Blog

महिलेची फसवणूक करून 13500 रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महिलेची फसवणूक करून तेरा हजार पाचशे रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी चार तासात ठोकल्या बेड्या याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक -11/02/2025 रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय 40 वर्ष रा, नातेपुते यांनी पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली की, फिर्यादी ह्या दुपारी 12.46 वाजता बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खाते अकाउंट वरून 40,हजार रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फटक्या नोटाचे बंडल आहेत असे म्हणून हातच्यालाकी करून  त्यांच्याकडील 40 हजार रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील 13,500 काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला बाबत  माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे psi विक्रम दिघे, pn राकेश लोहार, यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी MOB चे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली, सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र खाडे, गणेश खाडे, सहदेव साबळे यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर पाहिजे आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे, प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस हवालदार मनोज करडे, अमोल बंदुके, संतोष वारे, अमित भगत, रंजीत मदने, असलम शेख, अमोल देशमुख, यांनी सदर आरोपी यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सरफराज पिता मानू इराणी वय 43 वर्ष राहणार सय्यद नगर पुणे, असे असून त्याच्याकडे गुण्यातील रकमेबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे सांगून त्याच्याकडे 11,600 रुपये मिळून आले, तसेच त्याच्याकडे स्कुटी 50,000/ किमतीची असे एकूण 61,600/ रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यत जप्त करण्यात आला आहे , सदर आरोपी हा सराईत असून त्याने  यापूर्वी सोलापूर, पुणे सांगली, धाराशिव येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2025 भारतीय न्याय संहिता 318(4) अन्वये गुण्यामध्ये मध्ये अटक करण्यात आले असून त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत

तुम्ही माणूस आहात समोरच्याला माणसासारखं वागवा,अधिकाऱ्यांना जात नसते-प्रांताधिकारी विजया पांगरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथे उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट व जातीय सलोखा कार्यशाळा संपन्न झाली..
माळशिरस तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ॲट्रॉसिटी ॲक्ट व जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व  शक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय तथा प्रांताधिकारी विजया पांगरकर मॅडम बोलताना म्हणाल्या की तुम्ही माणूस आहात समोरच्याला माणसासारखं वागवा अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जात नसते ते सर्वांचे  असतात काम करत असताना जातीच्या भिंती पलीकडे गेले पाहिजे जातीय सलोखा राखण्यासाठी माणसाचा माणूस म्हणून विचार केला पाहिजे माळशिरस तालुक्यातील उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती ही सर्वांसाठी काम करते त्यांचं अतिशय चांगलं प्रकारे काम आहे अशाप्रकारे समितीतील सदस्यांची प्रशंसा केली.सरपंच,पोलीस पाटील हे गावाचे कान नाक डोळे असतात. त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात त्यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे अशाप्रकारे मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच गटविकास अधिकारी माळशिरस यांनी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे कार्य जबाबदारी व ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि जातीय सलोखा अबाधित ठेवण्याबाबत उद्देश स्पष्ट करीत प्रास्ताविक केले. विशेष सरकारी वकील वैभव धाइंजे यांनी ॲट्रॉसिटी कायदा अस्तित्वात येण्याची कारणे व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. माळशिरस चे पोलीस निरीक्षक पवार यांनी पहिली खबर देताना काय काळजी घेतली पाहिजे तपास कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार शेजुळ यांनी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना व पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या यावर भाष्य करत जातीय सलोखा व एकोपा टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्यात.ऍड.सुमित सावंत यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सांगत अतिशय सोप्या भाषेमध्ये ॲट्रॉसिटी कायदा व जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील समज गैरसमज उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना पोलीस पाटलांना केले. दुर्बल घटकावर अन्याय अत्याचार झाल्यास पोलीस स्टेशनचे दरवाजे 24 तास उघडे असून कोणावरही अन्याय खपवून घेतला जाणार नाही असे सांगीतले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे तिन जिल्ह्यांचे प्रमुख समन्वयक नागनाथ बनसोडे यांनी जन आरोग्य योजनेची माहिती देत असताना गोरगरिबांनी या योजनेसाठी काय केले पाहिजे तसेच रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णास उपचार देण्यासाठी टाळाटाळ करू नये, याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस राज्य सचिव वैभव गीते यांनी ॲट्रॉसिटी कायदा, प्रमुख तरतुदी, अधिकारी कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या, पहिली खबर देताना घ्यावयाची काळजी, तपासामध्ये पुरावा कशाप्रकारे घ्यावा, दोषारोप पत्र पाठवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, सरकारी वकिलांच्या जबाबदाऱ्या, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची जबाबदारी व कार्य विशद केली. तसेच उपविभागीय अधिकारी व डी वाय एस पी गटविकास अधिकारी यांचे आभार मानले. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणीसाठी माळशिरस उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना झाली व त्याच्या नियमित बैठका देखील घेतल्या जातात याची दखल जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर मुख्य सचिव यांनी घेतली व माळशिरस तालुक्याचे कौतुक केले ही बाब देखील वैभव गीते यांनी कार्यशाळेमध्ये अधोरेखित केली. अध्यक्षस्थानी बोलताना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी अतिशय मार्मिक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात सरपंचांनी दुर्बल घटकांना मदत करावी समिती सदस्यांनी कशाप्रकारे जबाबदारी तसेच प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही कार्यशाळा पार पडली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उपविभागीय स्तरावर तालुकास्तरीय ॲट्रॉसिटी एकच्या कार्यशाळा व जातीय सलोखा बैठका सुरू आहेत.यावेळी माळशिरस तालुक्यातील पोलीस पाटील,ग्रामसेवक,तलाठी, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी समितीचे सदस्य सचिव विकास अधिकारी आबासाहेब पवार व विस्तार अधिकारी सरवदे,बुगड रावसाहेब यांनी प्रयत्न केले. यावेळी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सर्व सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते.सूत्रसंचालन समितीचे सदस्य प्रमोद शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तालुका समन्वयक किरण वाघमारे यांनी केले.

सोलापूर,लातूर,धाराशिव, जिल्हयातील पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना ॲट्रॉसिटी कायदा व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी वैभव गिते यांच्याकडून मार्गदर्शन

. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व टाटा सामाजिक विज्ञान संस्था टीस तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर लातूर धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांची एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी तुळजापूर टाटा सामाजिक विज्ञान संस्था टीस यांच्या कॅम्पस मध्ये पार पडली. या कार्यशाळेमध्ये नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते हे प्रमुख मार्गदर्शक होते. वैभव गिते यांनी भारतीय संविधानाच्या प्रमुख तरतुदी,ॲट्रॉसिटी कायद्याची पार्श्वभूमी, ॲट्रॉसिटी ॲक्ट व नियम, ॲट्रॉसिटी कायद्यातील समज व गैरसमज, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक पोलीस आयुक्त, सरकारी वकील,प्रांताधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,पोलीस पाटील यांच्या जबाबदाऱ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कायदा व सुव्यवस्था जातीय सलोखा, शासनाचे शासन निर्णय परिपत्रके पोलीस महासंचालक यांचे स्थाई आदेश,अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य यांची महत्त्वपूर्ण परिपत्रके, तपासातील त्रुटी, फिर्यादी साक्षीदारांच्या अधिकार, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तसेच उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांची जबाबदारी व कार्य यावर राज्य सचिव वैभव गीते यांनी सखोल उदाहरनांसह मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.गजानन हिवाळे सर यांनी केले.यावेळी अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर,उपायुक्त तथा विभाग प्रमुख वृषाली शिंदे, प्रा.बाळ राक्षसे कॅम्पस संचालक,प्रा.रमेश जारे संचालक टिस, बार्टीचे नितीन सहारे,डॉ. गजानन हिवाळे प्रकल्प प्रमुख यांनी विचार व्यक्त केले.ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची परीनामकारक अंमलबजावणी होण्यासाठी व शिक्षेचे प्रमाण वाढवण्याकरीता अन्याय अत्याचाराची कारणे शोधून काढण्यासाठी बार्टी व टीस यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 पासून संशोधन करण्यात येत आहे. यासाठी धाराशिव लातूर व सोलापूर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने काही फिर्यादी व अत्याचार पिडीतांना भेटून शासनाकडून व प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण दस्तावेज संकलित करून सखोल अभ्यास करून टीस आपला अहवाल बार्टीकडे सुपूर्द करणार आहे. बार्टी हा अहवाल शासनास सादर करणार आहे. यासाठी सामजिक कार्यकर्ते,संस्था,संघटना व वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने आपापली मते मांडली. ऍड.रोहीत एकमली यांनी एक दिवसीय कार्यशाळेचा अभिप्राय सारांश उपस्थितांच्या पुढे ठेवला.सोलापूर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुलोचना सोनावणे- महाडीक, धाराशिव सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत, लातूर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण चिकुर्ते हे उपस्थित होते. तसेच वंचीत बहुजन आघाडीचे आतिश बनसोडे,नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत,मुकेश शिंदे, गोरख पारधे,ऍड.रोहीत एकमल्ली, ऍड.नवनाथ भागवत,शरद म्हस्के, संभाजी साळे, अविनाश ताकतोडे, रोहीत रावडे, प्रणव भागवत, विक्रम खंडागळे,सागर लांडगे, व सभापती, सरपंच,अनेक नेते व कार्यकर्ते हे उपस्थित होते..

आपण सर्वजण मिळून काम करू तुम्हाला लागेल तेवढे सहकार्य मिळेल-धैर्यशील मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमरावजी जानकर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातखासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आपण सर्वजण मिळून काम करूय जेवढं सहकार्य लागल तेवढे सहकार्य आम्ही करू पिरळे गावातील नेतेमंडळी नेहमीच गावच्या विकासासाठी झटत असतात निधी आणण्याचा प्रयत्न करतात.तुमचे कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही.लाईटचा प्रश्न लवकरच मार्गी लावू पण सर्व गावकऱ्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आपले मनापासून धन्यवाद तसेच आमदार उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले की, खासदार आपला आमदार आपला हा आनंदाचा क्षण याची देही याची डोळा पहावयास मिळाला या गावा. त्याच तोला मोलाचा कार्यक्रम पिरळे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे ग्रामस्थांचे मनापासून आभार. या वेळच्या निवडणुका खूप वेगळ्या होत्या मोहिते-पाटील आणि आपण एकत्र झालो आपल्याला यश मिळाले. म्हणून यांच्या छाताडावर थया थया नाचता अल.पण ईव्हीएम मधून येणारे आकडेवारी ही चकित करणारी होती.यावर कोणीतरी विरोध करायला पाहिजे म्हणून आपण संघर्षाच्या माध्यमातून विरोध करत आहोत येथील चोरी गेलेली मते नरड्यात जरी गेली असेल तरी आतड्यासह बाहेर काढू. जंतर-मतरवर मी आंदोलन व सत्याग्रह करणार आहे माझा राजीनामा मी निवडणूक आयोगाला देणार आहे. तुमच्या हक्कासाठी काल ही संघर्ष करत होतो आणि आज उद्या संघर्ष करणार आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करू पिरळे हे गाव हृदयापासून खासदार साहेब आणि आमचाच आहे. तसेच दलित पॅंथर चे घनश्याम भोसले, माजी सरपंच संदीप नरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शिंदे सर यांनी केले.खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांची ढोल ताशा हलगी गजी सह गाजत वाजत जे.सी.बी मधून पुष्पृष्टी करत भव्य दिव्य गावातून मिरवणूक काढण्यात आली 200 किलो वजनाचा गुलाब व झेंडूच्या फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादां धाईंजे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,माऊली पाटील,अजय सकट,पांडुरंग वाघमोडे,मधुकर पाटील,राजाभाऊ रुपनवर व अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आबारत्न शिक्षण संस्थेचे दादासाहेब शिंदे सर,दीपक शिंदे सर चेअरमन महादेव शिंदे यांनी केले होते.तसेच कार्यक्रमय शस्वी होण्यासाठी.शिवाजीराव लवटे-पाटील,संदीप वाघ,गणेश दडस,दत्तात्रय लवटे पाटील,सर्व शिक्षक स्टाफ संस्थेतील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

ज्या मतांची चोरी झाली ती मते नरड्यात गेली असली तरी हात घालून आतड्यासह बाहेर काढू-आमदार उत्तमराव जानकर


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे


ज्या मतांची चोरी झाली ती मते नरड्यात गेली असली तरी हात घालून आतड्यासह बाहेर काढू असे प्रतिपादन माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी पिरळे  येथे खासदाराने आमदार नागरी सत्कार कार्यक्रमादरम्यान केले. पुढे बोलताना ते म्हणाले की खासदार आपला आमदार आपला हा आनंदाचा क्षण याची देही याची डोळा पहावयास मिळाला या गावा. त्याच तोला मोलाचा कार्यक्रम पिरळे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.ग्रामस्थांचे मनापासून आभार. या वेळच्या निवडणुका खूप वेगळ्या होत्या मोहिते-पाटील आणि आपण एकत्र झालो आपल्याला यश मिळाले. म्हणून यांच्या छाताडावर थया थया नाचताल.पण ईव्हीएम मधून येणारे आकडेवारी ही चकित करणारी होती यावर कोणीतरी विरोध करायला पाहिजे म्हणून आपण संघर्षाच्या माध्यमातून विरोध करत आहोत. जंतर-मतरवर मी आंदोलन व सत्याग्रह करणार आहे. माझा राजीनामा मी निवडणूक आयोगाला देणार आहे. तुमच्या हक्कासाठी काल ही संघर्ष करत होतो आणि आज उद्या संघर्ष करणार आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करू पिरळे हे गाव हृदयापासून खासदार साहेब आणि आमचाच आहे.पुढे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आपण सर्वजण मिळून काम करूय जेवढं सहकार्य लागल तेवढे सहकार्य आम्ही करू पिरळे गावातील नेतेमंडळी नेहमीच गावच्या विकासासाठी झटत असतात निधी आणण्याचा प्रयत्न करतात. तुमचे कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही आपण भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आपले मनापासून धन्यवाद. तसेच दलित पॅंथर अध्यक्ष चे घनश्याम भोसले,माजी सरपंच संदीप नरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शिंदे सर,यांनी केले.खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांची ढोल,ताशा,हलगी गजी सह गाजत वाजत जे.सी.बी मधून पुष्पृष्टी करत भव्य दिव्य गावातून मिरवणूक काढण्यात आली200 किलो गुलाब व झेंडूच्या फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादांधाईंजे,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,माऊली पाटील,अजय सकट,पांडुरंग वाघमोडे,मधुकर पाटील राजाभाऊ रुपनवर व अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आबारत्न शिक्षण संस्थेचे दादासाहेब शिंदे सर,दीपक शिंदे सर चेअरमन महादेव शिंदे यांनी केले होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी.शिवाजीराव लवटे पाटील,संदीप वाघ सर,गणेश दडस,दत्तात्रय लवटे पाटील,सर्व शिक्षक स्टाफ संस्थेतील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.सूत्र संचान विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

पिरळे येथे खासदार व आमदार यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील खासदार माढा मतदार संघ आमदार उत्तमरावजी जानकर साहेब( आमदार माळशिरस विधानसभा) यांचा भव्य नागरी सत्कार तसेच दलित पॅंथर चे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दि-20 जानेवारी २०२५ रोजी सायं.6 वा. आयोजीत केला आहे.तसेच यावेळी पारंपरिक गाजी ढोल खेळ होणार असून यात सहभागी होणारे गजी मंडळ  श्री नाथ गजी मंडळ लोणंद धुळदेव गजी मंडळ  मारकडवाडी सतोबा गजी मंडळ बांगर्डे बिरदेव गजी मंडळ पांगरी व टाकेवाडी. बानलिंग गजी मंडळ फोंडशिरस,चक्रेश्वर हलगी, सनई ग्रुप चाकोरे ,हलगी ग्रुप पलसमंडळ / मावळा, दहा जणांचा तुतारी ग्रुप, कै. बबनरावजी ठोंबरे गजी मंडळ उंबरे दहीगांव या द्वारे मा. खा. धैर्यशील मोहिते पाटील व  आ. उत्तमरावजी जानकर यांची भव्य- दिव्य अशी मिरवणूक व JCB मधुन पुष्प वृष्टी होणार आयाजन करून गवच्यावतीने भव्य असा  नागरी सन्मान सोहळा समत विद्यालय क्रीडांगणावर संपन्न होणार असून मान्यवरांचे हस्ते समता माध्य.व. श्री भिदेवी कनिष्ठ, पिरळे,एस. एम. एस. इंग्लिश मेडिअम स्कूल पिरळे यांचा  वार्षिक स्नेह संम्मेलन उद्धघाटन सोहळा संपन्न होणार आहे.पंच कृशितील सर्व नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दालित पँथर जील्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन- सचिव आबारत्न शिक्षण संस्था, पिरळेसरपंच व सर्व सदस्य ग्रा.पं.पिरळेचेअरमन व सचिव सर्व सदस्य वि.का.स.पिरळेसमस्त ग्रामस्थ पिरळे माळशिरस यांनी केले आहे.

जि प शाळा पिरळे येथे युद्ध कला शिबरास प्रारंभ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे प्राचीन युद्ध कला शिबिराचे आयोजन करण्यात आल आले आहे हे शिबिर दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत घेण्यात येणार असून. या शिबिरात लाठीकाठी दांडपट्टा तलवार ढाल चालवणे शिकवले जाणार असून त्यासोबत व्यायामाचे प्रकार सुद्धा मुलांना शिकवले जातात. सायंकाळी चार ते सात या वेळेमध्ये हे शिबिर होणार असून 100 विद्यार्थ्यांचा सहभाग या नोंदवाला गेला आहे. हे शिबिर कोल्हापूर येथील सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिष्ठान पेठ कोल्हापूर आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. हे शिबिर डॉक्टर फुले यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. प्रशिक्षक म्हणून वैष्णवी गोंदकर व त्यांचे सहकारी हे आहेत शिबिर घेण्यासाठी मुख्याध्यापक संजय ढवळे सर शिक्षक हनुमंत फुले सर निगडे सर व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतला आहे.

परभणी येथील हिंसाचार प्रकरणाची तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठित

शासनाने गठीत केलेल्या न्यायालयीन चौकशी समिती मध्ये सुधारणा करणे आवश्यक…… वैभव गिते.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात एक शिष्टमंडळ परभणी येथे संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना प्रकरण व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू या प्रकरणाबाबत भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन फिर्यादी वैभव गिते,पी.एस खंदारे, शरद शेळके, दिलीप आदमाने, संजय माकेगावकर,जगदीप दिपके,ऍड
नवनाथ भागवत यांच्या टीमने परभणी दौऱ्यात हकीकत जाणुन घेत साक्षीदार यांचे म्हणणे जाणून घेऊन एक सत्यशोधन अहवाल नागपूर हिवाळी अधिवेशन येथे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन हा फॅक्ट फाइंडिंग अहवाल प्रकाशित करण्यात आला.
यामध्ये परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडी मधील मृत्यूप्रकरणी व संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना गुन्ह्याबाबत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मा. विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाची तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत येईल असे आश्वासित करण्यात आले होते. त्यानुसार
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने
दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाची तसेच कोठडीत असलेल्या स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दि. १५.१२.२०२४ रोजीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश मा. व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली “एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.२. सदर न्यायालयीन चौकशी समितीसाठी संदर्भ अटी (The Terms of Reference/ToR) खालीलप्रमाणे असतील(अ) दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे व परिणाम याचा अभ्यास करणे,
(आ) या घटनेसाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का याची तपासणी करणे.(३) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेले नियोजन आणि तयारीची पर्याप्तता (Adequacy) पुरेशी होती किंवा कसे?(ई) उपरोक्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का याची तपासणी करणे.(उ) उपरोक्त अट (आ), (इ) आणि (ई) संदर्भात जबाबदारी निश्चित करणे,(ऊ) अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी करावयाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाययोजना सुचवणे.(ए) सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित इतर कोणतीही महत्त्वाची सूचना करणे.३.सदर न्यायालयीन चौकशी समितीस खालील अतिरिक्त अधिकार असतील :-१. सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी चौकशी समिती कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्याचा अधिकार राहिल.२. कोणत्याही इमारतीत / जागेत प्रवेश करण्याचा अधिकार किंवा त्यासाठी कोणालाही प्राधिकृत करण्याचा अधिकार आणि कोणतेही संशयित दस्ताऐवज, खाते किंवा कागदपत्रे इ. जप्त करण्याचा अधिकार राहिल३. समितीसमोरील कार्यवाही ही न्यायालयीन स्वरुपाची कार्यवाही राहील.४. चौकशी समितीचे मुख्यालय परभणी येथे राहील. चौकशी समिती स्वतः च्या कार्यपद्धतीचे नियमन करेल, चौकशी समिती या दुर्घटनेची चौकशी करुन आपला चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह सदरहू शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत शासनास सादर करेल.असा शासन निर्णय गृह विभागाने 15 जानेवारी 2025 रोजी काढलेला आहे.
21 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी बोलताना परभणी व बीड या दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने 15 जानेवारी 2025 रोजी म्हणजे तब्बल 25 दिवसांनी विलंबाने एक सदस्य चौकशी समिती स्थापन केलेली आहे.या चौकशी समितीमध्ये नऊ सदस्य असावेत. या नऊ सदस्यांमध्ये माजी न्यायमूर्ती अध्यक्ष व मुख्य सचिव सुजाता सौनीक (IAS) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे (IAS) आयुक्त समाजकल्याण पुणे ओम प्रकाश बखोरीया (IAS),माजी IAS अधिकारी माजी IPS आय.पी.एस अधिकारी,सिनियर कौन्सिल यांचा समावेश तात्काळ करावा.दी.10 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना गुन्ह्यात तपासी अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का? या तपासात निष्काळजीपणा केला आहे का? आरोपीस शिक्षा होईल असे पुरावे प्राप्त केले आहेत का ?महापुरुषांच्या प्रतिमांचे पुतळ्यांचे विटंबना अवहेलना होऊ नये याकरिता उपाययोजना सुचविणे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी दुर्दैवी घटना घडल्यास शासन व प्रशासनाच्या वतीने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता करावयाच्या उपायोजना सुचवाव्यात.भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या आंदोलन प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन लाटी हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले होते याबाबत लेखी आदेश प्राप्त करून बेकायदेशीर आदेश देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत अथवा पोलीस कोठडीमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची बातमी जिल्हाधिकारी यांनी दिली. हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक परभणी यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.असं काहीही घडलं नाही ही अफवा आहे असा व्हिडिओ जिल्हाधिकारी यांनी का जारी केला. याबाबत जिल्हाधिकारी यांचा जबाब नोंदवून याची चौकशी करावी.या समितीच्या पुढे सामान्य नागरिक, पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेले लोक, पीडित संस्था संघटनांना, वकिलांना लेखी युक्तिवाद करण्याची, लेखी म्हणणे मांडण्याची परवानगी असावी.या समितीने आपला अहवाल एक महिन्याच्या आत स्वतंत्र मूल्य निर्धारित करत आपल्या स्वयं स्पष्ट अहवालासह शासनास सादर करावा. समितीने शासनास सादर केलेला अहवाल जनतेसाठी खुला करावा.समितीच्या या अहवालावर कार्यवाही करणे शासनास बंधनकारक असावे.समितीचे सर्व कार्यवाही व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे पूर्ण करावी.शासनाने स्थापन केलेल्या एक सदस्य चौकशी समितीमध्ये बदल करून आम्ही सुचवलेले कार्य व जबाबदारी समितीच्या सदस्यांना देण्यात यावी..इत्यादी सुधारणा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर या संघटनेचे वतीने शासनास सुचवण्यात आलेल्या आहेत. या सुधारणांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता या सुधारणांसह निवेदन
एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते शासनास देणार आहेत.

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक 20/10/2021 रोजी 00.29 वाजता फिर्यादी नामे – बापू नाना वाघमोडे वय – 35 वर्ष राहणार, फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली की
फिर्यादीची मौजे फोंडशिरस फुले मळा तालुका माळशिरस येथे जमीन गट नंबर 1413 जमीन आहे सदर सामाईक जागेवरून फिर्यादीचे वडील नामे – नाना अण्णा वाघमोडे वय – 70 वर्ष यांचे बरोबर भावकीतले नामे 1. किरण महादेव वाघमोडे व 19 वर्षे 2.अंकुश महादेव वाघमोडे वय 27 वर्ष 3. धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय 35 वर्षे यांनी संगणमत करून वडील नाना अण्णा वाघमोडे यांना लोखंडी पाईप ने डोकीत मारून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले म्हणून वैगरे मजकुराची फिर्याद वरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गुर नंबर 365/ 2021 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 302 307 323 504 506 34 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला होता,सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर हे करीत होते सदर दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली दप्तरी सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे यांनी काम केले तसेच तपासाचे दरम्यान आरोपी विरुद्ध सबळ असा पुरावा हस्तगत करून सदर आरोपीविरुद्ध माननीय सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोप पत्र दाखल केले होते माननीय सेशन कोर्ट न्यायाधीश श्री एल डी हुली सत्र न्यायालय यांनी सदर गुन्ह्याचे ट्रायल चालूउण सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने i) भा.द.वि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी 5000रुपये दंड,दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास तसेच 504,506,34, मध्ये 1वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे ।। आशी शिक्षा सुनावली आहे सदर केससाठी पुण्यातील सबळ पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन उत्कृष्ट पने कर्तव्य पार पाडलेले आहे सरकारी वकील एस एस पाटील ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे ,पोलीस नाईक मारुती शिंदे यांनी काम पाहिले आहे
सदरची कामगिरी माननीय डी वाय एस पी शिरगावकर साहेब प्रभारी अधिकारी सपोनी महारुद्र परजणे साहेब ,तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर साहेब, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे मा.सरकारी वकील एस एस पाटील साहेब ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे, पोलीस हवालदार मारुती शिंदे यांनी केली आहे

सहकार महर्षींनी माळशिरस च्या माळरानावर नंदनवन फुलवलं-पद्मजादेवी मोहिते

पाटील-संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे श्रेष्ठ – पद्मजादेवी मोहिते-पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे उद्देशाने दिनांक सात जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले यामध्ये प्रा. नारायण माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुले- मुली यांच्या कबड्डी, खो-खो आदी क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, गायन, निबंध लेखन, पुष्प सजावट,रांगोळी, हस्ताक्षर, पारंपारिक दिन या सारखे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आटपाडी येथील प्रा शहाजी पारसे यांचे ‘ सहकार महर्षी आणि त्यांचे जीवनकार्य‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले,सामान्य माणसाविषयी त्यांच्या मनात अपार श्रध्दा होती. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ते तत्पर असत. वंचितांचे, उपेक्षितांचे आणि शेतकऱ्यांचे- शेत मजुरांचे जीवनमान उंचावले जावे. त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे या विचाराने ते समाज सेवा करीत राहिले. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अकलूज येथे शैक्षणिक संकुल उभा केले. अनेकांना रोजगार निर्माण व्हावा शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती साधता यावी यासाठी त्यांनी दूध संघ, कुकुटपलान, जर्सी गायी छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते म्हणाले
माळशिरस च्या माळरानावर सहकार महर्षींनी नंदनवन फुलवलं तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी समाजकार्य वा राजकारण करताना भेदभाव कधी केलानाही.
सहकार महर्षी यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, या हेतूने तालुक्यातील सर्व संस्थांची सहकार तत्त्वावर उभारणी केली. आज त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज आहे, असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयात सहकार महर्षीच्या १०७ व्या जयंतीनिमित्त बोलताना
ते पुढे म्हणाले, महर्षींनी राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने त्यांचे राजकारण होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुनील राऊत, निनाद पाटील, एन. के. साळवे, समीर सोरटे, अभिमन्यू आठवले, मनोज राऊत, सुनील गजाकंस,श्रीकांत बाविस्कर,, सुनील ढोबळे, संजय पवार , या सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ , डायरी पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार प्रमोद शिंदे यांची द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निनाद पाटील, सुनील राऊत आपल्या मनोगतातून सहकार महर्षी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
प्र प्राचार्य डॉ रज्जाक शेख, डॉ दत्तात्रय साळवे आणि विद्यापीठ सुवर्णपद विजेता अजय कुंभार यांचा विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक विभागातील प्रा नितीन देशपांडे, प्रा सौ पुष्पा सस्ते, प्रा सौ रब्बाना शेख, प्रा. दयानंद साठे, प्रा राजेंद्र साठे, प्रा. उत्तम सावंत, प्रा जगदीशचंद्र मुळीक, प्रा श्रीकांत पवार,प्रा डॉ बाळासाहेब निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ रज्जाक शेख यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे यांनी केले तर प्रा. सुहास नलवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

You may have missed