Blog

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दलित समाजाने मतदान करू नये पवार साहेब हेच का तुमचे पुरोगामीत्व- डॉ.कुमार लोंढे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-


शरद पवार साहेबांना एवढे दिवस महाराष्ट्रातील तमाम जनता शेतकऱ्यांचे कैवारी,पुरोगामी, जाणते राजे, देशाचे नेते असे  उपाधी देऊन  त्यांचं काळीज सुपाएवढे आहे हे असा भास निर्माण होत होता. शरद पवार साहेबांनी सुभेदार व जहागीरदार निर्माण करण्याचे आणि सत्तेमध्ये केवळ प्रस्थापित मराठ्यांना सामील करून इतरांना त्याचे दास बनवण्याचे मोठे कटकारस्थान त्यांच्याकडून झालेले आहे ( अपवाद वगळता रामदास आठवले, लक्ष्मण ढोबळे) पवार साहेब नेहमी दोन्ही जातींना समोरासमोर लढवून संपवण्याचे कटकारस्थान रचत असतात आणि हे अनेक वेळा  सिद्धही झालेल आहे परंतु ज्या पवारसाहेबांनी फोडाफोडीचे राजकारण केलं त्याच पवारांचा पक्ष फुटला हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. 

महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा या अनुषंगाने काही बाबी प्रकर्षाने मांडणे ममहत्त्वाच आहे माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यामध्ये दोन टर्म हनुमंत डोळस चर्मकार आणि एक टर्म राम सातपुते अशा तीन टर्म विजयसिंह मोहिते पाटील यांनी चर्मकार उमेदवार दिले त्यांना येथील दलित , मातंग,बौद्ध, चर्मकार,होलार बांधवांनी सगळ्यांनी निवडून ही दिल साहजिक जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी या प्रमाणे चर्मकार सोडून मातंग,बौद्ध यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते

महत्वाचा मुद्दा असा आहे ही जागा (SC 254) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्या जागेवर अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार पाहिजे परंतु धनगर समाजातील काही व्यक्तींनी बनावट अनुसूचित जातीचे दाखले काढले आहेत.हा धनगर समाज केंद्रामध्ये ओबीसी आणि राज्यामध्ये एनटी चा दर्जा असताना सुद्धा अनुसूचित जागेवर अतिक्रमण करून त्याचे हक्क हिसकावून घेतोय.या प्रकारास आदरणीय महादेव जानकर यांनी कडाडून विरोध ही केला आहे अशा नेत्याचे दलित बांधव स्वागतच करत आहेत.

राखीव (SC)माळशिरस मतदार संघात उत्तम जानकर (जात धनगर) यांना उमेदवारीचा घाट घातला जातोय व उमेदवारी दिली जाते एकीकडे स्वतःला आपण पुरोगामी म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे त्या दलितांच्या हक्काच्या जागेवर विधानसभेच्या एस सी च्या जागेवर अतिक्रमण करायला भाग पाडायचं हे फारच विदारक आहे.या संदर्भात माळशिरस तालुका अनुसूचित कृती समिती ने पवार साहेबांना भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली आहे. फलटण मतदार संघात सुद्धा असाच संघर्ष आपणास पाहण्यास मिळतो आहे.भाजपचे माढा लोकसभेचे माजी खासदार रणजिसिंह निंबाळकर यांनी फार चांगली भूमिका घेऊन मी बौद्ध समाजाबरोबर आहे असे जाहीर केले आहे.शनिवार दिनांक (१९) इंदापूर मध्ये बहुजन समाज जागृती मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ व मी (डॉ.कुमार लोंढे) ही प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो यावेळी आदरणीय मेश्राम साहेबांनी एक सुंदर उदाहरण दिल हातामध्ये पेन घेतला आणि समोर उपस्थित लोकांना सांगितल हा पेन म्हणजे दलाल आहे आणि हाताला धक्का दिला तर तो पेन हातातून गळून खाली पडला याचा अर्थ दलाला धक्का द्यायची गरज नाही जे हात दलाल निर्माण करतात त्या हाताला आपणास धक्का द्यायला लागेल म्हणजे दलाल ही राहणार नाही दलाल निर्माण करणारी व्यवस्था ही राहणार नाही.दलालांना दोष देऊन उपयोग नाही तर दलाल निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर आपल्याला आघात घालायला लागेल असं आपण ठाम ठरवलं पाहिजे.

शरद पवार साहेबा सारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या व फुले -शाहू -आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या व्यक्तीने असे वागणे हे पातक आहे.हे महाराष्ट्राला न शोभणार कृत्य आहे एकीकडे उत्तम जानकर (धनगर) SC जातीचा दाखला काढून दलितांच्या जागेवर अतिक्रमण करून लढतात आणि दुसरीकडे शरद पवार इतर मतदारसंघांमध्ये सांगतात की हे आमच्याकडे धनगर समाजाचे नेते आहेत किती दिवस दलितांचा बुद्धिभेद करणार आहात पवार साहेब! उत्तम जाणकरांना दोष देऊन उपयोग काय? उत्तम जानकरांना निर्माण करणारी व्यवस्था ही भयंकर आहे त्यामधे ते ही भरडले जातील असा विश्वास आहे.माळशिरस तालुक्याचे मोहिते पाटील राष्ट्रवादी चे शरद पवार यांना आता अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे.

शरद पवारांनी जे सुभेदार निर्माण केले ते ठराविक घराण्यातलेच आहेत. सत्ता कुणाची येऊ द्या काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस,सेना ,भाजपा असेल तरी ही त्या सत्तेचं सगळ्यात जास्त बेनिफिट इथल्या दीडशे ते 170 प्रस्थापित घराण्यालाच मिळालेले आहे . देवेंद्र फडणविस यांच्या मार्फत शरद पवारांना नेहमी चॅलेंज झालं आहे.धर्मसत्तेच आणि राजसत्तेच ज्यावेळेस भांडण निर्माण झालं त्यावेळेस देवेंद्र फडवणीसाची एक जमेची बाजू समोर आली की त्यांनी महाराष्ट्रातली प्रस्थापित घराणे संपवली पवाराची हुकूमशाही जहागिरी संपवण्यामध्ये देवेंद्र फडवणीसाठी पुढाकार घेतला याचा अर्थ असा आहे की राजसत्तेला धर्म सत्तेन आव्हान दिलं. संविधान धोक्यात आहे हे प्रकाश आंबेडकरांनी अग्रक्रमाने सांगून तो मुद्दा निर्माण केला तो मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हायजॅक केला.हा मुद्दा आपल्याकडे खेचून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त कांग्रेस व राष्ट्रवादी ने जागा मिळवल्या .

बांधवानो मुद्दा आहे आपल्या हक्कासाठी आज मराठा लढतो आहे आपल्या हक्कासाठी आज ओबीसी लढतो आहे आपल्या हक्कासाठी दलित लढतो आहे एससी एसटी लढतो आहे व हे सगळं होत असताना शैक्षणिक आरक्षण आम्ही समजू शकतो इतर सोयी सवलती आम्ही समजू शकतो पण आमच्या राजकीय आरक्षणावर जर गडांतर येत असेल तर काय करायचे?माळशिरस तालुक्यामध्ये जे स्वतः ओरिजनल धनगर आहेत परंतु त्यांनी हिंदू खाटीक एससी जातीचे दाखले काढलेत अशाची लिस्ट जवळजवळ 36 च्या आसपास आहे आणि हा माळशिरस मतदार संघ चर्चेचा विषय झाला आहे .हिंदू खाटीक ओरिजिनल असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं परंतु येथे धनगर समाजाच्या व्यक्तीने हिंदू खाटीक हे प्रमाणपत्र काढून एससी च्या जागेवर अतिक्रमण करण कितपत योग्य आहे .

माझा प्रश्न पवार साहेबाना आहे तुम्हाला एवढी सहानभूती असेल तर पवारांनी बारामती मध्ये उत्तम जानकर यांना उमेदवारी द्यावी. पवारांनी मोहिते पाटलांना थांबा म्हणावं आणि माढा विधानसभा जागेवर त्यांनी उत्तम दरकरांना उमेदवारी द्यावी हा घाट का घातला जातोय हा कळीचा मुद्दा नव्हे तर महाराष्ट्रभर या मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये आपणही दलित बांधवांनी विचार विनिमय करणे गरजेचे आहे

रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा आहे प्रत्येक जण स्वतःच्या जातीसाठी झगडतो आहे महाराष्ट्रातील 18 पगड जातीतल्या एससी, एसटी लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि आपला हक्काचा न्यायाचा लढा उभारला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आमच्या हक्कावर गदा येईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा शरद पवार असो अथवा कोणी ही असो दलाल निर्माण करणारी व्यवस्था मुळासकट उखाडून फेकली पाहिजे.या शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला आपणअद्दल घडवली पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान न करता बहिष्कार टाकावा या पद्धतीत आपण सर्वांनी निर्णय घ्यावा या निर्णयाचा फटका सत्तेला ज्यावेळेस बसेल त्यावेळेस त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही

आमच्या अधिकाराचा लढा आता आम्हाला लढावा लागेल अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास आम्ही गद्दार झालेलो आहे असे समजण्यात हरकत नाही. माझेही उत्तमराव जानकर यांच्याशी चांगले संबंध आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ते असतात परंतु हा लढा वैचारिकतेचा आहे उत्तम जानकर अथवा मोहिते पाटील अथवा शरद पवार कोणत्याही व्यक्तीशी व्यक्तिगत वादाचा विषय नसून हा वैचारिक वाद आहे हा लढा तीव्र करण्यासाठी आपली साथ व सहयोग महत्वाचा आहे हा लढा तीव्र केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही . समाजासाठी SC/ST साठी वाटेल तेवढा संघर्ष व त्याग करण्याची माझी तयारी आहे. बांधवांनो आपण जास्तीत जास्त पोस्ट शेअर करा व या लढ्याला पाठबळ देण्यासाठी पुढे या…आपले अभिप्राय नक्की द्या लवकरच पुढील दिशा ठरवू या..
एससी/एसटी जागा हो….

जय भीम जय संविधान

(लेखक डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्युमन राईट संघटन
गारवाड माळशिरस सोलापूर)
मो.7020400150
मेल -londhekumar77@gmail.com
दिनांक 23/10/2024

उत्तम जानकर यांचा आज सकाळी 9 वा वाजल्यापासून पश्चिम भाग गावभेटी दौरा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तसेच महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस,शेतकरी कामगार पक्ष मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम शिवदास जानकर यांचा आज बुधवार 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून  विधानसभा निवडणुक संदर्भाने  माळशिरस तालुक्यातील पश्चिम भाग पिंपरी ते पिरळे व इतर गावांचा दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर सभा बैठका घेण्यात येणार असून.या दौऱ्यामध्ये पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील यांच्यासह व उत्तमराव जानकर समर्थक नेते मंडळी असणार आहेत.सदर दौरा हा पुढील प्रमाणे असणार आहे.सकाळी 9.00 वा पिंपरी,सकाळी 9.40कोथळे,10.20 वा,करूंडे ,सकाळी 11.00 वा,धर्मपुरी ,सकाळी 12.00 वा,शिंदेवाडी,सकाळी 12.40 वा,देशमुखवाडी, दु.12.40 ते2.30राखीव – डोंबाळवाडी, 2.40 वा.हनुमान वाडी, 3.10 वा.कुरबावी,संध्याकाळ. 4.00 वा,तांबेवाडी, ,संध्याकाळी४.४०वा.एकशीव,संध्याकाळी5.20वा.कळंबोली ,संध्याकाळ. सकाळी 6.00 वा.पिरळे,संध्याकाळ. 7.30वा.दहिगाव (सभा),रात्री 8.30 वा गुळसाळे,रात्री 9.20 वा मोरोची, अशा प्रकारच्या गावभेटी दौऱ्याचे आयोजन केले असून. या दौऱ्याच्या संबंधित कार्यकर्त्यांना सूचना दिली आहेत. याबाबत सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात ९२२ जाहिराती हटविल्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे:

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी केली आहे. शासकीय व सार्वजनिक इमारतींवरील तब्बल • ९२२ जाहिराती पहिल्या २४ तासांतच हटविण्यात आल्या आहेत, अशी माहिती माळशिरस विधानसभा – मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने त्याची आचारसंहिताही तत्काळ लागू झाली. त्यानुषंगाने प्रशासनाने आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासकीय व सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर रंगवलेल्या ९८ जाहिराती, ८६ पोस्टर्स, १३६ कटआउट, ८८ – बॅनर्स, २२० झेंडे पहिल्या २४ तासांत हटविण्यात आले आहेत. तसेच २९५ कोनशिला व इतर वस्तू झाकून
ठेवण्यात आल्या आहेत.

भाजपची पहिली यादी जाहीर ९९ जणांचा समावेश,माळशिरस च्या जागेचा सस्पेन्स ?

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे. तसंच अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीज्या अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती.या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. भाजप- च्या पहिल्या यादीत ९९ पैकी १३ महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून ९९ पैकी ६ एसटी आणि ४ एससी उमेदवार आहेत परंतु माळशिरस विधानसभा उमेदवारच नाव अजूनही सस्पेन्स च आहे कारण माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील आणि उत्तमराव जानकर त्यांची मोठी ताकद मतदारसंघात असल्यामुळे भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात असल्याचा दिसत आहे. उमेदवारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे. 

“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचा विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना बिनशर्त पाठिंबा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेने या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना बिनशर्त पाठिंबा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी भरणेवाडी येथील आमदारांच्या निवासस्थानी दिला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे , संघटनेचे सचिव अनिल केंगार, राजशिष्टाचार समितीचे आप्पासो कदम, नागेश भोसले,मिलिंद भोसले, तालुका अध्यक्ष सतीश वाघमारे, समाधान भोसले, अशोक मिसाळ , बबलू वंचाळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इंदापुर तालुक्याच्या ८० गावात संघटनेचे जाळे असुन संघटनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. संघटनेकडे निर्णायक मते असुन त्याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना होणार आहे.
विद्यमान आमदारांनी तालुक्यात अनेक गावांमध्ये बुध्दविहार बांधण्यासाठी निधी, बुध्दविहार सुशोभीकरणासाठी निधी, अनेक दलित वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृहांना निधी, अभ्यासिकांसाठी निधी,दलित वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्त्यांसाठी निधी,बंदिस्त गटार योजनांसाठी निधी,बौद्ध विहारांच्या स्वागत कमानीसाठी निधी ,प्रकाश व्यवस्थेसाठी निधी,लासुर्णे येथे भव्य संविधान भवन बांधण्यासाठी भरघोस ३ कोटींचा निधी दिला आहे. म्हणूनच संघटनेने बिनशर्त पाठिंबा दिला असून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सर्व इंदापूर तालुक्यात गावभेट दौरा करणार असुन जास्तीत जास्त मतदान दत्तात्रय भरणे यांना देण्यासाठी मतदारांना विनंती करणार आहेत.

https://youtu.be/1S4DW_PuWmQ?si=F1YPJzXkFUR2fe1L
🎊🎉💥यंदाच्या दिवाळीची खरेदी फक्त यश लाइफस्टाइल मध्येच करा
कारण इथे आमच्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत . दिवाळी साठी खास दिवाळी बंपर प्राईस,🎁🛍️ आमच्याकडे साड्या,शूटिंग ,शर्टिंग,रेडीमेड जीन्स, पॅन्ट, शर्ट टी-शर्ट मध्ये कपड्यांच्या भरपूर वरायटीज.सर्व वयोगटातील जेंट्स आणि लेडीज साठी कपड्याचे भव्य दोन मजली दालन.तर चला मग आजच यश लाइफस्टाइल मध्ये दिवाळीची खरेदी करू. आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास दिवाळी ऑफर. 2500 रुपयाच्या पुढील प्रत्येक खरेदीवर खास आकर्षक हमखास भेटवस्तू सोबत एक लकी ड्रॉ कुपन , त्यामध्ये हिरो स्प्लेंडर – १, हिरो डेस्टिनी, – १, वरफुल फ्रिज – १,मोबाईल – 3,LED-32″- 3,कूलर-5
नियम व अटी लागू
आमचा पत्ता-
भगवान महावीर पथ
नातेपुते, ता माळशिरस,जि. सोलापूर
मो.८४३२१७१००८ ९४२३३२८८१३🎉🎊 आपल्या परिसरातील बातम्यां आणि जाहिराती संपर्क-9975903040

दहिगाव हायस्कूलचे लिपिक धनाजी फुले सर यांना आदर्श लिपिक पुरस्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

दहिगाव हायस्कूलचे लिपिक धनाजी फुले सर यांना आदर्श लिपिक पुरस्कारनातेपुते ( -दहिगाव हायस्कूल दहिगाव चे लिपिक धनाजी भानदास फुले यांनासोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेकडून जिल्हा स्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेच्य्या प्रत्येक उपक्रमांत पडद्यामागील कलाकार म्हणून त्यांनी केलेली प्रमाणिक कामगिरी या मुळेच त्यांना आदर्श लिपिक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समिती सदस्य सुभाष माने, राजेंद्र आहिरे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे, रावसाहेब मिरगणे शिक्षण उपनिरीक्षक, सचिन जगताप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सोलापूर,  सुलभा वठारे शिक्षणाधिकारी (योजना) सोलापूर, मुख्याध्यापक संघटनेचे नियंत्रक समितीचे अध्यक्ष सुभाषराव माने सर, अनिल माने अध्यक्ष शिक्षकेतर महामंडळ, शिवाजी खांडेकर कार्यवाह शिक्षकेतर महामंडळ व श्री गोवर्धन पांडूळे पुणे विभागीय कार्यवाह इत्यादी प्रमुख पाहूणे उपस्थित होते.सदर कार्यक्रम शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी  मुळे हॉल हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाला.यावेळी मुख्याध्यापक चव्हाण सर व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष रविकांत सुर्वे तर आभार सचिव मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले.

*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क-9975903040*

माळशिरस तालुक्यात येळीव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी आमदार रणजितसिंह व धैर्यशील खासदार मोहिते पाटील द्वयांच्या म प्रयत्नांना यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

प्रतिनिधी सहकाराच्या माध्यमातून प्रगतीपथावर असलेल्या म ाळशिरस तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मिनी औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ रणजितसिंह मोहिते पाटील व खा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्याला यश आले असून माळशिरस तालुक्यातील येळीव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

आ मोहिते पाटील व खा धैर्यशील म ोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई मंत्रालयात भेट घेवून मागणीचे पत्र दिले होते. या पत्रात माळशिरस तालुक्यात सुमारे ४ लाख ८५ हजार लोकसंख्या असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी ाळशिरस तालुक्याच्या मध्यभागी माळशिरस पुरंदावडे, येळीव व सदाशिवनगर

जवळ शेती महामंडळाची सुमारे २१० एकर सलग जमीन आहे या जमिनीवर मिनी औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास शासनाला जमीन विकत घ्यावी लागणार नाही तसेच येथे औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास माळशिरस तालुक्यासह लगतच्या फलटण व माण तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल ही जागा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर असल्याने दळणवळणासाठीही उद्योजकांना फायदेशीर आहे त्यामुळे येथे मिनी औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळावी अशी मागणी दि ११ जुलै रोजी केली होती.

या मागणीचा विचार करुन शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालयाचे अप्पर सचिव किरण जाधव यांनी म हाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्व मारे मा. प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी झालेल्या १६६ व्या उच्चाधिकार

समितीसमोर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या बैठकीत उच्चाधिकार समितीने माळशिरस औद्योगिक क्षेत्र मौजे माळशिरस येथे २९.१८ हे. आर क्षेत्र व मौजे येळीव येथील ३०.२९.८१ है. आर असे एकूण ५९.४७.८१ हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम, १९६१ अन्वये कलम २ खंड (ग) च्या तरतूदी लागू करणेबाबत दि. १४ ऑक्टोंबर रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इतिवृत्त अंतिम होण्याची वाट न पाहता पुढील आवश्यक कार्यवाही सत्वर करावी अशी सूचना केली आहे माळशिरस तालुक्यातील येळीव येथील शेती महामंडळाच्या जागेत औड्योगिक वसाहत होण्यास मंजुरी मि ळाल्याने माळशिरस तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील युवकांमध्ये आनंदाचे वा- तावरण पसरले आहे.

कॅनल मध्ये मास फेकणाऱ्या वर कारवाई न केल्यास पाटबंधारे अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फसणार-अनुप शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे


फलटण तालुक्यातील चौधरवाडी गावाच्या हद्दीमधील गो हत्या करून गोमास कॅनॉल मध्ये फेकून देण्यात आले आहे यामुळे फलटण शहर व परिसरातील शाकाहारी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे याबाबत तातडीने पाटबंधारे खात्याने भूमिका न घेतल्यास व सदरचे कृत्य कोणी केले याचा छडा न लावल्यास भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष अनुपशहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे बाबत अधिक माहिती अशी की फलटण हे मानभाव व जैन समाजाची दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे संतांची भूमी म्हणून सुद्धा फलटणचा उल्लेख होतो परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर सद्गुरु हरिभाऊ महाराज यांच्या समाधी ही फलटणमध्ये आहेत हे सर्व समाज शाकाहारी असल्याने ते आपल्या धर्माच्या परंपरेनुसार त्याचं पालन करत असतात व नगरपालिका नीरा उजवा कॅनल मधून येणाऱ्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करत असते मात्र हा कॅनॉल तरडगाव साखरवाडी चौधरवाडी या मार्गे फलटण शहरातून पुढे पंढरपूर माळशिरस कडे जातो या कॅनॉलमध्ये काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडवण्यासाठी गोहत्या करून या गोमातेचे मांस या कॅनल मध्ये टाकल्याने जैन समाज व मानभाव पंथीय समाज तसेच मारवाडी समाज यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे हे गोमास टाकलेल्या ठिकाणाहून आलेले पाणी नगरपरिषदेने शहराला वितरित करून ते पाणी अजाणते पणे शाकाहारी समाजाच्या लोकांना प्यावं लागले आहे त्यामुळे हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे तसेच पाटबंधारे विभागाने याबाबत कारवाईची भूमिका न घेतल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून त्याची प्रतिकात्मक गाढवावरून भेंड काढण्यात येणार आहे असा इशारा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी पत्रकामध्ये दिला आहे.

नातेपुते कंगन फॅशन शोरूम चे उद्घाटन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते तालुका माळशिरस येथे विजय दशमी दसरा निमित्त कंगन फॅशन कपड्याचे शोरूम चे उद्घाटन मा.आमदार रामहरी रूपनवर मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख मा सरपंच बी.वाय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी बोलताना बाबाराजे देशमुख म्हणाले की. सुलतान सय्यद यांनी अतिशय परिश्रम करून हा उद्योग व्यवसाय उभारला आहे. सुरुवातीच्या काळात हमाली मोलमजुरी तसेच बाजारात कॉट वरती मुंबईवरून आणून कपडे विकण्याचे काम केलं आहे.कष्ट मेहनत जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा च्या जोरावर हळूहळू व्यवसायाची प्रगती करत आज त्यांची भव्यदिव्य चार दुकाने झाले आहेत. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माऊली पाटील,नगराध्यक्ष अनिता लांडगे,उपनगराध्यक्ष अतुल पाटील,मालोजीराजे देशमुख, उद्योजक शरद मोरे,अविनाश दोशी,विशाल साळवे, साळवे,राजकुमार पांढरे,सचिन पांढरे, तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बशीर काजी व,सूत्रसंचालन औदुंबर बुधावले पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन सुलतान सय्यद,समीर सय्यद,जमीर सय्यद यांनी केले. 

ॲट्रॉसिटीॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे होय…. वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

राज्यात मातंग,बौद्ध,चर्मकार,होलार या समाजासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती दलित आदिवासींवरील अन्याय अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. यातील प्रमुख कारण म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियमांप्रमाणे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्च अधिकारी दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात एका वर्षातून दोन वेळा बैठका घेणे कायदेशीर बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी विलंब तर केलाच शेवटी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांच्या मंत्रालयीन पाठपुराव्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय काढून या समितीची पुनर्रचना केली. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृह,अजित पवार उपमुख्यमंत्री वित्त,शिवाय चार लोकसभा सदस्य यामध्ये डॉ.हिना विजयकुमार गावीत, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, अशोक नेते, हे सदस्य आहेत. तसेच 12 विधानसभा सदस्य डॉ.बालाजी कीनिकर, मंगेश कुडाळकर, ज्ञानराज चौगुले,शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, श्रीमती लताबाई सोनवणे, प्राचार्य अशोक उईके, सुनील कांबळे, डॉ.देवराज होळी,श्रीमती नमिता मुंदडा, काशीराम पावरा, नामदेव ससाने, हे सदस्य आहेत.आणि मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव ग्रह, अपर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग, पोलीस महासंचालक, संचालक/उपसंचालक राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अशी एकूण 25 जण सदस्य आहेत. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे निमंत्रक आहेत.
एवढी महत्त्वपूर्ण समितीची एकही बैठक झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही तर या समितीतील लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्यांनीही बैठक घेण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व मुख्यमंत्री महोदयांना केला नाही.

या समितीची कार्ये खालील प्रमाणे आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ ची अंमलबजावणी राज्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य/मदत नियमांनुसार देण्यात येते किंवा कसे, याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेणे.

अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्तींचे पुनर्वसन इ. नियमानुसार व तात्काळ करण्यात येत आहे किंवा कसे, या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पोलिसात दाखल करण्यात आलेले गुन्हे/न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे यांचा आढावा घेणे.

या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित संस्था/अधिकारी/ कार्यालयाकडून होते आहे किंवा कसे याचा आढावा घेणे.इत्यादी महत्त्वपूर्ण कामे या समितीची आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी एकही बैठक घेतली नाही. कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त,जिल्हाधिकारी मंत्रालय स्तरावरील समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांचा आढावा घेतला नाही.
1)ॲट्रॉसिटी ॲक्ट चे खटले जलदगतीने ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीप्रमाणे दोन महिन्यात निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट विशेष न्यायालयांची स्थापना केली नाही.

2) बौद्ध मातंग चर्मकार दलित आदिवासी यांच्या हत्या (खून) प्रकरणात पुनर्वसन करण्यासाठी आकस्मिकता योजना कंटीजंन्सी प्लॅन लागू केला नाही. हत्या प्रकरणात शासकीय नोकरी जमीन पेन्शन मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय काढला नाही.3) ॲट्रॉसिटी ॲक्ट चे खटले हाताळण्यासाठी नियुक्त विशेष सरकारी वकिलांना देण्यात येणाऱ्या परिणामकारक की व अपरिणामकारक याबाबतीत एकसूत्रीपणा आणला नाही.

4) अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी,अन्याय अत्याचार होऊच नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या नाहीत.

यामुळेच महाराष्ट्रात जातिवाद बोकाळला असुन अत्याचार करणाऱ्यांना कायद्याची भीती उरली नाही. राजरोसपणे बौद्धमातन चर्मकार अनुसूचित जाती जमाती दलित आदिवासींचे मुडदे पाडले जात आहेत. बालकांवर,महिलांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी दोन वर्ष व चार महिन्यांमध्ये किमान चार बैठका घेणे बंधनकारक होते परंतु त्यांनी एकही बैठक घेतली नाही.
तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या नियमाप्रमाणे मंत्रालय स्तरावर प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्यासाठी
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी पाठपुरावा केल्याने शासनाने 22 नोव्हेंबर 2022 रोजी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उद्योग व ऊर्जा विभाग यांची ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणी करिता मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली समन्वय अधिकारी यांनी प्रत्येक तीमाहीस संबंधित सनदी अधिकाऱ्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे.तरी देखील प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी अद्याप एकही बैठक घेतली नाही.

ॲट्रॉसिटीॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले समन्वय अधिकारी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आहेत.