प्रमोद शिंदे

ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.

महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.

प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.

समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .

संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा तात्पुरता चार्ज इतर विभागातील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले शेतकऱ्यांच्या शेतीच्या केसेस व इतर अन्य प्रशासकीय बाबी वेळेवर होत नसल्याने लोकांचे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ माळशिरस तालुक्यात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्यावा अशी मागणी राजकुमार हिवरकर यांनी केले आहे.

अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर

अजिनाथ राऊत यांनी केलेल्या लढ्याला ऐतिहासिक यश

अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.
उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2019 ते 2022 या तीन वर्षांत अॅट्रोसिटी अंतर्गत जातीय अत्याचारात खुन झालेल्या सात पिडीत कुटुंबातील व्यक्तींना नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत व त्यांच्या जिल्हा टिमने शासनाच्या विविध कार्यालयांना पत्रव्यवहार करुन गेली तीन वर्षांपासून केलेल्या खडतर पाठपुराव्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी राज्य शासकीय कर्मचारी यांना लागु असलेल्या महागाई भत्यासह दरमहा 5,000 रु पेन्शन मंजुर केल्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय दलीत न्याय आंदोलन या सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव अॅड. डॉ. केवलजी ऊके, राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जिल्हा सचिव काशिनाथ कांबळे, कोषाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा युवकाध्यक्ष आकाश चव्हाण यांच्या सहकार्याने मंत्रालयात संबंधित विभाग, विधानभवन, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे गेली तीन वर्षांपासून वेळोवेळी कायदेशीर पत्रव्यवहार करुन आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कचेरीसमोर दि. 6 डिसेंबर 2022 रोजी स्वतः आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्याच दिवशी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त यांनी तात्काळ पिडीतांच्या पुनर्वसनाची पावले उचलत जिल्ह्यात अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या सात कुटुंबातील व्यक्तींना पेन्शन मंजूर करुन उर्वरीत खुन प्रकरणात पुढील जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत मंजुर करण्याचे आश्वासन अजिनाथ राऊत यांना दिले आहे. पेन्शन मंजुर केल्याचा आदेश मिळाल्याने व पुढील खुन प्रकरणातील वारसांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राऊत यांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा मागे घेतला आहे. अत्याचार पिडीत व्यक्तींच्या वारसांना पेन्शन मंजूर केल्याने राऊत यांचेवर सामाजिक, राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातून कौतुक करुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)-पुरोगामी महाराष्ट्र व प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस यांच्या वतीने आशा डे उत्साहात संपन्न झाला.संविधान दिन तसेच आशा डे चे औचित्य साधून परिसरातील सर्व आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तसेच सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरळे मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहायिका  व्ही.पी चव्हाण यांनी केले.बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की आशा स्वयंसेविका यांनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.शासनाचा प्रत्येक कार्यक्रम त्या प्रामाणिक घरोघरी जाऊन राबवतात त्यांचं काम उल्लेखनीय आहे.तसेच त्यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय रुग्णसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भेटवस्तू उस्नेहभोजन देण्यात आले.यावेळी अशा सुपरवायझर कल्पना कुंभार  यांनी सर्व आशांच्या वतीने आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रशांत खरात,आरोग्य सेविका कल्पना जाधव,विजया शिंदे, ज्योती डोंबाळे, वंदना चंदिले, मनीषा कुदळे, गायत्री जाडकर,सी एच ओ तब्बूसुम जुबेरे, पवार मॅडम,वर्षा शिंदे,औषध निर्माता प्रशांत घुंबरे,आरोग्य सेवक गुरुनाथ हिवरे, विठ्ठल काशीद,रमेश बंडगर तानाजी बिबे, बाबूलाल शेख मेजर खिलारे, सचिन गोरे अशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

नानासाहेब देशमुख यांच्या समाजकारणाची छाप माझ्यावर पडली -डॉ एम के इनामदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे— समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या राजकारणात समाजकारणाची छाप होती,त्याच्याच  व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडल्यामूळे मला समाजकारणाची,समाजात चांगले काम करणार्याला मदत करण्याची सवयी लागली असे मत,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ.एम.के.ईनामदार यांनी व्यक्त केले.  समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या९६ व्या जयंतीनिमित्त व एस.एस.डी.इटरनॅशनल स्कूल इमारतीच्या पहीला मजला भूमीपूजन  प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड डी.एन.काळे तर प्रमूख पाहूणे म्हणून बापुराव देशमूख(किल्ले वडगांव) हे होते,  डाॅ.एम.के.इनामदार पुढे म्हणाले,कोणतीही संस्था चालवत असताना शिस्त अतिशय महत्वाची असते.शिस्त नसेल तर संस्था टिकू शकत नाहि,परंतू नानासाहेब देशमूख यांना दूरदृष्टी असल्यामूळे त्याच्या नावाने चालवलेली व त्यांनी स्थापन केलेल्या असल्याचे . सर्व संस्था प्रगतीपथावर असल्याचे पाहून समाधान वाटते,आर्थीक शिस्ती बरोबरच वैयक्तीक शिस्तही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.     प्रास्तावीक करताना एस.एन.डी.स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले कि,ग्रामीण भागातील मूलांना शहरातील स्पर्धेत  टिकण्यासाठी सी,बी .एस.सी.अभ्यासक्रम सूरू केला.माझी शाळा माझा विद्यार्थी हि भावना पालकांत दिसून येत असूनहीच यशाची पावती आहे ,अस वाटत.या संस्थेत शिकलेल्या जगाच्याबाजारपेठेत एकनंबर मिळवल असे शिक्षक येथे काम करत आहेत.  यावेळी व्यासपिठावरील सहकारमहर्षि शंकरराव मोहीते पाटील व समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी स्कूलमधील विद्यार्थाना बक्षिस वितरीत करण्यात आली,यावेळी,स्वेतश्री पिसाळ,मैथिली बडवे.सनद मोटे,श्रीमय भागवय या मूलांनी समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्याविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास डाॅ एम .के.इनामदार,डाॅ एम पी मोरे,अॅड डी.एन.काळे.जि.प.माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख,मार्केटकमिटी उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे, माऊली पांटील,चेअरमन मालोजीराजे देशमूख,अमरशील देशमूख,नाथाजीराव देशमूख,नारायण देशमूख,सौ विनोदिनी देशमूख,कूमूदिनी पवार,भाग्यश्री निंबाळकर.श्रूतिका देशमूख,नगराध्यक्षा उत्कषाराणी पलंगे,अॅड बी,वाय,राऊत,विरेंद्र दावडा,बाहूबली चंकेश्वरा,अॅड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,अतूल बावकर,विलास काळे,अर्जून जठार,मूख्याधिकारी माधव खांडेकर,सपोनी प्रविण संपांगे,ञ्रूतूजा मोरे!शरद मोरे,रोहीतशेटे, विश्वजित पिसाळ उपस्थित होते.सूञसंचालन शकूर पटेल यांनी केले तर आभार प्राचार्य सदिप पानसरे यांनी मानले 

 चौकट—कार्यकर्ता हाच राजकारणा आत्मा असतो,कार्यकर्ताल्या कधीही फसवू नका.जात ,धर्म ,पंथ,पक्ष याचा विचार न करता तळागाळातील गरीब माणसाला मदत करणे,चांगले नाही करता आले तर वाईट करू नकाअसे विचार,समाजभूषण नानासाहेब देशमूख यांचै होते,त्याच्या नावाने एखादी संस्था असावी विचार पुढे येऊन रेणूका परीवाराने एस.एन.डी, स्कूलची स्थापना केली.२०२४ अखेर तीन मजले पूर्ण करून सूसज्ज,ग्रथालय,संगणक लॅब,प्रयोगशाळा असेल,तसेच ११वी १२वीसाठी अॅकॅडमी सूरू करून नातेपूते येथे सर्व शैक्षणिक सूविधा मिळतील असे काम करणार आहोत.     बाबाराजे देशमूख,माजी जिप उपाध्यक्ष

संजय राऊत यांनी आरोग्यमंत्र्याचं काम जाणून घ्यावं मगच बोलावं- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-काल सामना मधून संजय राऊत यांनी आरोग्य मंत्री दाखवा यावर आणि एक लाख रुपये मिळवा अशी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिले की वास्तविक पाहता संजय राऊत साहेब पण  ईडीच्याच्या कोठडीत गेले होते. त्यादरम्यान आरोग्य मंत्री सावंत साहेब यांनी त्यादरम्यान आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारला आरोग्य मंत्री झाल्यापासून तानाजीराव सावंत साहेब यांनी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सुरक्षित माता सुरक्षित घर हे अभियान राबवलं या अभियानाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा घेतली आणि या अभियानातून महाराष्ट्र अठरा वर्षावरील मातांची तपासणी करणारा हा सगळ्यात प्रथम क्रमांकाचे राज्य बनला आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात बऱ्याच सरकारी दवाखान्यांना भेटी देऊन गोरगरिबाच्या हक्काचं मिळणारा औषध उपचार तो व्यवस्थित दिला जातो का तिथे स्वच्छता ठेवली जाते का याची पाहणी करणारे आरोग्य मंत्री हे देशात पहिले आरोग्य मंत्री ठरलेले आहेत म्हणून माझी आदरणीय महाभारतातील संजय राऊत यांना विनंती आहे की आपण आता कोठडीतून बाहेर आलेला आहात त्यामुळे काही बोलण्याच्या अगोदर आपल्या संसद बुद्धीचा वापर करा सभोवताली घटनाचा अभ्यास करा माहिती घ्या कोणावरही आरोप करण्या अगोदर माहिती घ्यावी आणि नंतर आपलं मत सामना हा बाळासाहेबांच्या विचाराचे दैनिक आहे याची दखल देशभरात घेतली जाते आपण जर चुकीचं बोलून छापणार असाल तर सामना विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ते आपण लक्षात घ्याव त्यांनी एबीपी माझा च्या कट्ट्यावर मुलाखतीत सांगितलं की मी शांत झालो आहे एकांतात राहिल्यामुळे माझी बोलण्याची विचार करण्याची क्षमता कमी झालेली आहे माझी जेलमध्ये लावलेल्या अतिप्रतर लाईट मुळे नजर सुद्धा कमी झाली आहे असं स्वतः संजय राऊत साहेबांनी राजीव खांडीकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं ते त्यांनी लक्षात घ्या म्हणून वाचनात नसलं तरी सोशल मीडियाचा वापर करून आरोग्यमंत्र्यांचं काम जाणून घ्यावं नंतर टीका करावी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी देशाला महा शिबिराच्या माध्यमातून कुठला मैदान परंडा येथे आयोजित केलेल्या शिबिरामधून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला हे आशेचा किरण दाखवला दोन लाख 87 हजार 653 एवढ्या रुग्णांची तपासणी स्वतः तानाजीराव सावंत यांनी थांबून करून घेतली आहे हे जर संजय राऊत डोळस तुळसपणे नाकारत असतील तर महाभारतातील संजय आणि हे हा संजय यामध्ये खूप मोठा फरक कलियुगात दिसत आहे कारण याच संजय मुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जन्म झाला की त्यांनी विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी एक शिवसैनिक म्हणून विनंती आहे संजय राऊत साहेबांनी चुकीचे बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे दिसणार आहे ते मांडव आहे विरोधक असलं तरी चालेल पण एखाद्या समोरच्याने चांगले केलेले कामाची प्रशंसा करणे हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे आणि यापासून संजय राऊतइ डीच्या कोठडीत गेल्यापासून बरेच दूर गेलेले आहेत अशाप्रकारे त्यांनी यांच्या प्रतिक्रियेवर मत व्यक्त यावेळी.शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील पोपट शिंदे सोशल मीडिया प्रमुख जावेद मुलांनी गटप्रमुख राजू मुलांनी आधी शिवसैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते

संविधान म्हणजे समता-एपीआय प्रवीण संपांगे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे तालुका माळशिरस येथे जि प शाळा व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ऍड सुमित सावंत उद्योजक संदीप नरोळे हे होते. एपीआय प्रवीण संपांगे बोलताना म्हणाले की भारतीय संविधान म्हणजे समता या देशामध्ये संविधानामुळे आपण सर्व समान आहोत.कोणीही उच्च नीच नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले आहेत.आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात तरीसुद्धा लोकशाही आहे ती संविधानामुळेच.ऍड सुमित सावंत म्हणाले की संविधान हे सर्व भारतीयांना लागू आहे संविधानाची सुरुवात बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक असे केली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपल्याला संविधान समजून घ्यायच असेल तर जनजागृती करणे गरजेचे आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला होता.त्याचप्रमाणे संविधानाची जनजागृती होण्यासाठी प्रत्येकाला आपला अधिकार व हक्क माहीत होण्यासाठी शासनाने हर घर संविधान घर घर संविधान हा कार्यक्रम राबवला पाहिजे.उद्योजक संदीप नरोळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शेंडगे मॅडम व नामदे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष आनंद लवटे, माजी शिक्षणाधिकारी प्रल्हाद साळवे,संदीप वाघ मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

समाजरक्षक वैभवजी गीते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना भेटून निवेदन दिले तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या सचिवांना भेटून निवेदन देऊन चर्चा केली होती.याची दखल घेत शासनाने शासन निर्णयानुसार

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण केलेली आहे. सदर राज्यघटना ही दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आलेली आहे. त्यानुषंगाने ज्या संविधानाने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोंव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक ६ डिसेंबर हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२, संविधान दिन ते ६ डिसेंबर, २०२२, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत “समता पर्व” आयोजित करण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाणे शासन निर्णय काढला आहे यामध्ये खालील कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यक्रम राबविणारी यंत्रणा
दि.२६ नोव्हेंबर २०२२, संविधान दिन ते दि. ६ डिसेंबर, २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील समता पर्वामध्ये आयोजित कार्यक्रमाबाबत पत्रकार,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण आयुक्तालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे परिषदेचे आयोजन व कार्यक्रमास प्रसिध्दी देणे.
२६ नोव्हेंबर
Walk for Constitution / प्रभात फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालये, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेले सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृहे इ.संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,जिल्हास्तरावर पालकमंत्री,
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा तथा कार्यक्रमाचे आयोजन निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा,लेखी परिक्षा,
२७ नोव्हेंबर २०२२,२८ नोव्हेंबर २०२२,२९ नोव्हेंबर,३० नोव्हेंबर २०२२ राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये, सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित इ. राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,संविधानविषयक व्याख्याने (विषय- अधिकार व कर्तव्ये) सामाजिक न्याय भवनात पत्रकारांची कार्यशाळा ( विषय सामाजिक न्याय : विभागाची नवी दिशा) संविधान या विषयावर भित्तीपत्रक,पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे
समाजसेवी प्रतिनिधी,कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा विषय : अनुसूचित जाती उत्थान : दशा व दिशा
१ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा
२ डिसेंबर २०२२ रोजी
स्थळ भेट : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी
जिल्हयातील विविध तालुक्यात जेष्ठ नागरीक,दिव्यांग, तृतीयपंथी व ३ डिसेंबर २०२२ रोजी
वृध्द यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त,सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थीना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरण
४ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र आयोजन राज्यातील सर्व तालुकास्तरावर राज्यातील सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी
५ डिसेंबर ६ डिसेंबर २०२२ संविधान जागर व येणाऱ्या ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाच्या संदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन, व समता पर्वाचा समारोप राज्यस्तरीय कार्यक्रम चैत्यभूमीवरील कार्यक्रम
अभिवादन रॅली राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पडताळणी समिती
योजनांच्या माहितीची कार्यशाळा अधिकारी व कृषी अधिकारी
राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे,दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, २०२२ या कालावधी दरम्यान होणाऱ्या समता पर्व कार्यक्रमाच्या सनियंत्रणाकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत समतादूत उपलब्ध करून देण्याबाबत आदेश काढावेत.कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी त्या त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची राहील व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पर्यवेक्षणाची
जबाबदारी संबंधित प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण यांची राहील.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांची राहील असे शासनाने आदेश दिले आहेत.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रालयीन पाठपुरावा केला.संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य महिला संघटक यांनी पंचशीला कुंभारकर
राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,राज्य खजिनदार शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात यांनी शासनाचे अभिनंदन करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने 26 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते नातेपुते पोलीस स्टेशन व ज्ञानदीप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नातेपुते येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच 26 /11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे सर्व कर्मचारी व ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष सीडी ढोबळे हनुमंत माने यांनी केले आहे.