Uncategorized

*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीनेजीवनावश्यक वस्तूंचे वाटप *

*आद्यक्रांतिवीर भटके-विमुक्त संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*नातेपुते (प्रमोद शिंदे)-शिवपुरी तालुका माळशिरस  येथे  आद्य क्रांतिवीर  भटके-विमुक्त  संघटनेच्यावतीने 75 किराणा किट व मास्क सेनिटायझर चे वाटप करण्यात आले वाटप करताना शासनाच्या नियमांचे पालन करून हे वाटप करणात आले तसेच सर्व पत्रकारांचे  विशेष सत्कार करण्यात आले या वेळी एकशिव गावचे मा.सरपंच मा श्री.शहाजीदादा धायगुडे, अध्यक्ष लखनभाऊ चव्हान,मा.श्री.गुणवंत पाटील, ग्रा.सदस्य दशरथ जाधव,अय्याज मुलाणी,किरण जालोदे, पोपट, एन डी एम जे  तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, गुरसाळे गावचे सरपंच राहुल जगताप व शिवपुरी शाखेचे अध्यक्ष राहुलभाऊ सरगर, उपाध्यक्ष श्रीकेश वरूडे, खजिनदार महेश कांबळे,व सर्व सभासद ,किरण खरात, कुलदीप खांडेकर,सुमित चँकेश्वरा,प्रतीक वरूडे,अनिस मुलाणी,आसिफ मुलाणी,रुपेश वाघमारे, वाहिद मुलानी किसन रुपनवर सर्व शिवपुरी ग्रामस्थ उपस्तीत होते कार्यक्रमाचे सूत्रसनचन श्रीकेश वरूडे यांनी केले.

महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त आयोजीत शिबिरात 126 रक्तदान

महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त आयोजीत शिबिरात 126 रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन *मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे सदर आवाहानास महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने *डॉ. धवलसिंह मोहिते पाटिल* यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत याच अनुषंगाने मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिंदे यांचे वाढदिवसा निमीत्त अकलुज येथील राणे हाॅस्पीटल येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले होते . या शिबीरामध्ये माळशिरस तालुक्यातील मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य इतर सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष व सर्व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.यामध्ये 126 रक्तदात्यांनी रक्तदान केले महेश शिंदे यांना अनेक मान्यवरांनी विकास दादा धाईंजे वैभव गीते सतीशनाना पालकर रोहन भैया सुरवसे पाटील ऍडव्होकेट बाबजी वाघमोडे विजय काका सगर अशा अनेक वरिष्ठ लोकांनी भेटी दिल्या समक्ष व सुजयभैया माने पाटील तसेच श्रीलका (माँ) पाटील व अनेक वरिष्ठ मित्र परिवारांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीराचे उदघाटन उपस्थीत सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले शिबीर यशस्वी करण्यासाठी

इत्यादींनी परिश्रम घेतले.
सदर रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बॅंकेचे

यांचे विशेष सहकार्य लाभले
या शिबीर मध्ये सहभाग घेतलेबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश शिंदे यांनी मानले.

नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा

नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा*
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते तालुका माळशिरस परिसरात पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहेत वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना चांगला तडाखा बसला आहे. पावसासह वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यात शेतामध्ये उभी असलेली पिक कोसळले आहेत त्यामध्ये केळी मका अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या कोरोना चा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे गेली तीन महिने पासून शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे त्याला भाव नाही त्यामुळे आधीच तो अडचणीत आला आहे त्यात आता या वादळा वाऱ्याने तडाखा दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाले असून प्रामुख्याने शेती ही त्याच्या उपजीविकेचे साधन असून त्या शेतीवर कोरणा मुळे संकट आले आहे व आता निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर कोपत आहे. अशात शेतकऱ्याने करायचं तरी काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे? शेतकऱ्यांकडून सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी शासनदरबारी होत आहे परंतु शासन या शेतकऱ्यांची दखल घेणार का? हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

नांदुसा खुन प्रकरनातिल आरोपिंना फासी द्या…

.

नांदुसा खुन प्रकरनातिल आरोपिंना फासी द्या….

हिंगोली जिल्ह्या आत्याचार प्रवन क्षेत्र घोषित करा…

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेची मागनी…

काल दिनांक २१/०५/२०२० रोजी नांदुसा येथिल बोद्ध समाजातिल अकरा वर्षिय निरागस प्रियंका कांबळे या चिमुकलिचा त्यांच्या गावातिल बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याने घरात घुसुन धार धार शस्त्राने गळा कापुन निर्घुन खुन केला त्या अनुषंगाने आरोपी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याच्यावर गुन्हा क्रंमांक ००९२/२०२० भा.द.वी. ३०२ व अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या कलम ३(२)५) नुसार पोलिस स्टेशन बासंबा येथे दाखल करन्यात आला असुन गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बालाजी वैजने हे करित आहेत,
घटनेची माहिती मिळताच नॅशनल दलित मुव्हमेंट फार जस्टीस (NDMJ) संघटनेच्या पदाधिकार्यांनी अॅड डाॅ. केवल उके, मा. वैभवजी गिते व पि. एस. खंदारे यांच्या आदेशाने पिडित कुटुंबाची भेट घेऊन पिडितांचे सात्वन केले, पिडित कुटुंबाला धिर दिला व जो पर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होन्यासाठी पोलिस प्रशासन स्तरावर व न्यायालईन स्तरावर शेवट पर्यंत पाठपुरावा करन्याचे व शेवट पर्यंत पिडितांसोबत आसल्याचे आश्र्वासन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी दिली…
व तात्काळ पोलिस अधिक्षक हिंगोली व उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली (ग्रामिन) यांची भेट घेउन सदर गुन्ह्याचा तपास दोन महिन्याच्या आत पुर्न करून दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल करन्यात यावे,
पिडित कुटुंबियाच्या जिवितास धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलिस संरक्षन देन्यात यावे,
सदर खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्टात) चालऊन आरोपिला फासी देन्यात यावी, गुन्ह्याचा तपास गुनवत्तेवर आधारित करून सदर गुन्ह्यामध्ये पोस्को व ईत्तर कलमानुसार कलमवाढ करून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पुरावेकामी जप्त करन्यात यावेत, सदर खटला अंडरट्रायल चालवन्यात यावा,
हिंगोली जिल्ह्या आत्याचार प्रवन क्षेत्र घोषित करून अनुसुचित जाती अनुसुचित जमाती चर्याइ व्यक्तीवर आत्त्याचार होऊ नयेत म्हनुन सर्व प्रकारच्या उपाय योजना करन्यात याव्यात आशा मागनिचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पोलिस अधिक्षक हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली (ग्रामिन) सहाय्यक आयुक्त हिंगोली यांना प्रत्यक्ष भेटुन दिले आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ हाफिज अ हादी, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, जिल्हा संघटक विजय आनंता दिपके प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, कामगारांचे नेते महेंद्र आत्माराम दिपके, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शिवाजी ईंगळे, सेनगाव तालुकाध्यक्ष दिलिप अंबादास लाटे, अॅड चौरे, हिंगोली तालुकाध्यक्ष रवी श्रिरंग इंगोले, जटाळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वक्षर्या आहेत….

https://youtu.be/W3n2g2TRn6Q आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात रहा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल जाहिरात आणि वाचण्यासाठी संपर्क साधा 9975903040, 77 70076737🖋आमच्या चॅनला सबस्क्राईब करा 👍🏻बेल आयकॉन 🛎 दाबून नोटिफिकेशन मिळवा*

मौजे पिंपरी ता.माळशिरस येथे गरीब व गरजू नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मौजे पिंपरी ता.माळशिरस येथे गरीब व गरजू नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने मौजे पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच व सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती विकास दादा धाईंजे यांच्या व मनसेचे जिल्ह्याचे नेते आप्पासाहेब कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत गहू तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गीते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे,संभाजी साळे व मंगेश भागवत उपस्थित होते सदर कार्यक्रम पिंपरी ग्रामपंचायतीच्या समोर घेण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकी झेंडे यांनी पिंपरी गावातील ग्रामस्थांना मदत करावी अशी मागणी केली होती वाल्मिकी झेंडे व मुकेश झेंडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली यावेळी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
कोरोना covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे अशा परिस्थितीत हाताला काम नसल्याने मजूर गरीब व गरजू नागरिक आबालवृद्ध निराधार नागरे नागरिक यांची उपासमार होऊ नये म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्तीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गीते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने माळशिरस तालुक्यात जात-पात न पाहता गरीब व गरजू नागरिकांना मदत केली जात आहे.

एन.डी.एम.जे.च्या अध्यक्षा कडून पिरळे ग्रामपंचायतीस थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट

एन.डी.एम.जे.च्या अध्यक्षा कडून पिरळे ग्रामपंचायतीस थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पिरळे येथील एन डी एम जे चे अध्यक्ष तथा साई उद्योग मॅनेजर प्रमोद शंकर भोसले यांनी पिरळे ग्रामपंचायत व covid-19 समिती यांना 15000 रुपये किमतीची थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट दिली आहे covid-19 कोणाचा देशात व महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डॉ.केवल उके वैभव गिते व विकास दादा धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य विविध प्रकारे मदत केली जाते. तसेच आज त्याच्या मार्गदर्शनाखाली पिरळे येथील अध्यक्ष तथा साई उद्योग मॅनेजर प्रमोद शंकर भोसले यांनी थर्मल स्कॅनिंग मशीन भेट दिली आहे जेणेकरून गावात येणाऱ्या नवीन लोकांची व korantain करण्यात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास सोयीस्कर जावे. हे मशीन प्रमोद भोसले यांनी पोलीस पाटील औदुंबर बुधावले तलाठी कपिल मसल खांब ग्रामसेवक रमेश जमदाडे यांच्या स्वाधीन केले यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे पाटील,दशरथ जाधव, महादेव शिंदे, प्रल्हाद साळवे, समितीतील सदस्य उपस्थित होते. या केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वतःच्या घासातील घास गरिबांना काढून देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे….वैभव गिते

स्वतःच्या घासातील घास गरिबांना काढून देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे….वैभव गितेन्यूज पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी ऊसतोड मजूर,झाडे झुडपे तोडून कोळसा पाडणारे आदिवासी महिला पुरुष लहान मुलाबाळांसह परजिल्ह्यातुन यापूर्वीच आलेले आहेत.त्यांची उपासमार होऊ नये भुकेने हाल होऊ नयेत म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी कार्यकर्त्यांना स्वतःला मिळालेल्या रेशनपैकी अर्धे रेशन (धान्य) गरीब व गरजूंना द्यावे अशी घोषणा केली होती वैभव गीतेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवपुरी गावच्या कुसुम अड्याप्पा कांबळे,महालुंग गावच्या सिंधू विक्रम सोनवणे,संगीता युवराज भोसले मिरे गावच्या कल्पना अरुण नावगिरे,करोळे गावच्या बाळाबाई मच्छिंद्र नवगिरे,गिरवी गावच्या शेसाबाई मच्छिंद्र सावंत,लोणंद गावच्या सुमन भीमराव झेंडे,कुरबावी गावच्या रत्नप्रभा तानाजी गिते,धर्मपुरी गावच्या नीला नारायण झेंडे,कारूंडे गावच्या ताई बाजीराव गायकवाड,अंजना नंदकुमार गायकवाड,कोथळे गावच्या हिराबाई संभाजी भोसले,
फोंडशीरस गावच्या मंगल जगन्नाथ खरात या सर्व महिलांनी स्वतःच्या कुटुंबास रेशनचे मिळालेले प्रत्येकी 25 किलो धान्य गोरगरीब गरजू ऊसतोड मजुरांसाठी झाडे झुडपे तोडून कोळसा पडायला आलेल्या आदिवासींना दिले.विशेषतः ज्या महिलांनी हे धान्य मजुरांसाठी दिले त्या सर्व महिला सुद्धा गरीब घरातीलच आहेत परंतु त्यांची नाळ फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी जोडली गेली असल्याने गरिबीचे चटके व भुकेच्या यातना काय असतात हे या महिलांना माहीत आहे म्हणूनच आपल्या घरात दिवा लावण्याअगोदर शेजारची चूल पेटली आहे का हे पाहणे खूप गरजेचे असते.या महिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अडचणीत सापडलेल्या मजुरांना केलेल्या मदतीचे जगातील कोणत्याही मापाने मोल होऊ शकत नाही.
वैभव गिते या लोकप्रिय नेत्याने केलेल्या आवाहणास जनतेने भरभरून दिलेला प्रतीसाद पाहता गोरगरीब जनतेला मदत करण्याचा माळशिरस तालुक्याचा पॅटर्न महाराष्ट्रभर झाल्यास एकही गरीब मजूर उपाशी राहणार नाही असे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवलजी उके यांनी म्हंटले तसेच गरिबांनी गरिबांना केलेली मदत पाहून डोळे पाणावले असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते विकास दादा धाइंजे यांनी केले
जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून स्वतःच्या घासातील घास गरीब मजुरांना देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे असे वैभव गिते यांनी सांगितले.

नातेपुते येथील एक हात मदतीचा घरपोच जेवण योजनेचा प्रांत व तहसीलदार यांच्याकडून कौतुक

नातेपुते येथील एक हात मदतीचा घरपोच जेवण योजनेचा प्रांत व तहसीलदार यांच्याकडून कौतुक*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथे अहिंसा सेवा समिती व माऊली पाटील मित्रपरिवार यांच्यावतीने एक हात मदतीचा घरपोच जेवण योजना  सहा एप्रिल पासून सुरू आहे . सध्या covid-19 कोरोना मुळे संपूर्ण देशामध्ये लॉक डाउन असल्यामुळे गोरगरीब हातावरती पोट भरणाऱ्या मोल मजूर लोकांचे हाताला काम नसल्यामुळे उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन माऊली पाटील मित्रपरिवार व अहिंसा सेवा समिती पंचायत समिती सदस्य माऊली पाटील व अविनाश दोशी यांच्या पुढाकाराने एक हात मदतीचा घरपोच जेवण ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत दररोज एक हजार ते बाराशे लोकांना घरपोच जेवण दिले जाते जो पर्यंत  लॉक डाऊन संपत नाही तोपर्यंत हे घरपोच जेवण सुरू ठेवणार असल्याचं माऊली पाटील व अविनाश दोशी यांनी सांगितले तसेच नातेपुते येथील या उपक्रमाच्या ठिकाणी प्रांत अधिकारीसो शाम पवार मॅडम,व तहशीलदार अभिजीत पाटिल,यांनी भेट दिली त्यानी या उपक्रमचे कौतुक केले.व ते म्हणाले की नातेपुते येथील युवकांचे आदर्श इतरानी घेऊन गारजून मदत केली पाहिजे.या योजने साठी नातेपुते येथील व्यापारी वर्ग व दानशुर दाते मदत करतात.हे जेवन मिळण्य साठी एकदिवास अगोदर कॉल करवा लागतो यासाठी संदीप ठोम्बरे, महावीर दोशी, शुभम पलंगे,राहुल पांढरे, शब्बीर आर्ट्स, दत्ता सोरटे, माऊली शिंदे, बाबा काळे, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच या उपक्रमासाठी अहिंसा सेवा समिती, माऊली पाटील मित्र परिवार,साई सेवा दल,नातेपुते येथील युवक परिश्रम घेत आहेत.

अहिंसा सेवा समिती व माऊली पाटील मित्र परिवार साई साई सेवादल चे कार्यकर्ते जेवणाचे पॅकेट बनवतात

लॉकडाऊन च्या काळात मजुरांचे भुकेने हाल होऊ देणार नाही एन डी एम जे चे वैभव गिते यांनी मजुरांची घेतली जबाबदारी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे परराज्यातुन आलेल्या ऊसतोडनी कामगार गरीब व गरजू व्यक्तींना ऍड.डॉ.केवलजी उके, एड. गजान चव्हाण,ऍड  अनिल कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनात गहू तांदुळ धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे नेते नितीन धायगुडे यांच्या उपस्थितीत कुरबावी गावचे पोलीस पाटील कुलदीप दनाने पाटील ग्रामसेवक काळे यांच्या देखरेखीखाली सर्व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी विशाल साळवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लॉक डाऊन च्या काळात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे व तालुका प्रशासनाचे आभार मानले.रासपचे नेते नितीन धायगुडे यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचने मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केल्याने कौतुक केले.गोरगरिबांना मदत करणे हीच खरी सेवा आहे असे म्हंटले आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी माळशिरस तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या मजुरांची हेळसांड होऊ देणार नाही महापुरुषांचा जयंती महोत्सवानिमित्त प्रत्येक गरजु व्यक्तीस अन्न धान्याचे वाटप करण्यात येणार आहे असे म्हंटले.धान्य मिळालेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.धान्य वाटपाचे संयोजन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी केले तर प्रमोद शिंदे व दत्ता कांबळे यांनी मोलाची साथ दिली. तसेच हे वाटप सोशल डिस्टन्स चा नियम पाळून शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून करण्यात आला.

You may have missed