धैर्यशील मोहिते-पाटील यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) –प्रती,मा. पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीण.
मा. महोदया,
मराठा आरक्षण, स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा रखडलेल्या नियुक्त्या, सारथी या सारख्या समाजाच्या प्रश्नांप्रती उदासीन धोरणामुळे महाविकास आघाडी सरकार वर मराठा समाजाचा रोष आहे.
पोलीस खात्यात ज्यांच्या कास्ट व्हॅलिडीटी अपूर्ण आहेत, त्यामुळे त्यांची पदोन्नती होऊ शकत नाही व त्यामुळे पदोन्नतील जागा रीक्त आहेत, त्या ठिकाणी ओपन प्रवर्गातील लोकांना पदीन्नती देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
या निर्णया अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ओपन प्रवर्गातील नाईक पदावरील ८५ हवालदार, तर हवालदार पदावरील 33 लोकांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली, यामध्ये खुल्या प्रवर्गातील पोलीस बांधवांना याचा लाभ मिळाला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच मागील सरकारचा घेतलेला निर्णय रद्द करून सेवाज्येष्ठते नूसार पदोन्नती देण्याचे ठरवले, परंतू फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे ज्यांना पदोन्नती मिळाली, अशा पोलीसांचे महाराष्ट्रतील कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांनी पोलीसांचे पदावनती (डीमोशन) केलेले नाही. मात्र आपल्या कार्यालयाने सोलापूर जिल्ह्यातील नाईक पदावरील ८५ हवालदार, तर हवालदार पदावरील 33 लोकांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती, त्यांची पदावनती केली.
आपल्या कार्यालयाने या घेतलेल्या अतातायी निर्णयामुळे ओपन प्रवर्गातील समाजातील पोलीस बांधवांवर अन्याय होताना दिसत आहे. आपल्या कार्यालयाने घेतलेला हा निर्णय अजूनच मराठा समाजाच्या नाराजीला खतपाणी घालत आहे.
आपण सारासार विचार करून ओपन प्रवर्गातील ज्यांना पदोन्नती मिळाली होती, आपल्या कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाने पदावनती झाली होती, त्यांना पुन्हा पदोन्नती देण्यात यावी, ही विनंती.
कळावे
आपला
धैर्यशील राजसिंह मोहीते पाटीलसंघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टीसोलापूर जिल्हा.