प्रमोद शिंदे

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नातेपुते प्रतिनिधी..
कोरोना covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आहे या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे महाराष्ट्र शासनाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे व पालकांवर शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने covid-19 विषाणूचा संसर्ग जलदगतीने विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या व सर्वच प्रकारच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा काढावा यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी ठेवू नयेत.आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक आहे.
काही ठिकाणी डिजिटल वर्ग सुरू झालेत परंतु लाखो विद्यार्थी गरीब असल्यामुळे त्यांच्या कडे लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट अशी अद्ययावत साधनसामग्री नसल्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे आणि मगच डिजिटल शिक्षण पद्धती सुरू करावी देशात लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही हे कामकाज सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना covid-19 विषाणूचा संसर्ग खासदार व आमदारांना होऊ नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे अशी परिस्थिती असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय आत्मघाती निर्णय होऊ शकतो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता वर्ग अपुरे पडू शकतात योग्य फिजिकल डिस्टन्स ठेवता येणार नाही अगोदरच विद्यार्थ्यांची संख्या जास्त व बसण्याची क्षमता व वर्ग कमी आहेत ही सत्यता आहे.
त्यामुळे सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा एक कोटी रुपयांचा विमा काढून प्रत्येकास लॅपटॉप कॉम्प्युटर व इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे सर्व प्रतिबंधात्मक सोयी सुविधांच्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात शासनाने योग्य उपाययोजना न करताच शाळा सुरू केल्यास प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्यास आणि सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांबाबत कोरोना covid-19 विषाणू संसर्गाबाबत अनुचित घटना घडल्यास त्यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असेल
असे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वात माळशिरस प्रांत अधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, सौरभ वाघमारे,धनाजी शिवपालक,संभाजी साळे हे उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती एन.डी.एम.जे चे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांनी दिली आहे

* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*

* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- शिवपुरी तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते एन डी एम जे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गरजूंना केली मदतलॉकडाउनच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळे मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात घेता शिवपुर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी विकास दादा धाइंजे व एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब साठ शेती महामंडळातील कामगारांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे स्वतःच्या वाढदिवसाचा होणारा वायफळ खर्च टाळून गरजूंना मदत केल्यामुळे परिसरात दत्ता कांबळे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा मास्क सानेटायझर जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग नियम पाळणे करण्यात आला. यावेळी माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाईंजे,एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गीते,  पत्रकार प्रमोद शिंदे, श्रीकांत बाविस्कर, सुनील गजाकस, विलास भोसले, प्रशांत खरात, शहाजी धायगुडे. कार्यकर्ते उपस्थित होते. 

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- कृषी अधिकारी शिवलाल गेना कांबळे हे कृषी खात्यातून कृषी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले असल्याने पिरळे येथील अर्जुन नगर येथे प्रमोद भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला शिवलाल कांबळे हे इंदापूर तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी व मित्र परिवाराने त्यांना प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच पिरळे येथे ही त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी साई उद्योग समूहाचे मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोसले,मित्रपरिवार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक नातेपुते मॅनेजर बबन गुलाब धाइंजे उपस्थित होते.

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा सपत्नीक पिरळे येथे सत्कार

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -( प्रमोद शिंदे)- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी 15 जून 2020 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे.
आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने आश्वासने देऊन शासनामार्फत व प्रशासनामार्फत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली ,कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड-१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला आहे. कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत असतांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, शासनाने समान काम समान वेतन याची घोषणा केली आहे परंतु यावर शासनाने कसल्याही प्रकारचे वेतन वाढ कर्मचाऱ्यांना दिली नाही .शासनाला आमची गरज नसल्यास, आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसुन येत आहे.
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १७००० रिक्त पदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे मा. आरोग्यमंत्री साहेबांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळली आहे. पत्र संदर्भ क्र ४ व ५ नुसार राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतलेली नसल्यामुळे दि.१५/०६/२०२० पर्यंत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी दि.१५ जुन २०२० पासुन महासंघाकडुन राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच या आंदोलनात जे काही नुकसान होईल यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन शासनाला कंत्राटीी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष नंदू कासार व संघटने च्या पदाधिकारी यांनी दिले आहे .शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभरातून करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

प्रांतअधिकारी यांच्याकडून हनुमान गणेशउत्सव मंडळ नातेपुते यांचे कौतुक

प्रांत अधिकारी यांच्याकडून हनुमान गणेश उत्सव मंडळ नातेपुते यांचे कौतुक
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)-Covid-19 प्रादुर्भाव कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते शहरातील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, मंडईचा राजा नातेपुते.यांनी लॉकडाउन च्या काळात गरजू लोकांना अन्नदान केले, लॉकडाउन च्या काळात माणसा पासून माणसं दूर असताना आमच्या मंडळांनी माणुसकीच्या नात्याने सर्वांना एकत्र येऊन नातेपुते येथील नागरिकांच्या सहकार्याने घरपोच अन्नदान सेवा करण्यात आली या कामाची दखल घेत प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम यांनी हनुमान गणेशोत्सव मंडळ नातेपुते यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक केले आहे. प्रशासनाने घेतलेल्या सामाजिक कामाच्या दखल मुळे मंडळातील कार्यकर्ते प्रोत्साहित झाले असून यापुढेही असेच सामाजिक बांधिलकी ठेवून काम करू से आश्वासन मंडळातील कार्यकर्त्यांनी दिला आहे तसेच त्यांनी नातेपुते येथील अन्नदाते यांचे आभार व्यक्त केले आहेत. हा उपक्रम पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.

अत्याचार पिडित कुटुंबांना एन.डी.एम.जे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप*


अत्याचार पिडित कुटुंबांना एन.डी.एम.जे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप*


नातेपुते (प्रमोद शिंदे)- महाळुंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कोरोना आपात्कालीन परिस्थितीत लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या   अनेक जातीय अत्याचार पिडित गरजू कुटुंबाना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) यांच्या वतीने
संघटनेचे राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकास दादा धाईंजे यांच्या उपस्थितीत  व राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सध्या लॉक डाऊन मुळे लोकांच्या हाताला काम नाही  त्यामुळे उपासमारीची वेळ लोकांवर येत आहे  हे लक्षात घेता एन.डी.एम.जे. संघटनेने अत्याचार पिडित कुटुंबांना दहा किलो गव्हाचे पीठ, दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो गोडेतेल, दोन किलो तुर डाळ, उडिद डाळ, आंघोळीची व धुण्याची साबन, मीठ, मिरची, हळद, 12 बिस्कीट पूड़े, सॅनिटरी पॅड आदी पंधराशे रुपये वस्तूंची एकत्रित किट तयार करून सदर किट पिडित कुटुंबांना मदत म्हणून देण्यात आली. माळशिरस तालुक्यात जवळपास 50 त्‍याचार पिडीतांना अशा प्रकारची मदत देण्यात आली. विकास दादा धाइंजे बोलताना म्हणाले की माळशिरस तालुक्यात जीजी लोका अडचणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही त्या गरजू लोकांना होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू गेले अडीच महिन्यांपासून आम्ही गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि इथून पुढेही करत राहू यावेळी राज्य सचिव वैभवजी गिते, पत्रकार प्रमोद शिंदे, प्रशांत खरात,बाबासाहेब सोनवणे,धनाजी शिवपालक, दत्ता कांबळे, रणजित धाईंजे ,कल्याण लांडगे, बाबर साहेब भगवान भोसले, गेजगे,नवगिरे कार्यकर्ते व पीडित कुटुंब प्रमुख उपस्थित होते.



लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील जातीय अत्याचार पिडित कुटुंबांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) तर्फे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप…


दिनांक ७ जून २०२० रोजी ठाणे जिल्ह्यातील कोरोना आपात्कालीन परिस्थितीत लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या अनेक जातीय अत्याचार पिडित गरजू कुटुंबाना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) यांच्यावतीने
संघटनेचे राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी तुर्फापाडा-ठाणे येथील अनुसुचित जाती-जमातीची लोक राहात असलेल्या झोपड्या जाळण्यात आल्या होत्या. या घटनेत जवळपास ३५-४० झोपड्या जळुन ख़ाक झाल्या होत्या. सदर घटनेचा पाठपुरावा येथील स्थानिक नेते आयु. राजाभाऊ चव्हान हे करत असून त्यांच्या विनंतीवरून एन.डी.एम.जे. संघटनेने येथील पिडित कुटुंबांना दहा किलो गव्हाचे पीठ, दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो गोडेतेल, दोन किलो तुर डाळ, उडिद डाळ, आंघोळीची व धुण्याची साबन, मीठ, मिरची, हळद, बिस्कीट पूड़े, सॅनिटरी पॅड आदी वस्तूंची एकत्रित किट तयार करून सदर किट पिडित कुटुंबांना देण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील अंबरनाथ येथील बोहनोली गावाच्या आदिवासी कुटुंबांच्या अवैधरित्या जमीनी लाटल्या गेल्याच्या घटनेतील पिडित कुटुंबांना व ठाणे जिल्ह्यातील पूर्णा, दहिसर मोरी, वडवली, जंबिवली सह अश्या प्रकारच्या जातीय अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यातिल पिडित कुटुंबांना त्यांच्या घरी जाउन जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले.
“या महामरिच्या टाळेबंदीमूळे हाताला काम नासल्याने कुटुंबाची फार वाताहत होत आहे, अनेकांना दिवसाला एक वेळचे जेवण करून वेळ काढावा लागत आहे, नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली, अशा परिस्थितीत एन.डी.एम.जे.संघटना आमच्या मदतिला धाउन आली आणि किमान काही आठवडे निघतील एवढे अन्न-धान्य व किराना मालाची मदत केली याचे मानावे तेवढे आभार कमी आहे” या शब्दात अनिल जोगदंड यांनी स्थानिकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
उपस्थित लोकांना प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार राहुल सावंत यांनी कोविड-१९ या आजारचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे या बाबत माहिती दिली. या प्रसंगी एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे-मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनावने, आयु.शशिकांत वाघ, सामाजिक कार्यकर्ते आयु.राहुल कासारे, आयु.दिपक गुप्ता, आयु.नितेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.
अत्‍याचार पिडीतांना मदत करताना एडवोकेट डॉक्टर केवल उके साहेब
तुझा त्या त्याच्यात बळी पडलेल्या पीडितांना मदत करताना अडवोकेट डॉक्टर केवल उके व ठाणे जिल्हा कार्यकर्ते

नातेपुते नगरीमध्ये तरुणांनी राबवला अनोखा उपक्रम!!!

*नातेपुते नगरीमध्ये तरुणांनी राबवला अनोखा उपक्रम!!! पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपूते (प्रमोद शिंदे)-सध्याच्या कोरोनाच्या भयानक परिस्थिती बर्याच गोरगरीबांना, कामगार वर्गाला काम नसल्याने त्यांच्या कुटूंबावर  उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि याचाच विचार करुन नातेपुते मधील चार-पाच तरुणांनी एकत्र येऊन गावातील अशा गरजू लोकांची यादी केली व त्यांना स्वखर्चाने घरपोच जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. दोन-तीन दिवसांतच त्यांना गावातील बर्याच तरुणांनी साथ देऊन हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात केली. गावातील सधन कुटुंबांनी त्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली.आज हे तरुण रोज सायंकाळी ४००ते ४२५ लोकांना एक भाकरी, वेगवेगळी भाजी व ठेचा या स्वरुपात जेवण घरपोच करतात.या भयावह परिस्थिती मध्ये गरजूंना मायेचा एक घास देऊनमाणूसकी जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे हा उपक्रम या तरुणांनी *समस्त ग्रामस्थ नातेपुते* या नावाने राबवला  आहे म्हणजे याचे श्रेय या तरुणांनी स्वता: किंवा कोणत्याही एकाच व्यक्तीला किंवा एकाच मंडळाला दिलेले  नाही.या उपक्रमासाठी खालील दानशूरांनी आर्थिक मदत केली.अन्नदाते* -हनुमान गणेश मंडळ,श्री अमोल (अध्यक्ष) कुंडलिक उराडे,श्री प्रितम शिरीन दोशी,श्री हितेश हुकुमचंद दोशी,श्री मंदार शशिकांत देशपांडे,श्री रुपेश लक्ष्मीकांत इंगोले, रत्नत्रय परिवार सदशिवनगर संस्थापक श्री अनांतलाल रतनचंद दोशी, श्री महावीर जिवनचंद दोशी, श्री शितलकुमार माणिकचंद दोशी,स्वामी विवेकानंद गणेशोत्सव मंडळ,श्री सखाराम महादेव भिसे,प्रितम ट्रेडिंग कंपनी,१२ शास्त्र २००८ बॅच डॉ बा.ज. दाते प्रशाला, चि.भाविक जितेश शहा, कु जुई व योगेश सुरेश कुलकर्णी,श्री सुधीर – जितेंद्र जिवांधर दोशी,हर हर महादेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते हिंदु खाटीक समाज नातेपुते,श्रीराम सेल्स पटेल बंधू,श्री प्राजाल मदनकुमार दोशी,श्री शहाजीराव उर्फ बाबाराजे मुधोजीराव देशमुख,श्री माणिक (भाऊ)उराडे,श्री करीम रमजान शेख,श्री चांद महबुब काझी, चि ध्रुव अभिजीत दोशी,श्री जवाहर रघुनाथ इंगोले,विपुल ट्रेडिंग कंपनी,श्री मुबारक कासिम शिकलगार (गुरुजी),श्री राजेन्द्र तुकाराम भिसे,श्री दिलीप चानविरप्पा मुंजी,अहिल्यादेवी पथसंस्था नातेपुते,श्री अतुल(बापू) पाटील व श्री संदिप (दादा) ठोंबरे मित्र मंडळ,श्री सदाशिव शंकर पिसे  गोरेगाव मुंबई,DK Electricals Natepute,चांगण व पिसे परिवार,श्री गणेश कुंडलिक उराडे (बापू), *विशेष सहकार्य* –   श्री राजकुमार उराडे,श्री इम्रान बागवान (मेंबर),श्री नंदकिशोर धालपे, श्री प्रसाद उंडे,विशाल भंडारी,श्री सहदेव बबन खोमणे,श्री उदय मैड, डॉ संदिप महामुनी, चि.शार्दुल उराडे,श्री अमोल अनंता पवार, संजयकुमार अँड ब्रदर्स,श्री अनिल ठोंबरे,बालक मंदिर १२शास्त्र (१९९८),श्री पांडुरंग & गणेश पिसे,श्री गौतांचंद  नेमचांद गांधी,हॉटेल हिरा देशमुख ,संतोष खिस्ती,कैलास दळवी,प्रदीप वणसाळे,सुरेश दोशी(बाबुशेठ),श्री विजय डफळ,श्री वैभव दिगंबर लाळगे, श्री केदार जगताप, कवितके कार्यालय,श्री बाळू जैन,श्री बाळासाहेब पांढरे, श्री संतोष भरते,श्री दादा ठेंगल श्री लक्ष्मण लवटे,श्री सुरेश बनसोडे,श्री अशोक कुंकरी,Star Girls Group १२ Science Natepute

वाढदिवसाचा खर्च टाळून कैलास गायकवाड यांनी मास्क सैनी टायझर केले वाटप*

*वाढदिवसाचा खर्च टाळून  कैलास गायकवाड यांनी मास्क सैनी टायझर केले वाटप*

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) कारुंडे  तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास गायकवाड यांनी स्वतःचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून . नातेपुते येथील पीएमपी  कॉलेज  येथे  क्वाॅरंटाइन असलेल्या  लोकांना  तसेच कोरोना महामारी  अहोरात्र  जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना जेवण तसेच सॅनी टायझर, मास्क वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी आकाश(वस्ताद)भोसले, अक्षय शिंदे, वैभव गेजगे, अतिष गायकवाड, डी आर गेजगे, बाबासाहेब गायकवाड, प्रथमेश रणदिवे ,बादल सोरटे,गणेश खिलारे, अतिष खिलारे, शशिकांत गायकवाड व इतर मिञ परिवार उपस्थित होते.

*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीनेजीवनावश्यक वस्तूंचे वाटप *

*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*नातेपुते (प्रमोद शिंदे)-शिवपुरी तालुका माळशिरस  येथे  आद्य क्रांतिवीर  भटके-विमुक्त  संघटनेच्यावतीने 75 किराणा किट व मास्क सेनिटायझर चे वाटप करण्यात आले वाटप करताना शासनाच्या नियमांचे पालन करून हे वाटप करणात आले तसेच सर्व पत्रकारांचे  विशेष सत्कार करण्यात आले या वेळी एकशिव गावचे मा.सरपंच मा श्री.शहाजीदादा धायगुडे, अध्यक्ष लखनभाऊ चव्हान,मा.श्री.गुणवंत पाटील, ग्रा.सदस्य दशरथ जाधव,अय्याज मुलाणी,किरण जालोदे, पोपट, एन डी एम जे  तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, गुरसाळे गावचे सरपंच राहुल जगताप व शिवपुरी शाखेचे अध्यक्ष राहुलभाऊ सरगर, उपाध्यक्ष श्रीकेश वरूडे, खजिनदार महेश कांबळे,व सर्व सभासद ,किरण खरात, कुलदीप खांडेकर,सुमित चँकेश्वरा,प्रतीक वरूडे,अनिस मुलाणी,आसिफ मुलाणी,रुपेश वाघमारे, वाहिद मुलानी किसन रुपनवर सर्व शिवपुरी ग्रामस्थ उपस्तीत होते कार्यक्रमाचे सूत्रसनचन श्रीकेश वरूडे यांनी केले.

You may have missed