माळशिरस तालुका

भाऊबीजेला सोने-चांदी स्वस्त ! किंमती धडाधड कोसळल्या;

 सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये (Gold Silver Price) सध्या मोठी घसरण सुरू आहे. गुरुवारी, भाऊबीजेच्या (Bhai Dooj) शुभमुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली.गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ५५३ रुपये आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे १००० रुपयांहून अधिकची कपात नोंदवली गेली. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर थोडीशी रिकव्हरी दिसल्याचे वृत्त आहे.सोन्याचे नवे दर:इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,२३,९०७ रुपयांवरून घसरून १,२३,३५४ रुपयांवर आला आहे.तसेच, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,१३,४९९ रुपयांवरून कमी होऊन १,१२,९९२ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दरही ९२,९३० रुपयांवरून कमी होऊन ९२,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.यापूर्वी बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ३,७०० रुपयांहून अधिक आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे सुमारे १०,६०० रुपयांची मोठी घसरण झाली होती.चांदीत किती घसरण?गुरुवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलोमागे १०५१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा भाव १,५२,५०१ रुपयांवरून कमी होऊन १,५१,४५० रुपये प्रति किलो झाला आहे.एमसीएक्सवर रिकव्हरी:हाजिर बाजारातील घसरणीच्या विपरीत, वायदा बाजारात मात्र तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर २०२५ साठी सोन्याचा कॉन्ट्रॅक्ट १.५७ टक्क्यांनी वाढून १,२३,७६५ रुपये तर चांदीचा ५ डिसेंबर २०२५ चा कॉन्ट्रॅक्ट २.३१ टक्क्यांनी वाढून १,४८,९२३ रुपयांवर होता.रिकव्हरीचे कारण:तज्ञांनी सांगितले की, एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याच्या किंमतीत रिकव्हरी दिसून आली. अलीकडच्या दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नफावसुली आणि अमेरिका, भारत आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेमुळे ही घसरण झाली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या धोरणात्मक विचारांमधील बदलांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा कमी दरात गुंतवणूक केल्यामुळे किरकोळ तेजी आली आहे.

ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील 72 तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुंवाधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ज्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोट सोबत ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.अनेक भागात ढगांची गर्दीकाही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीटचा जाणवत होता. तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता. मात्र गेल्या २४ तासांत अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे. तसेच अनेक शहर आणि परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी २३ ते २५ ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.यलो अलर्ट जारी झालेले जिल्हे२३ ऑक्टोबर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा-विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.२४ ऑक्टोबर : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह आता खान्देशातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश.२५ ऑक्टोबर : प्रामुख्याने कोकण, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि मराठवाडा, संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवाऐन काढणीच्या काळात आलेल्या या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. तसेच आवश्यक असल्यास घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिवाळीच्या संध्याकाळी चारित्र्यावरून वाद, रात्री पत्नीने तिच्या ओढणीनेच..

ती-पत्नीचं नातं हे जन्मजन्मांतरीचं असतं अस म्हणतात. लग्नात सप्तपदी घेताना पती-पत्नी हे एकमेकांची साथ देण्याचं, सात जन्म एकत्र राहण्याच वचन देतात. या नात्यात प्रेम, आदर आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो एकमेकांवरचा विश्वास..पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर कितीही वादळं आली तरी संसाराचा पाय डगमगत नाही. मात्र जर याच नात्यात संशयाचं भूत शिरलं तर मग अख्खा संसार उद्ध्वस्त होतो. एकमेकांवर संशय नसल्याने किती तरी जोडप्यांच्या संसाराची राखरांगोळी होते, कोणी वेगळं होतं तर कोणी अजून काही करतं .पण याच संशयातून कोणी कोणाचा जीव घेतला तर ? एका शुल्लक वादावरून पत्नीने तिच्याच, जोडीदाराची, पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा यगळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.नेमकं काय घडलं ?मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव आहे. तो सामजिक कार्यकर्ता होता, तर आरोपी पत्नी ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नुकल भोईर हाँ त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर खूप संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा.काल दिवाळीच्या दिवशी देखील याच संशयावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटतो ना मिटोत तोच पुन्हा त्याच कारणावरून रात्रीही ते एकमेकांशी पुन्हा भांडेल. आणि त्याच वादात पत्नीने तिचीच ओढणी वापरत पती नुकलाचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली.गुन्ह्याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी पत्नीला बेड्या ठोकून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता ‘हे’ तृणधान्ये मोफत दिले जाणार !

रेशनमहाराष्ट्रातील रेशन धारकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना एक नवीन तृणधान्य मोफत देण्यात येणार कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ सोबतच आता ज्वारी सुद्धा मोफत मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार गव्हाचे प्रमाण कमी करून आता रेशन कार्ड धारकांना ज्वारी हे तृणधान्य सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी ज्वारीचे विक्रमी उत्पादन झाले होते आणि राज्य शासनाने देखील मोठ्या प्रमाणात हमीभावात ज्वारीची खरेदी केली. दरम्यान आता याच ज्वारीचे राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे.नोव्हेंबर महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ सोबत ज्वारीचे वाटप करण्यात येणार असून जवळपास पुढील दोन महिने रेशन कार्डधारकांना ज्वारी दिली जाईल अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी अंतर्गत राज्यात भरड धान्य खरेदीच्या सूचना मिळाल्या होत्या. यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एमएसपीवर ज्वारीची खरेदी केली आणि आता याच ज्वारीचे रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येईल.प्रत्येक पात्र कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी एक किलो ज्वारी देण्यात येणार आहे. ज्वारीचे वाटप फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशन कार्ड धारकांना ज्वारीचे वाटप करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हानिहाय ज्वारीचे वाटप आणि उचल प्रक्रिया सुद्धा निश्चित केली असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.तसेच सरकारने पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच नोव्हेंबर पासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण ज्वारीचे वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्या आहेत.कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार ज्वारी?

एसआयटी चौकशीत मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश, 80 रुपयांत एक मत खाल्ले! डेटा ऑपरेटरने तब्बल 6018 नावे कापली!!

र्नाटक सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीतून मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश झाला आहे. 2023 च्या निवडणुकीआधी येथील आळंद विधानसभा मतदारसंघात तब्बल 6018 मतदारांची नावे कापण्यात आली. एका डेटा सेंटरमध्ये बसून काही डेटा ऑपेरटर्सनी हे कांड केले.अवघ्या 80 रुपयांच्या बदल्यात त्यांनी एक मत खाल्ले. त्यातून डेटा ऑपरेटर्सना एकूण 4 लाख 80 हजार रुपये मिळाले. मतांच्या ‘सेल’चा हा झोल चव्हाटय़ावर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा संशयाचे मळभ दाटले आहे.भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आळंद मतदारसंघाचा दाखला दिला होता. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. आळंद येथील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 6018 मतदारांच्या नावांची चौकशी करण्यात आली. त्यातील केवळ 24 मतदारांचे अर्ज योग्य असल्याचे आढळले. दुसरीकडे वास्तव्यास गेल्यामुळे त्यांनी नाव वगळण्यासाठी अर्ज केले होते, मात्र, इतर नावांचा घोळ कायम होता.n एसआयटीने तपास हाती घेतल्यानंतर कलाबुरागी जिह्याच्या मुख्यालयातील डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केले. याच सेंटरमधून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अश्फाक, मोहम्मद अक्रम व इतर तिघे असल्याचे समोर आले. अश्फाक व अक्रम हे दोघे डेटा सेंटर चालवत होते व अन्य तिघे ऑपरेटर्स म्हणून काम करत होते. पोलिसांनी या सर्वांचे संगणक व इतर वस्तू ताब्यात घेतल्या. नावे वगळण्याचे अर्ज करण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉपही जप्त करण्यात आला.धागेदोरेभाजपनेत्यापर्यंतलॅपटॉप आणि इतर रेकॉर्डस्च्या तपासानंतर भाजपचे नेते सुभाष गुत्तेदार यांच्याविषयी पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी एसआयटीने गुत्तेदार, त्यांची दोन मुले हर्षनंदा व संतोष आणि त्यांच्या सीएचे घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यातून पोलिसांनी 7 लॅपटॉप, मोबाइल फोन जप्त केले आहेत. डेटा ऑपरेटर्सना देण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय याचा शोध आता एसआयटी घेत आहे.75 वेगवेगळय़ामोबाइलनंबर्सचावापरमतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्ज करण्यासाठी तब्बल 75 वेगवेगळय़ा मोबाइल नंबर्सचा वापर करण्यात आला. हे नंबर निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यात आले. पोल्ट्री फार्ममधील कामगारांपासून ते पोलिसांच्या नातेवाईकांच्या नावावर हे मोबाइल नंबर आहेत, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. ओळखपत्रे बनावट असताना आयोगाच्या पोर्टलवर मोबाइल क्रमांक कसे स्वीकारले गेले, याचाही तपास सुरू आहे.एन एसआयटीला भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या घराजवळ मतदारयाद्यांची कागदपत्रे जळालेली आढळली. पुरावे नष्ट करण्यासाठीच ही कागदपत्रे जाळली गेली असावीत, असा एसआयटीला संशय आहे. गुत्तेदार यांनी मात्र साफसफाई करताना नोकरांनी ही कागदपत्रे जाळली. याचा यादीतील घोळाशी संबंध नाही, असा दावा केला.

राधानगरी-कोकण राज्य मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार, दोघा जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू

राधानगरी-कोकण राज्य मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार, दोघा जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू कोल्हापूर-राधानगरी-कोकण या राज्य मार्गावर मोटारीच्या अपघातात दोन जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.बुधवारी मध्यरात्री अभयारण्यातील शेळप-बांबर या गावादरम्यान मोटार झाडावर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये अनुराग अनुप सोनी (वय ३३, रा. सह्याद्रीनगर, सांगली) व अभिजित बापू कुंभार (४२, रा. मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली, सांगली) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत, तर दोघा जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सुरेश पूनमचंद शर्मा (वय ३२, रा. दत्तशीलनगर, सांगली) हे व अन्य एक अनोळखी गंभीर जखमी आहेत. अपघातात जखमी वाहनचालकाचे शिवाजी गायकवाड (सांगली) असेनाव आहे.Weather Update : पुढील तीन दिवस नाशिकसह घाट परिसराला यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारापुढील तीन दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केला आहे.CM Siddaramaiah : राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या बेळगाव दौऱ्यावरLatest Marathi Live Updates 24 October 2025 : पुढील तीन दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच आगामी २०२८ ची विधानसभा निवडणूक माझे वडील आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या लढवणार नाहीत. मात्र, काँग्रेसच्या सिध्दांतावर चालणारे राज्यात अनेक राजकारणी आहेत. त्यांनी सतीश जारकीहोळी यांना पुढे नेले पाहिजे. सिद्धरामय्यांनंतर त्यांच्या जागेवर काम करण्याची ताकद सतीश जारकीहोळींमध्ये आहे आणि सतीश जारकीहोळी हेच सिद्धरामय्या यांचे वारसदार आहेत, असे परखड मत विधान परिषद सदस्य डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या शनिवारी (ता.२५) बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. कित्तूर (जि. बेळगाव) येथे सुरू असलेल्या ‘कित्तूर उत्सवाच्या’ समारोप समारंभात ते सहभागी होणार आहेत. कोल्हापूर-राधानगरी-कोकण या राज्य मार्गावर मोटारीच्या अपघातात दोन जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री अभयारण्यातील शेळप-बांबर या गावादरम्यान मोटार झाडावर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी,

महागाईत आणखी घट होण्याचे संकेत

वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा दृश्य परिणाम ऑक्टोबर महिन्यातील वस्तूंच्या किमतीवर दिसेल.त्यामुळे किरकोळ महागाई निर्देशांक अर्धा टक्क्‌याच्या खाली येईल, असा अंदाज युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्याअहवालात वर्तविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात खाद्यान्नाच्या किमतीत चांगली घट पाहायला मिळत आहे. आजच्या तारखेअखेरीस महागाई निर्देशांक अर्धा टक्क्‌याच्या खाली आहे.येत्या हिवाळी हंगामात खाद्यान्नाच्या किमती उणे पातळीवर जातील, असेअहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महागाई निर्देशांक ३.१ वरून २.६ टक्क्‌यांवर येईल. सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा किमती खाली आल्या आहेत. ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक उणे २.२८ टक्क्‌यांवर आला आहे. जून २०२५ पासून खाद्यान्न महागाई निर्देशांक उणे पातळीवर आहे.

सोलापूरात भाजपात दुफळी !बाहेरून येणाऱ्यांनी ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं : देशमुख

जिल्ह्यातील ४ माजीआमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दु‌फळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावीअसं विधान केले आहे.सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी

यंदा दिवाळी पावसातच जाणार !राज्यभरात पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून (२१ ऑक्टोबर) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातपूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली. मोठी पडझड झाली, झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.हवामान विभागाचाअंदाज काय?हवामान अंदाजानुसार,विभागाच्या आजपासूनकुठे आहेत इशारे ?२३ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली यलो अलर्ट, २४ ऑक्टोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, २५ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचे येलो अलर्टकोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे २१ ऑक्टोबरपासून पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा परिषद मिनी मंत्रालयात कोणाचे राहणार वर्चस्व

सोलापूर जिल्हा परिषद मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेवर आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून झेडपीवर वर्चस्व गाजलेले मोहिते पाटील गट यंदाच्या निवडणुकीत टर्निंग पाईन्ट ठरणार असले तरी ज्या त्या तालुक्यातील तेथील नेत्यांचा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते.जिल्ह्यात ११ आमदारापैकी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख, मंगळवेढा आमदार समाधान आवताडे आणि शहरातील शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे भाजपचे पाच आमदारांची ताकद आहे. हे जरी जमेची बाजूर असली तरी या भाजपच्या पाच आमदारामध्ये सध्या तरी एकमत दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत राजकारण पहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मोहिते पाटील यांना झेडपीची निवडणुक कशी लढवायची आणिती कशी जिकायची हे त्यांना अनेक वर्षापासून ज्ञात आहे. त्यामुळे मोहिते पाटील गट हा या निवडणुकीत निर्णायक ठरू शकणार असणार आहे. भाजपचे जरी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वर्चस्व राहिले तरी अंतर्गत धुसफूस मात्र भाजपमध्ये वाढत असून याचा फटका कार्यकर्त्यांना बसणार आहे. झेडपीवर सर्वाधिक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची कमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर आहे. त्याला साथ खासदार प्रणिती शिंदे यांची मिळणार आहे. परंतु भाजपला रोखणे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला कठीण असून अनेक जण पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांची यादी लागली आहे. त्यामुळे झेडपीमध्ये ज्या त्या तालुक्यात तेथील नेत्यांचा दबदबा पहायला मिळणार आहे.या नेत्यांचा दिसणार करिष्माअक्कलकोटमध्ये मध्ये आ. कल्याणशेट्टी, दक्षिणमध्ये आ. देशमुख, सांगोल्यात आ. देशमुख, बार्शीत आ. दिलीप सोपल, राजाभाऊ राऊत, करमाळा आ. नारायण पाटील, संजयमामा शिंदे, मंगळवेढ्यात आ. समाधान आवताडे, माढ्यात आ. अभिजीत पाटील, बबनराव शिंदे, मोहोळमध्ये आ. राजू खरे, राजन पाटील, उत्तरमध्ये दिलीप माने, काका साठे, शहाजी पवार. पंढरपरमध्ये प्रशांत परिचारक. माळशिरसमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या सर्वांची ताकद पाहायला मिळणार,