Blog

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाराचा धसका घेत सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये बोनस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

परिवहन महामंडळ तथा एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. तसेच कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून ६५ कोटी रुपये देण्याचे आणि पात्र कर्मचा-यांना दिवाळी अग्रौग म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी घोषित केले.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याएसटीचे सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी सरकारने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचा-यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी सरकारने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, याशिवाय जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्टया समृद्धकरणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पत्र वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटीच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे.या बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश

दहावी,बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे.शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नातेपुते येथे अजूनही माणुसकी टिकून आहे याचं ज्वलंत उदाहरण बेवारस मृतदेह विधिवत अंत्यविधी …!

*

माहिती आशि की,नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण – पंढरपूर रोडच्या साईट पट्टीमध्ये नातेपुते बायपास येथे एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मयत स्थितीत पडून असले बाबतची माहिती तक्रारदार नामे अर्जुन हरिबा पिसाळ वय 43 वर्ष
राहणार जानकर वस्ती नातेपुते याने पोलीस ठाणे येथे दिनांक 11/10/2025 रोजी हजर होऊन माहिती दिली की दुपारी 02.00 वाजता फलटण -पंढरपूर नातेपुते बायपास रोड एन एच ए 995 रस्त्याच्या साईड पट्टीतील चारीमध्ये शेती गट नंबर 259 मध्ये एक 55 ते 60 वर्षे वयाचा इसम अंगात फिकट काळसर शर्ट, फिकट निळसर फुल पॅन्ट, सडपातळ, सर्व त्वचा काळी निळी पडलेले असून मयत झालेला आहे तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असले बाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वये अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून अकस्मात मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पाटकुल कर नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत..!घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री परजणे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, बेवारस मयताची ओळख पटवण्यासाठी सर्व ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे….! सदर मयत चार ते पाच दिवसांपूर्वी पासून पडून असल्याने परिसरात मैदाच्या शरीराचा वास पसरलेला होता…! परंतु नातेपुते येथील श्री देविदास कैलास चांगण, राजू बापू लोंढे, अर्जुन हरीबा पिसाळ, ज्ञानेश्वर माने यांनी माणुसकी दाखवत बेवारस मयतावर विधिवत दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेलं आहे..!
अजूनही माणुसकी टिकून आहे याचं ज्वलंत उदाहरण नातेपुते येथे पाहायला मिळालेला आहे…! तसेच जयश्री शंकर अटक, राहुल हरी सोरटे, व पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले..!

केंद्र, राज्य सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

: ‘अतिवृष्टीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शे-तकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकस-ान झाले असून, त्यांच्यासाठी ३१ हजार ६२७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्य सरकार एवढ्याच मदतीवर थांबणार नसून, काही बाबींचा समावेश करून आणखी मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपत्तीग्रस्त शे तकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी स्पष्टोक्ती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक्-श्राव्य माध्यमातून झाला. योजनेत पालघर, राय-गड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवडझाली असून, त्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात राज्यस्-तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते. आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.भरणे म्हणाले, ‘या वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनींचे, घरां-चे नुकसान झाले. याबाबत पंचनामे सुरू असून, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत निधी जाहीर केला आहे. त्यासाठी बागायत, जिरायत, कोरडवाहू, खरडून गेलेली जमीन या प्रकारांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली आहे. तसेच, घरांची पडझड, बाधित पशुधन या नुकसानीबाबतही मदतमिळणार आहे. मात्र, वीजरोहित्र, वीजपंप, सौरपंप यांचेही मोठे नुकसान झाले असून, सरकार या बाबींचाही समावेश करणार आहे. त्यानुस -ार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा पंचनाम्यात समावेश करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा अहवाल केंद्राकडेटेंभुर्णी व परिसरातील खवैय्यांसाठी खुशखबर पाठवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत निधी दिला जाईल. “कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, उत्पन्नवाढीसा-ठी राज्यात ३,५०० ‘कृषी सखी’ काम करत आहेत. आणखी कृ-षी सखींनी यामध्ये सहभाग घेऊन शेतीला नवसंजीवनी द्यावी,’ असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला होणार सुरुवात

मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला आहे.जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २५१ पूर्णतः व ३१ अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबर २०२५ मध्ये जवळ जवळ ३९ लाख हेक्टर अशा सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी सांगितले.

‘ज्या काही योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायमच्या चालतात असं नाही-अजित दादा पवार’

मुंबई : यंदा आर्थिक अडचणींमुळे दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं अन्न व सागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका बक्तव्याने अनेकांच्या मुवया उंचावल्या आहेत ज्या बोजना चालू असतात, त्या सगळ्याच कायम चालतात असे बाही आनंदाचा शिधा ठराविक लोकांनाच मिळायचा. पण लाडक्या बहिणीचा पैसा हा जास्त माझ्या बगिनींना मिळतो लाडक्यांना मळतो असं उपमुख्यमंत्री अजितपवार म्हणाले आहेत. गोरगरिबांनासणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा सुरू करण्यात आली होती शिधा ही योजना राज्यात अतिवृष्टी, पूर परिस्थितीनं शेतकऱ्यांच्या हा तात तोंडातील घास हिरावला गेला अनेक ठिकाणी अजूनही बिकट परिस्थिती असताना दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा मिळण्याची आशा आता भंग झालीय. त्यातच उपमुख्यमंत्रीअजित पवारांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.”ज्या काही योजना सुरू असतात, त्या योजना कायमच्याच चालतात अशातला भाग नाही त्या त्या वेळेस ची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही बदल केले जा तात. आता आनंदाचा शिधा मिळत असताना तो ठराविक लोकांनाच मिळायचा . पण लाडक्या बहिणींचा पैसा हा जास्त माझ्या माझ्या बहिणींना मिळतो लाडक्यांना मिळतो. सगळ्याचांगल्या योजनांच्या बाबतीत महायुती सरकार सकारात्मक आहे अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळायला पाहिजे तो जर पोहचू शकत नसेल तर त्यामध्ये काही बदल आपण करत असतो हे आजचं नाही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे अनेक योजना याआधीही आल्या काही बंद केल्या काही योजनांमध्ये बदल केले. काही योजना आणखी लोकाभिमुख केल्या त्या पद्धतीने बाही बद्दल मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.विरोधक पुढे येत नाहीयत, केंद्र सरकार वेगळ्या विचारातनवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यात संशयावरून ३० दिवसांपेक्षा जास्त तुरूंगात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद असलेल्या घटनादुरूस्तीसह तीन वादग्रस्त विधेयकांची छाननी करण्यासाठीच्या संयुक्त संसदीय समितीला (जेप ीसी) जवळपास २ महिन्यांनंतरही मुहर्त मिळालेला नाही. नाही. प्रस्तावित जेपीसीमध्ये सहभागी होण्याबाबत विरोधी पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने आता, संसदेतील छोटे पक्ष आणि अपक्षांसह या जेपीसीचे गठन करण्यासाठी पावले उचलली आहेत. कलंकित राजकारण्यांना पदावरून आपोआप काढून टाकण्याची तरतूद असलेल्या या विधेयकांवरील जेपीसीमध्ये विरोधी पक्षांच्या सहभागाबाबतची कोंडी अद्याप सुटलेली नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अद्याप या अद्याप या जेपीसीसाठी विरोधी पक्षांकडून एकाही सदस्यांचे नाव पाठवण्यात आलेले नाहीत. केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावस-राहिल्यास ाळी अधिवेशनात २० ऑगस्ट रोजी लोकसभेत पुढील तीन विधेयके सादर केली होतीः संविधान (१३० वे) दुरुस्ती विधेयक, २०२५; जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५; आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगात जवळपास सहा महिने असताना दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही आपल्याकडेच ठेवले होते. त्या वेळेसारखीच परिस्थिती भविष्यात देशाच्या कोणत्याही राज्यात निर्माण होऊ नये म्हणून या विधेयकाची गरज निर्माण झाल्याचा सरकारचा दावा आहे. प्रस्तावित संविधान दुरुस्ती विधेयकांवर व्यापक विचार करण्याची घोषणा करणाऱ्या जेपीसीमध्ये सहभागी व्हावे की नाही यावर विरोधी इंडिया आघाडीतही एकवाक्यता नाही.

सांगलीत सर्वात मोठी कारवाई! १ कोटीच्या बनावट नोटा जप्त

सांगलीमधील मिरजजवळीनिलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं. त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या ५००रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

नातेपुते पोलीसांचा रोडरोमिओंना चोप, वाहनांवर कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शाळेशी संबंध नसलेले तरुण शाळेच्या आवारात आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही. तसेच बस स्थानत व इतर ठिकाणी मोटर सायकल घेऊन फिरणे, हॉर्न वाजवणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्या तरुणावर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांचे वाहन जप्त करण्यात येईल. तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये तसे निदर्शनास आल्यास अल्पवयीन मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. नातेपुते व परिसरातील नागरिकांनी वाहन नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.महारुद्र परजणे शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड काढणाऱ्या, व ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोडरोमिओंची नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पो.ह. देवीदास धोत्रे, पो. अमंलदार सारिका देशमुख,पो.कॉ. सोनवणे, पो.कॉ. गोधार, पो. कॉ. शेंडे या पोलिस कर्मचारी यांनी रोडरोमिओंनाधरपकड करून चांगलाच चोप दिला. शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शाळा भरतेवेळी व सुटण्याच्या वेळी दाते प्रशाला पुणे पंढरपूर रोड, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला दहिगाव रोड, अक्षय शिक्षण संस्था फडतरी रोड, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय या ठिकाणी कॉलेजशी संबधित नसलेल्या काहीरोडरोमीओंना नातेपुते पोलिसांनी चोप देऊन समज दिली. अच ानक झालेल्या या कारवाईमुळे इतर तरुणांनी धूम ठोकली. तसेच मेनपेट, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व गर्दीच्या ठिकाणी मोटर वाहनावर ट्रिपल सीट फिरणे, विना नंबर प्लेट व विना लायसन्स वाहन चालवणे या वेगवेगळ्या मोटर ऍक्ट नुसार वाहन विभागाचे वाहतुक पोलीस कर्मचारी रमेश बोराटे, नितिन पना से यांच्याकडून वाहनांवर कारवाई नुसारकरण्यात आली असून अल्पवयीन मुलांच्या वडिलांना नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलवून समज दिली व यातील काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकारची मोहिम सातत्याने राबवावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मोहीम अचानक आणि सातत्याने राबविली गेली तरच रोडरोमीओंना चाप लावता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मोठी घोषणा. “राज्यभरात शाळांमध्ये आता.”

पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळेत,तसेच शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास अशा कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहेत.त्यामुळे या प्रारुपाची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल, अशा घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.‘टी ४’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या पुरस्काराची मानकरी ठरली. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी शाळेलाही भेट दिली.आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, योजना विभागाचे संचालक कृष्ण कुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक या वेळी उपस्थित होते. भुसे यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, शाळेकरिता जागा देणाऱ्या व्यक्ती, सीएसआर निधी देणाऱ्या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमावेळी जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोल्यात उत्साहात उदघाटन

लोक कलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकटगावकर यांचे हस्ते उदघाटन,कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी


सांगोला /प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग व सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ वा विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव “उन्मेष सृजनरंगचा २०२५” याचा भव्य उदघाटन सोहळा सांगोला महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककला अभ्यासक मा. योगेश चिकटगावकर यांनी उदघाटक म्हणून उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटऩ केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी भूषविले.यानंतर उदघाटक म्हणून बोलताना योगेश चिकटगावकर यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “लोककला, संस्कृती आणि सृजनशीलतेतून समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते. युवकांनी आपल्या कलागुणांद्वारे भारतीय परंपरेचा संदेश जगभर पोहोचवावा.”

लोकसंस्कृती, स्त्रीशक्ती आणि सामाजिक समतेवर भाष्य करताना त्यांनी भावनिक शैलीत सांगितले“हजार मुलांमागे दीडशे मुली कमी आहेत, कारण आपण त्या मुलींना जन्म घेऊ देत नाही. तीच मुलगी आई, बहीण, माय माऊली असते तिच्यामुळेच घर उजळते.”“प्रत्येक घरातून एक शिवबा, एक सावित्री जन्माला यावी,” असे आवाहन करत त्यांनी जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण केले.

शिवचरित्र आणि लोककला यांची सांगड घालत चिकटगावकर यांनी पारंपरिक ‘पिंगळा’ कला पुन्हा जिवंत केली आणि “माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला” या गीताने वातावरण भारावून टाकले.या प्रसंगी स्वागतपर भाषणात संस्था अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण विद्यापीठ परिवाराचा आहे. प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी एकत्रितपणे सहभाग नोंदविल्यास हा खरा आदर्श महोत्सव ठरेल.”

कुलगुरूंनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, “युवा महोत्सव म्हणजे विद्यापीठातील विविध संस्कृतींचा संगम आहे. अशा मंचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो, संघभावना आणि संस्कार यांचा विकास होतो.”ही स्पर्धा पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. जिंकणारेच नव्हे तर भाग घेणारेही खरे विजेते आहेत. पूरस्थितीमुळे आलेल्या अडचणींवर मात करून युवा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सांगोला महाविद्यालयाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “हा आपला स्वतःचा कार्यक्रम आहे, थोडीफार उणीव झाली तरी ती आपलीच आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.युवा महोत्सव उदघाटन सोहळयापूर्वी सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पूरग्रस्‍तासाठी मदत निधी संकलन केंद्राचे उदघाटन मा.कुलगुरु महोदयांच्याहस्ते संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाच्या मुख्य रंगमंचावर पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यासाठी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.  या चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला, साहित्य, वाद्य, काव्यवाचन, पोस्टर प्रस्तुती, आणि लोककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५३ महाविद्यालयांमधील १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत, सांगोला महाविद्यालयाच्या परिसरात कलात्मकता आणि सृजनशीलतेचा उत्सव फुलला आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लक्ष्मीकांत दामा (प्र.कुलगुरू), डॉ. अतुल लकडे (प्र-कुलसचिव, विद्यापीठ) डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) संस्थेचे अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, सचिव मा. उदय (बापू) घोंगडे, सहसचिव मा. साहेबराव ढेकळे, मा. विश्वनाथ चव्हाण, माजी सचिव झिरपे सर, रावसाहेब ताठे, शामराव लांडगे, सुरेश फुले, सुधीर उकळे, चंद्रशेखर अंकलगी, दिनानाथ लोखंडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, समन्वयक डॉ. रामचंद्र पवार, सहसमन्वयक डॉ. राजकुमार ताठे व प्रा. संतोष लोंढे, यावेळी विविध स्पर्धांचे परीक्षक, विद्यापीठ परीक्षेत्रातील सहभागी महाविद्यालयांचे संघनायक व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

उदघाटऩ सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.कॅप्टन संतोष कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवक कार्यरत असून परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सांगोला शहरात सणासारखा उत्साह