरस येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वाय .व्ही .माने ग्रुप चे श्रींकांत दादा माने यांच्या सहकार्याने घेण्यात आली या स्पर्धेला आमदार यशवंत (तात्या ) माने चषक 2020 असे नाव देण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मैदानावर श्रीफळ फोडून करण्यात आले . यामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पथनाट्य लेझीम स्पर्धा गायन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी पंढरपूर, इंदापुर, व पंचक्रोशीतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. इंदापूर व पंढरपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती व शेतकऱ्यांची सद्यस्थिती व सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस बी पाटील इंजीनियरिंग कॉलेज इंदापूर, दुतिय क्रमांक सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर ,लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक मोरची विद्यालय, दुतिय क्रमांक प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी, यांनी पटकावला, छोटा गट लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक एकशिव, दुतिय क्रमांक हनुमान वाडी कुरबावी यांनी पटकावला स्पर्धे साठी यशवंत विठ्ठल माने कन्ट्रक्शन ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले तसेच एकशिव, शिवपुरी येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नयना दीप असा लेझीम खेळ सादर केला यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे, एकशिव गावचे चे माजी सरपंच शहाजी दादा धायगुडे, पत्रकार प्रशांत खरात, वाघमोडे सर, झोडगे सर, शिंदे सर, प्रेम देवकाते,कसबे सर, साळवे मॅडम, शैलेश नारोळे आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन निखील जानकर यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी येथील मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.