आंतरराष्ट्रीय

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन –

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- दि.1ऑगस्ट पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे साहित्यसम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व जयंती निमित्त पिरळे ग्रामस्थांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी पिरळे गावचे सरपंच ज्ञानदेव शिंदे, माजी सरपंच महादेव शिंदे,उपसरपंच दशरथ जाधव, मातंग युवा संघटना अध्यक्ष सुभाष खिल्लारे, जिल्हाध्यक्ष उमेश भैय्या खिलारे, सोमनाथ निकम,कालिदास दडस, भाऊसाहेब खिल्लारे,विजय खंडागळे,सागर खिलारे,तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

खुडूस प्रतिनिधी – मकरंद साठे

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जन्मशताब्दीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी युवा क्रांती सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मकरंद साठे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साठे,युवा क्रांती सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पवार, ए.बी.प्रतिष्ठाणचे महादेव लोखंडे, पांडुरंग साठे, दादासाहेब साठे, चंद्रकांत साठे, छगन लोखंडे, राम कांबळे, बंडू कांबळे,धनाजी साठे,पोपट साठे,स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अश्वसेन गोरवे,शंकर सकट,अंकुश शिंदे रोहित साठे,माऊली साठे,वैभव गायकवाड,भागवत साठे,सचिन कांबळे,सुशांत गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणुस हा केंद्रबिंदू आहे.माणसाचे,माणुस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा,जगण्यासाठी धडपडणाऱ्यांची निष्ठा यासाठी अण्णाभाऊ साठे लिहित व गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक,नायिका बनविणारे अण्णाभाऊ साठे मराठीतील महत्त्वाचे साहित्यिक आहेत कृष्णा-कोयना नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी,गावगाढा, स्वातंत्र्य चळवळ त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलीकडे पोहचवली. या सर्व कर्मठ आणि कट्टर पणाला विरोध करून न्याय, समता, बंधुता स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणुक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महामानवाच्या 100 व्या जन्मशताब्दीनिमित्त व जयंतीनिमित्त सर्वांनी त्यांच्या कार्याचे चरित्राचे, त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे प्रती आदर व्यक्त करून व शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिसटन्स ठेवून डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पांडुरंग साठे,योगेश साठे,सुशांत गायकवाड, माऊली साठे,केशव गोरवे आदींनी परिश्रम घेतले.

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

कोविड १९ च्या संकटामुळे जल्लोषात साजरी केली जाणारी जयंती साधेपणाने साजरी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -(जवळा नि / सिरसाव : प्रतिनिधी)-

परांडा तालुक्यातील जवळा नि येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान जवळा नि यांचे वतीने कोविड १९ चे नियम पाळुन साजरी करण्यात आली
जयंतीची सुरुवात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालुन पुष्प अर्पन करुन प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली,
संपुर्ण जगासमोर कोरोना विषानुचे संकट उभे आहे म्हणुन शासनाने सद्या जमावबंदी आदेश लागु केलेले आहेत कोणतेही कार्यक्रम‌ मोठेपणाने साजरे करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या सुचनांचे काठेकोरपणे पालन करुन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. म्हणुन जास्त लोकांना एकञ न जमा करता मोठ्या जल्लोषात साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साध्याच पध्दतीने साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमासाठी सरपंच नवजीवन चौधरी, ग्रामसेवक पोपट खटकाळे, एन. डी. एम. जे. संघटना जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत तसेच साहित्यसम्राट प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीराम चव्हाण यांचेसह पत्रकार गणेश गवारे, कैलास चव्हाण, प्रभाकर चव्हाण सर, शाम चव्हाण, राजेंद्र चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, हनुमंत पांगरे, सुनिल चव्हाण, आदिंसह गावातील सर्व जाती धर्मातील तरुण उपस्थित होते

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी
एन डी एम चे जिल्हाध्यक्ष चर्मकार समाजाचे नेते आजिनाथ राऊत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना

*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*

*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )-ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है…
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती येथील शोषित पीडित दलित कष्टकरी नाहिरे वर्गाच्या यांच्या तळहातावर तरलेली आहे.
जग बदल घालुनी घाव  मज सांगून गेले भीमराव .
हे अवघ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती, ही जयंती आज  संपूर्ण जगभरात  मोठ्या दिमाखात  साजरी झाली असती परंतु  सध्या  जगामध्ये  covid-19  कोरणा प्रादुर्भावाने  थैमान घातला आहे.यामुळेआज अण्णाभाऊंची जयंती  घराघरात  वैचारिक पद्धतीने आपण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत.उपेक्षित शोषित पीडित कष्टकरी कामगार त्यांचं दुःख साहित्यातून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भरीव असं योगदान आहे.त्यांचं साहित्य लिखाण महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापलीकडे म्हणजे जगभरात गाजले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोल्हापूर आणि सातारा च्या मध्यभागी डोंगर पायथ्याशी वसलेल्या वाटेगाव या निसर्गाने नटलेल्या गावी कृष्णा आणि वारणा नदीच्या परिसरात वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे आईचे नाव वालुबाई राघोबा साठे असे होते.अण्णाभाऊ चे शिक्षण अगदी दीड दिवसाचे कुलकर्णी नावाच्या मास्तरने अण्णाभाऊंना मारले त्यामुळे अण्णाभाऊंनी शाळेकडे पाठ फिरवली. कुटुंबाची दारिद्र्य पराकाष्टा पाहून रोजगारासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबईचा रस्ता धरला चार मुले व पत्नी घेऊन ते पायी मुंबईच्या दिशेने निघाले 1931 आली भाईखेळा येथे चांदबिबीच्या चाळीमध्ये जिन्याखाली आपला फाटका संसार मांडला.मिळेल ते काम मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.   त्यात अण्णाभाऊंची ओळख एका कापड विक्रीकाशी झाली.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अण्णाभाऊ ने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला व ते कपड्याचे गाठोडे घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या रस्त्याने वन वन फिरत होते.त्यामुळे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न काहीसा मिटला होता.त्यानंतर माटुंगा येथील लेबर कॅम्प मध्ये राहावयास गेले लेबर कॅम्प म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मानव मुक्ती लढ्याचा बालेकिल्लाच होता.याच बालेकिल्ल्यात अण्णा भाऊंसारखा साहित्यसम्राट घडत गेला आणि अख्ख्या जगाला तो लेखणीच्या माध्यमातून कळाला.त्यांच्यात लपून बसलेला विद्रोही लेखक अखेर साहित्याच्या माध्यमातून बाहेर आला.कम्युनिस्टांच्या स्टडी सर्कल मुळे अण्णाभाऊंच्या लेखणीला धार मिळत गेली. 1946 साली टिटवाळा येथे शेतकरी परिषद भरली त्याच ठिकाणी लाल बावटा कला पथकाची स्थापन झाले.आणि शाहीर अमर शेख शाहीर,गव्हाणकर यांच्या साथीने अण्णाभाऊ लोकशाहीर झाले.15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यावर अण्णाभाऊ नाखूष होते.इंग्रजांच्या पारतंत्र्यातून ब्राह्मण प्रस्थापित वर्ग स्वतंत्र झाला परंतु बहुजन वर्ग मात्र गुलामच आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच ते म्हणतात ये आजादी झुठी है देश कि जनता भुकी है. महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यात बहुजन पुरुषांच्या आदर्शाचा गौरव करतात तसेच मनुवादी विचारधारा जोपासणाऱ्या ची चिरफाड करतात अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला पुरोगामित्वला पोषक ठरणारी प्रेरक ऊर्जा कम्युनिस्ट कडून घेतली त्यांच्या नंतर लक्षात आले भारतात वर्ग नाहीतर जाती आहेत.जातीव्यवस्था हे मनुवाद्यांचे आपत्य आहे जोपर्यंत जातिव्यवस्था आहे तोपर्यंत एक संघटन शक्य नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पुरोगामीतत्वाला प्रेरक ऊर्जा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतली आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनाची ललकारी ठोकली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्याकाळी 1936 ते 1941 या काळात मोठी राजकीय लढाई उभी केली होती.या दलित उद्धरण्या च्याआंदोलनाने अण्णाभाऊ साठे भारावून गेले होते.अण्णाभाऊ साठे म्हणतात “ज्या धनिक शहानी धर्मांधांनी दलित समाजाचा हत्ती व्यवस्थेच्या चिखलात घालून रुतून ठेवला आहे”त्यांनी आम्हाला कलंकित अवमानित केले आहे.तेव्हा आपली एकजूट करून या विषमता मूलक समाजव्यवस्थेवर आपल्या विचारांचा जोरदार घाव घालू व अन्यायसमाज व्यवस्था मोडून टाकू व गुलामगिरीतून मुक्त होऊन आपला स्वतंत्र समतेवर आधारित वेगळी समाज व्यवस्था निर्माण करू. ज्या  समाजव्यवस्थेने नाकारले आहे त्यांची गुलामी पत्करणे शक्य नाही. म्हणून ती व्यवस्था झुगारून नवीन समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे या मताशी अण्णाभाऊ ठाम होते. सध्या आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असून अजूनही समाजव्यवस्था बदललेली नाही जैसे थे आहे. फक्त अन्याय-अत्याचाराच्या पद्धती बदलल्या आहेत. आजही असंघटित असल्यामुळे बौद्ध समाज व मातंग समाज,दलित समाज यांना अन्याय-अत्याचाराला पावलोपावली समोर जावे लागत आहे. याची कित्येक उदाहरणे महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहेत.चंद्रकांत गायकवाड सारख्या तरुणाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली जाते.आमच्या भगिनीवरती दिवसाढवळ्या बलात्कार केला जातो कसली मानसिकता.यात आता बदल झाला पाहिजे अन्याय अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे.अखिल भारतीय साहित्य संमेलन मुठभर लोकांच्या हाती असून आपले स्वतंत्र वेगळे साहित्य संमेलन निर्माण केले पाहिजे. असे अण्णाभाऊंना प्रकर्षाने वाटत होते.त्यांनी मुंबई 1958 साली भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलन उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणात प्रकर्षाने जाणवते.अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान बहुमूल्य आहे.त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने जगभरात मराठी आणि महाराष्ट्र राज्याची मान निश्चितपणे उंचावली आहे.त्यांनी कामगार लढ्यातील संपातील यांच्या जीवनावर गाणी लिहिली अण्णाभाऊंनी फकीरा,चित्रा,वैजंता,वारणेचा वाघ अशा अनेक कथा कादंबऱ्याच लेखन केलं. अण्णाभाऊंनी एकंदर30 कादंबऱ्या, 22 कथा एक प्रवास वर्णन, एक नाटक,दहा शाहीर गीते, 15 वगनाट्य, तमाशे, एक छक्कड, आणि 100 पेक्षा अधिक गीते, एवढे मोठे साहित्य अण्णाभाऊंनी लिहिले त्यांच्या काही कथांच्या आधारे चित्रपट निर्मिती झाली.फकीरा,वारणेचा वाघ, साताऱ्याची तरा ( अलगुज), डोंगरची मैना (माकडीचा माळ), मुरली मल्हारी (चिखलातील कमळ ), बारा गावचे पाणी( वैजंता) टिळा लावते मी रक्ताचा (आवडी), हे त्या काळात गाजलेले चित्रपट होते.अण्णाभाऊंचे साहित्य अनेक भाषेत भाषांतरित करण्यात आले. आशा या पुरोगामी महाराष्ट्राची शान असणाऱ्या महान साहित्यिकास शंभराव्या जयंतीनिमित्त,जन्म शताब्दी निमित्त पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने  विनम्र अभिवादन..

…. संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज -प्रमोद ज्ञानदेव शिंदे,9975903040.

पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे
जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन
पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती येथील दलित शोषित कष्टकऱ्यांच्या नाहीरे वर्गाच्या हातावर तरली आहे, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन- अभी वादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे)– मौजे एकशिव सिद्धार्थ नगर व साठेनगर येथे वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
 काही दिवसापुर्वी मौजे एकशिव ता.माळशिरस येथे 1ला कोविड,कोरोना ग्रस्त पेशंट सापडला होता.म्हणून ज्या भागात कोरोना बाधित पेशंट सापडला तो भाग सिल करण्यात आला होता. हा भाग दलित लोकवस्ती असल्याने 200 कुटुंब अडकुन पडले होते सिल केलेल्या भागातून लोकांना बाहेर जाता येत नव्हते या वस्तीमध्ये सर्वच लोक मोलमजुरी करणारे व हातावर पोट भरणारे आहेत. परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे येथील लोकांना घरातच अडकून बसावे लागले. त्यामुळे अन्न धान्य व उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे दैनंदिन अडचणी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी माळशिरस विधानसभा उमेदवार राज यशवंत कुमार यांच्या वतीने 101 गरजू लोकांना जिवनआवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज कुमार यांनी माळशिरस तालुक्यातील वंचित च्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की अशा परिस्थिती अडचणीत असलेल्या लोकांना वंचित आघाडीच्या वतीने तात्काळ मदत करा व काही अडचण आल्यासआमच्याशी संपर्क साधा असे आवाहन केले या वेळी वंचितचे एकशिव अध्यक्ष दिपक झोडगे,बन्नी साळवे,विजय जगताप, सुरज कांबळे, सनी बाबर,यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमास अभिजित गायकवाड ,सलमान शेख, प्रितम साळवे ,धर्माअशोक सावंत,रामभाऊ सावंत,हरीभाऊ साळवे, शांतिनिकेतन साळवे, सामाजिक कार्यकर्ते बाजिराव खताळ श्रीकेश वरुडे , प्रमोद साळवे ,रोहित असुदे उपस्थित होते.

मौज एकशिव येथे वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शु

वाघवळीवाडा बुद्धलेणी बचावासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांची भेट

.
(आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची केंद्राने घेतली दखल)
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नवी मुंबई:दि (प्रतिनिधी) येथील उलवे परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून वाघवळीवाडा बुद्धलेणी च्या संवर्धन व पुनर्वसनाचा प्रश्न पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेने उचलला आहे, आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी यांच्या नेतृत्वात संविधानिक लढा उभारला असून या लढ्याला घवघवीत यश मिळत आहे. याचीच प्रचिती म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची लेणी स्थळाला भेट.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामा अंतर्गत येथिल गावचे पुनर्वसन करण्यात येत आहे, प्राचीन व ऐतिहासिक लेणी मध्ये स्थानिक गावकऱ्यांनी केरुमाता देवी ची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चना करून या लेणीचे जतन व संवर्धन केले आहे, मात्र सिडको प्रशासनाने केरुमाता देवीचे पुनर्वसन केले किंतु लेणीचे विद्रुपीकरण करून लेनिवर माती टाकून लेणीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे,
सदर घटनेची चाहूल पँथर योद्धा वीरेंद्र लगाडे यांना लागली असता पँथर डॉ राजन माक्निकर यांना माहिती दिली आणि पँथर योद्धा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली लेणी बचाव आंदोलनास सुरुवात केली, यावेळी OBC नेते राजाराम पाटील मागील 4 वर्षांपासून पुनर्वसन आंदोलन करत असून लेणी बचावासाठी प्रयत्नशील असल्याचे भेटीअंती सांगितले.
त्या अनुषंगाने पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय समाजसेवी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला याची दखल बहुतांश प्रसारमाध्यमांनी घेतली.
पुज्य भदंत शिलबोधी यांनी जाहीररीत्या प्रशासनाला ठणकावले, आंदोलनाचा इशारा दिला, लेणीचे जतन नाही केले तर भारतासह जगातील भिक्खू संघ आंदोलनात उभारतील आणि जागतिक प्रश्न निर्माण होईल असा इशाराही दिला.
नवी मुंबई RPI नेते महेश खरे यांनी प्रकरणाचे महत्व जाणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लेणी संवर्धनासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी लेणीचे पाहणी केली व कोणत्याही परिस्तिथीत लेणीचे संवर्धन व पुनर्वसन करण्यात येईल, लेणी अवशेषांचे जतन करून बौद्ध स्तूप उभारण्यात येईल या बद्दल पुरातत्व खाते आणि मुख्यमंत्यांना पत्र पाठवेन अशी प्रसारमध्यांना पुढे बोलतांना ग्वाही दिली. यावेळी पँथर सम्यक योद्धाचे पुज्य भदंत शिलबोधी आठवले यांच्यासोबत पाहणी केली, पँथर श्रावण गायकवाड, पँथर डॉ राजन माकणीकर, वीरेंद्र लगाडे, OBC नेते राजाराम पाटील, पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड, सुरेश बारशिंग, RPI नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, आदी अनेक मान्यवर व
शेकडो RPI व पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.
बौद्ध लेणीच्या जतनासाठी बौद्धभिखु, ग्रामस्थ आंदोलनात उतरले असून देशातील ही पहिली बौद्ध लेणी होय, जिच्यासाठी हिंदू मुस्लिम व बौध्येतर लेणी बचावासाठी आंदोलनात उतरले आहेत. OBC समाजामध्ये जनजागृती आणून समता पेरण्याचे काम राजराम पाटील यांचे हातून होत असल्याचे पुज्य भदंत शिलबोधी यांनी कौतुकात सांगितले व त्याच्या पुनर्वसनाच्या कामात ग्रामस्थांच्या सोबत असल्याचे वाचन भन्ते यांनी दिले.
पुज्य भदंत व त्यांच्या टीमने घेतलेल्या लेणी बचाव आंदोलनाच्या आंदोलनात संविधानतज्ञ सुरेश माने, ना. रामदास आठवले यांच्या आगमनाने आंदोलनाला एक सकारात्मक दिशा लाभली असून असंख्य राजीकय पक्ष प्रमुखांनी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, RPI (खरात) राजाराम खरात यांनी आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगून लवकरच भेट देणार असल्याचे दूरध्वनिहून सांगितले.
सदर देणीच्या संवर्धन व आंदोलनास भारतातील इतिहासप्रेमी, लेणी अभ्यासक व अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुज्य भदंत शिलबोधी यांनी प्रसारमाध्यमांच्या वतीने केले आहे.

पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक*

  • पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे – नातेपुते सध्या कोरोना य प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर  शिक्षक आणि शिक्षण विभाग वेगवेगळ्या युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवून ते व्हिडीओ लिंक शिक्षकांच्या मोबाईल वरती पाठवले जातात. व शिक्षक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती पाठवतात तसेच आता शिक्षण विभागाकडून दर आठवड्याचा म्हणजे सोमवार ते शनिवार तासिका प्रमाणे शाळेचे वेळापत्रक तयार केले असून ते वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल वरती पाठवले जाते व त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करण्यासाठी सांगितले जात आहे.
  • विद्यार्थ्यांकडून अभ्यास सोडून घेऊन तो अभ्यास मोबाईल वरती व्हाट्सअप च्या माध्यमातून टाकण्यास सांगितला जातो व तो अभ्यास शिक्षक तपासून पाहतात त्यामध्ये काही चुका असल्यास ते व्हाट्सअप वरती विद्यार्थ्यांना सूचना देतात परंतु काही विद्यार्थ्यांना मोबाइल सुविधा नसल्याकारणाने स्वतः शिक्षक हे वेळापत्रक घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जातआहेत. पिरळे येथील जि.प शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  खरात सर हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जात आहेत. व त्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक देऊन त्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत.खरात सर हे स्वतः तोंडाला मास्क बांधून विद्यार्थ्यांशी सोशल डिस्टंसिंग ठेवून त्यांना अभ्यासाविषयी सांगताहेत तसेच जि.प. शाळा शिंदे वस्ती येथील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे मॅडम ह्या सुद्धा लॉक डाऊन झाल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेही पंचक्रोशीत कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेत जाता येत नाही तरी सुद्धा शिक्षक सचोटीने विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास कसा पोचवता येईल विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल याचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत या प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
जि प शाळा येथील इयत्ता सहावीच्या शिक्षक खरात सर विद्यार्थ्यांना वेळापत्रक देताना
खरात सर विद्यार्थ्यांना अभ्यास संदर्भात माहिती देताना

केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या योजना जनसामान्यांनाद्या.पी एस खंदारे.

केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या योजना जनसामान्यांनाद्या…
पी एस खंदारे
.
वाशीम)
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने कोवीड 19साथरोग व टाळेबंदी मुळे होणा-या दुष्परिणामां बाबत लोक कल्याणकारी अनेक प्रकारच्या योजना घोषित केल्या आहेत. या योजनेच्या अमलबजावणी बाबत नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस व राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान यांच्या प्रयत्नाने “We Claim”या मोबाईल अॅप च्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. काॅल करून मिळालेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाभार्थी ला विविध योजना चा लाभ मिळाला नाही अशा सर्व लाभार्थी ला शासनाने घोषित केलेल्या योजना चा लाभ जनसामान्याना तात्काळ देऊन शासनाच्या योजना ची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव डाॅ. एड. केवल ऊके,राज्य सचिव मा वैभव गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधिकारी वाशिम यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये रोजगार हमी योजना, प्रधान मंत्री गरिब कल्याण योजना, उज्ज्वला योजना (मोफत गॅस सिलिंडर),संघटीत क्षेत्रासाठी 24%PEF,स्वंयसाह्यता बचतगटासाठी N.R.L.M.योजना अंतर्गत विस लाख रुपये बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देणे,प्रधान मंत्री किसान सहायता योजना अंतर्गत प्रती शेतकरी दोन हजार रुपये तिन महिन्यासाठी, जन धन योजना प्रती लाभार्थी पाचशे रुपये तिन महिन्यासाठी, सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत जेष्ठ नागरिक, अपंग, विधवा इत्यादी साठी एक हजार रुपये अतिरिक्त अर्थ सहाय, अग्रभागी आरोग्य सेवा कामगारांसाठी पन्नास लाख रुपये विमा योजना,या मध्ये डाॅक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, एस टी. कामगार, चालक, वाहक इत्यादी, P.D.S.व I.C.D.S.अन्नधान्याची मोफत धान्य वाटप योजना, अंगणवाडी पौष्टिक आहार व इतरही शासनाने घोषित केलेल्या योजना जनसामान्यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
कोरोणा संचारबंदी च्या काळात सर्वच जेनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या मध्ये प्रामुख्याने दैनंदिन रोजमजुरी करणारे कामगार, शेतमजुर,शेतकरी, न्हावी, परिट, फेरीवाले, फळ फळावळे, भाजीपाला विक्रेते, तिन चाकी रिक्षा (खटले)चालवणारे, विटभट्टी कामगार, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, फोटोग्राफी, व्हिडिओ शुटींग्ज करणारे, गायक, शाहीर, कवी, बॅडबाजा, वजांत्री, कलाकार, बहुरूपी, नृत्य कलाकार, तमासगिर, देहविक्रीय करणा-या महिला, भटके, पालावर राहणारे कुटुंब, स्थलांतरित कामगार आदी लोकांना कोरोणा संचारबंदी च्या काळात अतोनात हाल अपेस्टा सहन करत जिवन जगत आहेत. शासनाने सर्व लोकांना मदत करावी म्हणून एनडीएमजे च्या वतीने निवेदन दिले.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य सहसचिव पी एस खंदारे, विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजीव दारोकार,वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत,उपाध्यक्ष दतराव वानखेडे, भागवत गवई, वाशिम जिल्हा सचिव निलेश भोजणे, जिल्हा संघटक रामदास वानखेडे, नारायण सरकटे, महादेव कांबळे, बबन खरात, एड. भारत गवळी,डाॅ. एम.बी. डाखोरे आदी सहभागी झाले होते.

शरद पवार साहेब कोरोना आढावा घेण्यासाठी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्हा दौऱ्यावर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब हे कोरोना परिस्थिती पाहण्यासाठी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी नातेपुते येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली पैलवान अक्षय भांड यांनी स्वागत केले. तसेच पुढे माळशिरस येथे शिवतीर्थ बंगला येथे प्रमुख राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या तालुक्यातील घडामोडी जाणून घेतल्या तसेच या वेळी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तामामा भरणे .सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीरामकाका साठे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव पाटील, माळशिरसचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव युवा नेते संकल्प डोळस, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे उपाध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, श्रीशंकर कारखान्याचे माजी संचालक विलास आद्रट, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे, हंसराज माने पाटील, युवा नेते सुजयसिंह माने पाटील, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे वेळापूर तेथे येथे चांदापुरी सहकारी साखर कारखाना चेअरमन उत्तमराव जानकर यांची भेट घेतली व राजकीय विषयांवर येथे चर्चा करण्यात आली तसेच वेळापूर येथे उत्तमराव जानकर यांच्या संकल्पनेतील धान्य बँक याचे लोकार्पण सोहळा आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सोलापूर दौ-यायाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

वेळापूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर
धान्य बँकेचा लोकार्पण सोहळा माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला
माळशिरस येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत राजकीय चर्चा
गरुड बंगला वेळापूर येथे उत्तम जानकर यांची भेट
नातेपुते येथे राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते पैलवान अक्षय भांड यांच्यावतीने मा पवार साहेब यांना निवेदन देऊन त्यांचा कार्यकर्त्यांसमवेत सत्कार करण्यात आला

*जवळा नि येथे वयोवृद्ध महिला सापडली कोरोना पाॅझीटीव्ह!

जवळा नि येथे वयोवृद्ध महिला सापडली कोरोना पाॅझीटीव्ह!

तालुक्याचे तहसिलदार, बिडीओ, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन गावातील काही भाग केला सिल

कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना अपयश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उस्मानाबाद जवळा नि‌: प्रतिनिधी (अजिनाथ राऊत ) परांडा तालुक्यातील जवळा नि येथील ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे. सदर महीलेला पुर्वी बिपीचा व शुगर आजार होता. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांचे कुटुंबीयांनी दि.१६ जुलै २०२० रोजी शहा हाॅस्पिटल बार्शी येथे प्रथम उपचारासाठी हलवण्यात आले होते सदर हाॅस्पिटलमध्ये उपचार न झाल्याने पुढील उपचारासाठी जगदाळे मामा हाॅस्पीटल बार्शी येथे नेण्यात आले होते तपासणी झाल्यानंतर रात्री उशीरा कोरोना पाॅझीटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर दोन तासाने सदर महिलेचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला आहे.
पाॅझीटीव्ह आढळुन आलेल्या मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना आरोग्यविभागाने संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांचे स्वॅबचे नमुने घेवुन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची व गावातील एकुण ३० ते ३५ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती गावचे ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे, सज्जाचे तलाठी मोरे साहेब यांनी दिली आहे. कोरोनाचे विषाणूचे संकट निर्माण झाल्यापासून जवळा नि गावामध्ये अद्याप एकही रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आला नव्हता त्यामुळे आनखी कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण सापडतात की काय? अशी चर्चा आहे तसेच गावातील ‌नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीच्या बाबतीत उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थीती दिवसेंदीवस बीघडत चालली असुन नागरीकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रोग फैलावत असल्याचे अनेकांचे मत असुन उस्मानाबाद जिल्हा हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे.
परांडा तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, यांनी जवळा नि गावास भेटी देऊन रुग्ण सापडलेला तांबोळी गल्लीतील काही भाग सिल करण्यात आला आहे.
तर नागरीकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेवुन नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार अनिलकुमार हेळकर व परांडा उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सय्यद यांनी केले तर परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी कोविड १९ ची लक्षणे आढळुन आल्यास किंवा बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या नागरीकांची माहिती देण्याचे आवाहन केले. कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणुन आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत परंतु नागरीकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे मत गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे, तलाठी नितीन मोरे, सरपंच नवजिवन चौधरी, उपसरपंच अशोक गवारे यांनी वेळीच उपस्थित राहुन उपाययोजना करुन सहकार्य केले.

You may have missed