प्रमोद शिंदे

एन डी एम जे चे वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात

वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) राज्य सचिव वैभव गिते यांनी स्वतःचा जन्मदिन साजरा न करता गरिबांना मदतीचा हात देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना मुळे इतर राज्यातील व जिल्ह्यातील गोरगरीब मजूर लोक नातेपुते व परिसरात अडकल्याचे लक्षात घेऊन वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन वाढदिवसाला होणारा खर्च हे गरीबांसाठी गरजू मजूर वर्ग यांना मदत म्हणून माळशिरस तालुक्यातील चंद्रपुरी तांबेवाडी येथे मध्य प्रदेशमधील ऊसतोड मजूर कुटुंब यांना गहू,तांदूळ,तेल,साबण,माचिस,
कपड्याचा व अंगाचा साबण,खोबरेल तेल,मीठा सह जीवनावश्यक वस्तू दिल्या तसेच बोलताना वैभव गिते म्हणाले की ऍड. डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत जोपर्यंत मध्यप्रदेशातील हे कुटुंब माळशिरस तालुक्यात आहे तोपर्यंत त्यांची जबाबदारी एन.डी.एम.जे चे कार्यकर्ते घेतील.तसेच माळशिरस चे माजी सरपंच विकास धाईंजे म्हणाले की माळशिरस तालुक्यातील प्रत्येक अडकलेल्या मजुरा पर्यंत मदत पोहोचवली जाईल.मजुरांना कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासल्यास कोणताही संकोच न करता त्यांनी आमच्याशी संपर्क करावा मजुरांची अडचण सोडवली जाईल अन्न धान्य वाटप करताना शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्स चा नियम पाळून वाटप करण्यात आले तसेच यावेळी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले आहे. यावेळी वैभव गिते, विकास धाईंजे,विशाल साळवे मारुती सरगर, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे उपस्थित होते. तसेच वैभव गिते यांना ब्ल्यू जीन्स ॲप च्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऍड केवल उके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून मुंबई पुणे ठाणे कल्याण वाशिम हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्हिडीओ कॉलिंग द्वारा वाढदिवसाच्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तसेच या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा समितीच्या वतीने कल्याण पूर्व परिसरातील गरीब कुटूंबांना अन्नदान..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )देशभर कोविड १९ या महामारिने थैमान घातलाय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक २३ मार्च पासून १४ एप्रिल २०२० पर्यन्त संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉकडाउनची सर्वात जास्त झळ ही रस्त्यावर राहणारे गोरगरीब तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांना सोसावी लागत असून त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेचा फज्जा उडाला आहे आणि अनेक योजना या अद्याप कागदावरच आहेत. अशा वेळेस मदतीचा एक हात पुढे करत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या ठाणे जिल्हा समितीच्या वतीने आज दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आनंदवाडी, मिलिंद नगर, एफ कॅबिन रोड, कल्याण पूर्व या परिसरातील अपंग, बेरोजगार, रिक्षा चालक, गॅस डिलेवरी, व घर काम करणाऱ्या जवळपास २०० गरीब कुटूंबांना अन्नदान केले. संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर गरजूंना विविधप्रकारे मदत केली जात आहे आणि आजच्या अन्नदानाप्रसंगी ते स्वता जातीने उपस्थित होते.

अश्या गोर-गरिबांना मदत करण्याकरीता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हान यांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत केली आहे. तसेच मानुसकिची जान असणारे ऑल.इडिया एस.सी.एस.टी.कल्याण (ओ.एच.इ.) शाखेचे अध्यक्ष सुनिल ठेंगे याच्या सारखे अनेक लोक पुढे येत आहेत. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांनी पुढे येवून आणखी दान करावे जेने करून अश्या असंख्य कुटुंबाची मदत करता येइल असे अव्हाहन आजचे भोजन दानाचे मुख्य संयोजक तथा एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे यांनी केले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव व कल्याण तालुका संघटक जितेंद्र बुकाने, प्राध्यापक संतोष बनसोडे सर तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष अमित साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीएमजेची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना ग्रस्तांसाठी काम करत असल्याने जनतेतून कौतुक होत आहे.

अन्नदान करताना एन डी एम जे राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके
अन्नदान करताना एन डी एम जे कल्याण टीम
विशेष सहकार्य मार्गदर्शन बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हाण साहेब
परिश्रम घेताना बंटी साळवे
अन्नदान करताना विनोद रोकडे

रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात

रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) येथील रेणुका परिवाराच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच रेणुका परिवाराचे सर्वेसर्वा बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नातेपुते शहरात गरजू पंधराशे कुटुंबीयांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटपाचा प्रारंभ नातेपुते येथील समाजभूषण नगर येथून माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.गावाला कुटुंब माणुन गावामध्ये असणाऱ्या गरजू गोरगरीब कुटुंबाला धान्य,तांदूळ तसेच त्यासोबत लागणाऱ्या अन्य वस्तूंचे पॅकेट करून शहरांमध्ये वार्ड नुसार घरपोच देण्याचे नियोजन रेणुका परिवाराने केलेले आहे.संपूर्ण शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या घरपोच सेवेच्या या उपक्रमामुळे विविध सामाजिक संघटना,तरुण वर्ग या सर्वांना प्रेरणा मिळून भरपूर मदतीचे हात येऊन मानवा कडूनच मानवतेचे दर्शन घडावे.यासाठी रेणुका परिवार सततच अग्रेसर आहे.आज देशावर संकट आलेले आहे ते घालविण्यासाठी सरकारने घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे.आरोग्याच्या दृष्टीने लागणारे मास्क,निर्जंतुकीकरणासाठी चे लागणारे साहित्य वाटप करण्यासाठी गावातील प्रत्येक वार्ड नुसार रेणुका परिवाराचे सदस्य कामकाज पहात आहेत असे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले.गरजू गोरगरिबांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्यासाठी विविध वॉर्डामध्ये अमरशिल देशमुख,बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,महेश शेटे,उत्तम बरडकर,अतुल बावकर,मालोजीराजे देशमुख,धनाजी देशमुख,रणविरसिंह देशमुख,दादासाहेब लाळगे,राहुल पदमन,धनाजी पांढरे,अजित बाविस्कर,महावीर साळवे,नवाज सोरटे,शशी कल्याणी,समीर सोरटे,सागर बिचुकले,बाळासाहेब पांढरे,रोहित शेटे,शक्ती पलंगे,प्रवीण राऊत सदरील उपक्रमात सहभागी होऊन मामासाहेब पांढरे मित्र मंडळाच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे. या उपक्रमाचा नातेपुते व परिसरात लोकांच्या कडून कौतुक होत आहे.

नातेपुतेत महावीर जयंतीनिमित्त अत्यावश्यक वस्तूंचे वाटप*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथे सकल जैन समाज नातेपुते व महावीर सेना यांच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्री भगवान महावीर जयंती चे औचित्य साधून  ग्रामीण रुग्णालयात व नातेपुते पोलीस स्टेशन तसेच सर्व नातेपुते परिसरातील दवाखान्यात फळे, बिस्कीट, मास्क सॅनिटायझर असे 200 किट चे वाटप करणात आले. यावेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी. महावीर सेनेचे राहुल गांधी, संजय गांधी, वैभव शहा,अमित गांधी ,राजू डुडु, सुयोग दोशी, विनोद दोशी,सौरभ दोशी,हितेश दोशी, सुकुमार दोशी उपस्थित होते तसेच महावीर सेनेच्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*

*दहिगाव येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने बाहेरगावाहून आलेल्या मजूर लोकांना मदत*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- दहिगाव तालुका माळशिरस येथे आम्ही दहिगावकर यांच्यावतीने दहिगाव मध्ये बाहेर गावाहून आलेले मजूर परंतु काम नसलेने अडकुन पडले आहेत त्यांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू श्री विजय पाटील , भारत गॅस एजन्सी मालक यांचे वतीने देण्यात आले यावेळी सरपंच ॲड रणधीर पाटील, तलाठी समाधान पाटील , पोलीस पाटील विठ्ठल मोरे , नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक माने उपस्थित होते. वाटप करते वेळेस सोशल डिस्टन्स इन चा नियम पाळून वाटप करण्यात आले.

*जीवनावश्यक वस्तूंवर जास्त दर आकारल्यास कारवाई ….विकास दादा धाईजे

*जीवनावश्यक वस्तूंवर जास्त दर आकारल्यास कारवाई ….विकास दादा धाईजे

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे निवेदन

जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतल्याने जनतेने केले भरभरून कौतुक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अकलूज )नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन सादर करन्यात आले यामध्ये देशात करोना आजाराची साथ असल्याने लॉकडाऊन चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूवरील दर मोठ्या प्रमाणात आकारले जात आहेत अश्या प्रकारच्या तक्रारी जनतेकडून सातत्याने होत असल्यामुळे आंबेडकरी चालवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी. एम.जे.च्या टीम ने प्रांत अधिकारी यांची भेट घेतली जनतेला घराच्या जवळ असलेला किराणा मालाच्या दुकानदाराकडून किराणा मालावर वस्तूच्या किमतीच्या दरापेक्षा जास्त आकारणी केली जात आहे तसेच होलसेल किराणा दुकानदार जाणून-बुजून जास्त दराने छोट्या दुकानदारांना माल देत आहेत तसेच मंडईमध्ये भाजीपाला व इतर तरकारी वर जास्त दर आकारले जात आहेत त्यामुळे सामान्य जनतेला हाताला काम नाही जवळ पैसे नाही अशा परिस्थितीमध्ये होलसेल दुकानदार व पालेभाज्या विक्रेते हे जनतेकडून चढ्या भावाने माल विकून अक्षरशः जनतेची लूट करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने स्वतः हा बनावट ग्राहक बनून या दुकानदारांवर कारवाई करावी तसेच उज्वला गॅस कनेक्शन सिलेंडर माळशिरस तालुक्यात सह सोलापूर जिल्ह्यात मोफत वितरीत करण्यात यावेत केंद्र सरकारवर व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार सर्व कार्डधारकांना व कार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात यावे गहू काढणाऱ्या मशीन मालकांना शेतकऱ्यांकडून एकरी तीन हजार अशा चढ्या भावाने पैसे घेऊन शेतकर्‍यांची लूट केली जात आहे त्यांच्यावर कारवाई करावी ग्रामपंचायत स्तरावरील 15 टक्के निधी हा वैयक्तिक लाभासाठी दिला जातो तरी तो निधी माळशिरस तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीच्या व जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वितरित व्हावे तसे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावेत शासनाच्या आदेशानुसार गावातील सर्व नागरिकांना धान्य वाटप व्यवस्थित होण्यासाठी ग्रामपातळीवर मौजे तलाठी यांच्या अंतर्गत कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे रखने कामी करण्यात येणाऱ्या उपाययोजना गाव पातळीवरील कृती समिती त्यामध्ये अन्नधान्याचा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 24 3 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार तलाठी व ग्रामसेवक यांच्या कमिट्या तात्काळ कराव्यात झालेल्या कमिट्यांची माहिती मिळावी रेशन दुकानदार सर्व जनतेला डाळीचे वाटप करत नाहीत त्यांचेवर तात्काळ कारवाई करावी राज्यातील सर्वच आशा कार्यकर्ती आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मास्क सुरक्षिततेचे सर्व साहित्य तात्काळ देण्यात यावे तसेच अशा कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच लाख विमा देण्यात यावा
अशा मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी शमा पवार यांना देण्यात आले निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले. निवेदनावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे,राजेश साळे,नवनाथ भागवत यांच्या सह्या आहेत.

नातेपुते येथील पोलीस व व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन* गरिबांना मदतीचा हात*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी देशात झालेल्या लॉक डाऊनलोड मुळे हातावरती पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांचे हाल होत  असल्यामुळे नातेपुते तालुका माळशिरस येथील व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन घडून आले आहे .नातेपुते आणि परिसरातील गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे नातेपुते व परिसरातील झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांची उपासमार होत असल्याकारणाने नातेपुते पोलीस स्टेशने चे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे व कर्मचारी यांनी नातेपुते येथील व्यापाऱ्यांना गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते ची दखल घेत नातेपुते येथील व्यापारीव्यापारी बाहुबली सेठ शंकेश्वर, महावीर नथुराम दोशी, प्रीतम ट्रेडिंग कंपनी, सिद्धांत ट्रेडिंग कंपनी, राजेश मोहनलाल दोशी, सुधीर दोशी, तलकचंद रावजी दोशी, व्यापारी असोसिएशन  च्या किराणा व्यापाऱ्यांनी गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. प्रत्यक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी व कर्मचारी पत्रकार सुनील राऊत,अपूर्व चकेश्वरा, वैभव शहा,सुयोग दोशी, सागर दोशी,पारस शहा, यश गांधी,यांनी प्रत्यक्षात झोपड्यांमध्ये जाऊन मदत दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बरोबर माणुसकीचे दर्शन घडवल्याबद्दल व्यापारी व पोलीस यांचे परिसरात कौतुक होत आहे.

फोंडशिरस येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

फोंडशिरस येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
फोंडशिरस ता माळशिरस येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका यांचे वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते या शिबिरात एक महिलांचं 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुका भाजपा तालुकाध्यक्ष सोपान काका नारनवर, बाळासाहेब सरगर माजी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब वावरे ओबीसी बीजेपी सेल अध्यक्ष, तसेच अध्यक्ष माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संतोष महामुनी , तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वारे शिवाजी सरजे, बादशहा मुंडे, पुरुषोत्तम दाते, संभाजी गोरे, दत्तात्रय गोरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बालाजी रणदिवे ,सूरज सरजे, आमीर मणेरी,अन्वर मणेरी,लक्ष्मण राऊत,यांनी परिश्रम घेतले.

माळशिरस तालुक्यातील नागरिकांसाठी समन्वय कक्ष

माळशिरस तालुक्यातील नागरिकांसाठी समन्वय कक्ष
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे ) कोरोनो व्हायरस ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत संचार बंदीमुळे लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर
यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील लोकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला असून आरोग्य सेवा उपलब्ध होत नसेल,जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत नाहक त्रास होत असेल ,नागरिकांना जाणवणाऱ्या समस्यासाठी तालुक्यातील या कार्यकर्त्यांना फोन करा आपल्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ मदत केली जाईल
जे उपाशी आहेत अशांना घरपोच जेवण दिले जाईल
संपर्क करा उत्तमराव जानकर 9860646012
धैर्यशीलभाऊ देशमुख (नातेपुते) 9422028588
बाळासाहेब धाइंजे ,सदस्य जि प 9960950105
विकास धाइंजे (माळशिरस) 8600250288
अजय सकट, सदस्य पं स 9763145615
बाबासाहेब माने
तालुकाध्यक्ष युवक रा काँ (कण्हेर )
9511205005
मारुतीअप्पा देशमुख,नगरसेवक (माळशिरस )
9960427752
जीवन जानकर (सरपंच)
8805101020
डॉ. तुकाराम ठवरे (खुडूस )
9970343321
के पी काळे विझोरी
9423070000
राहुल सावंत,जि कार्याध्यक्ष
ncp युवक (दहिगाव )
9970681020
किरण साठे जिल्हा सरचिटणीस (अकलूज )
8390459999
संदीप ठोंबरे नातेपुते
9890887970
सालार पठाण (पिलीव)
9673617617
सौरभ बागनवर (एकशिव )
9960170969
सोमनाथ पिसे (पुरंदावडे )
9730809006
भुजंगराव शिंगाडे (काळमवाडी)
8208355200
राहुल खटके (जांबड)
9960016564
गणेश भोसले (संगम)
9011724017
ज्योतिराम आवताडे (फळवणी)
7083471000
शुभंम सूळ (मोरोची)
9604133737

माळशिरस तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय

तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) माळशिरस तालुक्यामध्ये पत्रकारांसह कर्मचारी वर्ग व अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांची पेट्रोलपंप वाले पेट्रोल देत नसल्या कारणाने गैरसोय होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो तसेच पत्रकार मुळे परिसरातील चालू घडामोडी तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात सध्या कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव असल्यामुळे पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रोगाविषयी जनजागृती करीत आहेत. तसेच बातम्या कव्हरसाठी पत्रकारांना बाहेर पडावे लागते. पत्रकार सुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात परंतु पंप चालकांच्या आडमुठेपणामुळे पत्रकारांना पेट्रोल मिळत नाही. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय मिलिंद शंभरकर साहेब यांनी दिनांक 27 मार्च 2020 रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात पत्रकार अत्यावश्यक सेवेत मोडतात त्यांना पेट्रोल देण्याचे आदेश परिपत्रकात दिले आहेत.तरीसुद्धा त्यांच्या आदेशाला पेट्रोल पंप चालकाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यावर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी पेट्रोलपंप चालकांना पत्रकारांना पेट्रोल देण्याचे आदेश करावेत अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्याकडून होत आहे. पत्रकारांसह अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी अडवले जात आहे. याची दखल आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष या नात्याने मा.उपविभागीय प्रांत अधिकारी यांनी घ्यायला हवी. व यासंदर्भात पेट्रोल पंप वाल्यांना आदेश द्यावेत दिनांक 27 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष प्रांत सो यांनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पेट्रोल देण्यासंदर्भात आदेश काढले होते परंतु आज त्यांनासुद्धा पेट्रोल पंपावर ती पेट्रोल दिले गेले नाही. ही बाब गंभीर असून यावर मा.उपविभागीय दंडाधिकारी प्रांत व मा.तहसीलदार साहेब यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

You may have missed