Blog

मुंबई विमानतळावर परदेशी सोने तस्करीचा पर्दाफाश, दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक यू

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डीआरआयने विमानतळावरील दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींकडून 24 कॅरेटचे 1.2 किलो परदेशी सोने जप्त केले आहे.दोन्ही आरोपींविरुद्ध सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. डीआरआय आता या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत आणि कोणाच्या सूचनेनुसार तस्करी करत होते याचा तपास करत आहे.गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) शनिवारी पाळत ठेवली होती. यादरम्यान डीआरआय टीमला एरोब्रिजच्या पायऱ्यांवर सफाई कर्मचाऱ्यांचा एक टीम लीडर संशयास्पदरित्या एक पॅकेट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसला. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले असता तो कर्मचारी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडील पॅकेट जप्त केले. जप्त केलेल्या पॅकेटमध्ये पांढऱ्या कापडात सोन्याची पावडर आणि मेण आढळले. कर्मचाऱ्याची चौकशी केली असता त्याच्या पर्यवेक्षकाने सोन्याचे पॅकेट काढून त्याच्याकडे बाहेर देण्यासाठी सोपवले असल्याचे त्याने सांगितले. यानंतर डीआरआयने पर्यवेक्षकालाही अटक केली आहे. दोघेही विमानतळावरून सोने बाहेर नेण्यासाठी तस्करांना मदत करत होते. दोन्ही आरोपी एका खाजगी विमानतळ सेवा कंपनीत काम करतात.

2026 मध्ये सोन्याचा दर 162500 ते 182000 असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल

aba Vanga On Gold Price: दिवाळी मुहूर्तावर सोन्याच्या किमतीने सर्वांनाच धक्का दिला आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या करारात 2 टक्क्यांनी घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,27,320 रुपयांवर पोहचली आहे.मजबूती आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होणे. अशातच प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमीताबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल.या वर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय तेजी दिसून आली आहे. देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक ही याची कारणे आहेत. परंतु वातावरण बदलत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पारंपारिक कारणांमुळे नाही तर जागतिक वित्तीय व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळे झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक राजकारण, अर्थशास्त्र आणि डॉलरच्या ताकदीवर सोन्याचे भाव अवलंबून होते. या वर्षी अनिश्चिततेमुळे ते वर गेले. तथापि, आता तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, परंतु गुंतवणूकदार सावध आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार ते विकण्याचा विचार करत आहेत. सोन्याचे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.2026 सोन्याचा दर काय असेल?2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल अशी देखील चर्चा रंगली आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार 2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल, याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ग्रोक यांना विचारण्यात आले की, सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर पोहोचला आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, ग्रोक म्हणाले की, 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता असल्याने चलन प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, बँकिंग संकट येऊ शकते आणि बाजारात तरलतेचा अभाव येऊ शकतो.अशा परिस्थितीत, सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. खरं तर, लोक आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतील. आर्थिक संकटाच्या काळात, अलिकडच्या वर्षांत सोन्याच्या किमती 2 0 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या, बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जर 2026 मध्ये मंदी आली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 162,500 ते 182,000 दरम्यान पोहोचू शकते. हा अंदाज जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित आहे.

पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यातअजित पवारांची तुफान फटकेबाजी; कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कार्यक्रमात एकच हशा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.’मी या ठिकाणी काय नावं घ्यायला आलोय का? मी बायकोचं कधी नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता?’, असं म्हणत अजित पवार यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर एका कार्यकर्त्याने रस्त्यावरील डिव्हायडरून कुत्रे उडी मारत असल्याचीतक्रार केली. त्यावर अजित पवारांनी डोक्याला हात लावत म्हटलं की, ‘मी कुत्र्यांना सांगतो की उडी मारू नका’, असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. अजित पवार काय म्हणाले?ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. आमची देखील पंचायत होते. कारण चांगलं काम झालं नाही तर आम्ही फडाफड बोलतो. कारण त्या कामांना आम्ही निधी दिलेला असतो. आम्हाला निधीच्या पै आणि पैचा हिशेब लागतो, असं अजित पवार यांनी म्हटलं.’पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यात’अजित पवार कार्यक्रमात बोलत असताना एका कार्यकर्त्याने ग्रामपंचायत कामांच्या संदर्भात अडवणूक होत असल्याची तक्रार केली. यावर अजितपवार म्हणाले की, ग्रामपंचायती वाल्यांना कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी निवडून दिलं का? मला तुम्ही निवडून दिलं, पण ग्रामपंचायतीमध्ये निवडून देण्यासाठी मी आलो का? तुम्ही ग्राम पंचायतीच्या सदस्यांना निवडून दिलं, तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्ही जे तुमचं योग्य काम करतात त्यांची बटने (मतदान करा) दाबा. आता पायताण घे आणि ‘मी बायकोचं नाव कधी घेतलं नाही’अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना अनेकांची नावे घेतली. मात्र, त्यावेळी एका व्यक्तीने म्हटलं की, सरपंच राहिलेल्या एका व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं नाही. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आता कोणाकोणाचे नावे घेऊ. मी या ठिकाणी नावे घ्यायला आलोय का? मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता ? मी येथे काय उखाणे घ्यायला आलोय का?, असं अजित पवारांनी म्हणताच पुन्हा एकदा कार्यक्रमात एकच हशा पिकला.ाझ्या डोक्यात हाण, असं अजित पवार यांनी म्हटलं.’मी कुत्र्यांना सांगतो उडी मारू नका’ अजित पवार हे रस्त्यांच्या विकासाबाबत बोलत होते, एवढ्यात खाली बसलेल्या एका व्यक्तीने अजित पवारांकडे तक्रार केली आणि म्हटलं की, ‘दादा रस्त्यावरील डिव्हायडर मोठेकरा. कुत्रे अचानक उडी मारतात आणि गाडीसमोर येतात.’ त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की. हो मी आता कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका, असं म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर पुढे अजित पवार म्हणाले की, देवा बाराम तीला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला बारामतीशिवाय कोणी नाही.

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचे दर वाढले

दिवाळीत यंदा फटाक्यांनाही महागाईची झळ बसली आहे. फटाक्यांच्या किमतीम ।ध्ये २० ते २५ टक्क्‌यांनी वाढ झाली [ आहे. मात्र, किमती वाढल्यानंतरही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी : गर्दी आहे. फटाक्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे [ फटाके विक्रेत्यांनी सांगितले.आवाज फटाक्यांसोबत करणा-या आकाशात उंच जाऊन रोषणाई करणा या फटाक्यांना जास्त मागणी आहे. मुंबईत तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणावर फटाके येतात. दक्षिण भारतामध्ये या वर्षी गेल्या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फटाक्यांच्या परिणाम उत्पादनावर झाला.कच्चा माल तयार करणे तसेच फटाके बनविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे दिवाळीपर्यंत अपेक्षित फटाक्यांची निर्मिती झाली नाही. परिणामी, दरवर्षीप्रमाणे फटाक्यांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. साहजिकच फटाक्यांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. मशीद बंदर, कुर्ला, मालाड येथील फटाके विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. शनिवारी, रविवारीही फटाक्यांची चांगली विक्री होईल, असे व्यापा-यांनी सांगितले.

दिवाळीच्या उत्सवात मुलांचे आरोग्य जपा!फटाके, धूळ आणि मिठाईतील घटकांतून मुलांना अॅलर्जीचा धोका

सोलापूर: प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी आता दारात आला आहे. घराघरात स्वच्छतेची लगबग, फटाक्यांचा आवाज आणि गोड पदार्थाची रेलचेल. सगळीकडे सष्णोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या जल्लोषात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. विशेषतः दम्बाने, एक्झिमाने किंवा अॅलर्जीने त्रस्त असलेल्या मुलांसाठी दिवाळीचा काळ थोडा अधिक काळजीचा असतो. दरवर्षी दिवाळीपाठोपाठ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.फटाक्यांच्या धुराचा घातक परिणाम हा दिवाळीत सर्वात घातक ठरतो. असेही गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचा प्रश्न प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आलेला आहे. त्यातय दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावण्यात येत असल्यामुळे लगान मुलांच्या चसनाच्या विकाराचे प्रश्न निर्माण होतानादिसतात. फटाक्यांच्या पुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑवस्वहइस आणि सूक्ष्म मूळकण यांसारखे रसायन असतात. हे घटक बसनाच्या समस्यांना चालना देतात. डॉक्टरांच्या मते, लहान मुलांनी फुफ्फुसे अजून विकसित होत असतात, त्यामुळे त्यांना पुरामुळे श्रास घेण्यास प्रास, खोकला किंवा दम्याचा झटका येऊ शकतो. बंद खिडण्या असलेल्या फांमध्ये हा मूर जास्त साचतो, त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवाळीपूर्वी परापरांमध्ये मोठी साफसफाई मुह होते. शहरी भागात बहुतेक घरात एसी असल्यामुळे असेही खिडक्या दारे बंद असतात. त्यातुनचदिवाळीत गोडधोड पदार्थाचीवसनाचा एक वेगळाच मुरा अशा घरांम ध्ये निर्माण झालेला असतो. याशिवाय दिवाळीत सफसफाई करताना कपाटे, गालिचे, पडदे, जुनी पुस्तके हलवताना धूळ आणि बुरशी हवेत पसरते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, डोळ्यांची जळजळ किंवा सतत शिंक येणे अशी लक्षणे दिसू शकतात, त्याम के स्वच्छतेदरम्यान घरातील खिडक्या उपड्या ठेवाव्यात, मास्क वापरावा आणि अॅलर्जी असलेल्या मुलांना मूळ असलेल्या ठिकाणी न नेहा दुसऱ्या खोलीत ठेवावे, असा सहा वञ्या देतात, दिवाळीच्च सर आनंदाचा असला तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांनाही काही काळजी घेणे आवश्यक असल्याचेरेलचेल असते. परंतु अनेक मिठाई आणि फराळातील घटक ज्यात शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, तूप किंवा कृत्रिम रंग असतो. एबी हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खात नाही. मात्र दिवाळीत हटकून फराज जीगत केला जाती. काही मुलांमध्ये यामुळे अॅलर्जी निर्माण करू शकतात, बाहेरून मिठाई घेताना त्यातील घटक तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ओळखीचे आणि घरगुती तयार केलेले पदार्थ मुलांना देणे अधिक सुरक्षित ठरते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.डॉक्टरांचे म्हणणे आहे. शक्यतो फटाक्याऐवजी दिवे, कंदील, रंगोली आणि पर्यावरणपूरक सजावट वापरा. परातील हथा स्वच्छ ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा एआर प्युरिफायर वापरा, दम्मानी औषये आणि इनहेलर नेहमी सहज उपलब्ध ठेवा. एथिक्षमा असलेल्या मुलांच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावा. धूर,

महाराष्ट्र आता ‘कांटम कॉरिडॉर’च्या नकाशावर : मुख्यमंत्री फडणवीस

: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांस-ोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदलघडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.आयओएनक्यू, मेरीलँड, अमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानास आणि ाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी मेझॉन ब्रैकेट, मायक्रोसॉफ्ट अइयूरआणि गुगल क्लाउड यासारख्या क्ल-ाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओआयओएनक्यू चे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधन, लॉजिस्टिक्स, फायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेग, अचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठीहे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम वर्धित ऑप्टिमायझेशन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश।

काळी दिवाळी’ आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सरकारला इशारा; प्रति हेक्टर ₹५०,००० मदतीची मागणी

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. घरे आणि शेतीमालाचीही मोठी हानी झाली आहे. मात्र राज्य सरकारने या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ‘काळी दिवाळी आंदोलन’ करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.सरकारने केलेल्या या दुर्लक्षाबद्दल आणि शेतकरी वर्गाची थट्टा केल्याबद्दल संताप व्यक्त करत पक्षाच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे पक्षाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रति हेक्टर ₹५०,००० देण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने पुनर्वसन निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सुधीर खरटमल यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या शेतकरी धोरणांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली असून, सरकारने तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या नेत्यांनी दिला.

सतत नडणाऱ्या ट्रम्प यांना भारताने दिला पहिला मोठा दणका, थेट कृतीमधून अमेरिकेला इशारा

टॅरिफ आणि रशियन तेल खरेदीवरुन भारताला नडत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने पहिला मोठा धक्का दिला आहे. रिपोर्टनुसार, भारताने रशियाकडून कच्चं तेलं विकत घेऊन चिनी मुद्रा युआनमध्ये पेमेंट केलं आहे.डीलच्या तुलनेत चिनी मुद्रेमध्ये होणारं पेमेंट कमी आहे. पण यामुळे भारताकडून पेमेंट सिस्टिममध्ये होणारा बदल लक्षात येतो. यातून ही सुद्ध गोष्ट लक्षात येते की, भारत-चीन आणि रशियाने ब्रिक्स करन्सी न बनवता ट्रम्प यांच्या डॉलरच्या अभिमानाला धक्क्याला लावायला सुरुवात केली आहे.आंतरराष्ट्रीय मुद्रा बाजारात एका युआनची किंमत 12.34 भारतीय रुपये आहे. भारताचं हे पाऊल भले छोटं असेल, पण याचे राजकीय परिणाम मोठे आहेत. यातून एक संदेश जातो. भारत अजूनही प्रामुख्याने रशियन मुद्रा रुबलमध्ये पेमेंट करत आहे, असं रशियाचे उप पंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले. भारताने आता युआनमध्ये पेमेंट सुरु केलय. ब्रिक्स मुद्रेशिवाय उचललें हे पाऊल भारत-रशिया आणि चीनची आघाडी मजबूत बनवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘डॉलर डिप्लोमेसी’साठी हा मोठा झटका आहे.याचा अर्थ काय?Investing live वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलय की, भारत सरकारची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अलीकडेच दोन ते तीन रशियन तेल कार्गोचं पेमेंट युआनमध्ये केलं. हे पाऊल म्हणजे 2023 नंतरच्या बदलाचे संकेत आहेत. त्यावेळी चीनसोबत तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याने सरकारी रिफायनरीजने युआनमध्ये पेमेंट थांबवलं होतं. खासगी रिफायनरीकडून मात्र युआनमध्ये पेमेंट सुरुच होतं. भारताने चिनी मुद्रेमध्ये पेमेंट सुरु करण्याचा अर्थ असा आहे की, भारत-चीन संबंध आता पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहेत.ट्रम्प यांनी काय इशारा दिलेला?भारताकडून कच्चा तेलाच्या पेमेंट सिस्टिमध्ये बदल याचा संबंध राष्ट्रपती ट्रम्प यांच्या एका स्टेटमेंटशी आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिक्स (ब्राझील रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रीका) यांनी नवीन मुद्रा बनवण्याच्या आणि डॉलरच्या पर्यायाला समर्थन करण्यावरुन इशारा दिला होता. ट्रम्प यांनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रूथ सोशलच्या पोस्टमध्ये म्हटलेलं की, “ब्रिक्स देशांनी नवीन मुद्रा बनवू नये. अन्यथा त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लागेल. अमेरिकी बाजारपेठांमधून या देशांना निरोप मिळेल”

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजचा भाव काय? पाहा १० ग्रॅमची किंमत किती

 

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.अशातच आज, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येतो आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं १३५००० रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती.देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18 October 2025)आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने घसरले आणि चांदी वधारले. १८ ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने १,२९,५८० रुपये, २३ कॅरेट १,२९,००७, २२ कॅरेट सोने १,८,७०० रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ९७,१९० रुपये, 14 कॅरेट सोने ७५,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १,३२,००० वर आले आहेत. तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर १,७८,००० रुपयांवरून १,७०,००० रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव ७८,६१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होती.हेही वाचासोन्या-चांदीच्या किमतीबाबत नवीन अहवाल; बघा किती जाणार किंमती सोन्याचा भाव, ४,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

माळशिरस तालुका असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांचा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने सत्कार

नूतन 2025 26 साठी माळशिरस तालुका बार असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, व खासदार धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी श्री.व्हि.टी.पिसाळ तर उपाध्यक्ष पदी श्री.झुरळे व सचिव पदी श्री.सुमित सावंत यांची निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार व खासदार यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सर्व पदाधिकारी यांना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस बारा असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते..

You may have missed