प्रमोद शिंदे

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करा मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे वैभव गीते यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई )-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 संशोधित अधिनीयम 2015 सुधारीत नियम 2016 नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात दोन बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे मुख्यमंत्री महोदयांनी या समितीची स्थापना करून तात्काळ उच्चअधिकाऱ्यांची बैठक बोलावून राज्यात बौद्ध दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्यावर वाढलेल्या अत्याचाराचा आढावा घ्यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी महाआघाडी करून सत्ता स्थापन करून मंत्रिमंडळाचे खातेवाटप सुद्धा झाले आहे त्यामुळे अधिक वेळ न घालवता दक्षता समितीची स्थापना करावी व न्याय करावा अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेबांनी केली आहे

महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवडनातेपुते

महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवडनातेपुते (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या  नूतन वर्षानिमित्त  व  पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर पदाधिकाऱ्यांचे  नियुक्ती करण्यात आली आहे . या निवडी  महाराष्ट्र पत्रकार संघाचे  राज्याध्यक्ष  विलासरावजी कोळेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली  रत्नागिरी येथे करण्यात  आले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष कोळेकर सर व राज्य कमिटीतील सर्व सदस्य यांनी एक मताने केले असून प्रमोद शिंदे यांना संघवाढीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियातून सुद्धा  यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच प्रमोद शिंदे  म्हणाले की संघाने दिलेली जबाबदारी मी माझे कर्तव्य समजून प्रामाणिकपणे पार पाडीन.

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत बाविस्कर यांची निवड

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत बाविस्कर यांची निवडपुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( रत्नागिरी)- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी शांत बाविस्कर यांची निवड करण्यात आली हे निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ही निवड राज्य कमिटीतील सर्व सदस्य एक मताने केले असून श्रीकांत बाविस्कर यांना संघवाढीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियातून सुद्धा श्रीकांत बाविस्कर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

शेखरभैया खिलारे वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

शेखरभैया खिलारे वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज (प्रमोद शिंदे) -4/1/2020
युवासेना अकलूज शहर प्रमुख
शेखर भैय्या खिलारे यांच्या 18 जानेवारीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना अकलूज शहराच्या वतीने मोफत रोग निदान व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अकलूज शहर युवासेना व माळसिरस तालुका यांच्या वतीने महषीॅ काॅलनी अकलूज येथे करण्यात आले होते शिबिरात 275 रुग्णांची तपासणी डॉ.एम.के.इनामदार, डॉ तानाजी कदम,डाॅ सुनिल राऊत,डॉ बळते,डॉ काळे,डॉ पाटील,डॉ पिसाळ,डॉ कारंजे या तज्ञ डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी करून यशस्वी झाले महामानवांच्या प्रतिमेचे पुजन अकलूज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,संग्रामनगर ग्रा.सरपंच राजवर्धीनी माने पाटील, गणेश इंगळे, सुजयभैया माने पाटील,अॅड विरेंद्र वाघमारे, दिनेश ताम्हाणे,सोनू भैया पराडे पाटील,राजाभाऊ खिलारे,भूषण पराडे,संदीप गांधी,यांच्या प्रमुख उपस्थितीत करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिवतेज सिंह मोहीते पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना युवासेना अकलूज शहरचे काम सामाजिक असुन सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले डॉ एम के इनामदार यांनी हा कार्यक्रम दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच राजाभाऊ खिलारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी आरोग्य संबंधित सर्व रक्त चाचण्या व रक्त तपासणी सुध्दा करण्यात आले युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता साळुंखे,संदीप इंगवले,बिपिन बोरावके,चैतन खिलारे,गणेश भिताडे,सचिन भोसले,सागर साळुंखे रामेश्वर खिलारे,बचन साठे,अजिंक्य पासगे,बच्चन साठे यांनी परिश्रम घेतले सकाळी अकरा वाजता सुरू झालेले शिबिर दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते नागरिकांनी गर्दी केली होती या आरोग्य शिबीराचा अनेकांनी लाभ घेतला
त्यावेळी विविध संघटना व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते

*क्ष-किरणांचा शोध लावणारे विल्हेम राँटजेन *

विल्हेम रोंटजेन यांनी क्ष-किरणांचा (x-रे)-चा शोध लावला *
पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- *_२८ डिसेंबर १८९५_*
*_विल्हेम राँटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला._*
_सन १८९५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले._

*प्रताप क्रीडा मंडळ आयोजीत समूहनृत्य स्पधेंत मोरजाई विद्यालयाने पटकवला प्रथम क्रमांक

*प्रताप क्रीडा मंडळ आयोजीत समूहनृत्य स्पधेंत मोरजाई विद्यालयाने पटकवला प्रथम क्रमांक
नातेपुते: प्रतिनिधी
प्रताप क्रिडा मंडळ अकलुज आयोजित समूहनृत्य स्पर्धत मोरजाई विद्यालयाने लोकनृत्यात आणि प्रासंगिक नृत्यात दोन्ही विभागात प्रथम क्रमांक पटकवला आहे या स्पर्धा सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय प्रसिध्द आहेत.या स्पर्धामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थाना अनेक चित्रपटात,मालिकात व पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. विद्यालय हे मोरोची सारख्या ग्रामीण भागातील असूनही या विद्यालयाच्या कलाकाराने अतिशय सुंदर लोकनृत्य आणि प्रासंगिक नृत्य सादरीकरण करुन प्रेक्षक व रसिकांची वाहवा मिळवली .
या कलाकरांना प्रशस्तीपत्र,ट्रॉफी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेच्या संचालिका,.स्वरूपराणी मोहिते-पाटील,स्पर्धा प्रमुख,अँड.नितीन खराडे यांच्या हस्ते देण्यात आले
या विद्यार्थाना मार्गदर्शन विविध गुणदर्शन प्रमूख रणजित बाबर, संपत रुपनवर, अशोक शितोळे, दादासो.हुलगे, स्मिता देशमुख , सुनंदा वजाळे यांनी केले.या दोन्ही गीतांचे दिगदर्शन रणजित बाबर यांनी केले.या विद्यालयाचा शालेय गुणवत्तेबरोबरच कला,क्रिडा,सांस्कृतिक क्षेत्रातही नावलौकिक आहे.या यशाबद्दल प्रशाला समितीचे सभापती,श्री.छगनराव माने, मुख्याध्यापक विकास सूर्यवंशी ,सर्व प्रशाला समितीचे सदस्य आणि पालक यांनी कलाकरांचे अभिनंदन केले आहे

जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा. आजिनाथ राऊत

जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा.

पोरगा महाराष्ट्र नेटवर्क – मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे साहेबांकडे राऊतांनी केली मागणी…

गावात जर राष्ट्रीयीकृत बँकेची मुख्य शाखा असती तर गावातील एस.बी.आय.ग्राहक सेवा केंद्र चालक आश्रु कारकर याने गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन करुन लाखो रुपये घेऊन पळुन जाऊन केलेल्या फसवनुकीच्या प्रकारास गावासह आसपासच्या खेड्या पाड्यातील ग्राहक बळी पडले नसते अशी खंत मा. जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांचेशी चर्चा करताना व्यक्त केली

परांडा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या जवळा नि गावामध्ये वारंवार राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेव्दारे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सबंधित विभागांना यापुर्वीच केल्या आहेत. तरीसुध्दा बँकेची शाखा सुरु करत नसल्याने ग्रामस्थातुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत,

गावांतील लोकांना राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार करण्यासाठी परंडा,बार्शी,भुम,येथे किमान 23 किलोमीटर व मानकेश्वर येथे 11 किलोमीटर जावे लागते. केंद्र व राज्य शासनांच्या अनेक योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी. शासनाच्या विविध कर्जयोजनांचा लाभ घेण्यासाठी, शेती पीककर्जासह सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी तसेच महत्वाच्या इतर बाबींसाठी नेहमीच बँकेची गरज लागत असते.
म्हणुन राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी. त्यासाठी जागेपासून हवी ती मदत देण्यास आम्ही तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत व गावचे सरपंच नवजीवन चौधरी यांचे म्हणणे आहे. गावच्या अडचणी लक्षात घेऊन. गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी आम्ही नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करत आहोत. गावात बँक यावी म्हणुन जवळा नि गावासह आजूबाजूच्या गावांचे ठरावही करून दिले आहेत. राष्ट्रीयीकृत बँक गावची खुप महत्वाची गरज असल्याने लीड बँकेने,जिल्हाधिकारी साहेबांनी,मुख्यमंञी महोदयांनी ग्रामस्थांच्या अडचणींचा व एन.डी.एम.जे.संघटणेच्या मागणीचा विचार करून जवळा नि गावात नव्याने राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद मार्फत मुख्यमंञी महोदयांना केली आहे सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांची स्वाक्षरी आहे

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

नातेपुते (प्रमोद शिंदे)-मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये
शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी मनोज दोशी, विक्रम रणवरे,भगवान पालवे, सुर्वे सर, दैवत वाघमोडे सर, देशपांडे सर, हांगे सर उपस्थित होते.मनोज दोशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे नियोजन आठवी इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया दोशी आभार प्रदर्शन विशाखा तोरणेने केले. तर स्नेहा नारनवर व रवींद्र काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दहिगाव व एकशिव येथे जिवन उन्नती अभियान अंतर्गत H.B कॅम्प कार्यक्रम उत्साहात

नातेपुते( प्रमोद शिंदे) -हिगाव व एकशिव तालुका माळशिरस येथे जिवन उन्नती अभियान अंतर्गत H.B कॅम्प कार्यक्रम उत्सा.दहिगाव व एकशिव येथे 18 व 19 डिसें. रोजी उमेद अभियानाद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनमोल व जिजामाता ग्रामसंघातील महिला व किशोरवयीन मुलींचा हिमोग्लोबिन दहिगाव मधील 150 महिला व एकशिवमधील 120 महिलांची बचत गटा मार्फत मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी C.C अमित सर,C.C प्रताप वाघमोडे सर,सेंद्रिय शेती व्यवस्थापक गौरी गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये महिलांना पैशाची बचत, सक्षमीकरण,शाश्वत उपजीविका,आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनेमध्ये तसेच शिक्षण आरोग्याची काळजी पंचायत राज संस्थेमध्ये सहभाग घ्यावा हा उमेद अभियानाचा मूळ उद्देश आहे.यावेळी C.T.C ज्योशना साळवे,C.R.P वंदना खिलारे, कुसुम काळे, लेखापाल कुलकर्णी मॅडम,गौरी सोरटे,टेक्निशियम जाडकर मॅडम, दुर्गुडे मॅडम,तांबिले मॅडम, जगताप मॅडम, सूळ मॅडम व ई महिला उपस्थित होत्या.

माळशिरस तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी शरद पवार यांना अक्षय भांड यांचे निवेदन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -बारामती  गोविंद बाग येथे अक्षय भांड व सहकाऱ्यांनी मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली भेटीदरम्यान*माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्ना वर चर्चा केली केली,त्यात प्रामुख्याने माळशिरस तालुक्यात M.I.D.C होण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे माळशिरस तालुक्यातील तरूणांना M.I.D.C मुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि माळशिरस तालुक्यातील व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, या सर्व वर्गाचा दर्जा सुधारेल , तसेच नातेपुते ते सरकारी काँलेज होस्टेल करण्यात यावे  तालुक्यातील कारखान्याच्या परिस्थिती मुळे शेतकरी वर्ग पुर्ण पणे कोलमडून पडला आहे. त्यामध्ये दुय्यम वर्गाचे,तसेच व्यापारी, या सर्वांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे तालुक्याचा विकास पुर्ण पणे थांबला आहे  या सर्व मागण्यांचा विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.  या सर्व बाबींवर लक्ष घालू असे आश्वासन मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तरुणांना दिले निवेदन देताना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते पै.अक्षय भांड,डॉ. सुनील लोखंडे,विधान सभा युवक अध्यक्ष सुमित पवार,आकाश कापसे,लखन चांगण,ओम लाळगे,आकाश भांड,साहिल आनपट व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed